Submitted by नंदिनी on 5 March, 2014 - 00:50
आज लोकसभा २०१४ निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. ७ एप्रिलपासून निवडणुका घेतल्या जातील. आचारसंहिता लागू झालेली आहे.
निवडणुकासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी हा धागा. या निवडणु़का नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल व्यतिरीक्त अजूनही हजारो लोक लढवत असतील तेव्हा निव्वळ या तिघांनाच सर्व फुटेज देऊ नये ही विनंती.
आपपल्या शहरतील, भागातील उमेदवारांविष्यी अधिक लिहिल्यास उत्तम.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हातकणंगले (इचलकरंजी) >>
हातकणंगले (इचलकरंजी) >> केदार.. ही जागा बहुतेक करून काँग्रेसला सोडली आहे, कोल्हापुरच्या बदल्यात. तसे झाले तर राजू शेट्टींच्या विरोधात कल्लाप्पाण्णा आवाडे असतील. त्यांनी तशी तयारीपण सुरू केली आहे. अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.
>> मनीष , काँग्रेसने ही जागा घ्यायला नकार दिला आहे . आजच पी एन पाटील यानीही ते सांगितलय . पहिल्यांदा अस होत असेल की पश्चिम महाराष्ट्रातील एखादी जागा न घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत
पुण्यातून अद्याप उमेदवार
पुण्यातून अद्याप उमेदवार जाहिर झालेले नाहीत.... मिसेस कलमाडी कदाचित असू शकतील.. कालच वाचलं की प्रदीप रावतांना परत चान्स द्या म्हणून..
माझं आणि नवऱ्याचं नाव
माझं आणि नवऱ्याचं नाव चुकीच्या प्रभागात आलंय. लोकसभा आणि राज्यसभेला फरक नाही पडणार पण लोकल महानगरपालिकेला फरक पडतो. नवऱ्याने साईटवर पत्ता बदलण्यासाठी अर्ज केलाय, अजून काहीच प्रतिसाद नाही.
आमचा मतदारसंघ 'कल्याण', आनंद परांजपे सध्याचे खासदार.
ह्यावेळी युतीतर्फे एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट दिलंय. बाकीचे कळायचेत.
पारंपारिक चांगल्या कामामुळे
पारंपारिक चांगल्या कामामुळे कल्लाप्पा आवाडे हे इचलकरंजीत व जयंत पाटील सांगलीत अगदीं घरचेच उमेदवार मानले जात असावेत, असं मला पूर्वी तिथं फिरल्यामुळे जाणवतं. राजू शेट्टींचा जोर असला तरीही कल्लाप्पा व <<जयंत पाटील आणि आबा पाटील प्रतीकला किती मदत करतात तेही महत्त्वाचे आहे>>.
रायगड व रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या गोटात एकमेकांचे पाय ओढण्याचं काम चालूच असतं व त्यामुळे खूपच अनिश्चितता तिथं रहाणारच. राजापूर-रत्नागिरी मतदार संघात डॉ.राणेविरोधात कोण उमेदवार उभा राहातो/केला जातो हें पहाणं मोठं रंजक असणार आहे.
"मनसे" लोकसभा निवडणुका लढवणार
"मनसे" लोकसभा निवडणुका लढवणार आहे का?
मनसेचा पहिला नगरसेवक - मंगेश सांगळे (विक्रोळी)
मनसेचा पहिला आमदार (पहिला विजयी निकाल घोषित) - मंगेश सांगळे (विक्रोळी)
आता पहिला खासदार?
दक्षिण मुंबईतून काँग्रेसने
दक्षिण मुंबईतून काँग्रेसने विद्यमान खासदार मिलिंद देवरा यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे जाहिर केले आहे. त्यांच्या समोर मनसेचे बाळ नांदगांवकर असतील. तर सेनेचे पाच वेळा लोकसभेवर निवडणून गेलेले खासदार मोहन रावले यांना २००९ मधिल पराभवामुळे उमेद्वारी गमवावी लागली आहे. त्यांना डावलून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे कळले. आपच्या मिरा सन्याल यंदा मैदानात उतरल्या आहेत. तर अशी चौरंगी लढत आहे आमच्या कडे.
त्यांच्या समोर मनसेचे बाळ
त्यांच्या समोर मनसेचे बाळ नांदगांवकर असतील>>>>म्हणजे, मनसे यावेळेस रिंगणात आहे तर.
शेवटी पोटापाण्याचा प्रश्ण
शेवटी पोटापाण्याचा प्रश्ण आहे.
मनसे गेल्यावेळॅस १२ पैकी ५
मनसे गेल्यावेळॅस १२ पैकी ५ जागांवर दुसर्या स्थानावर होती... हे लक्षात घेतले पाहिजे
मुंबई विभाग २००९ चे निकाल. १.
मुंबई विभाग २००९ चे निकाल.
१. गुरूदास कामत (Cong- 2,53.920 votes)
Runner up:
गजानन किर्तीकर (Shiv Sena)- 2,15,533.
शालीनी ठाकरे (MNS)- 1,23,855
२. प्रिया दत्त (Cong- 3,19,352 votes)
Runner up:
महेश जेठमलानी (BJP)- 1,44,797.
शिल्पा सरपोतदार (MNS) - 1,32,555
३. संजय निरूपम (Cong- 2,55,157 votes)
Runner up:
राम नाईक (BJP)-2,49,378.
शिरीष पारकर (MNS) 1,47,502
४. एकनाथ गायकवाड (Cong- 2,57,523 votes)
Runner up:
सुरेश गंभीर (Shiv Sena)- 1,81,817 votes.
श्वेता परूळेकर (MNS) - 1,08,341
५. मिलिंद देवरा (Cong- 2,72,411 votes)
Runner up:
बाळा नांदगावकर (MNS)- 1,59,729. votes
मोहन रावले (Shiv Sena): 1,46,118
६. संजय पाटिल (NCP- 2,13,505 votes)
Runer up:
किरीट सोमय्या (BJP)- 2,10,572.
शिशिर शिंदे (MNS - 1,95,149)
गेल्यावर्षी मुंबईत तर केवळ
गेल्यावर्षी मुंबईत तर केवळ मनसे मुळे बीजेपी सेनेच्या सीट्स गेल्या होत्या.. मनसेचे बरेचसे मतदार मनसे नसेल तर सेना बीजेपी कडे वळू शकतात..
कालच गडकरी राज ठाकरे भेट झाली आहे.. जर मनसेचे उमेदवार नसतील तर युतीला नक्कीच फायदा होईल.
मावळ अन पुण्याचे मागल्या
मावळ अन पुण्याचे मागल्या बारीचे (चालू घडीचे) खासदार कोण आहेत? (घोर विचारग्रस्त चेहरा)
जर मनसेचे उमेदवार नसतील तर
जर मनसेचे उमेदवार नसतील तर युतीला नक्कीच फायदा होईल.>>>>अगदी अगदी.
>>मावळ अन पुण्याचे मागल्या
>>मावळ अन पुण्याचे मागल्या बारीचे (चालू घडीचे) खासदार कोण आहेत? (घोर विचारग्रस्त चेहरा<<
श्री गजानन बाबर आणी सुरेश कलमाडी.
'आढाळराव-पाटील' बहुतेक आंबेगाव मतदार संघातले ना?
पिंचिं मध्ये कोण उभारणार आहे?
कमाल आहे कलमाडींना परत तिकिट
कमाल आहे कलमाडींना परत तिकिट मिळाले आहे की काय पुण्यातुन ? नविन कोणी नाही का ?
ओह ते चालू खासदार कोण आहे याचे उत्तर आहे.
>>जर मनसेचे उमेदवार नसतील तर
>>जर मनसेचे उमेदवार नसतील तर युतीला नक्कीच फायदा होईल.>>>>अगदी अगदी. <<
पण करणार काय? मनसेचा एककलमी निवडणुक जाहिरनामा आहे - तुला नाहि मला नाहि, घाल कुत्र्याला!
अकोला लोकसभा मतदार संघातून
अकोला लोकसभा मतदार संघातून भारतीय रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर व भाजपाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्यातील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. मिनी मंत्रालयात (जि.प.) ची एकहाती सत्ता व महानगरपालीकेतील सत्ताधारी पक्ष म्हणून नेतृत्व भारिप कडे आहे. दलित मतांचे राजकारण ह्यावेळी सुध्दा अग्रक्रमाने राहीलचं असे जाणवते. विद्यमान खासदार संजय धोत्रेंकडून जनसामान्यांना अपेक्षीत असलेला विकास झालेला नसल्याने अकोला लोकसभा मतदार संघातील मतदार नाखूष दिसत आहेत. शेवटी जातीचे समिकरण ह्या लोकसभा क्षेत्रात प्रकर्षणाने जाणवेल हे निश्चित.
मतदारयादीत नाव नोंदवण्यासाठी
मतदारयादीत नाव नोंदवण्यासाठी फोर्म तर भरला आहे, आता बघु..
एक शंका आहे, माझ्याकडून form no. 6 मधील ''relatives' name'' मधे माझ्या आईचे व वडीलांचे दोघांचेही नाव लिहिले गेले आहे, मग माझ्या voters card वरती माझ्या आई/वडीलांच्या नावांपैकी कुणाचे नाव येईल, प्लीज मला सांगाल का???????
नंदिनी, खुप छान अपडेट केले तुम्ही टाईमटेबल...
बीड लोकसभा मतदारसंघामधून
बीड लोकसभा मतदारसंघामधून भाजपासेनेतर्फे विद्यमान खासदार गोपीनाथ मुंडे, काँ-राकाँ आघाडी तर्फे आमदार सुरेश धस (यांच्यावर भ्रष्टाचाराच्या बर्याच केसेस आहेत, त्यानिमित्ताने तुरुंगातही गेले होते) , आपतर्फे अभिनेता नंदु माधव उभे आहेत. त्याशिवाय तिथून चाटे क्लासेस वाले मच्छिंद्र चाटे पण निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वी मच्छिंद्र चाटे यांना बीडमधून बसपातर्फे उमेदवारी मिळणार असे ऐकले होते.
चाटे उभे राहिले तर ते मुंड्यांची मतं खातिल असा अंदाज आहे.
मध्यंतरी बीड मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये बराच मोठा घोटाळा /भ्रष्टाचार उघडकीस आला होता. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्या नेत्यांचा समावेश होता. ज्या नेत्यांना भ्रष्टाचार उघडकीस येणार याची कुणकुण लागली त्यांनी रातोरात सगळे पैसे बँकेत जमा करून स्वतःला या घोटाळ्यातून वाचवले आणि ते तुरुंगात जाण्यापासून वाचले. जर हा भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला गेला तर कदाचीत आपला फायदा होईल. फक्त त्यांचा उमेदवार अगदीच नविन आहे आणि मतदारसंघातले बरेचसे लोक त्यांना ओळखत नाहीत.
जर हा भ्रष्टाचाराचा मुद्दा
जर हा भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला गेला तर कदाचीत आपला फायदा होईल. >
आप 'ला' का 'आपला' ? का दोन्ही एकच?
@अकोलेकरः संजय धोत्रेंची
@अकोलेकरः संजय धोत्रेंची उमेद्वारी निश्चित झाली का? मला तरी वाटतं अकोल्यात संजय धोत्रेंना
पर्याय नाही. ग्रामीण अकोला,खामगाव या भागात त्यांचा चांगलाच जोर आहे. मराठा समाज पण त्यांच्या मागे उभा असतो शिवाय बीजेपी चा परंपरागत मतदार आहेच. काँग्रेस चा उमेदवार मारवाडी समाजाचा नसेल तर तो समाज ही बीजेपी कडेच वळतो असा अनुभव आहे.
कांहीं पक्षांच्या प्रचाराचा -
कांहीं पक्षांच्या प्रचाराचा - विशेषतः टिव्हीवरचा- अतिरेक त्यांच्या अंगलट येण्याचीच शक्यता दिसतेय !
"आप" ला. माझं मुळ गाव या
"आप" ला.
माझं मुळ गाव या मतदारसंघात (बीड) येत असल्याने मी खूप पुर्वीपासून या मतदारसंघावर लक्ष ठेवून असते. सेना-भाजपा आणि कॉं-राकाँ या दोन्ही आघाड्यांनी जिल्ह्याचं वाटोळं केलेलं आहे.
पण "आप" चे नंदु माधव अगदीच अननुभवी आहेत. एक राजकिय नेता म्हणून किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच नाव याआधी कधीही ऐकलं नव्हतं. फक्त अभिनेता म्हणूनच नाव ऐकलं आहे. त्यामूळे आय अॅम नॉट शुअर अबाउट हिम.
इथे नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपा आणि आप चे कोण उमेदवार असतिल कोण जाणे. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये "आप" च्या सीट्स जास्त आहेत इथून. इथल्या विधानसभा सीट्सचा निकाल आप=७, भाजपा=३ आणि काँग्रेस=० असा होता. काँग्रेसचे अजय माकन तसे स्ट्राँग कँडीडेट मानले जायचे पण विधानसभेचा निकाल फारच विचित्र लागल्याने आता काहि सांगता येणार नाही.
आप आता गुंडागर्दीवर उतरली.
आप आता गुंडागर्दीवर उतरली. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील भाजपा कार्यालयावर काल आपने हल्लाबोल केला. जय हो!
आणि रॅली घ्यायला परवाणगी लागत नाही असे आपचे म्हणणे आहे. केजरीवालसहित आप लाही हम करे सो कायदाच आवडते असे दिसते.
आपचा तमाशा अति चालू आहे.
आपचा तमाशा अति चालू आहे. त्यातही केजरीवाल जरा जास्तच. लोकं पायावर धोंडा मारतात. हे लोक शोधून शोधून धोंड्यावर पाय आपटत आहेत.
>>>> हे लोक शोधून शोधून
>>>> हे लोक शोधून शोधून धोंड्यावर पाय आपटत आहेत. <<<

>>>> कांहीं पक्षांच्या प्रचाराचा - विशेषतः टिव्हीवरचा- अतिरेक त्यांच्या अंगलट येण्याचीच शक्यता दिसतेय ! <<<<
भाऊ, कशाप्रकारचा अतिरेक? मधे मधे पेड जाहिराती देतात त्याचा? की मिडीयामार्फत मुलाखती/प्रश्नोत्तरे/चर्चा वगैरे माध्यमातुनचा प्रचार?
अतिरेक कशाचाही वाईटच.
धाकटीचे अभ्यासानिमित्ते मी टीव्ही केबल सगळे बन्द करुन टाकले आहे. सायंकाळी खूप शान्तता लाभते
टीव्ही मिडिया वरील बरिचशी च्यानेल्स /वाहिन्या प्रचंड आक्रस्ताळ्या पद्धतीने एकतर्फी बातम्या देत असतात , ते बघवत नाही, हा पण अनधिकृत (उमेदवाराच्या/पक्षाच्या खर्चात धरता न येणार्या) प्रचाराचाच एक भाग होऊ शकतो ना?.
असो. येते दोन महिने न भुतो न भविष्यति धामधुमिचे हे नक्की. नेमका शनि वक्रि होउन कन्येला जातोय, परत फिरतोय अन शनिमन्गळ युतिही होणार आहे याच कालावधीत. काऽऽश, मला मेदिनीय ज्योतिष येत असते तर किती बरे झाले अस्ते?
आता १७ मे पर्यंत राष्ट्रीय
आता १७ मे पर्यंत राष्ट्रीय तमाशा लीग... एकदा मतदान सुरु झाले की दर आठवड्याला वेगवेगळ्या राज्यात तमाशा फिरत राहणार...
पिंचि ला मावळात समाविष्ट केलय
पिंचि ला मावळात समाविष्ट केलय ना?
की बारामतीत?
@रंगासेठ आढळराव पाटील:
@रंगासेठ
आढळराव पाटील: 'शिरूर ' मतदारसंघ-
इजा झाली
बीजा झाली
आता तिजा ??????
@झकासराव
पिंपरी चिंचवड मावळात.
भोसरी आमच्या शिरूर मतदारसंघात.
२०१४ च्या निवडणूकांच्या
२०१४ च्या निवडणूकांच्या संदर्भात, गिरीश कुबेर लाईव्हः ऊत्कृष्ट!
http://www.loksatta.com/sampadkiya-news/election-commission-ready-techni...
Pages