लोकसभा निवडणुका २०१४

Submitted by नंदिनी on 5 March, 2014 - 00:50

आज लोकसभा २०१४ निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. ७ एप्रिलपासून निवडणुका घेतल्या जातील. आचारसंहिता लागू झालेली आहे.

निवडणुकासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी हा धागा. या निवडणु़का नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल व्यतिरीक्त अजूनही हजारो लोक लढवत असतील तेव्हा निव्वळ या तिघांनाच सर्व फुटेज देऊ नये ही विनंती.

आपपल्या शहरतील, भागातील उमेदवारांविष्यी अधिक लिहिल्यास उत्तम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतदान करून आलो. सकाळी लवकर गेलो होतो, तोपर्यंत तरी आमच्या बुथवर रांगा लागल्या नव्हत्या. परत घरी जाताना रस्त्यात १-२ ठिकाणी छोट्याश्या रांगा दिसल्या.

ठाणे आणि कल्याण दोन्हीकडे सेनेला चांगली संधी आहे.कल्याणमध्ये राष्ट्रवादी ब्राह्मण मतदारांना चुचकारु पाहतेय (परांजपे ब्राह्मण म्हणून).तसेच सेनेत परांजपे, मनोहर जोशी वगैरे कसे उपेक्षित राहिले त्याचा प्रचार राष्ट्रवादीवाले करत आहेत.राष्ट्रवादी आणि संभाजी बिग्रेड कनेक्शन लोकांना माहित नाही अश्या भ्रमात हे लोक असावेत.राज ठाकरेंचा करिष्मा ओसरतोय.सभांना गर्दी कमी म्हणून भिवंडीसहित काही ठिकाणी त्यांना सभाच रद्द कराव्या लागल्या आहेत. सभेत बोलायला मुद्दे तेच तेच आहेत.नाकाला तरी किती कराव्यात आणि राजनाथ सिन्हांनी फटकारल्याने मोदी मोदी जप पण किती वेळ करायचा यावर मर्यादा येतील.आणि मोदींनाच पाठींबा देणार तर मग सेना-भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला मत का देवू नये असे लोकच मनसे कार्यकर्त्यांना विचारात आहेत.

रत्नागिरी-सिंधूदुर्गात निलेश राणे डेंजर झोनमध्ये आहेत.तिथे राष्ट्रवादीने उघडपणे राणेंच्या विरोधात भूमिका घेतली आहे.अजित पवार, शरद पवारांनी सांगितले तरी राणेंचा प्रचार करणार नाही असे कार्यकर्ते बोलत आहेत.ते सोडा कॉंग्रेसचेच आमदार विजय सावंत पण विरोधात गेल्याने महायुती तिथे जोरात आहे.मच्छीमारांचा आणि जमिनी हडप्ल्याने स्थानिकांचा रोष आधीपासून आहेच.राणेंना आत्तापर्यंतचे एकाधिकारशाही आणि दडपशाहीचे राजकारण भोवत आहे.सेनेने ही जागा जिंकली तर आश्चर्य वाटायला नको.

सिंधुदुर्गात हे कधी ना कधी होणारच होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ७/१२ आपल्याच नावावर करण्याचा हव्यास राणेला भारी पडणार. सेनेने ही जागा जिंकली तर एकंदरीत कोकण पट्टयात सेनेला उर्जितावस्था प्राप्त होईल हे नक्की. रत्नागिरी राष्ट्रवादीने पण अशीच भूमिका घेतेली तर निलेश राणेची धूळ्धाण ! आणि 'दादा' राणेचं राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकतं. अर्थात पैसा आणि ताकद याचा वापर राणे करणार हे नक्कीच. जितेंद्र आव्हाड शिष्टाईसाठी पुढे सरसावलाय अशी बातमी होती.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवार आणि शरद पवारांचे ऐकत नाहीत तर आव्हाड किस झाड कि पत्ती.राजीनामास्त्र उगारले गेले आहे. अर्थात पक्षात वरून पण याला मान्यता असणारच.पण उगाच दाखवण्यापुरते दटावायचे. फारतर शेवटच्या टप्प्यात काही कार्यकरते दाखवण्यापुरते वरून काम करतील आणि आतून करायचे तेच करतील.राणेंनी तिथे एनसीपी संपवायचा घाट घातला होता.कोकणातले एनसीपीचे आमदार केसरकर, उदय सामंत,भास्कर जाधव या सर्वांशी मोठमोठे खटके राणेंचे उडाले आहेत.आता तर कॉंग्रेसचेच आमदार विजय सावंत राणेंविरुद्ध जात असतील तर एनसीपी म्हणेल कि आधी तुमच्या पक्षाचे लोक कामाला लावून दाखवा मग आम्ही बघू.दुसरीकडे शिवसेनेने वैभव नाईकसारखा लढवय्या जिल्हाप्रमुख दिल्याने तिथे सैनिक जोमाने काम करत आहेत.गेल्या ४ वर्षात तिथे वैभव नाईक चांगलेच प्रसिद्धी झोतात आहेत.उघडपणे राणेंना विधानसभेचे आव्हान देतात आणि राणे गप्प बसतात. शेवटी राणे कंपनी निवडणूक काळ सोडला तर मुंबई- सिंधुदुर्ग अश्या वार्या करत असते आणि आपल्या गोताव्ल्यापुरते बघते.वैभव नाईक स्थानिक असल्याने नेहमी लोकांच्या हाकेला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध होत आहे. असेही तळकोकणातली जनता जास्त करून बिगरकाँग्रेसी पक्षांकडे राहिली आहे (आधी समाजवादी नंतर शिवसेना).बाळासाहेबांवर अतोनात प्रेम करणारी हि कोकणी जनता.मधल्या काळात राणे कॉंग्रेसमध्ये गेल्यावर सेनेत वारीच पदझड झाली होती. आता परत तिथे शिवसेना फोफावत आहे.जुने सैनिक परत येत आहेत. सध्या सिंधूदुर्गात कॉंग्रेसचा एकच आमदार (स्वत राणे) आहेत.नगर पालिका, जिल्हा परिषदेत सेना आणि राष्ट्रवादीने मुसंडी मारली होती.या निवडणुकीत सिंधूदुर्गमध्ये राष्ट्रवादीचा मोठा गट आणि कॉंग्रेसचा एक गट महायुतीबरोबर आहे.

कुणाच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलु नये ..

पण मोदी गेली १५ वर्षे चुकीची माहीती जाहीर करत होते त्याच्यावर कार्यवाही होउ शकेल का ????

विधानसभेची निवडणुक लढवत असताना लग्न चा कॉलम मोकळा ठेवत होते आता लोकसभेच्या निवडणुकीवेळीस लग्न झालेले आहे असे जाहीर केले आहे.. मग गेली १५ वर्षे चुकिची माहीती जाहीर करत होते .. ?

असे चालते ?

उदयन..,

लग्न झालेलं असलं तरी रूढ अर्थाने ते दोघे एकत्र रहात नव्हते. शिवाय प्रमाणपत्र देखील केलेले नसावे. त्यामुळे अधिकृत पुरावा नसतांना पत्नीचे नाव लिहिले तरी गोत्यात येण्याची शक्यता होती. शिवाय पत्नीच्या घरच्यांना त्रास होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

तसंच मोदींचं 'लग्न' त्यांच्या १७ व्या वर्षी झालं. त्यामुळे ते अधिकृत मानावं का, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

असं आपलं माझं मत.

आ.न.,
-गा.पै.

आज विदर्भात मतदान झाले. गडचिरोलि मध्ये नक्षल्यांचा प्रभाव असल्याने दुपारी तीन पर्यंतच मतदान करता येणार होत मात्र त्या मतदारसंघात विदर्भातील इतर मतदार संघांपेक्षा जास्त मतदान झाल आहे.विदर्भात सरासरी मतदान झाल्याच समजतंय. दिल्ली आणि इतर ठिकाणी मात्र चांगल्या प्रमाणात मतदान झाल आहे.

पुणेरी जाहीर नामा............

http://www.loksatta.com/pune-news/assurance-election-independent-431513/...

'जग अणुबाँब विरहित करण्यासाठी सर्व देशांना अणुबाँब नष्ट करण्याचे आर्जव करू.. दाऊदला सहा महिन्यात पकडून आरोप सिद्ध करू.. जानेवारी २०१५ पर्यंत काश्मीर प्रश्न सोडवू.. भारतीयांचा वेळ बहुमूल्य असल्यामुळे टीव्हीवरच्या मालिका आणि सिनेमामध्ये फक्त एकच कमर्शियल ब्रेक ठेवू..'
ही 'न भूतो न भविष्यती' प्रकारची आश्वासने आहेत तरी कुणाची याचा विचार करताय? हा चक्क एका अपक्ष उमेदवाराचा जाहीरनामा आहे. जाहीरनाम्यात पुण्यासाठी काय असा विचार करताय? या अपक्ष उमेदवाराने निवडून आल्यास पुण्यातल्या सर्व साखळीचोरांना महिना दहा हजार रुपयांची नोकरी देऊ, असे आकर्षक आश्वासनही दिले आहे!
हा जाहीरनामा आहे अपक्ष उमेदवार रुपाली तांबोळी यांचा. बी-कॉम, एलएलबी शिकलेल्या रुपाली 'लेडिज पर्स' या निवडणूक चिन्हासह निवडणूक लढवत आहेत. त्यांचा जाहीरनामाही चांगला लांबलचक- ७५ कलमी आहे. त्यांनी दिलेली आश्वासने वाचनीय आहेत. 'आम्ही सर्व जुने कायदे अद्ययावत करू, भारतीय दंडसंहिता १८६० ऐवजी आयपीसी २०१६ बनवू, निवडणुका नसताना पक्ष कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या शेतात काम करणे, महिलांना १०-१५ किलोमीटरवरून पाणी आणून देणे अशी कामे करायला लावू, शून्य आत्महत्यांचे ध्येय गाठण्यासाठी आम्ही आत्महत्या प्रतिबंधक मंत्री ठेवू, भारतीयांचे वजन उंचीनुसार राखण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा राबवू, 'एफ' टीव्हीसकट सर्व वाहिन्यांवर रोज भारताची राज्यघटना व नवीन कायदे दाखवू, सार्वजनिक ठिकाणी कुणीच थंकू नये यासाठी प्रत्येक नवीन वाहन थुंकीडब्यासहित आणू, दर पंधरा वर्षांनी राज्याची राजधानी बदलू,' ही वचनेही या जाहीरनाम्यात आहेत.
पुण्यासाठी रुपाली यांनी स्वतंत्र तीन कलमे दिली आहेत. 'सर्व साखळीचोरांना महिना दहा हजार रुपयांची नोकरी देऊ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था २५ पैसे प्रतिकिलोमीटर दराने करू, महिलेच्या पर्समधील एक हजार रुपयांमध्ये महिन्याचा घरखर्च चालेल अशी परिस्थिती आणू,' अशी आश्वासने पुण्यासाठी देण्यात आली आहेत

आता जे आकडे आलेत त्यानुसार राज्यात आज १० जागांसाठी ६२-६५% मतदान झाले आहे.२००९ ला याच जागांवर ४५% मतदान झाले होते.विदर्भातला कडक उन्हाळा, मध्यंतरीची गारपीट यामुळे काही ठिकाणी उदासीनता वगैरे मुद्दे लक्षात घेतले तर १७% वाढ तशी चांगली आहे.मतदानाची टक्केवारी वाढली याचा सर्वसाधारण अर्थ लोक बदल घडवू इच्छितात असाच असतो.भाजप-शिवसेना महायुतीसाठी राज्यात हि चांगली चिन्हे आहेत.

म्हणजे मी आलो तर म्हणतील, तुम्हाला साखळी चोरता येते का? नाही नं, मग तुम्हाला नाही नोकरी. नि माझ्याशेजारचा म्हणेल मी एकच काय दहा साखळ्या चोरू शकतो. त्याला लगेच १ लाख रुपयाची नोकरी!
लै मज्जा भारत म्हणजे!

महिलेच्या पर्समधील एक हजार रुपयांमध्ये महिन्याचा घरखर्च चालेल अशी परिस्थिती आणू,'

व्वा! आता महिलापण साखळ्या चोरतील! एक हजारात घरखर्च, नि दहा हजाराची नोकरी, म्हणजे ९ हजार रुपयाची चैन! कित्तीतरी भेळ, पाणिपुरी मिळेल त्यात!

राणेंना चांगलच खिंडीत पकडलय. दीपक केसरकरानी आमदारकीचा राजीनामा पवारांकडे (विधान सभा अध्यक्षांकडे नव्हे) दिलाय.तिथली एनसीपीची सगळी कार्यकारिणी बरखास्त झाली आहे.केसरकर हे उघडपणे राणेंना पाडण्यासाठी विरोधी पक्षाला (सेनेला) मतदान करा असे सांगत आहेत.एकूण राणेने जे पेरले तेच आता उगवतेय. महायुतीला तिथे एनसीपी आणि कॉंग्रेस मधला एक गट( आमदार विजय सावंत) यांची साथ असल्याने यंदा तिथे भगवा फडकेल असेच दिसतेय,एनसीपी कारवाईचे नाटक करून नंतर केसरकरांना परत जवळ करेल कारण तळकोकणात त्यांनीच पक्ष वाढवलेला आहे.राणे पडावेत ही खरे तर एनसीपीची पण इच्छा असेल कारण राणे गेले तरच राष्ट्रवादी तिथे वाढू शकेल. मात्र याचा वचपा कॉंग्रेस राज्यात इतर ठिकाणी राष्ट्रवादीला विरोध करून काढत आहे.आघाडीत बिघाडी झाल्याने महायुतीचा मात्र फायदा होतोय.

मनसेची काय परिस्थिती आहे? कुणी काही प्रकाश टाकू शकेल का?

सर्वेक्षणानुसार १ जागा मिळेल अस दाखवत अहेत.

पुण्यात काय चालू आहे?

पुण्यात म्हणण्यापेक्षा कोथरूडमध्ये अक्षरशः नगण्य प्रचार आहे.

अगदी स्पष्ट सांगायचे तर कलमाडी समर्थक विश्वजीत कदम ह्यांना आणि मनसेचे अनुयायी अनिल शिरोळे ह्यांना सहकार्य करत नसावेत अशी शंका यायला पूर्ण वाव आहे. पुण्यामधील ही निवडणूक म्हणजे निवडून यायच्या प्रयत्नांपेक्षा पाडण्याचे प्रयत्न अधिक असणारी निवडणूक वाटू लागली आहे (मला तरी).

वरुण गांधींचे भाषण अतिशय प्रासादिक, संयत व चांगले झाले. त्यांच्या भाषणात प्रामाणिकपणा जाणवत होता. लोक दादही देत होते.

मनसेचे अनुयायी अनिल शिरोळे ह्यांना सहकार्य करत नसावेत अशी शंका यायला पूर्ण वाव आहे. >> शिरोळे भाजपाकडून उभे आहेत. त्यांना मनसे का सहकार्य करेल? मनसेचा स्वतःचा उमेदवार आहे की.

शिरोळे भाजपाकडून उभे आहेत. त्यांना मनसे का सहकार्य करेल? मनसेचा स्वतःचा उमेदवार आहे की.<<<

तुमचे बरोबर आहे. माझी लिहिताना चूक झाली. मला असे म्हणायचे होते की राज ठाकरेंनी मोदीविषयक घेतलेल्या भूमिकेविरुद्ध त्यांचीच पुण्याच्या मतदारसंघातील जी (स्वतःचा उमेदवार उभा करण्याची) भूमिका आहे तिचा नकारात्मल परिणाम अनिल शिरोळेंच्या मतांवर होईल.

चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद! Happy

मनसेने राज्यात ११ उमेदवार दिले आहेत त्यातील ९ शिवसेनेच्या मतदार संघात तर २ भाजपच्या मतदारसंघातील (पुणे आणि भिवंडी) आहेत.११ पैकी पुण्यात उभा असलेले दीपक पायगुडे तसे प्रबळ उमेदवार आहेत. ते २ वेळा सेनेकडून आमदार झाले आहेत. पायगुडे जितकी जास्त मते खातील तेवढा कदमांना फायदा आणि भाजपच्या शिरोळेना तोटा होईल म्हणून तर राजनाथ यांनी पुण्यात मनसेला फटकारले होते.मनसेचा २००९ मधला प्रभाव आता राहिला नाही, सेनेला नाट लावण्यात राज ठाकरे सतत पुढे असतात.मावळ आणि रायगडमध्ये तर मनसेने शेकापच्या उमेदवारांना (जे राष्ट्रवादीतून ऐनवेळी आयात केले आहेत) त्यांना पाठींबा दिलाय. कारण काय तर सेनेला अपशकून करायचा म्हणून.बर हे शेकापचे उमेदवार मोदींना पाठींबा देणार की परत पवारांकडे जाणार वगैरे काही माहिती नाही. असा संभ्रम मनसेने निर्माण केला आहे त्यामुळे मतदार मनसेला यंदा ठेंगा दाखवतील.आता आपला करिष्मा ओसरतोय म्हणून मोदी मोदी नावाचा जप करत ते संभ्रम निर्माण करत आहेत.पुण्यात शिरोळे हे मुंडे गटाचे असल्याने मनसेने मुद्दाम उमेदवार दिला आहे (आठवा राज आणि गडकरी भेट. गडकरी-मुंडे वाद भाजपात नवीन नाही).सर्व्हेमध्ये १ जागा मनसेला दाखवत असले तरी ती त्यांना कुठे मिळेल याचा अंदाज लावता येत नाही.मात्र पुणे, नाशिक मध्ये मनसे अपेक्षा करत आहे.मुळात मोदींना पंतप्रधान करण्यासाठीच मत द्यायचे असेल तर सेना-भाजप या अधिकृत महायुतीला का मत देवू नये असा सवाल आला तर मनसेच्या समर्थकांना पण उत्तर देत येत नाही.

खरोखरी आपले सरकारे धन्य आहेत. जेव्हढा प्रचार मतदान करा हा प्रचार करण्यासाठी करतात त्याच्या १ टक्का सुध्दा प्रचार तुमचे नाव मतदार यादीत कसे शोधा यावर केला जात नाही.

किती जणांना माहित आहे आपले नाव मतदार यादीत कसे शोधायचे ?

महाराष्ट्रात तरी ही सुवीधा देणार्‍या लिंक घ्या.

https://ceo.maharashtra.gov.in/

ह्या मुख्य पानावर गेल्यानंतर Search your Name in Final Electoral Roll 2014 New यावर क्लिक करा आणि एक तर आपल्या आयडेंटीटी कार्ड नुसारच्या नंबरा नुसार किंवा नावा नुसार आपले नाव शोधण्याचा पर्याय उपलब्ध्द आहे.

आपण या सर्च इंजिनवर सरळ जाऊ शकता http://103.23.150.139/marathi/

कृपया लक्षात ठेवा आपल्याला किमान खालील गोष्टी माहित असल्याशिवाय इथे जाण्याचा काही फायदा नाही.

१) आपला जिल्हा'

२) आपले व्होटर आयडेंटीटीवरील आपला युनीक नंबर ( विधानसभा मतदार संघ माहीत नसल्यास )

३) आपला विधानसभा मतदार संघ ( आपले व्होटर आयडेंटीटी कार्ड त्या क्षणी उपलब्ध नसल्यास )

लक्षात ठेवा की मागल्या वेळी इथे मतदान झाले अस समजुन जर आपण नाव शोधायला गेलात तर बर्‍याच वेळा तिथे नाव शोधायला खुप उशार लागतो. कधी कधी मतदान केंद्र तेच राहिलेले नसते. त्यात बदल झालेला असतो आणि आता शासनाने नेमणुक करुनही मतदानाच्या स्लीप देणारे कर्मचारी तुमच्या पर्यंत पोहोचलेले नसतात.

हा मनस्ताप टाळुन आपल्या पसंतीचे सरकार स्थापन करण्याचा अधिकार मिळवा.

ही माहिती कॉपी पेस्ट करुन इतरांना कळवा आणि मतदानासाठी उद्युक्त करा.

ये है काँग्रेस की हिंदुस्तानियत! पहले बाटो फिर सौ गुना खाओ!

http://www.loksatta.com/pune-news/fir-filed-against-congress-candidate-v...

शिक्षणसम्राट कदमांनी संस्थेतील शिक्षकांना गुरू, हो जा शुरू असा हुकुम फर्मावला असावा.

कदम कदम बटाए जा, नोटोंसे वोट पाये जा!

पुण्यात अटीतटीचा सामना होत असावा. नाहीतर प्रकरण इतके निकरावर आले नसते.

@भारत- बारामती मध्ये महायुतीतर्फे महादेव जानकर उभे आहेत.ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत.गेल्या वेळेस ते माढ्यातून पवारांतर्फे उभे होते (त्यावेळेस ते महायुती मध्ये नव्हते).तरी स्वबळावर जवळपास लाखभर मते घेतली होती याची नोंद शरद पवारांनी पण घेतली होती.कांशीराम प्रमाणे ते महाराष्ट्रात सोशल इंजिनीयरिंग करू पाहत आहेत.बारामती मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेला धनगर समाज, भाजपची परंपरागत मते, सेनेचे आमदार विजय शिवतरे (पुरंदरे),भाजपचे आमदार भीमराव तपकीर (खडकवासला) या जोरावर त्यांनी बर्यापैकी आव्हान उभे केले आहे.

कॉंग्रेस आणि गांधी घराण्याचे आणि त्यांच्या कृपेने ''पद्मश्री'' प्राप्त स्तुतिपाठक कम पत्रकार सुरेश भटेवरा यांनी काल आयबीएन लोकमत वर चर्चे दरम्यान अजाणतेपणी २ गोष्टी मान्य केल्या.

१. गांधी घराणे फक्त निवडणुकीपुरते जनतेसमोर येते आणि नंतर ५ वर्षे गायब.

२. राहुल गांधी अपयशी झाले आहेत का?? स्तुतिपाठकाच म्हणन अस कि, ते निवडणुकीनंतर कळेल.

मग आतापर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या प्रत्येक निवडणुकीत सगळीकडे पराभवच झालेला आहे. त्याच काय.

काल भटेवरा, गाडगीळ आणि अजून एक कुणी घराणेशाहीचे अभ्यासक होते ते एक असे तिघेही कॉंग्रेसची बाजू मांडत होते.माधव भंडारी त्यांना पुरून उरत होते. हे भटेवरा, कुमार केतकर वगैरे कॉंग्रेसचे भाट आहेत.एखाद्या पक्षाकडे कल असेल तर समजू शकतो पण हे लोक त्यांच्या प्रत्येक गोष्टीची री ओढतात.पक्षाने निर्णय फिरवला कि हे पण लगेच कोलांटी मारून त्याचे समर्थन करतात.

Pages