होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज, डिमेंशिया has memory loss too.
higher blood pressure, sugar level etc are some of the causes of dementia.
आपण त्याची कारणे पाहतोय.

जान्हवी अतीइनोसंटसाम्राज्ञी असल्यागत का वागतीये? स्वतःला सदमा मधील श्रिदेवी समजायला लागलीये का?

तिचे ते " अ‍ॅहॅ हॅ हॅ" लाडीक हसू आणि मेटॅलिक आवाजातले पाटीवर खिळ्याने रेघ ओढल्यासारख्या आवाजात बोलते तो टोन का नाही विसरली?

एकटा पिंट्या आणि त्याची आई नॉर्मल वाटत आहेत आता. बाकी सगळे गंडलेत.

सुजा, सगळेच मेमरी लॉस २४-७२ तासात रिकवर होतात असेनाही पण होण्याची शक्यता जास्त आहे.
त्यातही पेशंटचे मोटर फंक्शन्स इतर सेन्सेस अत्युत्तम असताना फक्त मेमरी लॉस आठवड्यापेक्षा जास्त शिल्लक रहाणे हे वॅस्क्युलर स्ट्रोक मध्ये जास्त होते, हेड इंज्युरीमध्ये कमी.
वॅस्क्युलर स्ट्रोक म्हणजे मेंदूचे रक्तपुरवठा कमी झाल्याने होणारे नुकसान.

मग तिला खरं काय ते समजल्यवर दिमाग पे असर होइल म्हणून घरातले सर्व तिच्यासमोर "हे लग्न वगिरे झालंच नाही" असं नाटक करतात रक्षंदा करणच्या बेडरूममधून बिस्तारा हलवते वगैरे बरीच हृदयस्पर्शी दृष्ये होती.

>> हे त्या 'बडे अच्छे लगते है' मध्ये सुद्धा होतं ना?

साती छान पोस्ट Happy

हेड इण्ज्युरित केस सगळे कापतात ना? मग जानुबाळीचे तुळतुळित का केले नाही? Uhoh

आणि सर्वात मोठा प्रश्न. आपण असल्या शिरेलीत एक मुर्खासारखा रोल करतोय जो एक कणही रियलिस्टिक नाही जाची जाणिव नसावी का या कलाकारांना? का फक्त पैसेच महत्वाचे असतात? Uhoh

इन ऑल मी कॉमेडी नाईट्स विथ कपिल ला १०० पैकी ५०० मार्क देते. अप्रतिम सिरियल. पैसा वसूल. खूप आवडते मला

हेड इण्ज्युरित केस सगळे कापतात ना? मग जानुबाळीचे तुळतुळित का केले नाही?<<<

हेड बराच वेळ शोधत होते डॉक्टर! यडपटच झालेत हल्ली डॉक्टर्सही!

हे त्या 'बडे अच्छे लगते है' मध्ये सुद्धा होतं ना?<<< माहित नाही. मी अथपासून इतिपर्यंत पाहिलेली एकमेव सीरीयल "क्युंकि सांस भी कभी बहु थी" त्यानंतर मी मालिका सलग पाहणे सोडले. अधून मधून एखादा एपिसोड पाहते. नाहीतरी सगळे प्लॉट याच आद्य मालिकेतून उचललेले असतात!!! मी ज्या मालिकेसाठी एडी म्हणून काम केलं त्या मालिकेचा एकही एपिसोड पाहिलेला नाही!!!

का फक्त पैसेच महत्वाचे असतात?>> दक्षे, त्यानां पण फ्लॅटचे हप्ते वै भराय्चे असतील की अस म्हणुन दुर्लक्ष कर..

श्री : आईआजी, ती मला म्हणालेली की प्रेम कधिच विसरता येत नाही...
आईआजी : अरे हे मग तू मला आधी का नाही सांगितलस?
श्री : म्हणजे?
आईआजी : अरे तुला कळत कसं नाहिये... प्रेम कधिच विसरता येत नाही...
श्री : हो आईआजी ते मला कळालय...
आईआजी : मग तुला हे का कळत नाहिये की ती कुणाला विसरलिये आणि कोण तिच्या लक्षात आहे?
श्री : म्हणजे तो अनिल...
सरू : शिर्‍या ही म्हातारी सटकलिये तू नको डोक्यात उडीद भरून घेऊ
आरजी : आई मी काय म्हणतोय...
मोठी आई : पहिल्यासारखे निष्ठूर वागा हवं तर... पण पायलिचे हावभाव करून चिपट्याची वाक्यं नका टाकू तुम्ही... आधिच सिरीयल झिंगायला लागलिये...
श्री : आता माझ्या लक्षात आलं... मी पर्यावरण रक्षणासाठी झटत राहिलो पण पर्यावरणालाच धुराचं व्यसन लागलेलं....
आईआजी : अरे लगेच असा टोकाला जाऊ नको... मला तसं म्हणायचं नव्हतं...
सरू : म्हणून झाल्यावर सांगण्यापेक्षा म्हणायच्या आधी ठरवत जा ना कसं म्हणायचं ते....
आरजी : मी तेच सांगतोय की असं काही नसेल आणि असेल तरी ती आता श्रीची बायको आहे... तेव्हा आपण चौकशी करू आणि तसच काही असेल तर काहितरी मार्ग निघतो का ते आईला विचारून ठरवू ना....
मोठी आई : ह्या वाक्याची काय गरज उपयोग मदत काहितरी आहे का? मी एकटीच बरी होते... का हा तंबोरा घातलाय माझ्या गळ्यात?
श्री : आई... तू शांत हो बघू...
आईआजी : प्रेम विसरता येत नाही.... अनिल आपटे... लग्न... होणार सून ती ह्या घरची....?
सरू : तू काय भांग मारून आलियेस का आज? धुणं पिळल्यासारखं काळीज पिळतीयेस कोकराचं ते....
आईआजी : सरू... जिभेला लगाम घाल. आणि सर्वांनिच लक्षात ठेवा आता मी सांगत नाही तोवर कुणीही जान्हवीला भेटायचं नाही... आणि श्रीने तर आजिबातच नाही...
आरजी : पण मग म्हणजे एक शंका म्हणुन बोलतोय म्हणजे बघा....
मोठी आई : ओक ना आता किती हुंदके देणार...
आरजी : म्हणजे हेच की ते आपण कुणीच भेटणार नाही ते ठीक पण मग अनिल भेटणार त्याचं काय?
श्री : नाही नाही नाही.....

***************** पुढच्या भागात *****************
श्री : डॉक्टर ती मला ओळखत नाही हे मला आता सहन होत नाहीये... मी तिला जबरदस्ती सगळं दाखवणार आहे
डॉक्टर : पण अचानक ते सगळं बघून ती घाबरेल... आय मिन आपल्याला आठवत नसलेले प्रसंग आपल्या आयुष्यात घडून गेलेत हे ती कसं पचवेल?
श्री : मग काय उलटी करेल? करूदे... पण मी त्या आपट्याला......

फक्त पैसेच महत्वाचे असतात? >>>> का नसावेत ? Happy शेवटी तो 'व्यवसाय' आहे त्यांचा.. चांगलं काम करायची इच्छा जरूर बाळगावी पण शेवटी त्यांनाही घर चालवायचं आहेच ना..
खुपते तिथे गुप्ते मध्ये ह्या संदर्भात नीना कुलकर्णी ह्या संदर्भात खूप चांगलं आणि पटेलं असं बोलली होती.. शेवटी आवड नावड सोडून काहितरी ठोस इन्कमचा सोर्स म्हणून डेली सोप करते.. आणि त्यामुळेच इतर गोष्टी करून बघता येतात..

आपल्यासारखे बरेच लोकं नावं ठेवत का होईना बघतातच ना डेली सोप्स.. विकतं म्हणून पिकवतात ते...

आपल्यासारखे बरेच लोकं नावं ठेवत का होईना बघतातच ना डेली सोप्स.. विकतं म्हणून पिकवतात ते...ंं >> हेच या चर्चेचं सार आहे!!!!!!

दक्षिणा,
हेड इंज्युरी नंतर डोक्याचा मोठा भाग उघडून सर्जरी करणार असतील तर पूर्ण टकलू करतात अगदी एवढुस्सं बर होल करणार असतील (डोक्याला गिरमिटने छोटेभोक पाडून क्लॉट काढतात) तेव्हाही इन्फेक्शन नको म्हणून सगळे केस काढतात.
काही वेळा वरवर छोटी जखम असेल आत ब्रेन नॉर्मल असेल तर तेवढ्याच भागातले केस काढून टाके टाकतात.
काहीही बाह्यखुणा न दिसता आणि सीटी स्कॅन नॉर्मल असतानाही मुका मार बसून मेमरी लॉस होतो. अश्या केसेस मध्ये डोक्यावरचे केस काढायची गरज नसते.
जानूची सिरीयल पाहिली नसल्याने तिला यातलं नेमकं काय झालंय माहिती नाही.

हसून हसून मेले सगळ्याच पोस्टीना.
शिरेल टीवी बोअर झालीय ना पण माबो वर बघा काय सॉलिड वाटतेय.

पराग + १
शेवटी त्यांना पैसा कमवायचा आहे. तो त्यांचा व्यवसायच आहे.
त्यामुळे आवड निवड/पटण/ न पटण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्याच लागतात Happy

हबा. आणी बेफि भयानक लिहीता बुवा तुम्ही.:हहगलो:

हबाच्या लेखनातला आई आजीचा आवाज मी इमॅजीन केला, पर्फेक्ट आहे. बाकी श्री वगैरेचा आवाज लक्षात नाही. जानु बिचारी किती हसते, तोन्ड दुखत नाही का तिचे? बहुतेक चेहेर्‍याचे व्यायाम करुन फेशियलचे पैसे वाचवत असेल.:खोखो:

जान्हवीला हॉस्पीटलमध्ये असताना आणि घरी जाताना केस नव्हते ( डोक्याला पंचा गुंडाळला होता ) पण नंतर दिग्दर्शकाला मेमरी लॉस झाल्याने घरी आल्यावर तिच्या डोक्यावर पूर्वीसारखेच केस उगवले.

हे नवीन वळण लेखक-दिग्दर्शकाला अजिबात झेपलेलं नाही. पूर्ण ताबा गेलाय त्यांचा ! मालिकेला सोडचिठ्ठी देण्याकरता उत्तम काळ आहे हा Wink

मेघना आणि जान्हवी यातली कोण सगळ्यात जास्त आवडते आणि कोण डोक्यात जाते?
आपापली अमुल्य मते इथे द्या कृपया. मला जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

जान्हवीला हॉस्पीटलमध्ये असताना आणि घरी जाताना केस नव्हते ( डोक्याला पंचा गुंडाळला होता ) पण नंतर दिग्दर्शकाला मेमरी लॉस झाल्याने घरी आल्यावर तिच्या डोक्यावर पूर्वीसारखेच केस उगवले.>>>>>

मलाही हाच प्रश्न पडला होता. जानूने गोखले गृह उद्योगातले असे कोणते तेल लावले कि ज्यामुळे इतक्या कमी वेळात केस झपाटयाने पुर्वीसारखे झाले?

आपल्यासारखे बरेच लोकं नावं ठेवत का होईना बघतातच ना डेली सोप्स.. विकतं म्हणून पिकवतात ते...ंं >> हेच या चर्चेचं सार आहे!!!!!! नंदिनी अनुमोदन

Pages