..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७/८२

सुमित आणि सविताची घरं एकाच गल्लीत होती. दोघांच्याही घराभोवती बाग होती. सुमितला सविता आवडायची. तो रोज तिला बागेतलं एक गुलाबाचं फूल घेऊन जायचा. पण सविताच्या बागेतही भरपूर गुलाब फुलत असल्यामुळे ती सुमितच्या गुलाबाकडे ढुंकूनही पहायची नाही. पण सुमित मात्र दिल चाहता हैमधला सुबोध जसा निष्ठेने रोज हार्ट शेपचा फुगा देतो, तसा रोज एक गुलाब तिच्यासाठी न्यायचा. तिने तो घेतला नाही, की घरी परत आणून कंपोस्ट बिनमध्ये टाकायचा. हळूहळू कंपोस्ट तयार झालं. मग सुमितला एक आयडिया सुचली. सविता फूल घेत नाही, पण कंपोस्ट तर घेईलच बागेसाठी! आणि खरंच, सुमितने दिलेलं कंपोस्ट सविताने आनंदाने घेतलं.
तर आता सुमित सविताकडे बघून कुठलं गाणं म्हणेल?

७/८3

Screenshot_20210606-112322_Chrome.jpg

ते येतात आणि एक केक ऑर्डर करतात. वेटर वरील केक घेऊन येतो. ते केक अनेक भागात कापून सगळे मिळून खातात. बिल पे करतात. वेटर थॅंक्यु म्हणतो, ते स्मितहास्य करत निघुन जातात.
तर वेटर कोणते गाणे म्हणेल?

दोन्ही बरोबर.
दिलेले डीटेल्स दिल के तुकडे मध्ये अधिक जुळतात.

कोडं क्र, ७/८४
एका गरीब प्रदेशातल्या छोट्या गावातून ते दोघेही मजुरी करायला जवळच्या छोट्या शहरात येतात. दोघेही आठवड्याचा बाजार करायला आलेले असताना एकमेकांना भेटतात. त्याच्याकडे साठलेल्या पैशातून तो तिला सोन्याचे कानातलं घेऊन देतो. तो तिला सांगतो कि माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि जर तुला माझ्याशी लग्न करायला होकार असेल तर पुढच्या वेळी बाजारात येताना कानात घालून ये. त्याप्रमाणे ती आदल्या दिवशी ती कानात घालून कसं दिसतंय हे पाहण्यासाठी कानातलं शोधत असते. पण तिला ते सापडत नाही. ते आपल्याकडून त्याच वेळी पडलं हे तिच्या लक्षात येतं. सगळीकडे शोधूनही तिला सापडत नाही म्हणून ती पोलीस तक्रार करायला जाते. तर हवालदार तिला सांगतो कि जे काही सांगायचं ते गाण्यात सांगा तरच तक्रार दाखल करून घेऊ.

तर ती कोणतं गाणं म्हणेल ?

श्रद्धा बरोबर!

७/८१
सतेंदर हरीयाणातून पुण्यात येतो. दुसर्‍या दिवशी बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो. पोटात कावळे ओरडताहेत आणि समोर मराठमोळा मेन्यू. त्याला काय करावे कळत नसते तोच वेटर समोर येऊन विचारतो "सर काय आणू?"
सतेंदर त्याच्याकडे बघतच राहतो. मग त्या वेटरला चमकते की साहेबांना मराठी कळत नाही... "सर, आप क्या ऑर्डर करना चाहेंगे?" सतेंदरला मेन्यूतले फारसे काही कळत नाहीये पण प्रचंड भूक लागली आहे तर तो गाण्यातून वेटरला कशी ऑर्डर देईल?

उत्तरः मै जट! yumm ला.

कोडं क्र. ७/८५

एका मुलाला शाळेत प्रश्न विचारतात की 'सांग पाहू, साप आधी का कात आधी?' तो फार विचार करतो तरी त्याला काय उत्तर द्यावं कळत नाही. मग तो घरी जातो आणि आईला विचारतो, 'आई, साप आधी का कात आधी?' आई म्हणते, 'मी आत्ता कामात आहे, आपण नंतर बोलू.' मग तो बाबांना विचारतो, 'बाबा, साप आधी की कात आधी?' ते म्हणतात 'आपण नंतर चर्चा करू, मी कामात आहे'. नंतर बाबा विसरून जातात. रात्र होते आणि आईला आठवतं की आपण आपल्या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलंच नाही. ती बाहेर बघते तर खूप अंधार पडलेला असतो, अष्टमीचा चंद्र वर आलेला असतो आणि मुलाला वेळेत उत्तर नाही दिलं तर ती गोष्ट अर्धवटच राहून जाईल. मग ती मुलाला हाक मारते आणि गाण्यात उत्तर देते. ते गाणं कोणतं असेल, सांगा पाहू.

(हे कोडं आधी झालं असल्यास क्षमस्व)

मुला कात आधी, भारी होतं हे. Lol

७/८६

नववीची ची परीक्षा संपून रिपोर्ट कार्ड मिळते आणि वासू एकदम हताश आणि दुःखी कष्टी होतो..त्याला काही सुचेनासे होते..मार्क तर चांगले मिळालेत पण तरीही खूप दुःख झालय..कशाच? तर ज्या मुलीवर प्रेम असत ती आता आपल्या वर्गात नाही.. तिच्या फोटो कडे बघत तो कोणते गाणे म्हणेल?

७/८७
त्याचा मुलगा खूपच मूर्ख असतो. एकही काम धड करत नसतो. लिंबु आणायला सांगतीलं तर खरबूज आणणाऱ्या टाइप. त्यामुळे तो मुलाला मूर्ख म्हणत असतो.
एकदा तो बागेत वेगवेगळ्या लहान मोठ्या झाडांना रोपांना घालायसाठी काही खतं घेऊन येतो आणि दुसऱ्या दिवशी घालू म्हणुन झोपतो. सकाळी उठून पहातो तर काय? खतांच्या पिशव्या रिकाम्या! तो घरात ओरडून विचारतो "खतांना कुणी हात लावला? काय केलं त्याचं?" तो मूर्ख मुलगा म्हणतो मी घातले खत झाडांना. तो कपाळावर हात मारून घेतो, त्याला वाटतं याने नक्कीच गडबड केली असणार.
पण मुलगा सांगतो, कुठलं खत, कुठल्या झाडाला, किती आणि कसं घातले ते. त्याने अगदी बरोबर, शास्त्रीय पद्धतीने खत घातले असते. आपल्या या मूर्खाला निदान एका विषयात तरी एवढी अक्कल आहे पाहून, तो आपल्याला मुलाला उद्देशून गाणे म्हणतो. कोणते?

मी टाइप करे पर्यन्त (मी खूप स्लो आहे यात) केयाचे कोडे आले, तेव्हा माझ्या कोड्याचा नंबर बदलला. आधी केयाचे सोडवू.

Pages