लोकसभा निवडणुका २०१४

Submitted by नंदिनी on 5 March, 2014 - 00:50

आज लोकसभा २०१४ निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. ७ एप्रिलपासून निवडणुका घेतल्या जातील. आचारसंहिता लागू झालेली आहे.

निवडणुकासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी हा धागा. या निवडणु़का नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल व्यतिरीक्त अजूनही हजारो लोक लढवत असतील तेव्हा निव्वळ या तिघांनाच सर्व फुटेज देऊ नये ही विनंती.

आपपल्या शहरतील, भागातील उमेदवारांविष्यी अधिक लिहिल्यास उत्तम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या भागातून (नवी दिल्ली प्रभाग) काँग्रेसचाच उमेदवार कळलाय आत्तापर्यंत. सध्याचे इथले खासदार /मंत्री अजय माकन. यांचा प्रचार तर एफएमवर सुरु झालाय. बरेचसे अ‍ॅथलिट्स अजय माकननी आम्हाला खेळामध्ये सपोर्ट केला असं सांगत एफएमवर प्रचार करत आहेत गेल्या आठवड्यापासून. बाकी उमेदवार माहित नाही.

हातकणंगले (इचलकरंजी)
राजू शेट्टी यानी महायुतीत प्रवेश केल्यामुळे त्यांचा विजय जवळ जवळ निश्चित आहे . दोन्ही काँग्रेस ही जागा घेण्यास उत्सुक नाहीत .
अशावेळी जयंत पाटील यासारख्या मातब्बर नेत्याला उतरवण्याचा घाट राष्ट्रवादी घालात आहे . त्याना उमेदवारी मिळाली तर मात्र ही निवडणूक लक्षवेधी होईल.

नाशिक मधे भुजबळ यांचा विजय निश्चित आहे... (असे मानले तरी जात आहे) तसेच शिवसेनेतर्फे हेमंत गोडसे यांना उमेदवारी देणार असल्याचे समजले आहे.. परंतु मागील निवडणुकीत मनसे तर्फे लढताना त्यांचा पराभव थोडक्यात झालेला.. यंदा शिवसेनेत प्रवेश केल्याने मताधिक्य वाढण्यापेक्षा कमी होण्याचे चांसेस जास्त आहेत

यावर्षी प्रथमच कर्नाटकातून मतदान करणार.
आमच्या गावात काँग्रेसतर्फे एक माजी मुख्यमंत्री.
बीजेपी तर्फे विलीन झालेल्या केजीपीच्या आमदारांचा मुलगा.
बाकीच्यांच्या उमेदवार्या कळल्या नाहीत.

बहुतेक 'यांपैकी नाही' पर्याय निवडावा लागेल.
Wink

उमेदवारांबद्दल चर्चा नाही. पण निवडणुकी संदर्भात म्हणून लिहितेय. यादीमध्ये फोटो नाही असे कळल्यावर तिघांचे ८अ फॉर्मस भरून दिले ऑक्टोबरमधे आणि मुलाचे नाव नवीन येण्यासाठी फॉर्म भरला तेव्हाच. पण नवीन यादीत काहीच फरक नाही.

अल्पना, तुमच्या भागाचे नाव पण लिही की.

निवडणुकांच्या तारखा: 7, 9, 10, 12, 17, 24, 30, एप्रिल आणि ७ मे आणि १२ मे.

अ‍ॅडमिन, धन्यवाद!!!

नंदिनी, वर बदल केला. आमचा मतदारसंघ नवी दिल्ली आहे. Happy

यावेळी मला औरंगाबाद मतदारसंघामध्ये प्रचार आणि मतदान करायला आवडलं असतं. तिथून माझे एक जवळचे काका सुभष लोमटे आम आदमी पार्टीतर्फे निवडणूकीस उभे आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे खैरे असतिल. कॉन्ग्रेस /राकाँ तर्फे काँग्रेसचे किशोर काळे (हे जरा कोणीतरी कन्फर्म करा. काळे आहेत हे नक्की पण कोणते काळे याबद्दल खात्रीची माहिती नाहीये मला) उभे असतिल.

हां
आता चेक केल
गुरुदास कामतच्या विरुद्ध आप चा मयंक गांधी आहे

बीजेपीकडून परत राम नाईक यांना ऊमेदवारि मिळण्याचे चांसेस कमी आहेत

आमचा पिंचिभाग, या मतदारसंघाला गेल्यावेळी खोपोलिपर्यंतचा काही भाग "जोडला" गेला, कारण कळले नाही.
इकडचे काहीच सांगता येत नाही.
कोण उभारणार आहे ते देखिल माहित नाही.
मला इतकेच माहित आहे की मी उभा रहाणार नाहीये या इलेक्शनला(ही) Proud
आशा आहे की मतदारयादीत आमची नावे शाबुत असतील Wink

माझं नावं चुकीच्या पत्त्यासहीत का असेना यादीत आलं ह्या वर्षी तरी हीच महत्वाची घटना.
आम्हाला मावळ मतदारसंघ.
उमेदवार अजुन घोषित नाहियेत.
रा कॉ आणि सेनेचं पैले आप पैले आप सुरुय.
म्हणुन आपने आधे उमेदवार डिक्लेअर केलाय Proud
मारुती भापकर.

आशा आहे की मतदारयादीत आमची नावे शाबुत असतील >>>

नक्की चेक करा. लोक सभा , विधन सभा , मनपा ला एकून ७ -८ मतदन करून सुद्धा , या वेळीस नाव माझे नाव गायब झाले आहे.

नवीन फॉर्म भरला आहे.

मेधा पाटकर निवडणूक लढवणार आहेत ??
मग आज त्या का केजरीवालांना राजकारणाची घाई झाली वगैरे का म्हणत होत्या ?

मेधा पाटकर निवडणूक लढवणार आहेत ??>>>>हो पराग, आपच्या यादीत ईशान्य मुंबईतुन मेधा पाटकर यांचे नाव जाहिर झाले होते.

मग आज त्या का केजरीवालांना राजकारणाची घाई झाली वगैरे का म्हणत होत्या ? >>>> हे कुठे वाचलंस /ऐकलंस पराग?

निवडनुक आयोगाच्या साईट वर तुम्ही स्वतःची नावनोंदनी करु शकतात.. तुमचा पत्ता देखील बदलु शकतात... >>>.. हो पण पुढे काहीच होत नाही. मी पत्ता बदलला तर अजूनही इन प्रोसेस आहे. आता ह्या वेळी जुन्याच मतदारसंघात मत द्यावे लागेल.

मेधा पाटकरांची हेडलाईन बहुदा तीन दिवसांपूर्वीच होती.

हातकणंगले (इचलकरंजी) >> केदार.. ही जागा बहुतेक करून काँग्रेसला सोडली आहे, कोल्हापुरच्या बदल्यात. तसे झाले तर राजू शेट्टींच्या विरोधात कल्लाप्पाण्णा आवाडे असतील. त्यांनी तशी तयारीपण सुरू केली आहे. अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरातून धनंजय उर्फ मुन्ना महाडिकला राकाँची उमेदवारी मिळाली आहे. विरोधात काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले संजय मंडलिक (विद्यमान खासदार सदाशिवराव मंडलिकांचा मुलगा आणि कोल्हापूर जिप अध्यक्ष) असतील. मुन्नाला, त्याचा आधीचा मित्र सतेज उर्फ बंटी पाटलाची (महाराष्ट्र गृह राज्यमंत्री) किती साथ मिळते त्यावर निकाल अवलंबून आहे.

सांगलीतून नेहमीप्रमाणे विद्यमान खासदार/केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील काँग्रेसकडून असायची शक्यता आहे. विरोधात राकाँमधून भाजपात आलेले संजय पाटील असतील. संजय पाटीलना सांगलीतल्या भाजपाच्याच आमदाराचा उघड विरोध आहे. जयंत पाटील आणि आबा पाटील प्रतीकला किती मदत करतात तेही महत्त्वाचे आहे.

निवडणूक तारखा:

10 एप्रिल-
विदर्भ- बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम

17 एप्रिल :
मराठवाडा- हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर
प. महाराष्ट्र: सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, मावळ, पुणे, बारामती, शिरुर, अहमदनगर, शिर्डी,
कोकण- रत्नागिरी-सिंधुदूर्ग,

24 एप्रिल:
उ. महाराष्ट्र- नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, दिंडोरी, नाशिक,
मराठवाडा: जालना, औरंगाबाद,
ठाणे-कोकण: पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई-उत्तर, मुंबई-ईशान्य, मुंबई-वायव्य, मुंबई-उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई,

Pages