होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

जानु आपटेला आपला होणारा नवरोबा समजतीय हे कळले, तर आपट्या अत्यान्न्दाने थिरकु लागेल. देवा! कुठे घरन्गळत चाललीय ही सिरीयल. किती सहन करतोय श्री बाळ.

आत्ताच मी या मालिकेची जाहिरात पाहिली. जानू पावसात भिजत असताना तिचे ध्यान (श्री बाळ) तिच्या डोक्यावर छत्री नेतो.
पण त्यात जानुचे केस पहिल्यासारखे लांबसडक दाखवले होते. आत्ताच तिचे ऑपरेशन झाल्यामुळे तिचे केस काढले होते ना?
काही वर्षांचा लीप दाखवला आहे का?
इतक्या लवकर पुन्हा पहिल्यासारखे लांबसडक केस कुठुन आले?
गोखले गृह उद्योगातले असे कोणते तेल तिने वापरले की इतक्या लवकर पुन्हा तिचे केस लांबसडक झाले?
टक्कल पडलेले पुरुष आणि (काही ठराविक कारणांमुळे) अचानक केस गळणाऱ्या स्त्रिया हे तेल घेण्यासाठी गोखले गृह उद्योगाबाहेर रांगा लावतील आणि गोखले गृह उद्योगाला बाकीची उत्पादने थांबवुन केवळ याच तेलाची निर्मिती आणि विक्री करावी लागेल. तरीही ते कोटयाधिश बनतील.
असे कुठले तेल वापरले जानुने? समजु तरी दे आम्हाला!

कुठल्या हॉस्पिटलमध्ये नर्स ऑपरेशन झाल्यावर पेशंटचा मेकअप सुद्धा (?) करतात? काल हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेली असताना जानुचा मेकअप व्यवस्थित होता आणि ओठांवरची लिपस्टिकसुध्दा तशीच होती.

हल्ली कोणी मालिका बघतय का? की नुसते कॉमेन्ट्स च करताहेत Lol

पण मालिका बघुन ४ महीने झालेत तर ह्या धाग्यावर छान मनोरंजन होतेय Happy सगळ्यांच्या कॉमेन्ट्स अगदी Rofl आहेत
आशोक मामा कुठे आहेत सध्या?

पेशंट कलाकार आहे ना..... म्हणून कलेनं दक्षे Proud

मला काही कळेना झालयं....!!!

एकताकपूर असती तर या मुव्हमेंटला दुसरा हिरो इंट्रोड्युस झाला असता एव्हाना.... :स्मितः

मी शेवटी न राहवून साबांना विचारलं की आता अजूनही तुम्ही ही सिरीयल बघत राहणार आहात का...कैच्याकै दाखवतायत..
तर म्हणे पण टाईमपास म्हणून काहीतरी सिरीयल पाहिजेच..म्हणून ही बघत राहावी लागेल. (म्हणजे दुसरा पर्याय नाही म्हणून). मग म्हणाल्या की पण आता माझी जुयेरेगा मेन सिरीयल आहे आणि होसूमी सेकन्ड रॅंकवर आहे. (आधी होसूमी फेवरेट होती).

वेदिका२१....(सहानुभूती व्यक्त करणारी बाहुली).... आमच्याकडे ही जुयेरेगाचा पहिला क्र. दुसर्या क्रमांकावर एक 'अमृतवर्षिणी' नावाची राहीबा व तूतिमी बर्या म्हणाव्या अशी भयानक पराकोटीची टुकार कानडी सीरियल आहे. स्वदेसमधल्या कावेरीअम्मा आजेसासूबाई आहेत त्यात.

>>>>>>>>>>हल्ली कोणी मालिका बघतय का? की नुसते कॉमेन्ट्स च करताहेत
मला मारून मुटकून पहावी लागते ….
मी आणि खंडोबा मधली म्हाळसा समोर tab घेऊन बसतो।
पण त्या जुळून येती च्या वेळी पर्याय नसतो , जेवताना Tab वगैरे काही नाही घेत येत
पण आजकाल Discovery वर चे सगळे program मिस होतायेत …

आमच्याकडे या मालिकेला बॅक बर्नरवर ठेवायचे सर्वानुमते ठरले आहे. आधीसारखे मालिकेच्या वेळेत टीव्हीसमोर बसत नाही. टीव्ही म्युट करून मालिका चालू असते.
आणखी आठ दिवसांनी विम्बल्डन सुरू होईलच. तेव्हा या टाइम स्लॉटसाठी पर्याय इतक्यात शोधणार नाही.

_>>>>>>>>>आमच्याकडे या मालिकेला बॅक बर्नरवर ठेवायचे सर्वानुमते ठरले आहे. आधीसारखे मालिकेच्या वेळेत टीव्हीसमोर बसत नाही. टीव्ही म्युट करून मालिका चालू असते.

लकी आहात
आमच्या घरी दर महिन्याला हे आता अतीच होतंय म्हणून एक एपिसोड अर्ध्यावर बंद करतात आणि उद्यापासून तोच सिरियल पुन्हा नव्याने पाहायला लागतात …

आमच्याकडे या मालिकांवरील भक्ती जराही कमी झालेली नाही.

सुख इतकेच कि "होम मिनिस्टर" च्या वेळेला कोणालाच टिव्ही बघायला मिळत नाही म्हणुन ती कटाप.
"जावई विकत घेणे आहे" हिने सगळ्यांच्याच सहनशक्तीचा अंत पाहिल्याने ती कटाप.
साबांना देवाच्या सिरियली आवडत नसल्याने "जय मल्हार" कटाप.
शिवाय त्यांना क्राईम वै. आवडत नसल्याने "अस्मिता" कटाप.
आणि साबुंच्या जेवणाच्या वेळी रिमोट त्यांच्या हातात असल्याने "फुबाईफु" कटाप.
(साबु कुठलाच एक चॅनल सलग १ मिनिटसुद्ध बघु शकत नाहीत. पूर्ण जेवणभर सर्फिंगच करतात).

जुयेरेगाच्या वेळेला "तारक मेहता का उल्टा चष्मा" असल्याने साबा रिपीट बघतात रात्री.
आणि भयाण म्हणजे झोप येत नाही इ. कारणांनी हि "होणार सुन मी" चं रिपीट सुद्धा (८ ला बघितलेले असले तरीसुद्धा) बघतात. ___/\___
नवरा "एका लग्नाची तिसरी गोष्ट"चा भक्त आहे. अगदी भक्तीभावाने न चुकता रोज बघतो हि मालिका.
(कोण म्हणतं डेली सोप फक्त बायका बघतात? Angry )

चाळ पडल्याचा बिल्कून धक्का नाही बसला ……
पण सफरचंदशी लग्न झाल्याचा खूप मोठा धक्का असेल …. म्हणून सांगत नसतील ….
आता आपटे काय म्हणतोय हेच ऐकायाचेय …। आपटे या पात्राला या ना त्या कारणाने परत परत जीवनदान मिळतेय …। स्टोरी रायटर शी रियल लाइफ नाते असले पाहिजे

जानूबाळाला झालेला अपघात कंप्यूटराईझ्ड पद्धतीने करण्यात आलेला असावा. बरोब्बर पन्नास टक्के घटना तिच्या विस्मृतीत गेलेल्या आहेत. विवाहपूर्व बाबी आठवतात व विवाहोत्तर आठवत नाहीत. मी तर म्हणतो आता शीर्षक बदलून 'नाय होणार सून मी त्या घरची, ह्हांऽऽऽ' असे करा.

श्रीबाळ जानूबाळाला रस्ता ओलांडून देण्यात मदत करते ह्या निव्वळ अकरा सेकंदांच्या प्रसंगावर आज अर्धा तास घालवला. मला एक समजत नाही की तिला भाषा, तिचे नांव, तिची नोकरी, तिचे माहेर हे सगळे नीट समजत असताना एक साधी गोष्ट सगळे का करत नाहीत? नुसते तिला सगळ्यांनी मिळून नीट समजावून सांगायचे की बाई गं हे तुझे सासर आहे. हवे तर हे फोटो बघ लग्नातले. अँ?????? काय चाल्लंय काय??????

त्यात तिची ओढणी आता बसस्टॉपवर अडकणार आहे आणि श्री बाळ ती सोडवून देणार आहे. बसस्टॉपही चावट झालेत हल्ली मुंबईतले!

-'बेफिकीर'!

नेमक्या कोण्त्या पॉईन्ट ला मेमरी फोरमेट झालीये? लग्ना आधीही श्री तिच्या लाईफ मधे होताकी.
होणार... मधल्या "ह्या" म्हणजे आपट्याच्या तर नाही ना? Lol

कुणीतरी इथे मेमरी लॉस झालेल्या पेशंटवर डॉक्टर कसे उपचार करतात ते विचारलंय.
मेमरी लॉसचे पण बरेच प्रकार असतात पण अश्य प्रकारे आघात झाल्यानंतर most of the times ट्रान्सिएन्ट रेट्रोग्रेड अ‍ॅम्नेसिया होतो.
शक्यतो अपघात आणि त्याच्या आसपसचा वेळ एवढीच मेमरी जाते.
मी स्वतः इतक्या पेशंटांत अ‍ॅक्सिडँटनंतर मेमरी जाण्याच्या जितक्या केसेस पाहिल्यात तितक्यांच्यात इतर फंक्शनिंग जर उत्तम असेल तर २४-७२ तासात मेमरी परत येते हे पाहिलंय. पैकि बर्याच जणाना अ‍ॅक्सिडेंट कसा झाला नेमके तेच आठवत नाही.
त्याना मग हळूहळू हे समजाविण्यात येऊन आम्ही नव्याने अ‍ॅक्सिडेंट मेमरी तयार करतो. बाकी ५० फर्स्ट डेटमध्ये जे इतर नमुने दाखवलेत तसे प्रत्यक्षात फार रेअर आहेत. या बाबतीत माझ्या अनुभवावर बिनधास्त विश्वास ठेवा कारण मी तीन वर्षे साय्ण हॉस्पिटलात काम केलंय जिथे दिवसाला किमान १० ते कमाल कितीही हेड इंज्युरी केसेस येतात आणि त्यांचे अगदी व्यवस्थित न्यूरॉलोजिकल डॉक्युमेंटेशन होते. ते एका मैत्रिणीच्या थिसीसच्य निमित्ताने आम्ही अभ्यासिले आहे.

माझ्या वैयक्तिक कार्यक्षेत्रात म्हणजे फिजीशीयनच्य प्रॅक्टीसमध्ये विविध कारणानी असा मेमरी लॉस होतो.
डायबेटिस, ब्लडप्रेशर् , अल्झायमर अश्या अनेक कारणानी होणारे मे लॉ हे हळूहळू आणि शक्यतो इर्रिवर्सिबल असतात.
सिरीयल/ चित्रपटात दाखवितात तसे मे लॉ हे बहुदा स्ट्रोकनंतर होतात. यातीलही बरेचसे २४-७२ तासांत बरे होतात.
ज्यांचे न्यूरॉनल डॅमेज जास्तं ते शक्यतो जास्त दिवस रहातात. त्यातही एखादा शब्दच न आठविणे, क्रियापदच न आठविणे, वाचता लिहिता येणे न आठविणे या प्रकारचे असतात. त्यांना हळूहळू माणसे दाखवून , अल्बम दाखवून, जूनी वर्तमानपत्रे वाचायला लावून मेमरी तयार किंवा बूस्ट करतो.
सगळ्यात जास्तं अनोमिया म्हणजे नाव न आठविणे हे पहायला मिळते. त्याना मी दिवसातून तीन वेळा मोबाईल, पेन, बांगडी, घड्याळ असे दाखवून नावे विचारून पाठ करून घेते.
दूसरा प्रकार म्हणजे पॉसिपोग्नोजिया म्हणजे चेहरे न आठविणे.- या करित आम्ही दररोज पेशंटच्य नातेवाईकांची ओळख परेड त्याच्याकडून करून घेतो. अल्बम दाखवितो. अगदी लांबलांबच्या नातेवाईकानाहि बोलावतो.
माझ्याकडे माझ्या आणि पेशंटच्या अश्या काही सेशनच्या मजेशीर क्लिप्सही आहेत.
पण फॉर एथिक्स इथे अपलोडू शकत नाही.

पेशंटही अगदी मजा करतात- घड्याळ दाखवून हे काय विचारल्यावर- ' हे ह्याच्यात घालायचं(हात दाखवून) , किंवा हे ते सारखं फिरतं ते, किंवा वेळ बघायचं यंत्र असं काहिही सांगतात.
त्यांच्या मुलांची नावे विचारली की स्वतःच्या भावंडांची नावे सांगतात इ.

आणि हो, आमच्या गावात मेंटल रिहॅबची काही सोय नसल्याने मीच फिजीशीयन आणि मीच रिहॅब असिस्टन्स असा सगळा वनवुमन शो आहे. Wink

साती किती छान माहिती दिल्येस Happy
<<सिरीयल/ चित्रपटात दाखवितात तसे मे लॉ हे बहुदा स्ट्रोकनंतर होतात. यातीलही बरेचसे २४-७२ तासांत बरे होतात.>> या सिरियल च्या बाबतीत काय असेल ?
एखादा माणूस जेव्हा कोमात जातो आणि २-३ दिवसांनी/ एक महिन्यांनी/२-४ महिन्यांनी कोमातून बाहेर येतो तेव्हा मेमरी लॉस होतो का ?

साती मस्त माहीती, लेख लिही ह्यावर एक तुझ्या अनुभवांचा. Happy २४-७२ पेक्श्या जास्त मेमोरी लॉस होत नाही का कधी? आणि मुव्ही मधे दाखवतात तसं परत येण्यासाठी परत डोक्यावर मार लागायची आवशकता असते का?

>>डायबेटिस, ब्लडप्रेशर् , अल्झायमर अश्या अनेक कारणानी होणारे मे लॉ हे हळूहळू आणि शक्यतो इर्रिवर्सिबल असतात. <<

डिमेंशिया राहिला का?

साती, तुम्ही कधी "त्यांना संभाळून घ्या, त्यांच्या मनावर आघात होइल असे सांगू नका, त्यांना वाटतंय त्यांचं लग्न झालेलं नाही, तर तसंच कंटीन्यु करा," वगैरे सल्ले देत नाही का? Proud

सगळ्यांत महान सल्ला क्युकि सास भी कभी बहु थी मध्ये दिला होता. त्यात नंदिनी (म्या नव्हे) कोमात गेलेली असते, तेव्हा करणच्या मुलाला कोण सांभाळणार म्हणून रक्षंदाचं लग्न करणबरोबर लावतात. करण्ला ते लग्न मा न्य नसतं म्हणून तो तिला हडहुड करत असतो. तुलसी त्याला समजावते आणि मग त्यांच्या मनामध्ये (करण रक्षंदाच्या) कुछ कुछ होता हय पण यथावकाश नंदिनी कोम्यातून बाहेर येते, मग तिला खरं काय ते समजल्यवर दिमाग पे असर होइल म्हणून घरातले सर्व तिच्यासमोर "हे लग्न वगिरे झालंच नाही" असं नाटक करतात रक्षंदा करणच्या बेडरूममधून बिस्तारा हलवते वगैरे बरीच हृदयस्पर्शी दृष्ये होती.

<<राखी रेखा आणि शशी कपुर चा असा एक मुव्ही होता का?>> राखी मेंटल हॉस्पिटल मध्ये असते. ती नंतर बरी होऊन घरी येते. तेव्हा तिच्या पासून सगळं लपवलं जात. शशीच रेखाशी लग्न वगैरे वगैरे Happy

< त्यांच्या मुलांची नावे विचारली की स्वतःच्या भावंडांची नावे सांगतात इ.>

सानिसातल्या कोकिलाबेनला मेमरी लॉस झाला हे आधी लिहिलंच आहे. ती वीसेक वर्षे मागे गेली आहे. मुलांना ओळखत नाही. नातवंडांना आपली मुलं समजते. सुनेला धाकटी बहीण समजते.
नवरा, सासू, जाऊ, दीर यांना ओळखते.

बसेरा सारखीच एक मराठी मालिका होती. सस्पेन्स थ्रिलर . यतीन कार्येकर, वर्षा उसगावकर, अश्विनी एकबोटे, क्षिती जोग, अभिजीत चव्हाण, इ.इ. अश्विनी एकबोटेने साकारलेल्या व्यक्तिरेखेला असाच स्मृतिभ्रंश होतो. ती मेली आहे असा तिच्या नवर्‍याचा समज होतो, तो दुसरे लग्न करतो. पण शेवटी दोघांची भेट झाल्यावर आणि तिचे टाळके ठिकाणावर आल्यावर नवर्‍याच्या आयुष्यात कॉम्प्लिकेशन्स नकोत म्हणून ती मेमरी लॉसचे नाटक करते.

Pages