लोकसभा निवडणुका २०१४

Submitted by नंदिनी on 5 March, 2014 - 00:50

आज लोकसभा २०१४ निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. ७ एप्रिलपासून निवडणुका घेतल्या जातील. आचारसंहिता लागू झालेली आहे.

निवडणुकासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी हा धागा. या निवडणु़का नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल व्यतिरीक्त अजूनही हजारो लोक लढवत असतील तेव्हा निव्वळ या तिघांनाच सर्व फुटेज देऊ नये ही विनंती.

आपपल्या शहरतील, भागातील उमेदवारांविष्यी अधिक लिहिल्यास उत्तम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप वर्षे डोंबिवली, जास्त सुशिक्षित असणारे शहर (महाराष्ट्रातील), ओळखले जाते. लिंक मिळाली तर देते इथे.

sorry, २००९ मध्ये डोंबिवलीला हा मान होता, आता मी गुगल सर्चमध्ये गेले तर २०११च्या सेन्ससनुसार मुंबई उपनगर आहे सर्वात सुशिक्षित शहर महाराष्ट्रातील.

काल बंगालमधे आणखी एक निवडणुकीचा टप्पा पार पडला. त्यात बर्धमान आणि बीरभूम हे महत्वाचे जिल्हे होते. अपेक्षेप्रमाणेच अफाट म्हणजे अफाट सॉफ्ट रिगिंग झालं अशा बातम्या आहेत (म्हणजे उघड रक्तपात आणि हिंसाचाराविना). तृणमूलच्या अनुव्रत मण्डल नामक गुंड नेत्याने सगळं 'मॅनेज' केलं. अनेको ठिकाणी केंद्रसरकारी सुरक्षा दलं नव्हती, स्थानिक लोकंच प्रीसायडिंग ऑफिसर्स होती, गावोगावच्या विरुद्ध पार्टीच्या मतदारांना धमकावून घरातून बाहेरच पडू दिलं नाही, इ.
आजच्या वृत्तपत्रांनी अगदी तपशीलात बातम्या दिल्या आहेत, पण इलेक्शन कमिशन कितपत दखल घेणारे माहित नाही.

तृणमूलपुढे सीपीएम हीसुद्धा निष्पाप बालकांची संघटना वाटावी अशी काहीशी सध्याची परिस्थिती आहे.

आजपर्यंत याबाबतीत फक्त एकाच शहराची ही ख्याती ऐकून होते.

>>>
डेलिया तुला पुणेच म्हणायचे आहे. उगीच ताकाला जाऊन गाडगे लपवण्यात काय अर्थ आहे? Happy पुणे हे निव्वळ सुशिक्षितच नव्हे तर चोखंदळ ,शहाणे, ज्ञानी, स्पष्ट्वक्ते शहर आहे. शहाणपणातला तो शेवटचा शब्द आहे. पुण्यात प्रत्येकाला एक मत असते आणि ते ठाम असते. सत्य त्याच्यापलिकडे असूच शकत नाही त्या अर्थाने पुणेकर खर्‍या अर्थाने 'मत' दार आहेत. पुणेकर चोखंदळ असल्याने जे पुण्याने स्वीकारले ते जगभर स्वीकारले जाते व त्याला पुण्याचा म्हणून एक दर्जा असतो असे (पुण्यात ) म्हटले जाते. या पुणेकरांनी चोखंदळपणे , डोळसपणे कलमाडी, रावत, ल सो जोशी, दीपक मानकर, आन्देकर, निम्हण , सभागृहात खुर्च्या तोडणारे मठकरी, असे महान प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत.....

http://www.census2011.co.in/facts/highcityliteracy.html
पहिल्या क्रमांकावर गाझियाबाद (उ.प्र.) एकूण साक्षरता १००.५४%, पुरुष ९३.३१% महिला १०८.६७%
सेन्ससमध्ये सुशिक्षितपणाचे नव्हे तर साक्षरतेचे आकडे आहेत असे दिसते.
जनगणना अहवालात मला जिल्हेवार आकडेवारी दिसली ज्यात बहुतेक मुंबई नगर जिल्ह्याची साक्षरतेची टक्केवारी सर्वाधिक आहे. डोंबिवली हे उपनगर आहे. जिल्हा नाही किंवा शहरही नाही. त्याचा क्रमांक कुठून मिळाला?

गझियाबाद महान जिल्हा आहे.
१०० मधल्या १०८ स्त्रिया साक्षर आहेत.
महान आकडेवारी आहे.
कशी काढली?

म्हणजे पोलिओ डोसिंगचे समजू शकतो की जिल्ह्यात १०० बालके रजिस्टर्ड आहेत आणि १०४ बालकाना डोस मिळाले कारण
बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे काही त्यादिवशी गावात पाहुणी आली , काही नव्याने जन्मली.

मात्र एकेक बाई नोंदवून तिला लिहिता वाचता येते की नाही हे बघताना १०० बायांपैकी १०७ जणींना कसे बरे लिहिता वाचता येत होते?

डोंबिवलीबद्दल मला फेसबुकवर आले होते, डोंबिवली फोरमकडून पण मग मी २०११च्या सेन्ससची महाराष्ट्रासाठीची लिंक बघितली त्यात मुंबई उपनगर पहिल्या नंबरवर आहे, मी फक्त महाराष्ट्राबद्दल बोलत होते. मी शेअर करते इथे ती पोस्ट.

पुन्हा एकदा सांगतो. मुंबई उपनगर हा एक जिल्हा आहे. मगाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा हे बरोबर.
डोंबिवली हे एक उपनगर आहे.(शहर नाही) ठाणे जिल्ह्याचा एक भाग आहे.

वरती लिंक दिली आहे, त्यावरून मी म्हणत होते. मान्य डोंबिवली उपनगर आहे, ठाणे जिल्ह्याचे पण ते शहरपण आहे, नक्कीच ठाणे मोठे शहर आहे.

Pages