Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>सासर्याचा पाय एक वर्ष झाला
>>सासर्याचा पाय एक वर्ष झाला तरी तसाच , लवकर operation नाही झाले तर कधीच चालता येणार नव्हते म्हणे , सगळे खोटे>>
अहो मुधळखोर, जर जानूच्या वडिलांचा पाय बरा झालेला दाखवला असता, तर बिचर्या लेखकाचा किती खोळंबा झाला असता "जानू शॉर्ट टेर्म मेमरी लॉस"चे भाग लिहिताना. मेमरी गेल्यावर जानूने विचारलं असतं कि बाबांचा पाय कसा बरा झाला तर तिला आता सगळ्या लपवून ठेवत असलेल्या गोष्टी सांगाव्या लागल्या असत्या आणि हे मेमरी लॉस प्रकरण आवरतं घ्यावं लागलं असतं.
जर जानूच्या वडिलांचा पाय बरा
जर जानूच्या वडिलांचा पाय बरा झालेला दाखवला असता, तर बिचर्या लेखकाचा किती खोळंबा झाला असता >>>>> म्हण्जे हे लेखक किती दूरगामी विचार करतात . आणि तुम्ही उगचाच त्याच्या नावाने खडे फोडता .. जानू विसरली बाबाना .
कोण म्हणत की डेली सोप डेली लिहिल्या जातात ????
'वर्षभर आयुर्वेदिक उपचार करून
'वर्षभर आयुर्वेदिक उपचार करून काही फायदा झाला नाही आणि आत्ताच ऑपरेशन करणे गरजेचे आहे' हा अचानक झालेला साक्षात्कार का मालिकेची सोय?
सखी.
सखी.:हाहा:
तेच तर सारिका, ती मालिकेची
तेच तर सारिका, ती मालिकेची सोयच.
आता परत पाय बरा करायचा म्हणून जानू-आपटेच्या लग्नाचा घाट घालतील.
बरेच महिने हे दळण दळल्यावर एकदाचा जानू-आपटे लग्नदिवस जवळ येइल, पण तरी तोपर्यंत तिला खरे काय ते कळलेच नसेल म्हणजे कोणी कळू दिलेच नसेल. मग लग्नाच्या विधी वेळी, ती टिपिकल वचने म्हणतात ना सिरीयली अन सिनेमात ,"मै तन-मन-धन से अपने पती कि सेवा करूंगी, सुख और दुख मै पती का साथ निभाऊंगी" टाइपची, ती वचने म्हटली जातील. त्यावेळी त्या वचनांचा प्रभाव जानूच्या मेमरीवर पडेल , तिचे डोके गरगरू लागेल व तिला आठवू लागेल कि हि वचने आपण ह्या आधीहि कोणासाठी तरी म्हटली होती. मग हळूहळू श्री बरोबरच्या लग्नाचे फ्लॅशबॅक तुकडे तिला (व प्रेक्षकांना) दिसू लागतील. त्यातच अचानक तिला श्रीचा चेहरा दिसेल आणि सर्व काही आठवू लागेल.
तेवढयात आपटे तिच्या गळ्यात मंगळसूत्र किंवा फुलांचा हार घलू लागेल आणि जान्हवी तीनवेळा इको मध्ये ओरडेल "थांबा! थांबा!! थांबा!!!". उर्वरीत भाग मग पुढच्या एपिसोड्मध्ये.
साकेता एक नं गेस
साकेता एक नं गेस
हिंदु कायद्याप्रमाणे घटस्फोट,
हिंदु कायद्याप्रमाणे घटस्फोट, विधवा/विधुर असल्याचा पुरावा दिल्याशिवाय दुसरे लग्न करता येत नाही.
आपटे विधुर आहे हे आधीच दाखवले आहे. म्हणजे जर जानूच्या आईला आपटे जानू यांच्या लग्नाचा घाट घालायचा असेल तर इथे डिवोर्स पेपरवर श्रीची खोटी सही करून जानूच्या नकळत त्याच डिवोर्स पेपरवर धोक्याने तिची सही घेतलेली दाखवतील. (आठवा : इश्क सिनेमा - अजय देवगण/जुही चावला)
पाणी घालत चालु राहू द्या आणखी दोन चार वर्ष मालिका.
रियल लाईफमध्ये बायकोला नवरा
रियल लाईफमध्ये बायकोला नवरा किंवा नवऱ्याला बायको आठवत नाहीये, लग्न झाल्याचं लक्षातच नाहीये असं झालं तर बऱ्याच लोकांना आनंदच होईल.
मी ही मालिका अजिबात बघत नाही
मी ही मालिका अजिबात बघत नाही पण अपडेट्स वाचायाला मात्र इथे इथे नियमित येते .
मग कधीतरी तुनळी वर शोधून एखादा एपिसोड बघते .
माझे २ अंदाज
१. जानु आणि आपट्याच लग्न हो ना हो ना करता लवकरच होईलच . मग लगेच काही दिवसात गोड बतमी कळेल .
मग प्रेमाची कसोटी .. सर्वाच्या संशयित नजरा .. चर्चा ..(आठवा : अवंतिका )श्री चे द्वन्द्व.. मूल माझे कि आपट्याचे .. स्वीकरावे की पर्यावरणासठी नाही म्हणावे .
२ आपट्यांशी लग्न व्हायच्या अगोदरच गोड बातमी.(श्री ने कधितरी काहितरी प्रताप केले असतिल ना.. ). जानु हादरणार .. आपटे मोठेपणा घेउन लग्न करायला तयार होणार ...घरच्याची कुचंबणा.. पुढे माझे डोके चलत नाहि
बाबांच्या ऑपरेशन साठी जानु
बाबांच्या ऑपरेशन साठी जानु आपटेकडुन पैसे घेण्यासाथी त्याच्याशी लग्न करायला तयार झाली होती तर श्री शी लग्न झाल्यावर तिने श्री कडुन का पैसे घेतले नव्हते?आपटेचे चालणार होते पण श्री चे घेतानां स्वाभिमान आडवा येत होता..
ती आधिच डोक्यावर पडली
ती आधिच डोक्यावर पडली असणार....त्यामुळे तिला समजत नसणार आपण काय करतोय ते. नाहीतर लेखक डोक्यावर पडलेला आहे.
मालिका न पाहात असल्याने
मालिका न पाहात असल्याने पडलेले काही प्रश्न:
जान्हवीचे आपटेबरोबर लग्न ठरते आहे हे श्री आणि गोखले परिवाराला माहिती आहे का?
जान्हवीची स्मृती परत आणण्यासाठी तिला लग्नाचे फोटो, आल्बम इ. काही दाखवावे असं कोणाच्या मनात येत नाही का?
जान्हवीला 'तुझं लग्न झालेलं आहे' असं सांगितल्यास तिला जबरी मानसिक धक्का बसेल त्यामुळे तसं सांगू नये अशी डॉक्टरांनी ताकीद दिली आहे का?
नाही हो हो
नाही

हो
हो
बाकी लग्न, श्री, बँकेचा
बाकी लग्न, श्री, बँकेचा पासवर्ड सगळं सोडा. क्यालेंडर मधे अचानक पुढचं वर्ष ऊगवलय हे पण नाही का दिसत तिला? बँक म्हणजे हे तिथे तिच्यापसून लपवण शक्यच नाही ना!!
होणार सासू मी आपट्याची >>>
होणार सासू मी आपट्याची >>>
नुकतेच काही भाग पाहिले. आउटडोअर सीन्स मधे मुख्य कलाकारांच्या मागे बिनबुलाये कलाकार - म्हणजे आजूबाजून तेथून जाताना थांबून हे काय चालू आहे बघायला कॅमेर्यासमोर रेंगाळणारे लोक पाहायला मजा येते.
जान्हवीला 'तुझं लग्न झालेलं
जान्हवीला 'तुझं लग्न झालेलं आहे' असं सांगितल्यास तिला जबरी मानसिक धक्का बसेल त्यामुळे तसं सांगू नये अशी डॉक्टरांनी ताकीद दिली आहे का?>> काय मानसिक धक्का बसेल? अपघात झालेला आहे, स्मृती गेलेली आहे, अशावेळेला कशा पद्धतीने काऊन्सिलिंग करायचं यासाठी डॉक्टरांना त्यांच्या शाळेत शिकवलेलं असतं ना? आणि बसला धक्का तर बसू देत ना, नाहीतरी काय फार शहाण्ञासारखं वागतेय. अजून चार दोन एपिसोड बोंबलेल.
बाकी, या बाईला आपलं "लग्न" झालंय हे अद्याप समजलेलं नाही?? कमॉन यार!!! एवढे डो़क्यावर पडलाय??
काल जाह्नवीची सासू त्या रोहिणी हट्टंग्डीला अद्वातद्वा बोलतानाचा एक सीन पाह्यला. करोडपती असलेल्या एकुलत्या एका मुलाची बायको असूनदेखील टकल्या आपट्याशी लग्न करयचं नक्की लॉजिक काय आहे?
Disclaimer : लॉगिक , कॉमन
Disclaimer : लॉगिक , कॉमन सेन्स अशा शब्दांचा झी मराठीशी कोणताही संबंध नाही , चुकून असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
भारतीय टीव्ही मालिकांतले
भारतीय टीव्ही मालिकांतले डॉक्टर वेगळ्या शाळेत जातात. ते कोणत्याही मालिकेत (कशाच्याही) पेशंटला धक्का बसेल असे वागू नका असेच सांगतात.
कोकिलाबेनने स्मृतभ्रंश झाल्यावर उच्छाद मांडला ते मी लिहिले होते. (आधीही ती उच्छादच मांडत होती म्हणा). तर स्मृतिभ्रंश झाल्यावर तिची जवळपास २० वर्षांची स्मृती गायब झाली. नातवंडांना ती आपली मुले समजू लागली. चुलतसुनेला धाकटी बहीण. मुलगा, सून, पुतण्या कोणालाही ओळखले नाही.
बाकी मंडळी तिने नेमून दिलेल्या भूमिका निमूटपणे करू लागली. आपण चार दिवस हास्पिटलात काय गेलो तर जावेने घराचे इंटेरियर बदलले याचा तिला राग आला. पण जाऊ, नवरा, सासू , अगदी स्वतःमध्ये घडलेले शारीरिक बदल लक्षात आले नाहीत. वीस वर्षांपूर्वीही ही मंडळी अशीच असू शकतात म्हणा. (पहा महाभारतातली कुंती. इ. अर्जुन आणि अभिमन्यू हे बापलेक आहेत की शाळूसोबती ते कळत नाही आहे.)
तर कोकिलाबेन. तिने पुतण्याला ओळखले नाही, तेव्हा पुतण्या हा आपला नवा ड्रायव्हर आहे असे तिला सांगितले गेले. मग पुतण्याचे अणि आपल्या बहिणीचे (म्हणजे प्रत्यक्षातली त्याची बायकोच) लफडे लक्षात आल्यावर तिने अकांडतांडव केलेच.
मध्येमध्ये तिला या हरवलेल्या स्मृतीतील काही फ्लॅश दिसत पण मग ती कपाळावर हात दाबून आराम करायला जात असे. (म्हणजे तेवढा वेळ इतर कोणाला काही काम सांगत नसे किंवा ओरडत नसे.)
मध्येमध्ये तिची स्मृती आणखीनच करप्ट झाल्याने एका रात्री आपल्या शयनगृहात शिरलेला परपुरुष समजून आपल्या नवर्यालाच चपलेने मारले.
तर या कोकिलाबेनला विजेचा शॉक लागला. नाही नाही...वेड्यांच्या इस्पितळात देतात तो कंट्रोल्ड शॉक नाही. चक्क विजेचा खांब उन्मळून अंगावर विजेची तार पडून शॉक लागला आणि तिची स्मृती परत आलेली आहे. अरेरे.
>>>>>≥तर या कोकिलाबेनला
>>>>>≥तर या कोकिलाबेनला विजेचा शॉक लागला. नाही नाही...वेड्यांच्या इस्पितळात देतात तो कंट्रोल्ड शॉक नाही. चक्क विजेचा खांब उन्मळून अंगावर विजेची तार पडून शॉक लागला आणि तिची स्मृती परत आलेली आहे. अरेरे.
.
अरे तर अशी स्टोरी आहे का
मी एका सकाळी हा सीन चेनल सर्फ करताना पहिला होता
एक शक्तिमान बाई विजेचा पोल जमिनीतून उन्मळून जाड्या बाईवर पाडते , एक कोणीतरी कड्यावरून पडत असते . खूप ड्रामा होता आणि action हि … मला मजा वाटली म्हणून पुढचा १०मिनिटाचा भाग बघितला .
त्या जानूच्या आणि सरूच्या
त्या जानूच्या आणि सरूच्या डोक्यावर पण कोणीतरी विजेचा पोल पाडा ना म्हणजे जानुची गेलेली आणि सरुची न गेलेली मेमरी परत येईल
विजेचा शॉक लागल्यावरचा
विजेचा शॉक लागल्यावरचा कोकिलाबेनचा अभिनय सॉलिड होता की नाही? एवढे प्रचंड शरीर सांभाळून खडकाळ जमिनीवर कुशीवर पडल्यापडल्या भलेथोरले डोके भल्याथोरल्या व्हेलॉसिटीने हलवणे खायचे काम नाही.
मध्येमध्ये तिची स्मृती आणखीनच
मध्येमध्ये तिची स्मृती आणखीनच करप्ट झाल्याने एका रात्री आपल्या शयनगृहात शिरलेला परपुरुष समजून आपल्या नवर्यालाच चपलेने मारले.<<< देवा!!!!!
आता ही स्टोरीलाईन पुढचं पाऊलमधेय पण रीपीट होणारे का?
>>आपट्यांशी लग्न व्हायच्या
>>आपट्यांशी लग्न व्हायच्या अगोदरच गोड बातमी.(श्री ने कधितरी काहितरी प्रताप केले असतिल ना..>>
जान्हवी प्रेग्नंट आहे का? एवढा मोठा अपघात होऊनही तिचे बाळ सुखरूप आहे का?
बाकी आता जानू बावळटपणामध्ये मंजिरीला काँम्पिटिशन देत आहे.
>>>>>>>विजेचा शॉक लागल्यावरचा
>>>>>>>विजेचा शॉक लागल्यावरचा कोकिलाबेनचा अभिनय सॉलिड होता की नाही?
.
ती खांब पडणारी काय खात असेल ? कसला खांब गदागदा हलवून पडला .
कोकिळेला पण इतका मोठा शरीर हलवायला बरीच मेहनत करावी लागली असेल
>>>>>Disclaimer : लॉगिक ,
>>>>>Disclaimer : लॉगिक , कॉमन सेन्स अशा शब्दांचा झी मराठीशी कोणताही संबंध नाही , चुकून असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा<<<<<
हा प्रॉब्लेम झी मराठीपुरता मर्यादित नाहीय. तमाम मराठी, हिंदी, सगळ्या भारतीय भाषा, इतकेच काय इंग्रजी चानेलना सुद्धा लागू होतो. टीवीला उगीचच इडियट बॉक्स नाही म्हणत. विचार करायचा ठरवला तर किती तरी प्रश्न आहेत.
१. डॉक्टर पेशंटला स्मृतिभ्रंश झालाय हे सांगायला मज्जाव का करतात?
२. जानुला नव्या घराबद्दल दिलेल्या माहितीने धक्का कसा बसला नाही?
३. ऑफिसमधून येताना नवं घर बरं पटकन सापडलं!
४. आपटेचा मुलगी बघण्याचा प्रसंग काही विशेष आनंदाचा नव्हता. जानुला ऑफिस मध्ये सांगावासासुद्धा वाटला नव्हता पण डॉक्टरांनी न विचारता का बरं सांगावसं वाटलं?
५. मोबाईलमध्ये गोखले कुटुंबियांचे नंबर नाही दिसले का? तारीख, पासवर्ड, पिंट्याची नोकरी, पेपरातल्या बातम्या, पासबुकमधल्या एन्ट्रीज, बिलांच्या तारखा... मधल्या हरवलेल्या काळाची जाण देणारे कितीतरी गोष्टी असू शकतात.
आता सगळ्यात महत्त्वाचे भविष्यातल्या घटनाबद्दल प्रश्न
१. जर कुणाला माहीतच नसेल कि आपण काही विसरलोय तर ते आठवण्याचा प्रयत्न करतील तरी का?
२. विसरलेल्या माणसांबद्दल ज्या नव्या आठवणी बनत आहेत त्या जर वाईट असल्या तर पुढचा मार्गच खुंटला... श्री साहेब अपघाताची जबाबदारी घेऊन बसलेत. बिचारी जानु चांगली म्हणून तिने राग नाही धरला.
३. सध्या बाबा आणि पिंट्या ज्या प्रकारे आई आणि आपट्यांसमोर मुग गिळून बसलेत, त्याप्रमाणे जानु आपट्यांशी लग्न करून देखील मोकळी होईल. आणि तसं झाल्यानंतर जर तिला श्री आठवला मग काय करेल?
४. महिनोंमहिने मधल्या काळाच्या पूर्ण विस्मृतीमध्ये घालवल्यावर जर अचानक स्मृती आली आणि लक्षात आलं "अय्या इतके दिवस आपल्याला काहीच आठवलं कसं नाही?!!" तर त्याचा पण मानसिक धक्का नाही बसणार का?
त्यामुळे "ठेविले अनंते..." च्या धर्तीवर "दाखविले दिग्दर्शके, ते ते पाहावे"! उगा डोक्याला शीण देऊ नये. पण कळते पण वळत नाही.
>>>करोडपती असलेल्या एकुलत्या
>>>करोडपती असलेल्या एकुलत्या एका मुलाची बायको असूनदेखील टकल्या आपट्याशी लग्न करयचं नक्की लॉजिक काय आहे?<<<<
करोडपती असलेला एकुलता एक मुलगा त्याच्या बायकोच्या (म्हणजे कलाबाईंच्या अत्यंत स्वाभिमानी लेकीच्या) ताटाखालचं मांजर आहे. त्यामुळे त्याच्याकडून काहीही मिळण्याची अपेक्षा नाहीय. टकला असला तरी आपटे लेकीला ताब्यात ठेवून आपल्याला पोटली देईल असं त्यांना वाटतंय. शिवाय सावत्र मुलीचा तसा नाही तरी असा सावत्रपणा करायला त्यांना आवडणार आहे. खरतर तेच जास्त महत्त्वाचं कारण आहे. कारण लग्न झाल्यावर आपटे त्यांना काही घास घालतील असे वाटत नाही.
vt220>>इतका नीटच विचार केल्या
vt220>>इतका नीटच विचार केल्या बद्दल झी मराठीने तुम्हाला बॅन केलेय
vt220....+ ∞
vt220....+ ∞
जान्हवीला 'तुझं लग्न झालेलं
जान्हवीला 'तुझं लग्न झालेलं आहे' असं सांगितल्यास तिला जबरी मानसिक धक्का बसेल त्यामुळे तसं सांगू नये अशी डॉक्टरांनी ताकीद दिली आहे का? << उअत्तर हो>> का? श्री शी लग्न ही एकदम वाईट धक्कादायक गोष्ट आहे का?
आपटे आणि जानूबाळाची आई - कसले
आपटे आणि जानूबाळाची आई - कसले मादकपणे बघतात एकमेकांकडे! इतकं तर काकोडकरांनाही शब्दबद्ध करता आलं नसतं.
Pages