होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या एपिसोड मधले अभूतपूर्व क्रॉस सेलिंग अचाट होते आज. पूर्वी कधी हे भारतीय सिरीयल्स मधे दिसले आहे का? असेलही. शेवटच्या पाच मिनीटांत सगळे २९ तारखेला झी मराठीवर फॅण्ड्री आहे, तो बघायचा आहे इ चर्चा करत होते.

"माझ्यासारखीला घरी बसूनही आता चित्रपट पाहता येइल" ऐकून उडालोच. ८० च्या दशकाच्या सुरूवातीला व्हिडीओ आले आपल्याकडे तेव्हापासून आत्तापर्यंत कोठे होते हे लोक? Happy

>>>>आपटे आणि जानूबाळाची आई - कसले मादकपणे बघतात एकमेकांकडे! इतकं तर काकोडकरांनाही शब्दबद्ध करता आलं नसतं.
.
बोलतात न खर प्रेम लपून नाही राहत , तेच खर . आता या दोघांचे ढाक्की टिक्की होते का नाही एवढेच बघायचे

बापाच्या operation साठी गो खोकाल्याकडून मदत नाही घ्यायची का तर स्वाभिमान
आणि टकल्या आपटेशी बापाचे operation करेल या आशेने एक सोडून दोन वेळा लग्नाला तयार व्हायचे
वावावा क्या बात है , पामोलिव्ह का जवाब नही

आपटेने कोणालातरी नोकरी लावून दिल्यामुळे जानूबाळ आणि जानूबाळाची आई आनंदात होते. जानूबाळाचे वडील मात्र निराशच होते. कोणाला नोकरी लावून देण्यात आली ते समजले नाही.

पिंट्या असण्याचीही शक्यता आहे म्हणा!

काल आई आजी श्रीबाळाच्या तान्ह्या टाळूवर तेल थापत होती. त्यामुळे त्याच्या मेंदूतून सुपीक विचार निघत होते. दिवसेंदिवस तो लहान मुलासारखा बागडू लागला आहे.

paravachya episodat ithala bhasadya mokat sutala hota v osandun vahat hota....<<<

सुमेधा व्ही, तुमचा प्रतिसाद तुम्हाला समजल्यानंतर मलाही समजावून सांगा! Light 1

एक भयाण गाणारा भसाड्या बॅग्राउंडला गातो ह्या सिरिअलीत. तो परवा धाय मोकलून गात होता हो.

श्रीबाळ कधीपासून जानूला सगळे सांगूया असे डॉला सांगतोय पण डॉने त्याला एक मस्तपैकी उदाहरण देऊन गप्प केले.

उदा. आपण अमेरिकेतून भारतात येतो. तेव्हा कधी कधी कॅलेंडरवरचा एक आख्खा दिवस आपल्या आयुष्यातून गेलेला असतो. म्हणजे तो एक दिवस आपण जगलेलोच नसतो. त्या एका दिवसाची आपल्याला किती चुटपुट लागून रहाते. अरे ईथे जान्हवीच्या बाबतीत एक अख्ख वर्ष तिच्या आयुष्यातून निघून गेलं आहे. एक अख्ख वर्ष ती जगलेलीच नाहीये. आणि जेव्हा तेला कळेल, तेव्हा तिला याचा किती त्रास होईल? याचा विचार कर.

>>>>>>श्रीबाळ कधीपासून जानूला सगळे सांगूया असे डॉला सांगतोय पण डॉने त्याला एक मस्तपैकी उदाहरण देऊन गप्प केले.

उदा. आपण अमेरिकेतून भारतात येतो. तेव्हा कधी कधी कॅलेंडरवरचा एक आख्खा दिवस आपल्या आयुष्यातून गेलेला असतो. म्हणजे तो एक दिवस आपण जगलेलोच नसतो. त्या एका दिवसाची आपल्याला किती चुटपुट लागून रहाते. अरे ईथे जान्हवीच्या बाबतीत एक अख्ख वर्ष तिच्या आयुष्यातून निघून गेलं आहे. एक अख्ख वर्ष ती जगलेलीच नाहीये. आणि जेव्हा तेला कळेल, तेव्हा तिला याचा किती त्रास होईल? याचा विचार कर.
.
मेला तो डॉक्टर कुठल्या कालेजातून शिकून आलाय त्याची मान्यता रद्द करा

>>उदा. आपण अमेरिकेतून भारतात येतो. तेव्हा कधी कधी कॅलेंडरवरचा एक आख्खा दिवस आपल्या आयुष्यातून गेलेला असतो. <<
झक मारली आणि हे वाचल़ं; चुटपुट लागली आहे. आयुष्यातले किती दिवस वाया गेले याचा हिशोब करतोय... Happy

मी अमेरिकेतून भारतात येताना हुकलेले सगळे दिवस वसूल करण्यासाठी तितक्याच वेळा परत गेलेलो आहे Happy

सहा महिन्यांपूर्वी बर्‍यापैकी सलग पाहिलेले एपिसोड्स पाहून ही सिरीज इतर सर्वांपेक्षा खूप वेगळी वाटली होती (तरीही अगदी सुरूवातीला खूपच चांगली होती असे ऐकले आहे). आता कायच्या काय होऊ लागली आहे.

त्या आपटेशी तो पिंट्यातर एकदम खुन्नस मधे बोलायचा पूर्वी. सध्या का तो गप्प असतो? आणि आपटेशी लग्न ठरले आहे असे तिला वाटू देण्यात जर काही धोका नसेल तर श्री शी झाले आहे हे कळू देण्यात नक्की काय धोका आहे?

बोलतात न खर प्रेम लपून नाही राहत , तेच खर . आता या दोघांचे ढाक्की टिक्की होते का नाही एवढेच बघायचे>>>>>>>>>>:हाहा: सत्यजीत तुम्ही ओगी पहाता वाटत.:फिदी:

बोलतात न खर प्रेम लपून नाही राहत , तेच खर . आता या दोघांचे ढाक्की टिक्की होते का नाही एवढेच बघायचे>>>>>>>>>>हाहा सत्यजीत तुम्ही ओगी पहाता वाटत. >>>>> अगदी अगदी रश्मी Wink

एक अख्ख वर्ष ती जगलेलीच नाहीये. आणि जेव्हा तेला कळेल, तेव्हा तिला याचा किती त्रास होईल? याचा विचार कर.>>>>> कळल नाही . ती जगली नाही कस ?? उलट ती किती चांगली आयुश्य जगली हे कळल्यावर तिला आनन्द नाही का होणार ???? कैच्याकै

टकल्या आणि तिडीक देणारा आपटे सोडुन आपले लग्न गोग्रुचा मालक, समवयीन आणि दिसायला हँडसम असणार्‍या श्री बरोबर झाले होते याचा धक्का नाही का बसणार तिला.

>>>>>>सत्यजीत तुम्ही ओगी पहाता वाटत.
.
.
झपलु : अपनी तो सटक रही है , लगता है इस जानवी के सर मे कुछ डालना पडेगा
पपलू : ये ले , पपलू का आलू
टपलु : सही है भिडू
.
कोक्रोच ग्यांग अमर रहे

oggy! yuck! Sad

malika pahan sodun dilay.
atasha updates vachun pan dokyat tidik jatey.
ya dhagyawar firakan pan sodun dyav kaay?

रिये सेम पिंच मी पण सोडून दिलं मालिका पाहणं.
प्रेक्षकांसाठी एक आख्खं येड्याचं इस्पितळ बूकून ठेवा. Proud

>>>>>>>>>ए दक्षिणा आधी लेखकासाठी बघा मेंटल हॉची सोय
.
.
असं कसं … असं कसं
इतके लोक टक लावून बघतात काहीतरी असेल त्याशिवाय
आपल्यालाच दिव्य दृष्टी नाही म्हणून नसेल दिसत आपल्याला …
टी आर पी सांभाळूनच सगळ दाखवतात

इतके लोक टक लावून बघतात काहीतरी असेल त्याशिवाय
आपल्यालाच दिव्य दृष्टी नाही म्हणून नसेल दिसत आपल्याला …तुम्हीच सांगा मग ते काय आहे, टीआरपी नाहीच मालिकेला, ती खंगत खंगत गेलीय आणि मरणासन्न झालीय आता

Pages