लोकसभा निवडणुका २०१४

Submitted by नंदिनी on 5 March, 2014 - 00:50

आज लोकसभा २०१४ निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. ७ एप्रिलपासून निवडणुका घेतल्या जातील. आचारसंहिता लागू झालेली आहे.

निवडणुकासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी हा धागा. या निवडणु़का नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल व्यतिरीक्त अजूनही हजारो लोक लढवत असतील तेव्हा निव्वळ या तिघांनाच सर्व फुटेज देऊ नये ही विनंती.

आपपल्या शहरतील, भागातील उमेदवारांविष्यी अधिक लिहिल्यास उत्तम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना, नंदू माधव यांचे थोडं-फार सामाजिक कार्य आहे, आता मला नीट आठवत नाही पण दोनेक वर्षांपूर्वी मी वाचलं होतं त्याबद्दल.

पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठं भगदाड पडलंय. जिल्हयातील शिवसेनेच्या तीन बड्या नेत्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केलाय. माजी जिल्हा प्रमुख उमेश चांदगुडे, उपजिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, शरद सोनावणे यांनी सेनेला रामराम ठोकलाय.

नवि मुंबई तुन विद्यमान खासदार संजिव नाईक आणि शिवसेनेचे ठाण्याचे आमदार राजन विचारे यांत सामना आहे. मात्र ह्या वेळेस नाईकांसाठि अवघड आहे.

आमच कल्याण डोंबिवलि लोकसभा
रा़.कां. तर्फे आनंद परांजपे
महयुतिकडुन नितिन एकनाथ शिंदे.
आप्/मनसे कदुन नाव नाहि.
लढत जबर्दस्त आहे.
आणी शेजारी ठाणे लोक्सभा
राजन विचारे महायुति आणि संजीव नाईक रा. कां

कल्याण डोंबिवलि लोकसभा :
आनंद परांजपे: माजी शिवसेना खासदार, जितेंद्र आव्हाडांचा समोरुन पाठिंबा, आणि मागुन पाडण्यासाठी पुर्न प्रयत्न. परांजपेंचे राजकिय करियर धोक्यात.
शिन्दे साहेब आमदारकीला कळवा मुंब्रा सोडणार बदल्यात कल्याण खासदाराची सीट मुलासाठी सेफ केलीय.
ठाणे रा कां चा राजन विचारेना आतुन पाठिंबा. नाईक वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न.. काहि प्रमाणात शरद पवारांकडुन ही याला मान्यता.डावखरे फ्या़क्टरही विचारेंच्या बाजुने.
राजन विचारेना खासदारकि मिळाली तर ठाणे शहर ३ आमदार सेनेकडे कायम आणि जितेंद्र आव्हाड कळव्यातुन सेफ.
हात ,घडयाळ आणि बाणाच्या घोळात कमळाबाईची मात्र पार ओढाताण आणि फरफट चालु आहे.....

बापरे ठाणे-कल्याणमध्ये एवढ्या घडामोडी चालू आहेत.

आनंद परांजपे राष्ट्रवादीत गेले हेच बऱ्याच जणांना पटले नाही कारण एकदा तुम्ही एखाद्या पक्षातर्फे निवडून आल्यावर कमीतकमी ती टर्म तरी पूर्ण करावी किंवा राजीनामा देऊन जावे. ही त्यांना निवडून दिलेल्या मतदाराशी बेईमानी होते.

मनसेलापण इथे खूप पाठींबा आहे, त्यामुळे कल्याण-डोंबिवलीची लढत इतकी सोपी होईल असं वाटत नाही.

मनसे आणि शिवसेनेचा ३६ चा आकडा आहे हे जगजाहिर आहे. भाजपा आणि मनसेचे असे काही नाही. त्यामुळे निदान जिथे भाजपाचा उमेदवार आहे तिथे तरी मनसे लोकसभा उमेदवार उभा करणार नाही असा काही करार झाला तरी त्याचा फायदाच आहे.
मनसे केवळ (शिवसेनेचे) नुकसान व्हावे म्हणूनच लोकसभा निवडणुका लढवते आहे असे मला तरी वाटते. त्यांना केंद्रात जाऊन काय करायचे आहे हे त्यांच्या धोरणातून मला तरी समजत नाही.

पुण्यात राष्ट्रकुलदीपक भाईसाहेब नव्या जोमाने लोकसभा निवडणार तर! धन्य ते पुणे आणि तिथली काँग्रेस. एकेकाळी लोकमान्य टिळक ह्या पुण्याने काँग्रेसला दिले आणि आता हे!

मुंडे ह्या निवडणुकीत पडावेत अशी माझी इच्छा आहे. पण भाजपा आणि मोदी लाट, काँग्रेसविरोधी लाट आणि बीडसारखा खात्रीचा मतदारसंघ हे जुळून आल्यामुळे तसे होणे नाही. आणि इतका आरडाओरड करुन आपने एक सुमार नावच मुंडेविरुद्ध उभे केले आहे.

आपची अशी तक्रार होती की सर्व पक्षात एक अलिखित करार असतो की एकमेकांच्या उच्चपदस्थ नेत्यांविरुद्ध बडे उमेदवार उभे करायचे नाहीत.

आयुष्यात प्रथमच निवडणुकीच्या प्रशासनात नाही. त्यामुळे लई रिल्याक्स हय. ही निवडणूक मी 'बाहेरून' अनुभवतोय. शिवाय महाराष्त्रात नसून मसूरीच्या थंड हवेत दोन महीने उन्हाळा घालविणार Happy
मागच्या येळंला केन्द्रीय निवडणूक आयोगाचा निरीक्षक म्हणून आंध्रात ५१ डिग्री तापमानात काम करायला लागले शिवाय ते शिंचे नक्षलाईट डोक्यावर बसलेले....

आमच्या भागातुन २००४ मध्ये गोविन्दा निवडून आला होता ही एक चुकुन घडणारी घटना ! ! २००९ मध्ये मनसे मुळे भाजपचे राम नाइक पराभूत झाले आणि संजय निरूपम ची लॉटरी चूकून लागून खासदारकी मिळाली. २०१४ मध्ये मात्र गोपाल शेट्टि ( भाजप) यांचा विजय निश्चीत आहे , जरी मनसे ने उमेदवार दिला तरी.
" कोणताही उमेद्वार पात्र नाही " या सोयीमुळे काहीही हाती लागणार नाही , कारण सर्वांनी नाकारले तरी ( ही शक्यता कमीच) उमेदवाराच्या बाजुने चार दोन मते असली तर त्यात कोणीतरी निवडून येणारच , मग ही तरतूद करून " अण्णांनी " काय साधले हे त्यांचे तरी त्यांना कळले कि नाही हेच कळत नाही.
राज्यसभेसाठी आपल्याला कोणताही मतदानाचा अधिकार नसतो.

>>मग ही तरतूद करून " अण्णांनी " काय साधले हे त्यांचे तरी त्यांना कळले कि नाही हेच कळत नाही.

अण्णांचे आता सर्वच कळून चुकले आहे असे म्हणायला हवे.. Happy

ठाणे आणि कल्याण मधून यंदा शिवसेनाच येईल. गेल्या वेळेस ठाण्यामधून उमेदवार चुकीचा दिला होता यंदा ती कसर भरून काढली आहे. राष्ट्रवादीची ठाणे (नाईक) आणि मुंबईतील संजय पाटलांची सीट आणि उस्मानाबादमधील सीट गेल्यात जमा आहे.सेनला मुंबई मधून एक किंवा दोन, ठाणे आणि कल्याण (कल्याण मध्ये परांजपे गेली दोनेक वर्षे मनाने एनसीपी मध्ये होते ), उस्मानाबाद तसेच कोल्हापूर या जागा खेचून आणायची जोरात संधी आहे.

मनसेची यादी:
दक्षिण मुंबई - बाळा नांदगावकर
दक्षिण मध्य मुंबई - आदित्य शिरोडकर
उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई - महेश मांजरेकर
कल्याण - राजीव पाटील
शिरूर - अशोक खांडेभराड
नाशिक - डॉ. प्रदीप पवार
पुणे - दीपक पायगुडे

मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा" म्हणणाऱ्याना केंद्रात जाऊन काय करायचे आहे ? मनसे केवळ शिवसेनेचे नुकसान व्हावे म्हणूनच लोकसभा निवडणुका लढवते आहे. फक्त शिवसेनेच्याच विरोधात उमेदवार देऊन राज ठाकरे यांनी हे सिद्ध केले. "तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला" (कॉंग्रेस) या एकाच सिद्ध्नाताने प्रेरित होऊन राज ठाकरे निवडणूक लढवीत आहेत. मग मराठी माणसाचे कितीही नुकसान झाले तर हरकत नाही मात्र मी माझे वैर(शिवसेनेशी) नक्की निभावणार...............

मावळात,
लक्ष्मण जगताप ह्यांनी हा माझा मार्ग एकल्याचा डिक्लेअर केलय.
आझम पानसरे ऑलरेडी कॉम्ग्रेस मध्ये गेलेत. राष्ट्रवादीची गोची झाली आहे.
अर्थात साहेबांसोबतच्या एका भेटीत जगताप वेगळा मार्ग धरु शकतील.
आपचे उमेदवार मारुती भापकर.
सेनेकडुन अजुन नाव डिक्लेअर नाहिये.
पण श्रीरंग बारणे आणि गजानन बाबर ही नावं चर्चेत आहेत.

पुण्यात नक्की काय घोळ घालणारेत देवच जाणे.

मनसेनी.. फक्त पुण्यातच बीजेपीच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे.. आणि तो उमेदवार जाहिरपणे मी मोदींनाच पाठिंबा देणार असे सांगतो आहे.. आपकडे कोण उमेदवार पुण्यातून आहे ह्याची काहीच माहिती नाही..

काँग्रेस यंदा कोणालाही उभे केले तरी जिंकण्याची शक्यता कलमाडींच्या पराक्रमामुळे शून्य आहे..

बीजेपी अजून उमेदवार शोधात आहे... गिरीश बापट की शिरोळे??? का परत एकदा प्रदीप रावत???

पुण्याची सीट नक्की कुठल्या स्टेटस मध्ये येते??? का प्रत्येक जण ही सीट गेलेलीच आहे.. कशाला उगाच प्रयत्न करायचा अशा विचारात आहेत..

मनसेने अजून पूर्ण यादी कुठे जाहीर केली आहे. मनसेच्या दुसर्या यादीत मुंबईतले उर्वरीत ३ आणि भिवंडी आदी उमेदवार जाहीर होतील तेव्हा चिते स्पष्ट होईल. मुंबईत जरी शिवसेनेला जर फटका बसेल असे मानले तरी मनसे निवडून थोडीच येणार आहे.मनसे आता ८ वर्षाची झाली तरी अजून सेनेला विरोध करणे एवढाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम दिसतोय. लोकांनी २००९ लोकसभेत मुंबई मध्ये मनसेला मते देवून शेवटी आपण अप्रत्यक्ष कॉंग्रेसलाच निवडून दिले हे ताडले आहे. फक्त सेनाद्वेष करून मनसे तात्पुरती चर्चेत येईल पण निवडून येणार नाहीच. आणि सेना उमेदवाराला धोका झाला तर शिवसैनिक मुंबई मध्ये भाजपला दगा फटका करू शकतात ही जाणीव पण भाजपला झाली असेल त्यामुळे लवकरच सेना- भाजप- आर पी आय महायुती एकत्र सभा घेवू शकते.

@ पेरू- शिरूरमधून आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम उभे आहेत.

९ तारखेला मनसेचा कार्यक्रम जाहीर झाला आणि अगोदर लिहिलेल्या पोष्टी पुन्हा नव्याने कराव्या लागणार .

दिल्लीत पुन्हा अधांतरी स्थिती नको येऊ दे .

वेबसाईटवरून खरंच पत्ता बदलता येणार का ?

मतमोजणी करतांना सर्व मशिन जोडून त्यांचा एकत्रित परिणाम दिसला तर एका एका भागाचे मतदान गुप्त राहील .

कल्याण डोंबिवली मधील लढत रंगतदार होणार आहे.

कल्याण पूर्व आणि त्याला जोडून असलेला ग्रामीण विभाग, डोंबिवली शहर आणि ग्रामीण विभाग, दिवा, मुंब्रा आणि कळवा यांना आपल्या कवेत घेणारा हा लोकसभा मतदार संघ. इथला मतदार पारंपारीकरीत्या शिवसेना आणि भाजप यांना साथ देत आला आहे. पण मनसेच्या आगमनामुळे मतांमध्ये फाटाफूट झाली आहे. त्यातच कल्याण पश्चिमसारखा शिवसेनेला नेहमीच साथ देणारा विभाग भिवंडी मतदारसंघात जमा झाल्यामुळे थोडी ताकद कमी झाली आहे.

इथले मुख्य उमेदवार:

शिवसेना : Dr. श्रीकांत शिंदे
राष्ट्रवादी : आनंद परांजपे
मनसे : राजू पाटील

आपच्या तापाला इथे काहीही किंमत नसणार.

मनसेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजू पाटील यांनी जिंकल्याच्या अविर्भावात मिरवणूक सुद्धा काढून झाली. खरेतर राजू पाटील आणि कुटुंबीय हे कॉंग्रेसमध्येच होते. पण वडीलबंधूनी कॉंग्रेसचे तिकीट न मिळाल्यामुळे मागील विधानसभेला मनसेची उमेदवारी घेतली. डोंबिवली शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात यांची चांगलीच चलती आहे. जिंकण्याच्या आशा थोड्या कमीच वाटतात पण शिवसेनेचा गेम होईल असे वाटतेय.

राष्ट्रवादीने, शिवसेनेचे फुटीर खासदार आनंद परांजपे यांना उमेदवारी दिली आहे. यांचसुद्धा काही खर नाही, शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे. यांची सर्व मदार बोलबच्चन आव्हाड आणि मुस्लिमबहुल मुंब्रा विभागावर आहे. कल्याण पूर्वेतील राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांना मदत न करण्याच जाहीर केलय. गणपत गायकवाड यांची शिवसेना आणि मनसेबरोबर नजरबंदी चालली आहे. त्यांच्या विरोधात जनतेत प्रचंड संताप आहे. ते ज्यांच्या बरोबर जातील त्यांना याचा फटका बसणार आहे.

शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र. परांजपे यांच्या विरोधात सुविद्य उमेदवार हवा म्हणून यांना उमेदवारी मिळाली आहे. यांची स्वतःची राजकारणात काहीच ओळख नाही.

उद्धव ठाकरे यांनी स्वतःची कुवत ओळखून, हेकडी बाजूला करून मनसे बरोबर हातमिळवणी करावी, नाहीतर आमच्यासारख्या पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकांना आपल्याच माणसांची डोकी फोडताना पाहावी लागणार. नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, संजय राऊत यांच्या सारखा पडेल आणि जनमनात स्थान नसलेला गोतावळा जमवून काहीही उपयोग नाही.

आपकडे कोण उमेदवार पुण्यातून आहे ह्याची काहीच माहिती नाही.. >>>>

आप ने पुण्यातून सुभाष वारे हे उमेद्वार दिले आहेत.
पुण्यातून आतपर्यंत माहित असलेले फक्त तीन उमेद्वार आहेत

आप : सुभाष वारे
मनसे : दीपक पायगुडे
????: डी. एस. कुलकर्णी (बसपा नाहीये)

पण हे सर्व मतं खाणार्या गटातील आहेत
अजून जे निवडून येण्याची शक्यता आहे त्यांनी (भाजपा आणि काँग्रेस ) उमेद्वाराच दिलेला नाही.

एकीकडे नरेन्द्र मोदिंना पाठिंबा जाहिर करायचा आणि दुसरीकडे अशा ठिकाणी उमेद्वार उभे करायचे कि जेणेकरुन आघाडीचे उमेद्वार विजयी होतील अशी ही " मनसे " ची रणनीती , म्हणजे दोन नावांवर स्वार होण्याचा प्रयत्न आहे
याचाच दुसरा अर्थ असा कि नरेन्द्र मोदिंना दिलेला पाठिंबा हा मनापासून दिलेला नाही. ह्याला काही उत्तम
" राज ' नीति " म्हणत नाही. आमच्या ग्रूपला अजिबात हेआवडले नाही.आता " मनसे " हे नाव बदलून " भानसे "
असे ( भारत नवनिर्माण सेना ) ठेवावे आणि दिल्ली गाजवावी.

हेकटपणा खरे तर राज ठाकरे करत आहेत. सेनाद्वेष करणे, सेनेला सतत पाण्यात पाहणे याशिवाय मनसेला काही कार्यक्रम दिसत नाही. परवापण मी इथवर वाट काढत आलो आहे आता वाट लावणार आहे अशीच भाषा होती.२००९ ला यांची लाट असताना पण एकही खासदार आला निवडून नाही मात्र आपण सेना भाजपला पाडून कॉंग्रेसला मदत केली याचाच राजना आनंद होता . आता गेल्या वेळेस सारखी स्थिती नाही, मोदिमुळे युवा मते मोठ्या प्रमाणावर महायुतीकडे वळत आहेत, मनसेला मत देणे म्हणजे कॉंग्रेसला सपोर्ट हे समीकरण लोकांच्या लक्षात येत आहे म्हणून आता राज यांनी नवीन खेळी (?) आहे. काय तर म्हणे मोदीना पाठींबा मात्र लढाई महायुती खास करून सेनेविरुद्ध! सेना उमेदवार पडले तरी तिथे मनसे येणार नाही.येणार तर कॉंग्रेसच. मग कसला मोदीना पाठींबा. अश्याने जो थोडाफार जनाधार उरला आहे तिथे पण निगेटिव मेसेज जावू शकतो.

मुंबई उत्तर-पश्चिम :
गुरुदास कामत (विद्यमान खासदार) आघाडी
गजानन किर्तीकर - महायुती
महेश मांजरेकर - मनसे
मयांक गांधी - आप

मागच्यावेळेसारखी मनसेने मतं खाल्ली नाही (यावेळेस शक्यता कमी वाटते. कारण नौटंकीला सुजाण मतदार कंटाळलाय असं एकंदरीत दिसतंय) तर कामत-किर्तीकर यांच्यामध्ये चांगली लढत होईल. ईथे राष्ट्रवादीचे शरद राव कामतांसाठी कितपत काम करतील हा प्रश्नच आहे. गोरेंगावात तरी किर्तीकरांना आघाडी मिळेल असं दिसतंय. त्यांनी मागच्या पाच चर्षांत "पक्षांतर्गत" विरोधकांशी जमवुन घेतलंय, त्यामुळे दगाबाजी होऊ नये. आणि बरेच आधी त्यांची उमेदवारी मान्य केल्याने त्यांनी कामाला आधिच सुरुवात केली आहे.

सध्या कामत उत्तर प्रदेशीय मतदांरांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित कराताना दिसतायंत. कामतांची भिस्त अंधेरी-वर्सोवा आणि जोगेश्वरीचा मुस्लीमबहुल भाग यांवर जास्त आहे. किर्तीकर गोरेगांव आणि जोगेश्वरी ईथुन जास्तीत जास्त आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. महेश मांजरेकरांना सिनेमांच वलय आहे खरं, पण त्यांना (एकंदरीत सर्वच मनसे उमेदवारांना) राज-कृपेवरच अवलंबुन राहावं लागेल. ईथे मनसेची संघटनात्मक बांधणी अजिबात नाहीये.

"आप" कौन अशी मयांक गांधींना विचारणा न झाली तर नवल!

मनसे व आप दक्षिण आणि मध्य मुंबईत तरी काहीच करिश्मा दाखवू शकणार नाहीत. २००९च्या वेळेला जो मनसेला पाठिंबा होता तो आता पार ओसरला आहे. तसेच सेनेच्या खोगीर भरती मुळे त्यांची काही मते आपकडे किंवा नकाराधिकाराला जातील अशी शक्यता आहे. बाकी थेट लढत फक्त आघाडी आणि महायुतीतच होईल अस दिसते.

पुण्यामध्ये पायगुडेंना मनसेची उमेदवारी मिळाल्याने चुरस वाढली आहे. गेल्या वेळेस नवखा उमेदवार असताना मनसेला ७५ हजार मते मिळाली. पायुडे हे त्या मानाने तगडे आहेत. दोन वेळा सेनेकडून आमदार राहिले आहेत. मनसे भाजपसमोर उमेदवार देणार नाही किंवा कमकुवत उमेदवार देणार वगैरे चर्चेला पुणे मात्र जोरदार अपवाद आहे.पाय्गुडेना कॉंग्रेस आघाडी आणि कदाचित महायुतीमधील असंतुष्टांची रसद सुद्धा मिळू शकते. कॉंग्रेसकडून निम्हण, विश्वजीत कदम, मोहन जोशी तर भाजप कडून शिरोळे /बापट/ जावडेकर/ प्रदीप रावत यांची चर्चा आहे. भाजप आज नाव जाहीर करेल असे दिसतेय. मात्र या सर्व स्थितीत सुरुवातीला वाटत होते तितकी सोपी निवडणूक भाजपला असणार नाही. आप कडून सुभाष वारे रिंगणात आहेत. डी एस के आणि कलमाडी अपक्ष उभे राहू शकतात.कोण कुणाची मते खाणार यावर भाजप- कॉंग्रेसचा विजय अवलंबून असेल. मात्र राजकारणात काहीही होवू शकते या उक्तीनुसार या दोन्ही पक्षांना धोबी पछाड देत पायगुडे च निवडून येवून धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता पण नाकारता येत नाही.

Pages