मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. 
०७/६९:
०७/६९:
नवं एखादं प्रॉडक्ट घेऊन नवा धंदा सुरू करायचा म्हणून एका जुन्याच लोकप्रिय डिशमध्ये थोडा बदल करून आणि तिच्या नावात थोडा फेरफार करून त्याच नावानं रुपेशनं पुण्यात हॉटेल टाकायचं ठरवलं. सोबत एक खटपट्या लटपट्या मित्र होताच पब्लिसिटी करायला. सर्व प्लॅनिंग झालं. उद्या हॉटेलचं उद्घाटन होणार तर आदल्या दिवशी दोघे सर्व परिस्थितीचा आढावा घेत चर्चा करत होते. मित्राला जरा जास्तच टेन्शन आलं होतं त्याच्याकडे पब्लिसिटी आणि गिर्हाइकांना हाताळण्याचं काम देण्यात आलं होतं ना. त्यानं मस्त मस्त भन्नाट जाहिराती करून पुण्यात धमाल उडवून दिली होती. पण..... तरीही ..... 'सर्व काही सुरळीत होईल ना, काही चूक तर नाही ना होणार ?' मनातली शंका शेवटी त्यानं रुपेशकडे बोलून दाखवली .......
मस्त आहे धागा
मस्त आहे धागा
अवघडै
अवघडै
पल पल हर पल कैसे कटेगा- लगे
पल पल हर पल कैसे कटेगा- लगे रहो मुन्ना भाई
जुन्याच लोकप्रिय डिशमध्ये
जुन्याच लोकप्रिय डिशमध्ये थोडा बदल करून आणि नावात थोडा फेरफार करून>>> मामी रिमिक्स आहे का हे?
पल पल हर पल कैसे कटेगा- लगे
पल पल हर पल कैसे कटेगा- लगे रहो मुन्ना भाई>> खरच कि अर्थ जुळतोय बराचसा. आणि जुनी डिश म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस असू शकते
पल पल हर पल कैसे कटेगा- लगे
पल पल हर पल कैसे कटेगा- लगे रहो मुन्ना भाई >>> नाही. कोड्यात गाण्यातल्या शब्दांबद्दल बरेच क्ल्यु दिले आहेत.
मामी रिमिक्स आहे का हे? >> नाही गाणं रिमिक्स नाहीये. हॉटेलचं नाव थोडसं बदललंय.
श्र नं सोडवलंय कोडं हे. तिने मला मेसेज करून उत्तर सांगितलं आहे. इतरांना सोडवायला वाव मिळावा म्हणून तिने उत्तर लिहिलं नाहीये.
जुनी डिश म्हणजे मुन्नाभाई
जुनी डिश म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस असू शकते >> लोकप्रिय डिश पुण्यातली आहे.
भूल कोई हमसे ना हो जाए
भूल कोई हमसे ना हो जाए
रूप तेरा मस्ताना
(मस्तानी)
०७/६९:
०७/६९:
नवं एखादं प्रॉडक्ट घेऊन नवा धंदा सुरू करायचा म्हणून एका जुन्याच लोकप्रिय डिशमध्ये थोडा बदल करून आणि तिच्या नावात थोडा फेरफार करून त्याच नावानं रुपेशनं पुण्यात हॉटेल टाकायचं ठरवलं. सोबत एक खटपट्या लटपट्या मित्र होताच पब्लिसिटी करायला. सर्व प्लॅनिंग झालं. उद्या हॉटेलचं उद्घाटन होणार तर आदल्या दिवशी दोघे सर्व परिस्थितीचा आढावा घेत चर्चा करत होते. मित्राला जरा जास्तच टेन्शन आलं होतं त्याच्याकडे पब्लिसिटी आणि गिर्हाइकांना हाताळण्याचं काम देण्यात आलं होतं ना. त्यानं मस्त मस्त भन्नाट जाहिराती करून पुण्यात धमाल उडवून दिली होती. पण..... तरीही ..... 'सर्व काही सुरळीत होईल ना, काही चूक तर नाही ना होणार ?' मनातली शंका शेवटी त्यानं रुपेशकडे बोलून दाखवली .......
उत्तर : रुप तेरा मस्ताना (मस्तानी --> मस्ताना)
PR मेरा दिवाना
भूल कोई हमसे ना हो जाये
रानभूली बरोबर उत्तर. श्र आणि रानभूली यांनी आपपल्या घरी ' आराधना' सिनेमा बघावा अशी विनंती.
बर्याच दिवसांनी पाहिला हा
०७/७०
०७/७०
०७/६८ मधला तुरटी लंपास करणारा पण मुलीच्या आठवणीने कासावीस व्हायला लागला होता. त्याने मुलीला फेसबुकवर मेसेज पाठवला "तुरटी परत देतो, बसस्टॉपवर भेटायला ये". मुलीच्या गावी तुरटीवाचून फार अडलेलं असतं. म्हणून त्या हँडसमला भेटायची इच्छा नसतानाही केवळ तुरटीसाठी ती भेटायला तयार होते. पण तिची बेचैनी पाहून आई तपशील विचारते. खरी गोष्ट कळल्यावर आई रागावते आणि 'अजिबात जायचं नाही. आणू दुसरं पोतं' म्हणते. मुलगी जात नाही. बसस्टॉपवर वाट बघून बघून मुलगा थकतो. रागाने गटारात पोतं फेकून देतो....
गटाराच्या किनारी बसून तो कुठलं गाणे म्हणेल??
(पहिल्यांदा ह्या धाग्यावर कोडे देत आहे. नियम माहिती नाहीत नीट अजून. घ्या सांभाळून!)
लो आ गयी उनकी याद वो नही आए
लो आ गयी उनकी याद वो नही आए
नाही नाही.... पण हे एकदम जवळ
नाही नाही.... पण हे एकदम जवळ जाणारे होते.
कोड्यातल्या कुठल्या स्पेसिफिक
कोड्यातल्या कुठल्या स्पेसिफिक शब्दाचा संबंध आहे का गाण्याशी?
हो, आहे. तुरटीचा आहे. आणि
हो, आहे. तुरटीचा आहे. आणि कृष्ण-धवल गाणे आहे.
फिर आने लगा याद वोह प्यार का
फिर आने लगा याद वोह प्यार का आलम???
माझा पण पहिलाच प्रयत्न आहे ग सीमंतिनी
सही जवाब!!!
सही जवाब!!!
माझाही पहिलाच प्रयत्न होता.
Thank you ग.. इथ काय बक्षीस
Thank you ग.. इथ काय बक्षीस आहे उत्तर बरोबर आल तर:)
#meechki
सी. मस्त होतं कोडं.
मस्त होतं कोडं.
०७/७०
०७/७०
०७/६८ मधला तुरटी लंपास करणारा पण मुलीच्या आठवणीने कासावीस व्हायला लागला होता. त्याने मुलीला फेसबुकवर मेसेज पाठवला "तुरटी परत देतो, बसस्टॉपवर भेटायला ये". मुलीच्या गावी तुरटीवाचून फार अडलेलं असतं. म्हणून त्या हँडसमला भेटायची इच्छा नसतानाही केवळ तुरटीसाठी ती भेटायला तयार होते. पण तिची बेचैनी पाहून आई तपशील विचारते. खरी गोष्ट कळल्यावर आई रागावते आणि 'अजिबात जायचं नाही. आणू दुसरं पोतं' म्हणते. मुलगी जात नाही. बसस्टॉपवर वाट बघून बघून मुलगा थकतो. रागाने गटारात पोतं फेकून देतो....
गटाराच्या किनारी बसून तो कुठलं गाणे म्हणेल??
उत्तर : फिर आने लगा याद वोह प्यार का आलम
सीमंतिनी :))
सीमंतिनी :))
पहिल्या डोकेबाज कोड्याबद्दल
पहिल्या डोकेबाज कोड्याबद्दल आणि डिकोडेड उत्तराबद्दल सी आणि केया यांचे अभिनंदन.
अचूक उत्तराबद्दल पूर्वी जिप्सी इथे फुलं द्यायचा. आता तो बिझी झालाय. कोण दुसरा स्पॉन्सर मिळतोय का बघू. तोवर तुम्ही या गाण्याचा दोघी 'ये दिल किस को दू' हा चित्रपट बघा.
मामी..आप का हुकूम सर आखोंपर
मामी..आप का हुकूम सर आखोंपर
आलम म्हणजे तुरटी असते होय.
आलम म्हणजे तुरटी असते होय..माहीत नव्हतं.
अरे वा, झालं का डिकोड...
अरे वा, झालं का डिकोड...
तिकडच्या दृ गा ओ च्या साड्यांचा ष्टाक आणा की थोडा हिकडंबी.
सीमंतिनीचं मीम..
सी चे मीम
सी चे मीम
७/७१
७/७१
पहिलावहिला प्रयत्न..
मनिषा धीरेशसाठी आईस्क्रीम घेऊन येते, धीरेशला काही फ्लेवर आवडत नाही म्हणूत तो आईस्क्रीम फेकून रागावून जायला लागतो,त्याला मनिषा समजवायचा प्रयत्न करते, आयुष्यात कधी कधीच आईस्क्रीम मिळते वगैरे...
(जमलं कि नाही माहित नाही )
7/71 -
7/71 -
मिलती है जिंदगी मे मोहब्बत कभी कभी... हे गाणे का? पण आईस्क्रीमचे कनेक्शन काही जुळत नाहीये.
Pages