..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुनं गाणं आहे आणि आता त्याच नावाचा नवा सिनेमा आला आहे का? <<< हो, पण आता म्हणजे तरी वीसेक वर्षे होऊन गेली असतील.

सॉरी, आता थोडा बिझी आहे. तोपर्यंत पुढचे कोडे चालू ठेवा. किंवा मी उत्तर द्यावे म्हटले तरी चालेल.

लामा म्हणजे उंट का? >>> लामा एक उंटासारखा दिसणारा पण आकारानं लहान प्राणी आहे. म्हणून मला कोड्यातला अशक्त उंट = लामा असं वाटलं. अर्थात, लामा सहारात मिळणार नाहीत.

https://en.wikipedia.org/wiki/Llama इथे माहिती मिळेल लामाबद्दल. पुढेमागे पाळायचा विचार असेल तर वाचून ठेवा.

७/१५३:
उत्तर

आ अब लौट चले = आ अबल उट चले ( अबल= शक्ती नसलेला)

मामी, बरोबर! Happy

७/१५३:
महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा खेड्यातून बंडूला घेऊन आई सहारा वाळवंटात फिरायला आलेली असते. बंड्याला खुद्द वाळवंटात जाऊन बागडणारा उंट बघायचा असतो ( काय करणार? एकेकाला असते अपूर्वाई - खुद्द लॉर्ड्स मैदानातला सामना बघायची. Proud पण हाय! वाळवंटात वणवण करूनही दोघांना उंटाचे दर्शन काही होत नाही. शेवटी बंड्या रडकुंडीला आला. आई आपली त्याला धीर देत होती. थांब बंडुल्या! आपल्याला नक्की दिसेल उंट. दोघे चालत राहिले, चालत राहिले. शेवटी एका ठिकाणी एक छोटासा झरा दिसल्यावर दोघेही तिथे पारभर टेकले. पोटभर पाणी प्यायले. आणि उठता उठता बंडूच्या आईला दूरवर एक बसलेला उंट दिसतो. आता दिसला तर खरा पण बराच वेळ बघूनही त्याची काहीच हालचाल दिसेना. बंड्याला दाखवण्यापूर्वी तो नक्की उंटच आहे की आपल्याला भास होतोय याची खात्री करून घ्यायचे ती ठरवते. बंडूला न सांगताच त्याला घेऊन ती त्या दिशेने चालू लागते. हळूहळू तिच्या लक्षात येते की आपण पाहिलेला उंटच तर आहे खरा, पण तो फारच अशक्त, थकलेला आहे. बंडूला तो दाखवावा की नको असा विचार करत असतानाच तो उंट कसाबसा धडपडत उठतो आणि अडखळत अडखळत चालू लागतो. हे पाहून आईचे डोळे आनंदाने चमकतात. बंडू चालताना थोडा मागे राहिलेला असतो. घाईने त्याला बोलावून तो अशक्त थकलेला चालणारा उंट दाखवते. पण गाण्यातून (पहिली ओळ).

उत्तर :
*आ अ-बल उट चले*

आ अब लौट चले
नैन बिछाये, बाहें पसारे
तुझको पुकारे देश तेरा

येय. मी उत्तर वाचलं नव्हतं हा तुझं. पण २०+ वर्षांपूर्वीच्या सिनेमांच्या नावांची लिस्ट वाचायला घेतली. १९९८ पासून सुरुवात केली तर नशिबानं १९९९ मधेच मिळाला. मी उट शब्दावर फोकस ठेवला होता त्यामुळे हे नाव त्या क्रायटेरियात बसतंय हे लक्षात आलं पण बाकीचा उलगडा व्हायला १ मिनिट द्यावं लागलं. मस्त होतं कोडं.

मी वाचले होते.. पण गप्प राहिले.. पटकन लक्षात आले.. ऐश्वर्या आणि अक्षय खन्ना मुव्ही नाव.

गजानन आणि मामी, भारी! मामी, तुम्ही आधी सुचवलेली उत्तरं पण एवढी भारी आहेत की तुम्ही त्यांचं उत्तर बघून चिटिंग केली असती तरी ती तुम्हाला माफ होती!

७/१५४ सोपं फाफिंफ कोडं:

भर पावसात बेल वाजते. तो दार उघडतो तर काय, त्याची मोठी बहीण दारात उभी चिंब भिजलेली.
तर तो कोणतं गाणं म्हणेल?

तसं धृपद सुद्धा नाही म्हणता येणार त्याला, पण मुखडा झाला की शेवटी धृपदा सारखे हे शब्द अनेक वेळा म्हणतो तो गाण्यात.

या गाण्याचा रिमेक झालाय. तो आता पाहिला तर त्या रिमेक मध्ये या शेवटच्या शब्दांनी सुरवात केली आहे.

नाही यात संधी विग्रहही नाही, की संधी करायचीही नाही.

ताई वरून सापडत नसेल तर पर्यायी शब्द बघा. ही दुसरी मोठी हिंट.

आता श्रद्धाने उत्तर द्यायच्या आत टायपा उत्तर पटकन, नाहीतर त्या लिहितीलच.

Pages