मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. 
बिंगो झिलमील!
बिंगो झिलमील!
ये जवानी है दीवानी.. (गीली
ये जवानी है दीवानी.. (गीली गीली अक्का)
जराssssसा उशीर झाला..
जराssssसा उशीर झाला..
गिली गिली अक्का.
गिली गिली अक्का.
गीली गीली अक्का
गीली गीली अक्का
आता पैठणीचे ३ तुकडे करावे
आता पैठणीचे ३ तुकडे करावे लागतील.. छोटा मला द्या.. मी त्याचा शॉर्ट टॉप शिवेन.. अग बाई सुनबाई.. च्या टायटल सोंग मध्ये असते ना तसे..
तिघींना एक एक किलो हैद्राबादी
चौघांना एक एक किलो हैद्राबादी काजुस्वीट.
७/१५५
डपो.
७/१५५
७/१५५
शत्रु देशा सोबतची समस्या संपुष्टात यावी म्हणुन एक करार बनवून, त्यावर छानशा कापडाचे कव्हर लावून एक जण तेव्हाच्या शत्रू राष्ट्र प्रमुखाला पाठवतो मोठ्या आशेने, आणि ती व्यक्ती तो करार वाचेल आणि आपले मत व्यक्त करेल याची अपेक्षा करतो.
पण तसे होत नाही. तेव्हा असे करण्यास त्या व्यक्तीला सांगायला तो कुठले गाणे म्हणेल?
दिल बेकरार था दिल बेकरार है.
दिल बेकरार था दिल बेकरार है..पास है तू फिर भी क्यू तेरा इंतझार है..
क्यू ते राइं तझार है.
क्यू ते राइं तझार है.
१५५ झिया बेकरार है
१५५
झिया बेकरार है
श्रवु दिल आहे त्यात पण नंतर.
श्रवु दिल आहे त्यात पण नंतर. मुख्य त्या व्यक्तीचं नाव येईल आधी.
नाव आलं सुद्धा, नाव बरोबर,
नाव आलं सुद्धा, नाव बरोबर, गाणं वेगळं.
झिया ओ झिया ओ झिया कुछ बोल दो
झिया ओ झिया ओ झिया कुछ बोल दो
अरे ओ डील का परदा खोल दो
बरोबर!
बरोबर!
अरे बेकरार शोधताना झिया
अरे बेकरार शोधताना झिया बेकरार गाणे आधी आले होते.. मग राय शब्द शोधात बसले..
गिली गिली अक्का. >>> हे कहर
गिली गिली अक्का. >>> हे कहर आहे
७/१५६
७/१५६
दहा वर्षापुर्वी घडलेली खरी गोष्ट आहे. तेव्हा आम्ही लंडन फिरायला गेलो होतो. लंडन मध्ये दुसराच दिवस होता. सकाळी विंडसर पॅलेस बघुन ट्रेन ने स्लो जंशन ला आलो आणि तिथुन पेडिंगट्न साठी दुसरी ट्रेन पकडायची होती. तिथे बोर्ड होता १२.२० ला 3 नंबर प्लॅटफॉम वर Slow , तर १२.२५ ला ५ नंबर वर fast ट्रेन होती. (नक्की वेळ आठवत नाही अंदाजाने लिहली आहे) मी पटकन स्टेशन वर लागलेले टाईम टेबल बघुन फास्ट ट्रेन ने जाण्याचा निर्णय घेतला. नंतर फॅमिली ला घेउन ब्रिज वर उभे राहिलो. लोक आप आपल्या प्लॅटफॉर्म वर जात होते. स्लो ट्रेन आली आणि गेली मी मात्र ब्रीज वरच उभारण्याचा निर्णय घेतला. घरचे रागावले होते तरी मी हट्टाने तिथेच उभे राहिलो. आमच्या बाचाबाची मध्येच काही घोषणा झाली आणि ५ नंबर वरील लोक सगळे ३ नंबर वर येत जाण्यासाठी वर येत होते. दुरुन ट्रेन बघुन मला पण अंदाज आला की ट्रेन आज ३ नंबर वर येणार आहे म्हणुन आम्ही सगळे ३ नंबर वर सर्वप्रथम पोहोचलो. आम्ही पोहोचलो आणि ट्रेन आली. माझ्या ७ वर्षाच्या मुलीने विचारले की हे सगळे तुम्हाला आधीच कसे कळले. तेव्हा मी तिला गाण्यात उत्तर काय उत्तर दिले असेल
क्लु : गाण्याचा तिसर्या कडव्यात आम्ही अनुभवलेली गोष्ट आहे.
साहिल शहा, तुम्ही डोंबिवलीचे
साहिल शहा, तुम्ही डोंबिवलीचे आहात का? हे जादुचे प्रयोग डोंबिवली स्टेशनवर नेहमी व्हायचे अर्थात समस्त पुरुष आणि काही हिंमतवाल्या बायका एका प्लॅटफॉर्मवरून सरळ रुळांवर उड्या मारून दुसर्या प्लॅटफॉर्मवर चढायचे. त्यामुळे ऑफिसला जाणारे सर्व जण शक्यतो ब्रीजवरच उभे राहून ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येतेय याचा अंदाज घेत आणि आयत्यावेळी ब्रीज उतरत.
तो अनुभव गाठिशी असेल तर तुम्ही ब्रीजवरच उभे राहणार हे बरोबर.
५ ला फास्ट आणि ३ ला स्लो हे
५ ला फास्ट आणि ३ ला स्लो हे ही टोटली डोंबिवलीच्या पूर्वीच्या पद्धतीने. कदाचित अजूनही
मी अंधेरी ला ट्रेन पकडायला
मी अंधेरी ला ट्रेन पकडायला जायचो . तिथे पण हाच प्रकार होता.
१९८८-८९ काळात एका रेलवेची कामे घेणार्या ठेकेदाराकडे काम केल्याने विरार , कर्जत , कसारा पर्यन्त सगळी कडे फिरणे होते.
तेव्हा डोंबिवली ला ४ च प्लॅटफ्रॉम होते . ५ वा सधी झाला? डॉम्बिवली लोकल चालु झाल्यावर?
मुम्बई बाह्रेर शिफ्ट झाल्याने मागच्या ३० वर्षात लोकलने जाणे खुप कमी झाले आहे.
५ ला फास्ट आणि ३ ला स्लो हे
५ ला फास्ट आणि ३ ला स्लो हे ही टोटली डोंबिवलीच्या पूर्वीच्या पद्धतीने. कदाचित अजूनही >> करेक्ट, फा. ब्रिटिशांनी डोंबिवलीची कॉपी केलीये.
५ वा सधी झाला? डॉम्बिवली लोकल चालु झाल्यावर? >> ५व्यालाही अनेक वर्षे होऊन गेली.
साहिल शहा, गाण्याच्या
साहिल शहा, गाण्याच्या मुखड्याच्या ओळींसाठी थोडा क्लु द्या ना. डायरेक तिसर्या कडव्याच्या ओळी आठवणं कठीण आहे.
अजून थोडी हिंट मिळेल का?
अजून थोडी हिंट मिळेल का?
मस्त लोकल गप्पा पण अर्जुनाचा
मस्त लोकल गप्पा पण अर्जुनाचा डोळा जसा पोपटाच्या डोळ्यावर, तसं माझं लक्ष कोड्यावर.

गाण्याचे तिसरे कडवे वगैरे ओळखायचं असल्यास अजून क्लु आवश्यक.
पण मुलीला सांगायला सुरुवात करताना -
'बात पुरानी है
एक कहानी है
अब सोचू के याद नही कुछ
अब सोचू नही भूले...(लोकल पकडण्याचे टेक्निक)'
हे कडवे फिट्ट बसेल.
श्रद्धा नाही.
श्रद्धा नाही.
मामी आपली जी चर्चा चालु होती त्या शहराचे नाव अंतर्यात आहे. (आता कोडे खुप सोपे झाले आहे)
मुंबई का डोंबिवली? डोंबिवली
मुंबई मुखड्यात आहे की तिसऱ्या कडव्यात?
अंधेरी आहे ग. गाण्यात कुठे
अंधेरी आहे ग. अंतर्यात आहे म्हणजे तिसर्या कडव्यात.
तू अंधेरीची गाणी शोध मी
तू अंधेरीची गाणी शोध मी डोंबिवलीची शोधायला घेते.
Pages