माझं नाव 'कांचन' :-)

Submitted by जिप्सी on 5 April, 2012 - 00:15

योरॉक्सच्या "शाल्मली"ला भेटायला आली "कांचन" फॅमिली. Happy
अंजनी, उर्वशी, गायत्री इ. आहेतच, त्यासुद्धा सावकाश येतील भेटायला. Wink

"पांढरा कांचन" (Bauhinia acuminata)
प्रचि ०१

प्रचि ०२
"जांभळा कांचन"
प्रचि ०३

प्रचि ०४
दुर्मिळ "पिवळा कांचन" (Bauhinia tomentosa)
प्रचि ०५
"गुलाबी कांचन" (रक्तकांचन)
प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

गुलमोहर: 

वाह मस्तच ! एक संपुर्ण झाडाचाही टाकायचा होतास कि रे. फुलं तर सुंदरच टिपली आहेस तु, पण लांबुन ते रंगित झाडही काय सुंदर दिसतं. एक टाकच प्लीज (हा माझा हावरटपणा Happy )

सह्ही! सह्ही!! सह्हीच!!!!

पांढरा कांचन सगळ्यात जास्त आवडला Happy

सुंदरच रे.
तूझ्याकडे लाल कांचनाचा पण फ़ोटो आहे.
शिवाय जांभळ्या रंगात, आणखी एक गडद छटा असते,
गोव्याला झाडे आहेत त्याची. कधी आपट्याच्या फुलांचा
फ़ोटो मिळाला तर संग्रही ठेव. फरक दाखवायला उपयोगी
पडतो तो.

धन्यवाद लोक्स Happy

ही फुले सुवासिक असतात का?>>>>नाही बित्तु, याला विशेष असा सुवास नसतो. Happy

ह्याचे नाव कचनार आहे. मराठी नाव कांचन नाही. ते हिन्दी नाव झाले.>>>>>बी, हिंदी नाव "कचनार" आहे ना? आणि मराठी नाव "कांचन"?

ह्या झाडाची पाने आपट्याच्या पानांसारखीच दिसतात. मला सुरवातीला कित्येक महिने हे आपट्याचे झाड नाही हे माहिती झाले नाही.

http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/124996.html?1176484849

जिप्स्या, वरच्या लिंकवर ५ एप्रिल २००७ च्या पोस्टमधे मी काढलेला जांभळ्या कांचनाचा फोटो आहे. हा फरक छटेचा आहे कि प्रकाशामूळे असे दिसतेय ?

हा फरक छटेचा आहे कि प्रकाशामूळे असे दिसतेय ?>>>नक्कीच छटेचा Happy

रागवू नकोस.>>>>नाही, बिलकुल नाही. Happy पण तुम्ही दिलेली विकीची लिंक हिंदीमध्ये आहे आणि त्यात कचनार असाच उल्लेख आहे. Happy

अजुन एक संदर्भ Happy
१. "कच्ची कली कचनार की तोडी नही जाती" — हिंदी गाणे
२. अंजन, कांचन, करवंदीच्या काटेरी देशा, प्रणाम माझा घ्यावा महाराष्ट्र देशा — मराठी गाणे Happy

अंजन, कांचन, करवंदीच्या काटेरी देशा, प्रणाम माझा घ्यावा महाराष्ट्र देशा — मराठी >> खरे तर ही ओळ कितपत लागू आहे महाराष्ट्राला? कारण कांचन कितीतरी ठिकाणी आढळतो.

पण तुझे बरोबर आहे. कांचन हे मराठी नाव आहे. कचनार हिंदी.

Pages