होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ह्या स्मृतिभ्रंशवाल्या सिरीयल सिनेमे बघून एक प्रश्न पडतो. कुणी डॉक्टर असल्यास वा असा काही अनुभव असल्यास माझे शंका निरसन करावे. जेव्हा स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तीला त्यांच्या जीवनातली काही विशिष्ट माणसे आठवत नाहीत, तेव्हा डॉक्टर त्यांना त्या विस्मृतीत गेलेल्या माणसांची ओळख करून देण्यास नाही का सांगतात? कमीत कमी शारीरिक आरोग्य सुधारल्यावर तरी...
असं सांगायला काय हरकत आहे कि "बाबा तुझा अपघात झालेला आणि तुझ्या मेंदूला दुखापत झाली आहे. त्यामुळे तुझा थोडासा स्मृतिभ्रंश झाला आहे. कदाचित काही काळाने तुला ती आठवतील किवा कदाचित नाही आठवणार पण हि तुमच्या आयुष्यातली महत्त्वाची माणसे आहेत. हा तुमचा अमुक तमुक, हि तुमची अमुक तमुक आहे वगैरे वगैरे..."
जर समजा त्या व्यक्तीला कुणीच आठवत नसेल पण बाकी पुराव्याने त्याची आणि त्याच्या कुटुंबियांची ओळख पटली असेल तरी त्या व्यक्तीला अशी ओळख करून देत नाहीत का? पण मग ती व्यक्ती शरीराने बरी झाल्यावर त्याला घरी कसे पाठवतात?

बाय द वे, मनात शंका आलेली आता आपटेकाकांचा परत नंबर लागेल आणि खरोखरच लागला. Happy

जाह्नवीच्या टेम्पोरल लोबमधील गोखले गायब झाले आहेत >>>> Lol सावत्र आईपण डिलीट व्हायला हवी होती.
शूटिन्ग ला सुट्टी दिली असेल पुढले ४-५ महिने. Wink
आधीचे बसस्टॉपवाले सगळे भाग पुन्हा रिपीट टेलिकास्ट होतील....पुन्हा श्री 'बाळ' त्याच्या भयानक बेसूर ( भेसूर) आवाजात गाईल.... 'सरळ असेल ते सोपे करावे' का काहीतरी....

मी नताशा पोइट आहे . श्री अकौ. पण आठवायला पाहिजे . आठवेल आठवेल.
पण आत्ता मात्र कट्टी मालिकेशी .लैच बोर करणारेत Happy

तिला काही आठवलं नाही आणि ती सिरेलच्या शुटिंगला गेलीच नाही तर किती बर होईल ना?? Rofl

इथे सर्वांचे प्रतिसाद मस्त. या असल्या मालिकांपेक्षा त्या न बघितलेल्या ब-या.. इथले प्रतिसाद वाचायला जाम मजा येत्ये पण. Happy

या पुढील काही भाग जानवी ला कोण आठवते आणि कोण नाही यात मस्त जाईल ….
आपटे जानवी शी परत लग्नास तयार होईल तर बरा
अतुल परचुरे जानवी ला रिपीट जोक सांगून हसवू शकतो

बिचार्या जानवी च्या डोक्याला धक्का बसू नये म्हणून गोखले पडलेली जुनी चाळ परत बांधून काढतील …।
बराच स्कोप दिसतोय या स्टोरी मध्ये

जान्हवी बाई श्रीला, तुम्ही कोण विचारतात...<< मग श्रीबाळ रडतं का?

जाह्नवी आता "आयला, या पण मेमरीमध्ये हेच ध्यान नशीबात? ती एकता बघा दर मेमरी लॉसला हीरो बदलल्ते" असा हट्ट धरए की काय.

जानवी च्या डोक्याला धक्का लागू नये म्हणून, आई आजीने नवा संकल्प बांधलाय ….
कोन्ग्रेस चे राज्य परत आणणार, आता मोदिलाच हाकलणार ……
हि बाई कोणाला टिकू द्यायची नाही ….

नंदिनी आणि मुधळखोर....:खोखो:
श्री बाळ यांचा 'ध्यान' असा उल्लेख केल्याबद्दल प्रचंड अनुमोदन.....हे ध्यान मधून मधून गाऊन बेसूर पार्श्वसंगीतही देतं....

आजवर माला(' त्या स्पृहा सारखं) हा प्रश्ण पडलाय, की एकट्या त्या आजीआई की आईआजी ह्यांच्या सर्व मुलांच्या बायका इतक्या अडाणी, अशिक्षित कश्या काय? बरं, इतक्या वर्षात नवरे सोडून गेले म्हणून कोणी धंद्याचं शिकतील तर काही नाही, सारखे आपले शिरे, खीरी, पोहे बनवतायेत.

माला कोणी सांगेल काय? Proud

आता जान्हवीला शिरा द्या करून मग पटकन ओळखेल की हे गोखले कुटुंवामधले श्री आहेत/

तिचं लग्न नक्की झालं तेव्हा अकांटंट तिच्या ओळखीचा झालेला होता का? तिच्या अ‍ॅक्शीटेन नंतर माझी मेमरीपण लॉस झाल्यासारखी झालिये.

आठवड्याभरात तिची गुड न्युज कळेल. मग दरम्यानच्या काळात तो घरातला मोदळा नवर्‍याकडे जाईल. आणि दुसर्‍यांची ठरवताना स्वतःसाठी अत्यानंदीनीला वर जायला टेकलेला वर मिळेल. महिनाभरात आईआजी पंतू दिल्याबद्दल पंत्या लाऊन देवाचे आभार मानतील आणि एक सहज सुंदर गोष्ट पाहिल्याचा आनंद मिळेल असा अंदाज होता पण शेवटी... हम भी नकटे तुम भी नकटे सब नकटो का मेला है, एक नाकवाला था पर वो भी उनका चेला है...
आता जय मल्हार आणि फु बाई फु उरले लिस्टवर फक्त.

लोक्स विपरित परिणाम झालेल्या लेखकाच्या बालमनाला जानू बाळाची मेमरी परत कशी येईल याच्या आयडिया हव्या आहेत.....
तेव्हा नव नवीन कल्पना सुचवा

Proud

काळात तो घरातला मोदळा नवर्‍याकडे जाईल>>> Lol

बोल्ड केलेला शब्द खुप दिवसानीं वाचला.

अंदाज अपना अपना मधली डोक्यात काठी मारायची जुनी पण खात्रीलायक कल्पना छान आहे. नाहीतरी गोखल्यांकडच्या सहा आया, दोन सासरे, श्री बाळ, जानूचे आईबाबा, पिंट्या, मनिष, गीता, बोरकर, झालंच तर आपटे. भरपुर माणसे आहेत डोक्यात काठी मारायला. कुणाची तरी काठी योग्य ठिकाणी लागेल ना! समजा, झालाच तिचा कपाळमोक्ष तर किमान आम्ही तरी सुटू एकदाचे.

टअंदाज अपना अपना मधली डोक्यात काठी मारायची जुनी पण खात्रीलायक कल्पना छान आहे>> टिलू!!!!

अंदाज अपना अप्ना महान आहे!!!!!

आईआजी तिला बघायला जाते मग ती आई आजीला हाक मारते आजीला धक्का बसतो मग जानू म्हणते गचकू नको लगेच मी फक्त श्रीची परिक्षा घेतिये थोडे दिवस दम काढ नायतर बरशील लगेच बाहेर जाऊन मग आठवडभर श्री गांजाडूसारखा होतो. बायकोच्या प्रेमासाठी वाट्टेल ते करतो आणी शेवटी कुचंबलेला अनिल फार त्रास द्यायला लागल्यावर कायच्याकाय व्हायच्या आधी सांगू म्हणून जानू बोलून टाकते. हे सगळ फक्त आईआजी आणि जानुलाच माहिती असतं... बाकी कुणाला नाही. >>>> असच करा नाहीतर लय बेक्कार हाल होतील तुमचे.... निष्पाप रसिकांची हाय लागून पुढची मालिका रात्री १२.३० ला दाखवण्याच्या लायकीची होईल तुमची...

Pages