Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१५०१
१५०१
साती पण तिला हॉस्पिटलात आणतात
साती पण तिला हॉस्पिटलात आणतात तेव्हा तो तिचा बालमित्र म्हणतो ना मनिष की ब्लड लॉस खूप झालाय. म्हणजे इन्ज्युरी असणारच ना.. मुका मार नाही लागलेला फक्त तिला...
वाट्टेल ते दाखवतात. :नाक वाकडं करणारी बाहुली:
पराग - मान्य आहे ठोस इन्कम सोर्स म्हणून मालिका स्विकारणं... पण नीना कुलकर्णीने इंडस्ट्रीला बरंच काही भरिव दिलंय. या जानूनं पहिल्याच सिरियलला माती खाल्लीये. म्हणून म्हणलं.
दक्षे ही जानुची पहिलीच सिरियल
दक्षे ही जानुची पहिलीच सिरियल नसेल.
ह्याआधी तिला एका चित्रपटात पाहिलय.
तो ही भयाणच होता म्हणा.
"सिरियल" पहिलिच आहे ना? काळजी
"सिरियल" पहिलिच आहे ना?
काळजी करू नको, तिला पुन्हा सिनेमात कोणी घेईल असं वाटत नाही
मजा आहे … डोक्यावर पडलेली
मजा आहे … डोक्यावर पडलेली विनाकारण हसतेय , दर वेळी श्री चा नाव घेतला कि ढोल वाजतोय
गोखले घरातील बरण्या पूर्ववत झाल्यात
कुठल्याही विषयावर सेंटी मुझिक वाजतेय
खरे प्रेम विसरता येत नाही … जानवी आपटे ची सून होणार
जानवी च्या घरी आदेश बांदेकर
जानवी च्या घरी आदेश बांदेकर परत बोलवा , होम मिनिस्टर परत खेळताना आठवला तर आठवेल श्री बाळ
बर्याच आठवड्यांपासुन ही
बर्याच आठवड्यांपासुन ही सिरियल बघणं सोडलंय... पण इथले प्रतिसाद मात्र नक्की वाचते...
दक्षिणा, मी ही सिरीयल
दक्षिणा, मी ही सिरीयल पाहिलेली नाही मला माहित नाही.

पण हो, ब्लड लॉस झाला असेल आणि त्याहून म्हणजे तिला ओटीत नेऊन ऑपरेशन केले असेल तर केस कापलेलेच असले पाहिजेत.
म्हणजे तिला ओटीत नेऊन ऑपरेशन
म्हणजे तिला ओटीत नेऊन ऑपरेशन केले असेल तर केस कापलेलेच असले पाहिजेत.<<< हो, मग ओटीत ऑपरेशन केलं होतं तर पण तेव्हा ते लाल दिवा चालूबंद करायच्या नादांत केस कापायचे विसरले असावेत.
जानवी नुसती खदा खदा हसत
जानवी नुसती खदा खदा हसत सुटलेय , अलिफ लैला मधल्या राक्षसासारखी
आता तो झोलाछाप डॉक्टर एक महिन्यासाठी पळ काढतोय , म्हणजे चित्र जैसे थे राहणार
गोखल्यांच्या बरण्या जानवीने इतके दिवस पकवलेले सर्व विसाल्यात … नक्की कोणाची format झालेय तेच कळत नाही
देवा वाट लावली आहे आधी
देवा वाट लावली आहे आधी बर्यापैकी चाललेल्य सिरीयलची. चुका तरी किती कराव्यात.. त्याच त्याच चुकांवर कॉमेन्ट करुनही कंटाळा आला आहे
लाल दिवा चालूबंद करायच्या
लाल दिवा चालूबंद करायच्या नादांत केस कापायचे विसरले असावेत. >>

दक्षिणा, जान्हवीची ही दुसरी
दक्षिणा, जान्हवीची ही दुसरी सिरियल आहे. ह्या आधी ती 'लेक लाडकी ह्या घरची' ह्या शिरेलित होती. तिची झी टिव्हीवरची ही पहिली सिरियल आहे.
लाल दिवा चालूबंद करायच्या
लाल दिवा चालूबंद करायच्या नादांत केस कापायचे विसरले असावेत. >>
हे भारी आहे.

तेजश्री स्टार प्रवाहवरच्या
तेजश्री स्टार प्रवाहवरच्या अजून एका शिरेलीत होती. त्यात निशिगंधा वाडची ती मुलगी होती आणि एका गुजराती मुलाशी तिचं अफेअर असतं. गुजराती प्रोड्युसरची मालिका होती म्हणून असं दाखवलं असावं. मला असल्या नको त्या गोष्टी का लक्षात राहतात माहीत नाही!
गोखल्यांच्या
गोखल्यांच्या बरण्या......नक्की कोणाची फॉर्मॅट झालेय तेच कळत नाही>>>>
चुलत सासर्यांच्या हास्यक्लबमध्ये (पनवेल) सध्या होसूमीयाघ आणि जुयेरेगा चे माबोधागे वाचतात म्हणे....पूर्वी राहीबा आणि तूतिमी वाचायचे....
खुप पकवातयेत मान्य पण मंदार
खुप पकवातयेत मान्य पण मंदार देवस्थली बघणारयांच्या डोळ्यात पाणी आणण्यात यशस्वी झालाय ,माझ्या बायकोला रडवण सोप नाही जे मला जमत नाही ते मंदार करतोय ;-);-)
(No subject)
काल हळद हवी होती तर कोणतीतरी
काल हळद हवी होती तर कोणतीतरी आई म्हणली की जान्हवीनी आवरले आहे. बरणी तिला माहीत असेल. अश्या ६-७ बायका दर वेळेला किचन आवरताना वस्तूंच्या जागा बदलत असल्या तर गोखल्यांच्या किचनचं काही खर नाही
ही मालिका बघताना कुणाला अशी
ही मालिका बघताना कुणाला अशी शंका येतिये का की जानूची आई आपटेवर लाईन टाकतिये? किंवा तिला आपटेने उचलली तर ती न बोंबलता सोबत जाईल? मला शेवटी आपट्याला तोच पर्याय निवडावा लागेल असे वाटतेय. काल ती बाई म्हणाली जानू मेली असती तर केस टाकून पैसा काढला असता पण ती वाचली. अशा बायकांचा ठराविक असाच नवरा हवा असा अट्टाहास नसतो. देवाने त्यांच्या जन्माची गाठ स्वर्गात अप्सरांचा डान्स चालू असताना असताना मदिरेच्या नशेत लूज मारलेल्या असतात.
देवाने त्यांच्या जन्माची गाठ
देवाने त्यांच्या जन्माची गाठ स्वर्गात अप्सरांचा डान्स चालू असताना असताना मदिरेच्या नशेत लूज मारलेल्या असतात.>>>>
ह.बा.
ह.बा.
ह बा
ह बा
कहर आहेत ईथले सर्व प्रतिसाद.
कहर आहेत ईथले सर्व प्रतिसाद. बाहेर कुठे वाचायची सोय नाही. एकटीने हसताना बघून फार विचित्र् लुक्स मिळतात.
जान्हवीला नवराच आठवत नाही तर
जान्हवीला नवराच आठवत नाही तर हळद कुठुन आठवणार?
लाल दिवा चालूबंद करायच्या नादांत केस कापायचे विसरले असावेत. >>
(No subject)
कालचा माझा भाग मिस
कालचा माझा भाग मिस झाला.
अरे लेकांनो बाजारात जाऊन आणा की बाडभर.
इतकुश्या हळदीसाठी जान्हवी?
ते गोखले मसाले विकतात ना? मग
ते गोखले मसाले विकतात ना? मग हळद त्यांच्या गोडाऊनमधे पण असेल की. आणी नसेल हळद तर खावी पांढरी फोडणी. किती तो काथ्याकूट.
अग नंदिनी फोडणीसाठी नाही. एका
अग नंदिनी फोडणीसाठी नाही. एका आईचे बोट कापले. त्याला लावायला हळद हवी असते. मिसळण्याच्या डब्यातली नको कारण त्यात तिखटाचा अंश असू शकतो. म्हणून extra हळद हवी आहे. जी जानूने किचन आवरल्यामुळे सापडत नाही.
ती जानु कधी गेली घर आवरायला?
ती जानु कधी गेली घर आवरायला? ती तर कधी फुदकुन याच्या रुममध्ये तर कधी त्याच्या अशीच घरभर टिवल्याबावल्या करत नाचत असायची सासरी. हो फक्त चहा देण्याचे काम मात्र तिलाच. आणि आता माहेरी थकवा येतोय तरी काम करतेय.
Pages