..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७/७७ - सुबह और शाम काम ही काम क्यो नही लेते प्यार का नाम (चीटिंग केलेली आहे :)) >> बरोबर ऋष्या.

७/७७

"ते काही नाही, या मिस पियामालिनींशी या विषयावर बोललंच पाहिजे. काय एकेक खुळं आणि नखरे! म्हणे माझी पब्लिसिटी मीच सांभाळणार. अरे इतक्या उत्तमोत्तम एजन्स्या आणि मॅनेजर आहेत त्यांना हायर कर ना. इंडस्ट्रीतले सगळे नटनट्या हेच करतात. स्वतःच्या अ‍ॅक्टिंग करीयरवर लक्ष केंद्रित केलं तर ही बाई कुठल्याकुठे जाईल, पण नाही! आता आपल्याच या सुरू असलेल्या प्रोजेक्टमध्ये बघा मिस पियामालिनींबरोबर जे दोन हिरो आहेत सुबोजित सरकार आणि शाम कुमार या दोघांनीही आपापल्या पब्लिसिटी करता एजन्सीज हायर केल्या आहेत त्यामुळे शुटिंग सुरू असताना ते किती शांत असतात. नाहीतर ही बया, सदोदित हायपर!" दिग्दर्शक आपलं फ्रस्ट्रेशन प्रोड्युसरपाशी मोकळेपणे सांगत होते.

शेवटी दुसर्‍या दिवशी त्यांनी पियालींपाशी या विषयाला वाचा फोडलीच .......

उत्तर :
सुबो और शाम calm ही calm
क्यू नही लेते पिया PR का नाम

शाब्बास श्र, ऋष्या आणि आंबटगोड.

माउमैया, वावे, ऋष्या यांनी लिहिलेली गाणी कशा वरून गेस केली कळले नाही. म्हणजे मी भलत्याच ट्रॅक वर आहे.

----
दिग्दर्शक लिहिलंय दिग्दर्शिका नाही. आणि ती नटी आहे.
म्हणजे पुरुषाने स्त्रीला उद्देशून म्हटलेले गाणे आहे.
हे बरोबर का?

जो तुम तोडो पिया मै नाही तोडूं रे, मीराबाई मधले.
मी ही तिथेच आहे मानवदादा. सगळं शब्दशः घेत आहे.

दिग्दर्शक लिहिलंय दिग्दर्शिका नाही. आणि ती नटी आहे.
म्हणजे पुरुषाने स्त्रीला उद्देशून म्हटलेले गाणे आहे.
हे बरोबर का? >>> मूळ गाणं कोणीही म्हटलेलं असो, ते जरा फ्लेक्सिबल ठेऊ.

मूळ गाण्यात जी व्यक्ती गाईल तसंच कोड्यात असेल असं नसतं. त्यामुळे gender वगैरे विचार न करता फक्त गाणं सूट होतं की नाही ते पाहायचं.

>> माउमैया, वावे, ऋष्या यांनी लिहिलेली गाणी कशा वरून गेस केली कळले नाही. म्हणजे मी भलत्याच ट्रॅक वर आहे.
शब्द आणि गूगलबाबा, बस्स !!

७/७८
हे गाणं अगोदर विचारून झालं आहे का हे लक्षात नाही पण तरीही हे एकदम सोप्पं कोडं ...
नायकाला ह्युंदाई ची ही गाडी इतकी आवडली आहे की मी ती कधी विकत घेतोय असं त्याला झालं आहे. त्या गाडीला उद्देशून तो कुठलं गाणं म्हणेल ?

७/७८
हे गाणं अगोदर विचारून झालं आहे का हे लक्षात नाही पण तरीही हे एकदम सोप्पं कोडं ...
नायकाला ह्युंदाई ची ही गाडी इतकी आवडली आहे की मी ती कधी विकत घेतोय असं त्याला झालं आहे. त्या गाडीला उद्देशून तो कुठलं गाणं म्हणेल ?
उत्तर - कह दो के तुम हो मेरी वर्ना जीना नही मुझे है मरना

७/७४ चे

मैं वही दर्पण वही >>> हे उत्तर बरोबर होते Happy

७/७९
कितीही 'घेतली' तरी आपल्याला 'चढत' नाही असा झुंजार रावांना गर्व होता. मित्रमंडळीं मधे त्यांनी अनेक पैजा ही जिंकल्या होत्या...
चंद्रा नायकीण ही तितकीच तोलाची अन स्वरुपवान. आपल्या सौंदर्याचा तिला सार्थ अभिमान होता...मी बत्तीस लक्शणी पद्मिनी आहे....भले भले माझ्या सौंदर्या पुढे गारद होतात....ती म्हणायची.
झुंजारराव आणि चन्द्रा.. आमने सामने आले एका मैफिलीत...... तिने त्यांना जाहीर आव्हान दिले..... माझ्या रुपाचा अंमल तुमच्यावर चढल्या शिवाय राहणार नाही....!!
त्यांनीही मिशीला पीळ दिला आणि होकार भरला.... झालं....!! पेल्यावर पेले रिते होऊ लागले, हसण्या खिदळण्याला ऊत आला......तितक्यात तिथे चंद्रा ने प्रवेश केला.......पारदर्शी शुभ्र वस्त्रां मधून तिचं सौंदर्य झळकत होतं...... सगळेच अवाक होऊन तिच्याकडे पहात राहीले...
तिने आपले काजळ भरले डोळे झुंजार रावांवर रोखले.....अन अचानक झुंजार रावांनी गायला सुरुवात केली..........
Happy

ये जो हल्का हल्का सुरूर है
यह तेरी नज़र का कुसूर है
के शराब पीना सीखा दिया
तेरे प्यार ने तेरी चाह ने
तेरी बहकी बहकी निगाह ने
मुझे एक शराबी बना दिया
शराब कैसी खुमार कैसा
यह सब तुम्हारी नवाज़िशें हैं
पिलाई है किस नज़र से तू ने
कह मुझ को अपनी खबर नहीं है
तेरी बहकी बहकी निगाह ने
मुझे एक शराबी बना दिया

बापरे..सोनाली! Happy पूर्ण गाणं लिहिलंत!
पण हे नाही..
के शराब पीना सीखा दिया....त्यांना हे शिकवायची गरज नव्हतीच ना....

७/७९
नीले नीले अंबर मे चांद जब आए

>>>> हे बरोबर वाटतंय

Pages