लोकसभा निवडणुका २०१४

Submitted by नंदिनी on 5 March, 2014 - 00:50

आज लोकसभा २०१४ निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. ७ एप्रिलपासून निवडणुका घेतल्या जातील. आचारसंहिता लागू झालेली आहे.

निवडणुकासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी हा धागा. या निवडणु़का नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल व्यतिरीक्त अजूनही हजारो लोक लढवत असतील तेव्हा निव्वळ या तिघांनाच सर्व फुटेज देऊ नये ही विनंती.

आपपल्या शहरतील, भागातील उमेदवारांविष्यी अधिक लिहिल्यास उत्तम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

५६ नवीन लोकांना संधी नसती दिली तरी भाजपने आता जेवढे उमेदवार दिले साधारण तेवढेच दिले असते मात्र नव्याने आलेल्या लोकांमुळे काही ठिकाणी विजयाची शक्यता वाढली आहे.उदा. नंदुरबारमध्ये कॉंग्रेसच्या माणिकराव गाविताना हरवणे खूप अबघड होते तिथे डॉ. हीना गावित आल्याने भाजपची स्थिती नक्कीच सुधारली आहे.
या ५६ मध्ये माजी लष्कर प्रमुख व्ही के सिंग, माजी पोलिस कमिश्नर सत्यपाल सिंग असे लोक पण आहेत. अश्यांना संधी मिळतेय हे चांगलेच आहे की. असे नवीन लोकांना पक्षात घेवून तिकीट देणे वगैरे सगळ्याच पक्षात होत असते.

अच्छा ... कर्तुत्वाने जिंकता येत नाही तिथे घरका भेदी निर्माण करायचे (थोडेफार काँग्रेस सारखेच म्हणजे .. मग कुठे आहे पार्टी विथ डिफ्रन्स) Wink

क्~ओंग्रेसचा धुव्वा उडणार हे तर उघडच आहे. पण भाजपच्या मतांची विभागणी करण्याचे काम आप करणार आहे. त्यामुळे भाजपला २०० सीट मोठ्या मुश्किलीने मिळतील....

जर असे झाले तर मग गटबंधन हा प्रयोग करावा लागेल. जवळपास ८० सीटा जमविताना मायावती, मुलायम, ममता, नितिश कुमार यांची मदत घ्यावी लागेल.

ही लोकं तेंव्हाच मदत देतील जेंव्हा भाजप मोदीला बाजूला सारुन दुसरा नेता उभं करेल. ही परिस्थीती निर्माण होण्याची दाट शक्यता असून राजनाथ सिंह या शर्यतीत नाहीत... मग उरते सुषमा स्वराज.

माझ्या मता प्रमाणे भाजप २०० च्या टप्प्यात अडकेल व मोदी बाजूला फेकला जाऊन सुषमा स्वराज पंतप्रधान बनेल!

भाजप पुरेपूर काळजी घेत आहे. तेलंगण राष्ट्रीय समिती आणि तेलगु देसम पक्ष ह्या दोन्ही बरोबर होऊ पाहणारी युती हे ह्याचेच द्योतक आहे. आयात केलेले बलिष्ठ उमेदवार, निरनिराळ्या पक्षान्बरोबर युती ह्यावरून त्यांना सत्तेत येण्याची घाई झाली आहे हे दिसत आहे.

परंतु, सर्वसमावेशक नेतृत्वाचा अभाव, दक्षिणेत असलेला सामान्य प्रभाव हि नक्कीच त्यांची उणीव आहे.

उत्तर प्रदेश ह्या सर्वात कळीचा आहे. तिथे पश्चिमेकडे मुझ्झ्फरनगर दंगलींमुळे आणि पुर्वांचलात मोदींच्या प्रभावामुळे यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. पण मध्य उ. प्र. मध्ये कमकुवत भासत आहे. अमेठी, रायबरेली, कानपूर, फुलपूर हे कॉंग्रेसचे बालेकिल्ले आहेत. आणि सक्षम ब्राम्हण उमेदवारांच्या अभावामुळे ते कमी पडत आहेत असे दिसते.

http://www.ndtv.com/elections/article/election-2014/polls-predicting-bjp...

हंम्म म्हणजे कार्पोरेट वल्ड काँग्रेस सोबत नाही असे त्यांना सुचवायचे आहे बहुदा. मजा आहे. एक म्हणतो आम्ही विकास केला, दुसरा म्हणतो आमच्यासोबत कार्पोरेट वल्ड नाही.

आज कोथरूडात अनिल शिरोळ्यांची सभा आणि रॅली झाली.. आज संध्याकाळभर इथे रिक्षा पण फिरत होत्या... त्या नक्की कोणाच्या ते कळलं नाही स्पष्ट ऐकू येत नव्हतं..
प्रचाराला चांगलाच जोर धरू लागलाय. !

आज संध्याकाळभर इथे रिक्षा पण फिरत होत्या... त्या नक्की कोणाच्या ते कळलं नाही स्पष्ट ऐकू येत नव्हतं.. >>> Lol त्यांचा उद्देशच फेल गेलेला दिसतोय पराग. कदाचित पब्लिक ही हा नॉइज इग्नोर करायला सरावले असतील Happy

बीजेपी चा आधीचा नारा :-
मंदिर वही बनायेंगे
पर तारीख नही बतायेंगे

बीजेपी चा आताचा नारा :-
सरकार हम ही बनायेंगे
पर "मेनिफीयेस्टो" नही बतायेंगे

नाही खरंच तसंच होत आहे. कोथरुडमध्ये फिरणार्‍या रिक्षा कोणाला मत द्यायला सांगत असतात तेच समजत नाही आहे. नुसत्याच केकाटत फिरतायत सध्या. पक्षातील बेबनावामुळे कार्यकर्ते गोंधळत नसतील इतक्या त्या रिक्षा गोंधळलेल्या आहेत.

कॅ कॅ कॅ कॅ असा आवाज करत पाच मिनिटे कोकलून नष्ट पावत आहेत.

बुखारी ने पाठिंबा काँग्रेस ला जाहीर केल्यावर भाजपाला ऐन निवडणुकीत बुखार चढला आहे..

२००४ साली याच बुखारी कडे भाजपाने पाठिंबा मागितलेला होता तेव्हा मतांचे ध्रुविकरण होत नव्हते तेव्हा बुखारी विकले नाही पण जसे काँग्रेस ला पाठिंबा दिला तेव्हा लगेच मतांचे ध्रुवीकरण झाले बुखारी विकले गेले म्हणुन भाजपा बेंबीच्या देठा पासुन बोंबलु लागला .. असे ही त्यांना सवयच आहे .

पुन्हा राममंदीर अयोध्या..

---------

कोब्रापोस्ट ने केलेल्या स्टिंग ऑपरेशन वरुन आता वादळ तापले .. भाजपाच्या बर्याच नेत्यांनी कबुल केले की वास्तु पाडणे ही पुर्वनियोजीत होती .. या स्टिंग चे खापर सहाजिकच काँग्रेस वर फोडले जात आहे परंतु तथ्य वेगळेच दिसुन येत आहे..

हे जे काही स्टिंग ऑपरेशन झाले हे सप्टें पासुन झालेले असे वाचण्यात आले .. त्यावेळेला सगळ्यांना माहीत होते की निवडणुका जाहीर होणार आहे एप्रिल मे मधे मग अश्या वेळेला कोण अश्या गोष्टीवर खाजगीत या सार्वजनिक बोलुन स्वतःच्या पायावर धोंडा मरुन घेणार आहे ? जिथे मोदी ने विकासाच्या गोष्टींवर भर देउन अयोध्याचा मुद्दा बाजुला ठेवलेला आनि सगळ्या भाजपाला सक्त ताकिद दिलेली की त्यावर बोलु नये म्हणुन मग मोदीचा सल्ला बाजुला करुन कोणी बोलेल का ? नाहीच बोलणार..... मग हे जे काही स्टिंग ऑपरेशन झालेले आहे ते जाणुन बुजुन केलेले दिसुन येते..

आठवा गुजरात च्या २००७ च्या निवडणुका . या वेळेला जिंकण्याचे चांसेस कमी झालेले ..ओपिनिअन पोल मधे जागा कमी झालेल्या दाखवत होते अश्यातच "कोब्रा पोस्ट" वाल्यांनीच (?) एक स्टिंग ऑपरेशन केलेले होते. यात मोदीचा खास माणुस आनि इतर कार्यकर्त्यांना२०००२ सालिच्या दंगलीवरचे प्रश्न विचारुन मोदींनीच पाठिंबा दिलेला अश्या प्रकारचा स्टिंग उघडकिस आलेला .. विरोधकांनी बराच हल्लाबोल वगैरे केला परंतु स्टिंग चा परिणाम असा झाला मतांचे ध्रुवीकरण झाले आणि जागा ज्या कमी झालेल्या त्या वाढल्या गेल्या. हे बरोबर स्टिंग नंतरच झालेले..

यंदा मोदी विकासाचे कार्ड खेळत आहे.. यातुन भाजपाला १८०-१८५ पर्यंत जागा मिळण्याचे शक्यता आहे परंतु बहुमत या सरकार बनण्याचे चांसेस कमी आहे. अश्यावेळेला जुने भाजपाचे अस्त्र "अयोध्या" बाहेर काढण्याचे सुचले ज्यावर काही दिवसांपुर्वीच मोदींनी "पिंक रेव्होल्युशन" सांगुन चुणुक दाखवलेली परंतु " अयोध्या" चे प्रकरण बाहेर सरळ भाजप काढु शकत नव्हती कारण त्याचा डाव उलटा पडला असता जर भाजपा सगळ्यांसमोर त्यावर काही टिप्पणी केली असती तर विरोधकांच्या तोंडी आपसुकच सापडली असती.. म्हणजे तु मारल्या सारखे कर मी ओरडल्यासारखे करतो..

म्हणुन ही राजकिय खेळी खेळली गेली....
यातुन भाजपाचा फायदाच होणार होता..

१) अयोध्याचे भाजपाने केले हा संदेश भाजपाचे नेते जाहिररित्या न बोलता जनतेत विशेषतः उत्तर प्रदेश परिसरात जाणार.. तिथल्या जागा भाजपासाठी महत्वाच्या आहेत

२) मुस्लिम वोट असे ही भाजपाला कमी मिळातात त्यात बुखारींनी काँग्रेस ला पाठिंबा दिला .. ज्या बुखारींकडे भाजपा २००४ ला पाठिंब्यासाठी गेलेली.. मग ध्रुवीकरण करायचे हेच हातात होते.

३) भाजपातील जुन्या नेत्यांना अयोध्या विषय जिव्हाळ्याचा आहे.. त्यामुळे यंदात्यावर नाही बोलाय्ला मिळाले अश्यांना या निमित्ताने संधी मिळेल

४) आता स्टिंग ऑपरेशन झाले म्हणजे आपसुकच या वर न्युज चॅनल वर बातमी तसेच चर्चा वगैरे घडवली जाणारच अश्या चर्चेत भाजप नेत्यांना त्यांचा गंड सुखवण्यास संधी मिळणार होती.. मनसोक्त चर्चे च्या नावाखाली कैच्याकै बोलायला रान खुले होणार होते.

५) विकासाचे पोकळ दावे दिलेले गेले होते त्यावर कधि ना कधी उत्तर द्यावेच लागणार होते.. अश्यावेळेला लोकांचे विचाराची दिशा बदलण्याकरिता या स्टिंग ऑपरेशन अत्यंत उपयोगी पडणार होते.

६) मॅनिफिएस्टो अजुन भाजपाला देता आला नाही त्यामुळे त्यांचे धोरण काय आहे हे एक कोडेच आहे .. स्वत:चे धोरण जाहीर करायचे नाही आणि इतरांच्या धोरणावर टीका करत बसायची हेच त्यांचे धोरण आहे हे आता स्पष्ट झाले.. यावर स्टिंग ची मदत घेउन स्वतःचे धोरणावर कमी चर्चा होईल आणि स्टिंग वर जास्त चर्चा होईल यावर जास्तितजास्त भर देण्यात आला आहे...

-----------------------------

उत्तरप्रदेश आणि बिहार मधे भाजपाला जागा सुरुवातीला कमी दाखवत होते. परंतु मोदीच्या सभेत स्फोट झाल्यानंतर बिहार मधे जागा वाढल्या भाजपाच्या .. तसेच मुज्जफ्फर नगर मधे दंगे झाल्यानंतर तिथे सुध्दा जागा वाढल्या .. हे न्युज चॅनल वरच दाखवले गेले आहे..

आता भाजपाचे जागा वाढवण्याचे काम इतर पक्ष कोणी करेल का ? Biggrin

करा विचार ..

आमच्या मतदारसंघात काँग्रेस -भाजपा साटेलोटे झाल्याने एकांगी लढत आहे. भाजप तर्फे ज्या उमेदवाराची हवा होती त्याला तिकीट न मिळता कुणा एका गरीब बिचार्‍याला तिकीट दिलंय.
भाजपाचा प्रचारच नाही.
त्यामुळे काँग्रेसला प्रचार करायची गरज नाही.
निवडणुकांदरम्यान बरेच पैसे - रोजगार मिळतील अशी खात्री असलेले गरीब लोक मात्रं हैराण झालेत.

मागच्या दोन निवड्णुकांचा आमचा अनुभव असा की रॅलीत / सभेत भाग घ्यायला पैसे मिळत असल्याने आणि घरपोच साड्या/ धोतरे आणि इतर मदत येत असल्याने गोरगरीब आठदहा दिवस दवाखान्यात येतच नाहीत.
म्हणून मग यावेळी आठ दिवस फिरायला जायचा प्लॅन केला आणि निवडणूकीच्या आदल्या दिवशी गावात परतायचे ठरवले.
Wink

तर सगळा पचकाच हो. पेशंट भरभरून येतच आहेत.
गावात काहीच हालचाल नाही म्हणे.
त्यात इथे आचारसंहिता खूप कडक राबवतायत.
एकहि पोष्टर/ कटाऊट नाही रस्त्यावर.

आमचे घर काँग्रेस उमेदवाराच्या शेजारी आहे.
आम्हाला वाटलं होतं किती त्रास होईल निवडणूकीत.
पण चारपाच गाड्या उभ्या असतात ते वगळता काही नाही.

विकेंडला पत्रकं आली घरी..
शिवाय राष्ट्र्वादीचं चिन्ह असलेल्या रिक्षेवर 'टिक टिकं वाजे डोक्यात...' लावलं होतं जोरात.. Proud

वक्तृत्वाच्या बळावर निवडणूका जिंकणे सोपे जाते. >>> तितकेसे खरे नाही. बाळासाहेब्, अटलजी, राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असे/ होते. पण मतं तितकी मिळत नाहीत.

आमच्याकडचे (नवी दिल्ली लोकसभा प्रभाग) उमेदवार काँग्रेसतर्फे सिटींग एमपी/क्रिडामंत्री अजय माकन (हे बहूतेक अर्बन डेव्हलपमेंट मंत्री पण होते), भाजपा तर्फे स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करणारी वकील मिनाक्षी लेखी, आपतर्फे पत्रकार आशिष खेतान, तृणमुल काँग्रेस तर्फे बिश्वजीत चटर्जी. आमच्याकडे शिवसेनाचा पण उमेदवार आहे (काल बाजारात फिरताना त्यांची जीप दिसली होती... बहूतेक धिरज गिरी नाव आहे त्या उमेदवाराचं.

अजय माकनचं गैरव्यवहारांमध्ये /भ्रष्टाचारामध्ये कधीच नाव आलं नाहीये. चांगली क्लिन इमेज आहे, बरेच खेळाडू रेडिओवर त्यांची स्तुती करायचे. मिनाक्षी लेखी आणि आशिष खेतानना पण चांगला सपोर्ट मिळतोय. कांटे की टक्कर होणार असं दिसतंय. दोनच दिवस राहिले आता मतदानाला. Happy

भाजपाचा जाहीरनामा आला.

याहूवरुन मिळालेला संक्षिप्त जाहिरनामा..

Following are highlights from the policy platform that the Hindu nationalist party hopes will secure a victory for its prime ministerial candidate, Narendra Modi:

Economic policy:

- BJP would not allow foreign direct investment in multi-brand retail.

- FDI would be allowed wherever needed for job and asset creation, including infrastructure.

- FDI would be allowed in selected defence industries.

- Would "rationalise and simplify" taxes.

- Would adopt a national General Sales Tax.

Social policy:

- To roll out low-cost housing programme to give every family a proper home within a decade.

- Will link welfare programmes like rural jobs schemes to "asset creation".

- Will review labour laws.

Infrastructure:

- Will build 100 new cities.

- Plans high-speed rail network.

Security:

- Would revise and update the nuclear doctrine.

Religious policy:

- Would explore possibilities of construction of Ram temple in Uttar Pradesh.

कल्याण मतदार संघातील चुरस आणखीच वाढली आहे. काल तर डोंबिवलीमध्ये अक्षरशः दिवाळीसारखी आतिषबाजी चालली होती सेना आणि मनसे कडून. परांजपे तर झाकोळूनच गेला आहे.

मागे राष्ट्रवादीशी जवळीक असलेले आणि सध्या मनसे बरोबर नजरबंदी करत असलेले कल्याण येथील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार या मतदारसंघात येथील स्थानिक आगरी भूमिपुत्र मतदारांची लोकसंख्या जवळपास ३ लाख आहे. त्यामुळे मनसे उमेदवार राजू पाटीलचा विजय जवळपास निश्चित. त्यांना भाडोत्री (स्थानिक लोक इतरांचा उल्लेख असाच करतात) लोकांच्या मतांची आवश्यकताच नाही.

या मतदारसंघात येथील स्थानिक आगरी भूमिपुत्र मतदारांची लोकसंख्या जवळपास ३ लाख आहे. >>> तेथील नगरसेवक आणि आमदारावरुन दिसुन येते मतदानाचा कौल नुसते आगरी असुन फायदा होत नाही..

नाशिक मधे खासदार राका चा आमदार मनसे चे आणि नगरसेवक भाजपाचे ......... या पध्दतीने विचार केला तर स्थानिक पातळीवर चे वेगळे आणि देशाचे राजकारण वेगळे

Pages