Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती जानु कधी गेली घर आवरायला?
ती जानु कधी गेली घर आवरायला? ती तर कधी फुदकुन याच्या रुममध्ये तर कधी त्याच्या अशीच घरभर टिवल्याबावल्या करत नाचत असायची >>>>> अगदी अगदी
हळद प्रकरण वाचल्यावर माबोवरचा
हळद प्रकरण वाचल्यावर माबोवरचा एक सुप्रसिद्ध धागा आठवला. असोच.
मजा आहे … डोक्यावर पडलेली
मजा आहे … डोक्यावर पडलेली विनाकारण हसतेय , दर वेळी श्री चा नाव घेतला कि ढोल वाजतोय
गोखले घरातील बरण्या पूर्ववत झाल्यात
कुठल्याही विषयावर सेंटी मुझिक वाजतेय
खरे प्रेम विसरता येत नाही … जानवी आपटे ची सून होणार .........++++१
जानु स्वयंपाक कधी करते पण,
जानु स्वयंपाक कधी करते पण, हळदीची बरणी मिसप्लेस व्हायला???????????? :स्मितः
जानवी खदाखदा हसल्याशिवाय एक
जानवी खदाखदा हसल्याशिवाय एक वाक्य नाही बोलत
आणि श्री बाळ हायबरनेशन मध्ये गेलंय
चांगली जोडी आहे
जानवी खदाखदा हसल्याशिवाय एक
जानवी खदाखदा हसल्याशिवाय एक वाक्य नाही बोलत
आणि श्री बाळ हायबरनेशन मध्ये गेलंय
चांगली जोडी आहे<<<
जान्हवीच्या हासण्याचा आवाज येत नाही. खदाखदा हे बहुधा तुमचे कंडिशनिंग असावे.
ती नुसतीच जबडा वासून प्रत्येकाकडे बघत राहते.
मला त्या जबड्यात लांबून एक चुन्याची पुडी टाकावीशी वाटते.
जान्हवीच्या हासण्याचा आवाज
जान्हवीच्या हासण्याचा आवाज येत नाही. खदाखदा हे बहुधा तुमचे कंडिशनिंग असावे.
ती नुसतीच जबडा वासून प्रत्येकाकडे बघत राहते.
मला त्या जबड्यात लांबून एक चुन्याची पुडी टाकावीशी वाटते.
>>>>>>>>>>>>>>>>
जान्हवीच्या हासण्याचा आवाज
जान्हवीच्या हासण्याचा आवाज येत नाही. << मला एकदम रिटार्डेट जान्हवी डोळ्यासमोर आली
मला त्या जबड्यात लांबून एक चुन्याची पुडी टाकावीशी वाटते.
>>:हाहा:
सर्जरी बाहेर आल्या आल्या ,
सर्जरी बाहेर आल्या आल्या , माझं लग्न ठरलय.. हे बर आठवतं.
(हे म्हणजे, लहान मूल सांगतं ना , माझा हॅपी बर्ड डे आहे उद्या.. तसं वाटलं)
आपट्याचा प्रोजेक्ट वाढला... श्री आता बेंचड्यावर.. बिचारा.
ह्या सिरियलीचे एकदम सुरुवातीचे भाग कुठे मिळतील? आमच्या नशिबाने आम्ही पाहिले नाहीत. आता नशीब वर टांगून बघून(सिरियलचे भाग) पाहतो. कृपा करा कोणीतरी.
ही जानू वेडी झालिये. कशी
ही जानू वेडी झालिये. कशी हासती
जानवी खदाखदा हसल्याशिवाय एक
जानवी खदाखदा हसल्याशिवाय एक वाक्य नाही बोलत
आणि श्री बाळ हायबरनेशन मध्ये गेलंय
चांगली जोडी आहे<<<
जान्हवीच्या हासण्याचा आवाज येत नाही. खदाखदा हे बहुधा तुमचे कंडिशनिंग असावे.
ती नुसतीच जबडा वासून प्रत्येकाकडे बघत राहते.
मला त्या जबड्यात लांबून एक चुन्याची पुडी टाकावीशी वाटते.

ती जान्हवी इतकी जोरजोरात
ती जान्हवी इतकी जोरजोरात ओरडून का डायलॉग मारतेय आताशी?( मेमरी लॉस झाली की माणसं जोरात बोलतात असा शोध लावायचा का प्रेक्षकांनी?)
इतकी जोरात ओरडून बोलते.... त्यात भयानक हसतेय..कर्कश वाटतेय. आधीच नाटकी आवाज आणि त्यात असा ओरडून अभिनय.. देवा.. आम्हला विसरायल अभाग पाडणार जानू.
हो आजच्या भागात तर जरा जास्तच
हो आजच्या भागात तर जरा जास्तच ओरडून बोलल्यासारखे वाटत होती.
हो आजच्या भागात तर जरा जास्तच
हो आजच्या भागात तर जरा जास्तच ओरडून बोलल्यासारखे वाटत होती.>>> हो ना
झी मराठी वरील सर्व
झी मराठी वरील सर्व मालीकावीरांनी अब तुम्हारे हवाले कथा साथियो या अर्थाने मालिका लिहायला सुरुवात केलीये ….
१. खंडोबा : खंडोबाची मूळ स्टोरी सोडून म्हाळसा आणि बानुबाई यांचे लग्ना आधीच चुरशीचे भांडण लावून दिलेय, मालिकेच्या सुरुवातीला याचा खंडोबा पुराणाशी तिळमात्र संबंध नाही इतकेच लिहायचे बाकी ठेवलेय. आता खंडोबा ने टोटल पाच लग्न केली शिवाय वाघ्या मुरली आहेतच , त्यामुळे पुढे महायुद्धाची रिहर्सल चालू आहे असे वाटते
२. जावई : यात मात्र सुरुवातच जोरदार केलीये , बिझनेस चे डायलॉग मस्त मारतात, आपल्याकडे स्टील आहे , तेल आहे वगैरे वगैरे , (स्टील आणि तेल मिळून काय बनवतात ते जरूर सांगावे )….
३. होणार सून : आम्ही काय वाट्टेल ते करू , कथेचा स्टोक संपलाय , तुम्ही पहिले तीन महिने हि मालिका बघितली नसेल किंवा तुमचीही त्या तीन महिन्याची याददाश्त गेलीये या आशयाने कथा चालवूया
४. रेशीमगाठी : परीचे केस लांब असतात, अशा अनेक जाहिराती बघून याचे एपिसोड लिहिले जातात, मुळ कथा हम दिल दे चुके चे सीन मध्ये मध्ये घुसवून लिहिली जाते
तिच्या आईने मात्र मुलीला, आधी
तिच्या आईने मात्र मुलीला, आधी करत अस्लेली काम आठवतात की नाही हे आधी पाहिल.
ही जानु आता प्रचंड कर्कश्श,
ही जानु आता प्रचंड कर्कश्श, प्रचंड भेसूर झाली आहे.. आणि बोलताना सारख्या उड्या का मारते :रागः
जानु मेमरी गेल्याने आणि
जानु मेमरी गेल्याने आणि जुन्या घरी परत आल्याने आता जुने कपडे घालतेय खरी.
पण लग्न मानवल्याच्या खुणा तर पुसता येत नाहीत ना (डबल चीन, जाड गळा, आता जरा मोठा झालेला चेहर्याचा आकार). त्यामुळे तिने पुर्वीसारखे हसायचा प्रयत्न केला तरी आता तो गोडवा अज्जिबात दिसत नाही त्या चेहेर्यात. (आठवा: पुर्वी जानु अंघोळ करुन ओले केस बांधुन कशी दिसायची?)
(आठवा: पुर्वी जानु अंघोळ करुन
(आठवा: पुर्वी जानु अंघोळ करुन ओले केस बांधुन कशी दिसायची?)<<< ह्या अवस्थेत जानू काय कोणीही चांगले दिसेल.
ही जानू वेडी झालिये. कशी
ही जानू वेडी झालिये. कशी हासती
>>>
हो आजच्या भागात तर जरा जास्तच ओरडून बोलल्यासारखे वाटत होती.
>>>>>>>
ही जानु आता प्रचंड कर्कश्श, प्रचंड भेसूर झाली आहे.. आणि बोलताना सारख्या उड्या का मारते
>>>>
प्रचंड अनुमोदन
तिच्या आईने मात्र मुलीला, आधी करत अस्लेली काम आठवतात की नाही हे आधी पाहिल:)>>>>>
ती सारवासारव होती अनू
पण या मालिकेतली सावत्र आई बघता दॅट इज ऑब्युअस!
तिच्या आईने मात्र मुलीला, आधी
तिच्या आईने मात्र मुलीला, आधी करत अस्लेली काम आठवतात की नाही हे आधी पाहिल>>>>>>>>>>> आणि त्यावरचं जानुबाईचं उत्तर म्हणजे डोकच फिरलं तिचा तो टोन ऐकुन. चहा करायचे, स्वैपाक करायचे, भांडी घासायचे काय नी काय.
सर्जरी नंतर तिच्या
सर्जरी नंतर तिच्या स्वरयंत्रावर परीणाम झालाय. म्हणून ती अशी जोरात जोरात बोलतेय.
डोकच फिरलं तिचा तो टोन
डोकच फिरलं तिचा तो टोन ऐकुन
>>>
+1
सगळे: प्रचंड अनुमोदन! बेफि:
सगळे: प्रचंड अनुमोदन! बेफि:

जानू : काय गं हे असं असं कसं
जानू : काय गं हे असं असं कसं झालं आपलं?
मेघना : तरी तुझं बर होत सुरुवातीला. माझा तर पहिल्या एपिसोडपासून पोपट झालाय.
जानू : ए पण त्याला आपण काय करणार?
मेघना : अभिनय!
जानू : म्हणजे तू करत नाहीस की काय?
मेघना : अती हुशारी नको दाखवू.
जानू : का तू तेवढी कशीही बोल आणि मी बोल्ले की...
मेघना : ए जाउदे आधिच लोक शिव्या देतायत त्यात तू आणि नको डोकं पिकवू... चल त्यापेक्षा बार मधे जाउया. व्हाईट मिष्चीप ९० मारुया आणि शुटींगला निघुया
जानू : नको श्री ला कळालं तर काय वाटेल त्याला
मेघना : त्याला कळायचं ते सगळ कळालय आता आणि उशिरा कळालय याचा पश्चातापही होत असणार.... जाऊदे चल हानुया पाचची
जानू : हं, बरोबराय तुझं चल
(बार मधे जातात दारू पितात)
मेघना : काय गं मायबोली वाचतेस का?
जानू : (रागाने बेभान होऊन) तुला काय मस्ती आलिये का? का त्या वेबसाईटचं नाव घेतलस? माझा अपमान करतीयेस हां... आग्यामहू चावलेल्या तोंडाचे... हार्णीयाहास्यीनी...
मेघना : जीभ आवर घोडे. तुझ्याबद्दलची चर्चा वाचलिये मी. घोडीची हरीण होत नाही की काहितरी...
जानू : अगं तू तर गॅस पेशंट आहेस बेवडे
मेघना : जा गं आधी त्या आपट्याला हो म्हणली मग श्री गाठला मग आता परत आपते पायजे ना? बडे अच्छे लागतात काय?
जानू : निदान मी बाकी तर काय नाय केलं तू त्या आदित्य१ बरोबर शेणच खाल्ल असणार....
(बराच वेळ हे ऐकत असलेला वेटर पुढे येतो)
वेटर : मॅडम मी दोन्ही मालिका न चुकता बघतो. तुम्ही दोघीही छान अभिनय करता. तसे मत मी न चुकता मायबोलीवर नोंदवत असतो. पण आत्ता तुम्ही दोघींनी एकमेकीचा जो महाभयंकर अपमान केला आहे त्यानंतर तुम्ही एकमेकीला मोकळे सोडणे म्हणजे पाप आहे. टेबल खुर्ची ट्रे ग्लास बाटल्या जे हवे ते वापरा पण एकमेकीला चांगली अद्दल घडवा आज.
जानू : यू आर राईट.... (बाटली उचलते आणि मेघनाच्या डोक्यात घालते... मेघना चरफडून चरफडून कोमात जाते.) हा हा हा हा (ती विजयोन्मादाने हासू लागते एवढ्यात वेटर जानूच्या डोक्यात ट्रे घालतो. आणि जानू चरफडून चरफडून कोमात जाते.)
(वेळ : रात्री दहाची. चॅनल : एबीपी माझा निवेदक : प्रसन्न जोशी)
प्रसन्न : नमस्कार हे आहे महाराष्ट्रातील नंबर वन न्युज चॅनल एबीपी माझा आणि तुम्ही पाहताय १० च्या बातम्या.
हबा : अरे बापरे हे तर मला कळलच नव्हतं...
प्रसन्न : नुकत्याच सकाळी दहा तासापुर्वी हाती आलेल्या बातमीनुसार काल सकाळी आकरा वाजता जुळून येती रेशीम काठी माफ करा गाठी व होणार सून मी या घराची या मालिकेतील दोन्ही अभिनेत्रीनी नैराश्यातुन एकमेकीची आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने दोघीही बचावल्या असल्या तरी कोमात आहेत. त्यामुळे या मालिका थांबण्याचा निर्णय झीमराठी ने घेतला आहे.
(वेळ : रात्री दहा दहाची स्थळ : महाराष्ट्र)
तडतडतडतडतडतडतडतडतडतडतड तडतडतडतडतडतडतडतड तडतडतडतडतडतड
धिंच्याक टिच्याक टिच्याक टिच्याक
तडतडतडतडतडतडतडतड
तक धिना धिन धिंच्याक ढिंच्याक
तकतिरकीडतकतातिरकीड
तडतडतडतडतडतडतडतडतडतडतडतडतडतडतडतड
भारीये ...
भारीये ...:P
यापुढे महिना दोन महिने श्री
यापुढे महिना दोन महिने श्री जानवी च्या पुढे मागे करेल आणि जानवी मला एक गुंड रोज त्रास देतो असा विचार करेल
त्यातच रक्षा बंधन उजाडेल …। या प्रोग्राम मध्ये तरी रेशीमगाठी जुळून येतील
जानू जाडी ढोली आम्मा ढिग
जानू जाडी ढोली आम्मा ढिग ढप्पा.
ह. बा. :हहगलो:
ह. बा.

दोन्ही अभिनेत्रीनी
दोन्ही अभिनेत्रीनी नैराश्यातुन एकमेकीची आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
Pages