..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

7/74 -
आईना वोही रहता है, चेहरे बदल जाते है...

नाही. आईना, शीशा वगैरे सोडा. "शुध हिंदी" शब्द धरून शोधा आरशाकरता. ही हिंट Happy

एक दोन तासांत उत्तर आले नाही तर दुसरे कोडे घेउन सुरू करा. मी सकाळी गाणे लिहीतो.

7/74 - उत्तर

दर्पन झूट ना बोले, दर्पन झूट ना बोले - दर्पन ( १९७०)

7/75
आरतीला हृदय रोगाचं निदान झाल्याने सगळेच जरासे धास्तावले होते. पण डॉ. रुईया यांनी तिला धीर दिला. ते म्हणाले..अगं घाबरायचे कशाला? आपण आधी angiography करू.
मी एक रंगीत द्राव तुझ्या हृदयात inject करीन. तुला कळणारही नाही. तो पूर्ण हृदयात पसरेल..आणि त्यावरून आपल्याला रोगाची व्याप्ती कळेल...no worries!
पण आरतीला जाम भिती वाटू लागली...व ती हॉस्पिटल मध्ये सैरावैरा धावत सुटली.. मागे हातात injection घेऊन डॉ सुद्धा धावत होते!
तिची बडबड चालूच होती..."कोण हे लागून गेले डॉ....? माझा त्यांचा काय संबंध? .......
शेवटी कुणीच ऐकेना तेव्हा आरती त्या सुई कडे पाहत रडवेली होऊन गायला लागली..कोणते बरं ते गाणे? Happy

7/75 -
छोटीसी उमर मे लग गया रोग
केहते है लोग
मै मर जाऊंगी
हे आहे का उत्तर?

7/75
तू म्हारो कौन लागे?

की

जहा मैं जाती हूं वही चले आते हो
चोरी चोरी ? मेरे दिल मे समाते हो
ये तो बताओ की तुम मेरे कौन हो.

7/7
आज मंगलवार है चूहे को बुखार है डॉक्टर ने लगाई सुई चुहा बोला ooi ooi ooi
https://youtu.be/PEaDWl3Cy9s
(Asach apal ughach :D)

पर्फेक्ट मानव !........... दुसरं उत्तर!
चोरी चोरी....

श्रद्धा, तुझा अंदाज ही ठीक होता...छोटीसी उमरिया मे लग गया रोग.....
त्या सुई आणि डॉक्टरवरून राज किरण आणि शोमा आनंदचं एक आचरट गाणं आठवलं... Lol

७/७६
राधिकाला जिया आणि पिया नावाच्या जुळ्या मुली होत्या. करिअर ब्रेक घेऊन राधिकाने दोघींना सांभाळायची जबाबदारी घेतली होती. आता दीड वर्ष झाल्यावर तिला तिचं करिअर खुणावू लागलं. मुलींचीही प्रगती चांगली होती. पिया नुकतीच बोबडं बोलायला लागली होती, तर जिया अजूनही हातवारेच करून सांगायची. सासूबाई गावाहून मुलींना सांभाळण्यासाठी यायला तयार झाल्या. मात्र त्या येण्यापूर्वीच, राधिकाला इंटरव्ह्यूचा कॉल आला.
मग तिच्या नवऱ्याने, राजने, एक दिवस मुलींना सांभाळण्याची जबाबदारी घेतली. ठरल्याप्रमाणे राधिका इंटरव्ह्यूला गेली. मात्र राजने एकट्याने मुलींसोबत राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याने , त्याची खूप तारांबळ उडाली. थोड्या वेळाने, राधिकाने राजला फोन करून " कसं चालू आहे सगळं? "असं विचारलं. तेव्हा भांबावून गेलेला राज कोणतं गाणं म्हणेल?

७/७७

"ते काही नाही, या मिस पियामालिनींशी या विषयावर बोललंच पाहिजे. काय एकेक खुळं आणि नखरे! म्हणे माझी पब्लिसिटी मीच सांभाळणार. अरे इतक्या उत्तमोत्तम एजन्स्या आणि मॅनेजर आहेत त्यांना हायर कर ना. इंडस्ट्रीतले सगळे नटनट्या हेच करतात. स्वतःच्या अ‍ॅक्टिंग करीयरवर लक्ष केंद्रित केलं तर ही बाई कुठल्याकुठे जाईल, पण नाही! आता आपल्याच या सुरू असलेल्या प्रोजेक्टमध्ये बघा मिस पियामालिनींबरोबर जे दोन हिरो आहेत सुबोजित सरकार आणि शाम कुमार या दोघांनीही आपापल्या पब्लिसिटी करता एजन्सीज हायर केल्या आहेत त्यामुळे शुटिंग सुरू असताना ते किती शांत असतात. नाहीतर ही बया, सदोदित हायपर!" दिग्दर्शक आपलं फ्रस्ट्रेशन प्रोड्युसरपाशी मोकळेपणे सांगत होते.

शेवटी दुसर्‍या दिवशी त्यांनी पियालींपाशी या विषयाला वाचा फोडलीच .......

सगळे 'हरलो' म्हनले की मी लिव्हनार उत्तर! Lol
असो.. पण सगळे योग्य पद्धतीने विचार करताय.. अजून सिमीलर गाणी आठवा.

Pages