..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिये तो जिये कैसे बिन 'आप'के
लगता नही दिल कही बिन आपके

इतक्या थेट हिंट नका देऊ. कोडं सोडवण्यातली मजा जाते मग.

निल्सन / श्रद्धा बरोबर!

श्रद्धा: ओके, .... तसं पहिलं कोडं होतं म्हणुन दिल्या, यापुढे विचारल्यावर देईन.

ही कल्पना रेडीओ मिरचीने ढापली आहे Wink कार्यक्रमाचे नाव आहे 'what the f..arhan'

त्यातले कालचे कोडे -

एका मुलाचे एका मुलीवर प्रेम असते. तो तिला आपल्या भावना सांगतो तर ती म्हणते मी तुला तशा नजरेने कधी बघितलेच नाही. उलट तू मला माझ्या आजोबांसारखा वाटतोस. तर तो मुलगा वैतागून कुठले गाणे म्हणेल?

नाही..

मै तेरा बॉयफ्रेंड तू मेरी गर्लफ्रेंड ओह मेनू केंदी ना ना ना ना

कोडे क्रं. ०७/६६
(कसलं भारी वाटतंय परत इथे लिहिताना! या खेळायला सगळ्यांनी Happy )

एक मुलगा त्याच्या सावत्र आईला कशी हाक मारेल? (सौजन्यः रेडिओ मिरची)

रेडियोवर किंवा अन्यत्रही गाणी ऐकताना कधी कधी इथे वाचलेली / रचलेली कोडी आठवतात.
विशेषत: आज रपट जाए (घोडेस्वारी), तुझे जीवन की डोर से (गोकुळातलं नं १ घर), करवटें बदलते रहें, यह शाम की तन-हाइयां (उचं स्टुलावरून पडणे),
खूप मजा केली.

अनेक वर्षांनी खेळायला सुरूवात करायला एकदम भारी वाटताय. हे नविन कोड माझ्याकडून
०७/६७
एक यमला जट गाण गात कमलाच्या मागे लागलाय ती पण गाण्यातच उत्तर देतेय पण त्याला काय माहीत हा तर कमला का हमला

अरे वा, धाग्याला पुनरुज्जीवन दिलं. माधव धन्यवाद.

माधव, भरत, स्वप्ना, दिनेशदा, जिप्सी आणि अनेकजण ... काय धमाल करायचो इथे.

मामी
मला विसरलीस.... असो
मी एक कोड घालून सुरूवात केलेय. प्रयत्न कर

दृ गा ओ के माननीय मेंबर्स, थोडा बदल म्हणून हीसुद्धा कोडी सोडवूया का जरा? Happy सुरुवात सोप्या कोड्याने.

०७/६८:

एक मुलगी तुरटीचं पोतं घेऊन बसने गावाला निघालेली असते. वाटेत तिला एक हँडसम मुलगा भेटतो. ती लगेच त्याच्या प्रेमात पडते. सुखस्वप्नात रमून जाते. काही वेळाने ती भानावर येते आणि तिच्या लक्षात येते की तो मुलगा आणि तुरटीचं पोतं दोन्ही गायब आहेत. ती कोणतं गाणं म्हणेल?

Pages