Submitted by नंदिनी on 5 March, 2014 - 00:50
आज लोकसभा २०१४ निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. ७ एप्रिलपासून निवडणुका घेतल्या जातील. आचारसंहिता लागू झालेली आहे.
निवडणुकासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी हा धागा. या निवडणु़का नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल व्यतिरीक्त अजूनही हजारो लोक लढवत असतील तेव्हा निव्वळ या तिघांनाच सर्व फुटेज देऊ नये ही विनंती.
आपपल्या शहरतील, भागातील उमेदवारांविष्यी अधिक लिहिल्यास उत्तम.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
NDTV वर बीजेपीला 285 चे
NDTV वर बीजेपीला 285 चे अनुमान देत आहेत
पुण्यात 32% मतदान झाले आहे
पुण्यात 32% मतदान झाले आहे असे म्हणत आहेत
हो पुण्यात मगाशी ३३% झालं
हो पुण्यात मगाशी ३३% झालं दाखवत होते, खूप कमी झालंय, सहा वाजेपर्यंत आहेना मतदान.
लातूरला पाऊस पडतोय, मतदानासाठी टाकलेले मंडप उडाले काही ठिकाणी.
पुण्यात मतदार याद्यात घोळ
पुण्यात मतदार याद्यात घोळ असूनही सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५१% मतदान झाले आहे. तासाभरात हा आकडा ५७-६०% पर्यंत जावू शकतो.(२००९ ला पुण्यात ३९% इतके कमी मतदान झाले होते).राज्यात दुसर्या टप्प्यात १९ मतदारसंघात ५ वाजेपर्यंत साधारणपणे ६०% च्या आसपास सरासरी मतदान झाले आहे.६ वाजेपर्यंतचा अंतिम आकडा ६५-७०% असू शकतो. म्हणजेच २००९ पेक्षा मतदानाची टक्केवारी बर्यापैकी वाढलेली आहे. हे बदलाचेच संकेत आहेत.
परवा गोव्यात ७७-७८% मतदान
परवा गोव्यात ७७-७८% मतदान झाले तर आज प बंगालमध्ये जवळपास ८०% विक्रमी मतदान झाले आहे.अर्थात बंगाल मध्ये ममता आणि डावे अशीच लढाई असून भाजप, कॉंग्रेस हे राष्ट्रीय पक्ष या दोघांच्या मागेच राहणार हे स्पष्ट आहे.
नाही, डाव्यांना या
नाही, डाव्यांना या निवडणुकीतही कठीण आहे. भाजपला फारसं कधी स्थान नव्हतं बंगालमधे पण यावेळेला कदाचित बरा निकाल पदरात पडेल. मारवाडी समाजाबरोबरच बंगाली व्यावसायिकांमधेही मोदींचा पाठिंबा काही प्रमाणात आहेच. दार्जिलिंगमधे भाजपला विजयाची उत्तम संधी आहे. तृणमूलची मुस्लिम व्होटबॅन्क फोडायसाठी कॉन्ग्रेस आणि डावे यांनी जोरदार फील्डिंग लावली आहे. शिवाय एकीकडे काही ठिकाणी भाजपला मोठ्या प्रमाणावर मते मिळावीत असा अंदाज आहे. त्यामुळे तृणमूल जिंकलं तरी विनिंग मार्जिनमधे किती फरक आहे बघायचं
मुळात येणार्या विधानसभेच्या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणूनच याकडे डावे आणि ममता आणी कॉन्ग्रेस बघताहेत. डावे आणि कॉन्ग्रेस यांचं विधानसभा निवडणुकीच्या आधी परत एकदा 'तुझ्या गळा माझ्या गळा' झालं तरी आश्चर्य वाटू नये!
पीटीआयने दिलेली आजच्या
पीटीआयने दिलेली आजच्या मतदानाची टक्केवारी :
महाराष्ट्र ५४.६७% ओडिशा ७०% मणिपूर ७४% छत्तीसगढ ६३.४४% मध्यप्रदेश ५४.४१% प.बंगाल ७८.८९% राजस्थान ६३.२५% जम्मूकश्मीर ६९%
महाराष्ट्रात २००९च्या तुलनेत प्रमाण वाढलेले नाही.
साकल्य | 17 April, 2014 -
साकल्य | 17 April, 2014 - 12:34 नवीन
काल भटेवरा, गाडगीळ आणि अजून एक कुणी घराणेशाहीचे अभ्यासक होते ते एक असे तिघेही कॉंग्रेसची बाजू मांडत होते.माधव भंडारी त्यांना पुरून उरत होते. हे भटेवरा, कुमार केतकर वगैरे कॉंग्रेसचे भाट आहेत.एखाद्या पक्षाकडे कल असेल तर समजू शकतो पण हे लोक त्यांच्या प्रत्येक गोष्टीची री ओढतात.पक्षाने निर्णय फिरवला कि हे पण लगेच कोलांटी मारून त्याचे समर्थन करतात.
<<
तुम्ही भाजपाचे भाट असल्याने त्यांचे म्हणणे तुम्ही मान्य करीत नाही
सिंपल.
मयेकर, http://en.wikipedia.or
मयेकर,
http://en.wikipedia.org/wiki/Indian_general_election,_2009
इथे दिलेल्या आकडेवारीनुसार २००९ ला महाराष्ट्रात ४९% मतदान झाले होते.
अजून तिसरा टप्पा बाकी आहे. पण आत्तापर्यंतची आकडेवारी बघता महाराष्ट्रात मतदान टक्केवारीत वाढ झाली नाही हे नक्की कशाच्या आधारे म्हणता ? (शिवाय बाकी सगळीकडे महाराष्ट्राची आकडेवारी ६१%च्या आसपास दाखवत आहेत.)
आत्ताच एक भारी किस्सा ऐकला..
आत्ताच एक भारी किस्सा ऐकला.. एकाच नावाचे दोन व्यक्ती एकाच ठिकाणी मतदानाला होते.. दोघांचे वय एकच.. दोघांकडेही कार्ड होते.. एक अजोबा आधी मत देऊन गेले होते.. दुसरे आजोबा मत द्यायला गेले तर त्यांच्या नावानी आधीच मत दिले असे दिसत होते.. पण ती सही त्यांची नव्हतीच.. त्यांनी टेंडर मत देण्याची मागणी केली आणि तसे मतदान केले..
मतदान अधिकारी आधीच्या आजोबांनी मत दिले तेव्हा झोपला होता बहुतेक. फोटो न बघताच मत देऊ दिले ते..
पुण्यातला घोळ कसा काय
पुण्यातला घोळ कसा काय निस्तरणार आहेत कोण जाणे!
पीटीआयच्या हवाल्याने दिलेली
पीटीआयच्या हवाल्याने दिलेली आकडेवारी फक्त कालच्या दिवसाच्या मतदानाची आहे. २००९ शी तुलनाही कालच्या दिवसाच्या मतदारसंघांपुरती असणार.
ओके. गेल्यावर्षीच्या ह्याच
ओके.
गेल्यावर्षीच्या ह्याच मतदारसंघांमधली मतदान टक्केवारी ५४.२८ % होती.
http://www.indiavotes.com/pc/info?eid=15&state=0
म्हणजे वाढ झाली म्हणायला हरकत नाही..
विनोदाचा भाग सोडता, पिटीआय सोडता बाकी सगळीकडे साधारण ६१ % मतदानाची नोंद दाखवतं आहे (कालच्या टप्प्यासाठी).. पिटीआयनेच कमी टक्केवारी का दिली आहे ?
http://timesofindia.indiatimes.com/home/lok-sabha-elections-2014/news/Ma...
http://news.in.msn.com/elections-2014/ls-polls-largest-phase-wb-79percen...
http://zeenews.india.com/news/general-elections-2014/lok-sabha-polls-fin...
http://www.timesnow.tv/INDIA/
http://www.timesnow.tv/INDIA/Congress-takes-Ramdev-tape-to-EC/videoshow/...
रामदेव बाबा अडकले..... भाजप उमेदवाराने पैसा मिळात नाही म्हणुन मागणे मांडले तर "वेडा झालास का ?इथे माईक चालु आहे या बाबत इथे बोलु नकोस.." ते ही हात दाबुन
...
आरोप काँग्रेस वर होत आहे ब्लॅकमनीचा आनि भरमसाठ खर्च मात्र भाजप करत आहे... याचे उत्तर बहुदा सापडले वाटते ..
रामदेवबाबा म्हणुन भाजपाला समर्थन देत आहे.. जेणेकरुन स्वतःच्या व्यापाराची चौकशी थांबेल ..
भाजपाचा ब्लॅक मनी पांढरा करण्याचे काम रामदेव कडे दिले आहे का ?????
उमेदवार भाजपाचा मग रामदेव कडे का पैश्याची मागणी करत आहे..??
रामदेव म्हणतोय की त्याचा आणि भाजपाच्या प्रचाराचा काहीही संबंध नाही मग याच्या कडे मागणी का होत आहे ??
याचाच अर्थ कुठेतरी पैसा मॅनेज करण्याचे काम रामदेव करत आहे ..
मुंबई-नाशिक मध्ये २४ एप्रिलला
मुंबई-नाशिक मध्ये २४ एप्रिलला होणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी चॅनेलवर मुलाखतींना सुरुवात केलिये. पुन्हा सेना-भाजपाची मतं वळवण्याचा प्रयत्न सुरु होताना दिसतोय.
कदमांच पुण्यात अवघडच दिसतयं,
कदमांच पुण्यात अवघडच दिसतयं, ज्या भागांतुन त्यांना जास्त मतदानाची अपेक्षा होती त्या भागात मतदान कमी प्रमाणात झालयं.
कदमांच पुण्यात अवघडच दिसतयं,
कदमांच पुण्यात अवघडच दिसतयं, ज्या भागांतुन त्यांना जास्त मतदानाची अपेक्षा होती त्या भागात मतदान कमी प्रमाणात झालयं.<<<
आबासाहेब,
असे झाले असले तर माहीत नाही, पण माझ्या अंदाजाने कदमच येणार!
कारणे:
१. सांगलीहून एक लाख आठ हजार मतदार आणल्याचा आरोप - आरोपात तथ्य आहे की नाही हे समजलेले नाही, पण ह्या आकड्याच्या दहा टक्के मतदार आले (दहा हजाराच्या आसपास) तरीही काहीही घडू शकते.
२. पुण्यातील एक लाख (नेमका हाही आकडा तोच यावा, केवढा योगायोग - मित्र सारंग ह्यांनी हाच विचार आधी फेसबूकवर मांडला - कालपासून माझ्याही मनात तेच येत होते) मतदारांची नांवे गायब!
३. गिरीश बापटांऐवजी शिरोळेंना उमेदवारी
४. दीपक पायगुडेंच्या उभे राहण्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली असणे!
आकाशवाणीच्या आज सकाळच्या
आकाशवाणीच्या आज सकाळच्या दिल्लीच्या बातमीपत्रातही महाराष्ट्राची आकडेवारी ५४+ टक्केच सांगितली
होती. निवडणूक आयोगाच्या पत्रकारपरिषदेचा उल्लेख केला होता. (लिंकमधले बातमीपत्र उद्या बदलेल किंवा उपलब्ध नसेल)
<१२ राज्यों में १२१ लोकसभा सीटों के चुनाव में कल मध्यम से भारी मतदान हुआ। पश्चिम बंगाल में सबसे अधिक ७८ दशमलव आठ-नौ प्रतिशत मतदान हुआ। मणिपुर में ७४ प्रतिशत, ओड़िशा में ७० प्रतिशत और जम्मू कश्मीर में उनहत्तर प्रतिशत से अधिक वोट डाले गए।
महाराष्ट्र में १९ लोकसभा सीटों के लिए ५४ दशमलव छह-सात प्रतिशत, कर्नाटक की सभी २८ सीटों के लिए ६८ प्रतिशत, राजस्थान में चुनाव के पहले चरण में २० लोकसभा निर्वाचन क्षेत्रों में ६३ प्रतिशत , मध्यप्रदेश में दस संसदीय क्षेत्रों में ५४ प्रतिशत और छत्तीसगढ़ में तीन निर्वाचन क्षेत्रों में ६३ प्रतिशत मतदान हुआ। बिहार में सात संसदीय निर्वाचन क्षेत्रों के लिए ५६ प्रतिशत, उत्तर प्रदेश की ११ लोकसभा सीटों पर ६२ और झारखंड में भी ६२ प्रतिशत ही मतदान की खबर है। ओड़िशा में ७७ विधानसभा सीटों के लिए भी ७० प्रतिशत वोट डाले गए। >
अन्यत्र ६१ टक्के आणि टक्केवारीत वाढ असेच वाचायला मिळाले.
नक्की काय घोळ आहे ते कळायला मार्ग नाही. ६१ टक्केच बरोबर असणार.
अर्धी चड्डीवाल्यांच्या हातात
अर्धी चड्डीवाल्यांच्या हातात देश देणार का असा प्रश्न शरद पवारांनी आनंद परांजपेंच्या 'डोंबिवली' येथील प्रचार सभेत विचारून परंज्पेंनाच अडचणीत आणले आहे.कदाचित मुंब्रा वगैरे भागातील मुस्लिम एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी पवारांनी अशी जोखीम घेतली असावी मात्र परांजपेना डोंबिवलीमध्ये काही ब्राह्मण/संघाच्या मतदारांकडून ज्या थोड्याफार आशा होत्या त्या आता मावळल्या आहेत.
राज्यात एक दोन दिवसात नरेंद्र मोदींच्या जळगाव, मुंबई इथे सभा होणार आहेत.दुसरीकडे आज सोनिया गांधींच्या नंदुरबार, धुळे, मुंबई इथल्या नियोजित सभा ऐनवेळी रद्द झाल्या आहेत.आजारपणामुळे सोनिया येणार नाहीत.राहुल गांधी मात्र मुंबईतमध्ये येण्याची शक्यता आहे.
Election Commission Director
Election Commission Director General Akshay Rout said.
१) ३४९ मतदार संघात आत्तापर्यंत मतदान झालेय व ते ६६% आहे. २००९ मधे याच ३४९ मतदार संघात ते ५७.५३% होते.
२) आत्तापर्यंतच्या सर्व निवडणूकात ही टक्केवारी जास्त असून हा कल असाच टिकून राहिल्यास ही निवडणूक नविन विक्रम प्रस्थापित करेल.
३) ते म्हणाले की २००९ साली याच मतदार संघातून एकूण २१.४९ कोटी मतदारांनी मतदान केले होते तर हाच आकडा २०१४ मध्ये ३५ कोटींवर पोहचला आहे.
समाप्त
----------
थोडक्यात विश्लेषण म्हणजे.
१) २००९ साली पात्र मतदार संख्या ३७.५ कोटी होती ती २०१४ मध्ये ५३.०३ झाली.
२) वाढलेले मतदान ५३.०३ च्या ८.४७% म्हणजे ४.९ कोटी इतके आहे.
३) ह्या वाढलेल्या मतदानात तामिळनाडूचा व पश्चिम बंगालचा समावेश नसावा कारण तिथे मतदानात वाढ झालेली नाही.
http://economictimes.indiatim
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/2014-lok-sa...
रामदेव बाबाची भिक्कार वृत्ती
रामदेव बाबाची भिक्कार वृत्ती भाजपाला घेउन बुडणार आहे बहुतेक सध्याच्या वक्त्यव्याचा भाजपाने साधा निषेध देखील नोंदवला नाही
याचाच अर्थ या रामदेव च्या खांद्यावर बंदुक ठेउन भाजपा गोळ्या चालवत आहे.
भेदभाव करुन फुट पाडणे आणि मग लांब उभे राहुन तमाशा बघणे हे भाजपाचे धंदे आहेत
इतर पक्षांच्य नेत्यांवर स्तुती करुन त्यांच्यात फुट पाडणे
दोन धर्मात फुट पाडुन आपापसात लढवुन सत्तेवर येणे
भावाभावांमधे नात्यानात्यांमधे तेढ निर्माण करुन मुद्दामुन तिकिट देणे आणि त्याच्यांत कटुता आणने आणि स्वतःची पोळी भाजुन घेणे
असले धंदे भाजपा जन्मल्याबरोबरच चालु केलेले आहे.
24 तारखेला सर्वात कमी मतदान
24 तारखेला सर्वात कमी मतदान आमच्या कल्याण मतदारसंघात झालं ४२%. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सुशिक्षित शहर म्हणून डोंबिवली ओळखले जाते आणि मतदान कमी झाले. sad वाटले.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त
महाराष्ट्रातील सर्वात जास्त सुशिक्षित शहर म्हणून डोंबिवली ओळखले जाते
<<
तमाम पुणेकरांच्या वतीने,
हार्दिक निषेढ!
अहो इब्लिस, ते जुने पुणे
अहो इब्लिस, ते जुने पुणे झाले. विसरा आता. आता पुण्यातल्या लोकांना निषेध हा शब्दहि धड लिहीता येत नाही, निषेढ असा लिहीतात. हे काय सुशिक्षितपणाचे लक्षण?
झक्की, निषेधातला तुमचा ढ पणा
झक्की,
निषेधातला तुमचा ढ पणा लक्षात आला का तुमच्या?
http://aajtak.intoday.in/stor
http://aajtak.intoday.in/story/india-became-3rd-largest-economy-in-2011-...
भाजप नेत्यांच्या खोट्या प्रचाराला तोंडघशी पाडले.
या बातमी खाली काही पेड आर्मीची प्रतिक्रिया आली नाही अजुन तरी
डोंबिवली नेहमी कमी
डोंबिवली नेहमी कमी मतदानासाठीच प्रसिद्ध आहे. इथला नीचांक २७% आहे.
तरी ह्यावेळेला ६% मतदान वाढलं
तरी ह्यावेळेला ६% मतदान वाढलं कल्याण मतदारसंघात, मागच्यावेळी ३५% पेक्षा थोडे जास्त होतं. वाईट वाटतं.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त
महाराष्ट्रातील सर्वात जास्त सुशिक्षित शहर म्हणून डोंबिवली ओळखले जाते >>
ऑ ऑ ऑ (आश्चर्यचकित झालेली बाहुली ) हे पहिल्यांदाच वाचले. आजपर्यंत याबाबतीत फक्त एकाच शहराची ही ख्याती ऐकून होते. 

रच्याकने, आम्ही लहानपणापासून डोंबिवली हे डासांचे आणि डोंबिवली फीवर चे शहर म्हणून ओळखतो.
Pages