..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक सोपं कोडं.

7/72 -
लग्न होऊन सासरी पाऊल टाकल्यावर सारिका बडजात्यापटापेक्षाही जास्त लोक असलेल्या आपल्या सासरच्या कुटुंबाकडे पाहतच राहिली. सासऱ्यांचे चार मोठे भाऊ, लहान दोन बहिणी, त्यांची कुटुंबं, त्यातले लोक.. त्यामुळे लग्न झाल्याझाल्याच ती कुणाचीतरी नात्याने सासूसुद्धा झाली होती, शिवाय तिला आता दोन नातू होते. तिचे एक जरा लांबच्या नात्यातले सासरे तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होते. आटोपशीर कुटुंबात वाढलेल्या सारिकाला हे सगळं कुटुंब पाहून गरगरायला लागलं आणि तिने एक गाणं म्हटलं. कोणतं?

डोला रे डोला ???

श्रध्दा, माझ्या कोड्याचे उत्तर बरोबरे..ते आईस्क्रीम असंच सहजच लिहिले होते..अजून अचूक कळलेला नाहीये हा खेळ..
Happy

०७/७२ साठी
सर घूमे चक्कर खाए
दिल दिल से टक्कर खाए
अरे मैं खोया के तू खो गया

जो ना है दिखता जाए
जो है वो दिख ना पाए
अरे आँखों को ये क्या हो गया
हो बिन चाबी खुल जाए मस्ती का ताला
छोरी लागे जोरु जोरा लगे साला
पनघट पे नाचे
हाँ पनघट पे नाचे, नाचे रे नाचे मधुबाला

अजून अचूक कळलेला नाहीये हा खेळ..<<<<< आधीची काही पानं वाचून बघ. म्हणजे लक्षात येईल. सहसा एखाद्या शब्दाचे दोन भाषांतले वेगवेगळे अर्थ (आलम - ऍलम), शब्दच्छल (PR मेरा दिवाना), किंवा मूळ गाण्यात आहे त्यापेक्षा अगदी वेगळ्याच सिच्युएशनला परफेक्ट सूट होणारं गाणं अशा गोष्टींवर आधारित सिच्युएशन तयार करून कोडी टाकतात लोक.

वावे, नाही. अजून थोडा क्लु द्यायचा म्हणजे बाकीचं गाणं नाही पण गाण्याची पहिलीच ओळ सारिकाला ते कुटुंब आणि त्यातले नातेसंबंध ऐकून जे फीलिंग आलं त्याला परफेक्ट सूट करते.

७/७२
दैया ये मै कहॉं आ फसी, रोना आवे ना आवे हसी

करेक्ट, माऊमैया.

7/72 -
लग्न होऊन सासरी पाऊल टाकल्यावर सारिका बडजात्यापटापेक्षाही जास्त लोक असलेल्या आपल्या सासरच्या कुटुंबाकडे पाहतच राहिली. सासऱ्यांचे चार मोठे भाऊ, लहान दोन बहिणी, त्यांची कुटुंबं, त्यातले लोक.. त्यामुळे लग्न झाल्याझाल्याच ती कुणाचीतरी नात्याने सासूसुद्धा झाली होती, शिवाय तिला आता दोन नातू होते. तिचे एक जरा लांबच्या नात्यातले सासरे तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होते. आटोपशीर कुटुंबात वाढलेल्या सारिकाला हे सगळं कुटुंब पाहून गरगरायला लागलं आणि तिने एक गाणं म्हटलं. कोणतं?

उत्तर - कितने अजीब रिश्ते है यहां पे..

७/७३
सचिन आणि सुप्रियाच्या घराजवळच्या रस्त्यावर समोरासमोर दोन दुकानं होती. भावाभावांची. जीवन जनरल स्टोअर्स आणि सावन जनरल स्टोअर्स. सचिन नेहमी जीवनकडून सामान आणायचा आणि सुप्रिया नेहमी सावनकडून. काही वर्षांनी सचिनची बदली दुसऱ्या गावात झाली. सुप्रिया नेमकी तेव्हा बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. शेवटी एकट्यानेच सामानाची बांधाबांध करून ते ट्रकमधे भरून तो निघाला. तेव्हा त्या सामानाकडे बघून तो कुठलं गाणं म्हणेल?

सामानाची बांधाबांध करून तो सामानाकडे बघून गाणं म्हणतोय. बांधाबांध करण्यासाठी ज्या वस्तू लागतात, त्या त्याने दुकानातूनच आणल्या आहेत!

७/७४ - हे आधी झाले असेल तर सांगा. स्नो व्हाईट ची सावत्र आई रोज आरशासमोर उभी राहून ते मिरर मिरर ऑन द वॉल वगैरे विचारायची व रोज तो आरसा तिला हवे तेच उत्तर द्यायचा. मग एक दिवस तो म्हंटला की स्नो व्हाईट ही "फेअरेस्ट" आहे.

यावर ती क्वीन काय गाणे म्हणेल?

Pages