लोकसभा निवडणुका २०१४

Submitted by नंदिनी on 5 March, 2014 - 00:50

आज लोकसभा २०१४ निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. ७ एप्रिलपासून निवडणुका घेतल्या जातील. आचारसंहिता लागू झालेली आहे.

निवडणुकासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी हा धागा. या निवडणु़का नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल व्यतिरीक्त अजूनही हजारो लोक लढवत असतील तेव्हा निव्वळ या तिघांनाच सर्व फुटेज देऊ नये ही विनंती.

आपपल्या शहरतील, भागातील उमेदवारांविष्यी अधिक लिहिल्यास उत्तम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रायगडमध्ये आपकडून कुणीतरी सोलापुरचा उमेदवार आणी रत्नागिरीमध्ये कर्नल गडकरी नावाचा पुण्याचा उमेदवार उभा केलेला आहे. यांचे एनावं सुद्धा मतदारांना ठाऊक नसल्याने कशाच्य बेसिस्वर यांना लोकांनी मते द्यावीत अशी अपेक्षा आहे?

मंडळी आणि प्रामुख्याने नंदिनी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी आपकडून कर्नल (निवृत्त) राजन गडकरी यांना उमेदवारी मिळाली आहे, ते पुण्यात असतात. ते माझे ऑफिसमधले इमिजियेट बॉस आहेत. सध्या इतकंच सांगेन. आचारसंहितेचे नियम सांभाळून त्यांच्याशीच चर्चा करून पुढची माहिती कळवेन.

नंदिनी, प्लीज विपु पहा.

एक गोष्ट गेल्या काही दिवसांपासून सारखी मनात येत आहे. आप चे अरविंद केजरीवाल ह्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद मिळाल्यापासून असे अनेक प्रकार केले जे वेडेपणा ठरावेत. ह्यात त्यांचा राजीनामाही आलाच. पण तरीसुद्धा समहाऊ हा माणूस जमीनीवर असल्याचे वाटते. समहाऊ असे वाटते की खरंच कुठेतरी अतीसामान्य माणसाचा आवाज तो बोलून दाखवतो. असेही वाटत आहे की निव्वळ 'न्यूसन्स व्हॅल्यू' किंवा 'मते खाणे' ह्यापेक्षा काहीतरी अधिक त्यांच्या पदरात पडेल आगामी निवडणुकांमध्ये!

सई, अवघ्या एक महिन्यामधेय त्यांना रत्नागिरी मतदारसंघ पिंजून काढणे तरी शक्य होइल का?
आपने तिकीट देताना नक्की कशाचा विचार केला आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

त्यातून एप्रिल मे. आंबे काजू माश्याचा सीझन!! लोकं कामात बिझी. या निवडणुकीच्या दरम्यान मी रत्नागिरीत असेन. त्यामुळे मला तरी तुफान मज्जा येणार आहे.

ईशान्य मुंबईत "मनसे"ने अजुन उमेदवार जाहिर केला नाही आहे. महायुतीत ईशान्य मुंबईची जागा "भाजप"ला आहे. Happy

ईशान्य मुंबईत "मनसे" राम कदमना सीट देणार असे ऐकण्यात आले होते, पण अजूनतरी काही ठोस बातमी नाही.

तयारी आणि नियोजन दोन्ही चालू आहे नंदिनी, उमेदवारीला पार्श्वभूमीही आहे. पण हा प्रश्न बातमी कल्यावर मलाही पडला. मला अर्धवट माहिती आहे आणि त्यांची धांदल सुरू झालेली आहे त्यामुळे इथे फार काही सांगू शकणार नाही.

मज्जा तुफान येणार आहे हे मात्र अगदी खरं बोललीस! Happy

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

मुख्य उमेदवार:

निलेश राणे - कॉंग्रेस
विनायक राउत - शिवसेना

इथे शिवसेनेने तुलनेने कमकुवत आणि वाकोला, मुंबई येथील मागील विधानसभा निवडणुकीतील पडेल उमेदवार विनायक राउत यांना उमेदवारी दिली आहे. नाहीतरी शिवसेनेकडे सध्या पडेल उमेदवारांचीच चलती आहे. जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी शिवसेनेचची पताका फडकत ठेवली आहे पण त्यांना पक्ष प्रमुखांकडून म्हणावी तेव्हढी साथ मिळत नाही. 'तुम लढो हम कपडे सांभाळते हे'---तुम्ही डोकी फोडून घ्या आम्ही दूरदर्शन पाहून परिस्थिती पाहतो---अशी नवीच टूम उद्धव ठाकरेंनी काढली आहे. त्यातच परशुराम उपरकर यांनी मनसेची गाडी पकडली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा गेल्या काही वर्षात राजकीयदृष्ट्या खूपच संवेदनशील झाला आहे. मुंबईहून गुंड नेऊन इथे खुलेआम दहशत माजवली जाते आणि पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. रमेश गोवेकरची तर सध्या कोणालाच आठवण नाही. राणेच्या कारभाराला सगळेच विटले आहेत, पण जाहीररीत्या त्याला कोणीही विरोध करत नाहीत. इथली भौगोलिक परिस्थितीच अशी आहे कि मदतीसाठी हाक जरी मारल्यास माणसे गोळा होईपर्यंत माणूस वर जाईल.

सूनटून्या,

तुमच्या वरील प्रतिसादाशी सहमत. रमेश गोवेकरांसारखी आजून चार प्रकरणे आहेत. इथे एक लेखात ओझरता उल्लेख आहे : http://parabsachin.blogspot.co.uk/2011/06/blog-post_6556.html

आ.न.,
-गा.पै.

या निवडणुकांमधे इतका प्रचंड पैसा गुंतवण्यात आला आहे की त्याची बातमी इथे आली होती! अनेक लहान धंदे, व्यक्ति यांना अपार धनलाभ झाला म्हणे.
आता काही नतद्रष्टांनी पैसे परकीयांच्या घशात घातले म्हणा, पण तरी बर्‍याच लोकांचा फायदा झाला म्हणे.

सुनटुन्या, वैभव नाईकांबाबत तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय. राणेंच्या दहशतीसमोर कुडाळात सेनेची शाखा पुन्हा सुरु करण्याचे काम वैभव नाईकांनी केलंय. खरं तर त्यांना वि.परीषदेवर पाठवायल हवं होतं. राणे M Power (money and muscle) वापरुन ही निवडणुक जिंकणार हे नक्कीच. तरीदेखिल मागच्या वेळेला १ लाखाचं मताधिक्य घेऊन जिंकणार अशा वल्गना करणार्‍या निलेश राणेंना ५० हजार मताधिक्य मिळालं होतं. त्यादेखिल रत्नागिरीमधुन मिळालेल्या मतांचा वाटा जास्त होता. तुल्यबळ उमेदवार उभा केला तर त्याला राष्ट्रवादीकडुन पण मागिल दाराने रसद पुरविली जाऊ शकते.

उद्धव ठाकरे स्वताचा विदेशातील धंदा सांभाळण्यासाठी महिन्यातले १५ दिवस देशाच्या बाहेर असतात. ते काय इथे लक्ष देणार. त्यांच्याकडे आहेत लढवय्ये नेते नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, संजय राऊत. Rofl

मावळ आणि रायगडमध्ये राष्ट्रवादीमध्ये बंडाळी माजली आहे. मावळ मध्ये लक्ष्मण जगताप शेकापकडून लढणार आहेत तर रायगडमध्ये रमेश कदम अपक्ष लढतील त्यांना पण शेकापचा पाठींबा असेल.याचा फायदा दोन्हीकडे सेनेच्या उमेदवारांना मिळू शकतो. मावळ मध्ये तर राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नसल्याचे चित्र आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वीच हार मान्य केल्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक मंत्री, नेते लोकसभेच्या निवडणुका लढण्यास अनुत्सुक असल्याच्या बातम्या आहेत.

काँग्रेस सत्तेपासून दूर गेल्यास संघटनेत स्वतःला हवे असलेले बदल करणे राहुल गांधींना सोयीचे होईल - इति मणिशंकर अय्यर. राहुल गांधीही ही निवडणूक उपान्त्य फेरीचा सामना म्हणून पाहताहेत असे वाचनात आले. आपने दिल्ली-विधानसभेच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यावर काँग्रेसची असावी.

एनडीटीव्हीच्या ओपिनियन पोलमध्ये एन्डीएला २२९ (बहुमत २७२+१) जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. उत्तरप्रदेश ४०/८० तर बिहार २३/४० जागा एन्डीएला मिळण्याची शक्यता दाखवली आहे.
तेलंगणा राष्ट्रीय समितीने आतापासूनच कुंपणावर बसायचे ठरवले आहे. सीमांध्र, तेलंगणात विधानसभेच्या निवडणुकाही लोकसभा निवडणुकांच्या सोबतच आहेत.

भ्रष्टाचार हा निवडणुकीतला सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा आहे की नाही याचे उत्तर तिकिट वाटपातच कळेल. कारण भ्रष्टाचाराचा शिक्का बसलेले नेते उभे राहिले की निवडून येण्याचीच शक्यता अधिक असते.

आमच्या भागातले खासदार संजय निरुपम यांनी मतदानाला एक महिना असतानाचमतदानासाठीच्या मतदार-केंद्र-यादी क्र.इ. माहितीची कार्डे बनवून वाटली सुद्धा.

मुंबई नॉर्थमध्ये यावेळेस निरुपम यांना यावेळेस घरी बसावे लागू शकते. गेल्या वेळेस मनसेच्या शिरीष पारकरांना जवळपास दीड लाख मते पडली परिणामी भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक अवघ्या ५-६ हजार मतांनी पडले आणि निरुपम सारखा खासदार लोकांच्या नशिबी आला.म्हणजे मनसेनेमुळेच एक प्रकारे मराठी माणूस पडून निरुपमांचे फावले. अर्थात निरुपमांची काही एक गठ्ठा उत्तर भारतीय मते होतीच. यंदा मात्र मनसेची पूर्वीची क्रेझ नाही आणि मुख्य म्हणजे उमेदवार पण उभा नाही. मोदींचा करिश्मा भाजपला तारेल.खास करून गुजराती लोकांची मते मोदींमुळे भाजपला मोठ्या प्रमाणावर जातील.बाकी सेनेमुळे मराठी मते तर मिळतीलच. तर उलट आपचा ताप कॉंग्रेसला भोवेल आणि भाजपचे गोपाळ शेट्टी निवडून येतील अशी चिन्हे आहेत.
असाच फायदा शेजारच्या मतदार संघात (मुंबई नॉर्थ ईस्टमध्ये) किरीट सोमय्याना मिळेल असे सध्या तरी दिसतेय.

मुंबई नॉर्थमध्ये>
भाजपचे गोपाळ शेट्टी निवडून येतील अशी चिन्हे आहेत.>>>>>पूनम महाजन कुठल्या मतदारसंघातुन उभ्या आहेत?

सुभाष वारे कोण आहेत ?>> राष्ट्र्सेवादलाचे माजी अध्यक्श , फार साधा सरळ माणुस आहे हा.
सामाजिक चळवळवाले ह्यांना जवळुन ओळखतात पण राजकारणात काय टिकाव लागेल देवास ठाउक.

आमच्या भागातले खासदार संजय निरुपम यांनी मतदानाला एक महिना असतानाचमतदानासाठीच्या मतदार-केंद्र-यादी क्र.इ. माहितीची कार्डे बनवून वाटली सुद्धा.>>>>आणि आमच्या इथे किरीट सोमय्यांनी. Happy

जिप्सी/ उदयन : प्रिया दत्त / सुनील दत्त विरुद्ध सेनेचा उमेदवार २००९ च्या इलेक्शनपूर्वी उभा असायचा. २००९ला मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि त्यांचा मतदारसंघ बदलला (नवीन पुनर्रचित मतदार संघ: मुंबई नॉर्थ सेन्ट्रल).२००९ पासून ही जागा भाजप लढवते.
२००९ला इथून भाजपचे महेश जेठमलानी उभे होते ते अर्थातच दत्तसमोर पडले.आता प्रिया दत्त विरुद्ध पुनम महाजन असा सामना आहे.मनसे रिंगणात नाही मात्र गेल्यावेळेस भाजप+ मनसे मतांची बेरीज केली तरी प्रिया दत्त पुढे होत्या. ही कॉंग्रेसची राज्यातली सर्वात मजबूत सीट समजली जाते. मतदार संघातील मोठ्या प्रमाणात असलेले मुस्लिम बांधव एक गठ्ठा दत्त याना पाठींबा देतात कारण अर्थातच सुनील दत्त आणि नर्गिस यांचा करिश्मा / पूर्व पुण्याई.बाकी उत्तर भारतीय आणि बर्याच प्रमाणात दलित मतपेढी पण इथे कॉंग्रेस बरोबर असते. यंदा मोदींची हवा, मनसे नसणे, प्रिया दत्त बद्दल काही प्रमाणात असलेली नाराजी वगैरे जमेस धरली तरी दत्त यांचे पारडे जड आहे.मुस्लिम मते फोडणारा कुणी उमेदवार उभा राहिला तर मात्र महाजन यांची लॉटरी लागू शकते.तशी शक्यता कमी आहे.
मुंबईत कॉंग्रेसला प्रिया दत्त आणि काही प्रमाणात मुरली देवरा यांची जागा वाचवणे सोपे आहे. बाकी जागी महायुतीला संधी आहे. खास करून किरीट सोमय्या, गोपाल शेट्टी तसेच सेनेचे गजानन किर्तीकर आणि राहुल शेवाळे यांच्या जागा. शेवाळे आणि किर्तीकर यांच्या जागेवर मनसे उमेदवार आहेत. किर्तीकरविरूद्ध महेश मांजरेकर पण उभे आहेत.लोकांनी २००९ च्या अनुभवावरून (मनसेला मत = कॉंग्रेसला फायदा) महायुतीला मतदान केले तर किर्तीकर आणि शेवाळे निवडून येतील.

उमेदवार आणि पक्श कोणी का असेना, सामान्य माणसाचा कितपत फायदा होईल हे आत्ताच सांगण अवघड आहे.

एक गोष्ट आहे कि ह्यामुळे पैसा बराच बाहेर निघत आहे.

नुकत्याच आलेल्या आक्डेवारीनुसार साधारण ३०,००० कोटी रुपये खर्च होईल. Hotel, transportation, advertising, media अशा अनेक क्शेत्रांमध्ये मंदीतुन बाहेर निघायला चालना मिळेल.

ह्याशिवाय अप्रत्यक्शरीत्या बर्याच ठिकाणी मदत होउ शकते.

२००८ साली मनमोहन सिंग यांनी मंदीतुन बाहेर निघण्यासाठी एवढ्याच रकमेची तरतुद केली होती.

ह्या सगळ्या गोष्टींचा जास्तीतजास्त उपयोग भारतीय नागरीकांना आणि येथील कंपन्यांनाच व्हावा, हि माफक अपेक्षा.

आयला मज्जा. मग दर सहा महिन्यांनी अश्या निवडणुका ठेवा. पन्नास साठ वर्षात स्विस बँकेतला सगळा पैसा आपोआप बाहेर येईल, मग आयकर, विक्रीकर वगैरे काही न भरता सरकार श्रीमंत होईल! आणि जनता सुद्धा. मग काय, इतर जग शोध लावेल, गोष्टी तयार करतील, आपण आपल्या घरबसल्या विकत घ्यायच्या. आपण फक्त क्रिकेट नि बॉलिवूड, बॉलिवूड नि क्रिकेट असे करत बसायचे.

एकदा पैशाची गरज संपली की त्या निमित्ताने होणार्‍या दंगली गुन्हे बंद. एकदम सगळे सुखी!

मग मेरा भारत महान! भारत जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र. जगात सर्वत्र लोक भारतात यायला धडपडतील!
माझी खात्रीच होती की आज ना उद्या भारतीय त्यांचे सर्व प्रश्न सोडवून जगातला उत्तम, सर्वशक्तिमान, संपान्न देश होईल.
जय भारत, जय निवडणुका!!

Light 1 Happy

<< प्रिया दत्त बद्दल काही प्रमाणात असलेली नाराजी वगैरे जमेस धरली तरी ...>> साकल्यजी, मीं याच मतदार संघातला आहे व ही नाराजी वर वर वाटते त्याहूनही तीव्र असल्याचं मला जाणवतं. जर सरळ सामना झाला व पुनम महाजन यांची प्रचार मोहीम कल्पकतेने आंखली व राबवली गेली, तर केवळ सुनील व नर्गिस दत्तच्या पुण्याईवर आतां प्रिया दत्तला [त्यांचं असं भरीव काम कांही नाहीय ] निवडणूक जिंकणं अशक्य नसलं तरी फार सोपंही जाणार नाही, असं आपलं मला वाटतं.

Pages