मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. 
@ ह.पा. , चौदहवी का चाँदची
@ ह.पा. , चौदहवी का चाँदची माझीही कल्पना शुक्ल चतुर्दशीचा चंद्र अशीच आहे. काही वेगळा अर्थ आहे का?
कोडं ७/९१
साहेबांना गावाला जायचं असल्यामुळे ते ऑफिसमधून आज लवकर घरी जायला निघाले. साहेब ऑफिस क्वार्टर्समधेच रहात असत. साहेब गेल्याचं पाहताच थोड्या वेळाने कुलकर्णी उठला आणि तोही घरी निघाला. एरवी साहेब फार कडक. पाच मिनिटंही आधी सोडत नसत. पण हाय रे कर्मा! घरी जायला म्हणून कुलकर्णी बसस्टॉपवर गेला तेव्हा वाटेतच नेमके स्टेशनवर जाण्यासाठी म्हणून निघालेले साहेब भेटले.
कुलकर्णी कुठलं गाणं म्हणेल?
7/91
7/91
राह मे उनसे मुलाकात हो गई
जिससे डरते थे वोही बात हो गई
बरोबर श्रद्धा!
बरोबर श्रद्धा!
माझ्या एका मैत्रिणीने बारावीला असताना खरोखरच हा जोक केला होता. उशिरा उठल्यामुळे रविवारचं एक्स्ट्रा लेक्चर बुडवून ती दुसरीकडे कुठेतरी चाललेली असताना लेक्चर संपवून निघालेले सर तिला वाटेत भेटले होते
7/92
7/92
रिचा बागेत रितेश ची वाट बघत बसली होती..रितेशने येताना रिचा चा आवडता रेड वेलवेट केक आणला..रिचा मन लावून केक खात होती..तितक्यात एक कावळा आला आणि केक घेऊन उडून गेला.. रिचा केक परत यावा म्हणून,केक ला उद्देशून कोणते गाणे म्हणेल???
ओ-ओ, पंख होते तो उड़ आती रे...
ओ-ओ, पंख होते तो उड़ आती रे....
हे नाहीए.
हे नाहीए.
उशिरा उठल्यामुळे रविवारचं
उशिरा उठल्यामुळे रविवारचं एक्स्ट्रा लेक्चर बुडवून ती दुसरीकडे कुठेतरी चाललेली असताना लेक्चर संपवून निघालेले सर तिला वाटेत भेटले होते<<<<
हे नसावं.... तरी एक अंदाज
हे नसावं.... तरी एक अंदाज
7/92
हवा में उडता जाये मेरा लाल (दुपट्टा) मलमल का
हवा में उडता जाये >>> कावळ्याने नेला
लाल मलमल >>> रेड वेलवेट
कारवी..बरोबर वाटतंय
कारवी..बरोबर वाटतंय
नाही हे पण नाहीये 'लाल' हा
नाही हे पण नाहीये 'लाल' हा क्लु आहे(गाण्यात येणारा शब्द) आणि तोंडचा घास गेल्याने उद्विग्न होऊन ती गाणं गाते.
7/92 मोहे रंग दो लाल
7/92
मोहे रंग दो लाल
हवा में उडता जाये मेरा लाल
हवा में उडता जाये मेरा लाल (दुपट्टा) मलमल का
हवा में उडता जाये >>> कावळ्याने नेला
लाल मलमल >>> रेड वेलवेट
>>> हे खरं फिट बसतंय. दुपट्टा = double layered. माझा double layered red velvet cake हवेत उडाला.
रिचा केक परत यावा म्हणून,केक
रिचा केक परत यावा म्हणून,केक ला उद्देशून कोणते गाणे म्हणेल???
जुनं गाणं आहे..गाजलेला सिनेमा आहे.
मोठा रेसिडेंशीअल प्रोजेक्ट
मोठा रेसिडेंशीअल प्रोजेक्ट असतो तो.
इमारतींचे अनेक रोज असतात आणि एका रो मध्ये आठ इमारती असतात. रोज ना इंग्रजी अल्फाबेटचे नाव दिले असते आणि त्यातील इमारतींना त्या अल्फाबेट पुढे सांख्यिक क्रमांक दिला असतो. पण रस्त्यावर रो दर्शक फलक अजून लावलेले नसतात आणि सगळ्या इमारतींवर अजून ब्लॉक नंबर लावलेला नसतो, कारण त्यांच्या रंगोटीचं काम नुकतेच झालेले असते.
ते तिथे फ्लॅट बघायला येतात. तिथला मॅनेजर त्यांना एकेका रो मध्ये एक फ्लॅट दाखवत असतो. ते म्हणतात हे पसंत नाही आम्हाला सगळे डिझाइन असेच आहेत की काही वेगळे आहेत?
मग मॅनेजर त्यांना एका ब्लॉक समोर घेऊन जातो.
त्या ब्लॉकचा आकारच एकदम वेगळा असतो आणि त्याची रंगोटीही वेगळीच असते.
ते विचारतात अरे असला कसला आकार आणि रंगोटी? कुठला ब्लॉक आहे हा?
तर तो कुठले गाणे म्हणुन त्यांना उत्तर देईल?
.....
रो ज रो ज तुम जो सनम ऐसा करोगे,
हम जो रुठ जायेंगे तो आहे भरोगे.
तुम तो धोकेबाज हो, वादा करके भुल जाते हो.
७/९२ केकला उद्देशून ----
७/९२ केकला उद्देशून ----
मेरे राजा मेरे लाल तुझको ढूँढूँ मैं कहाँ ( राजा और रंक ६८)
ओ मेरे लाल आजा. तुझको गले लगा लूँ ( मदर इंडिया ५७)
कारवी दोन्ही मैच होताएत पण
कारवी दोन्ही मैच होताएत पण

मेरे लाल आजा. तुझको गले लगा लूँ ( मदर इंडिया ५७)
हे बरोबर आहे.
सोपा, सऱळ क्ल्यू दिला होतात.
७/९०
रो ज रो ज तुम जो सनम ऐसा करोगे,
Submitted by अभ्या... >>>>
अभ्या... , मॅनेजरचे 'स्पष्टीकरण करणारे' गाणे हवं आहे / विचारले होते.
तुमचे गाणे ग्राहकाची तक्रार म्हणून चालेल. की असे विचित्र बांधकाम / रंगकाम केलेत, दिलेला शब्द पाळला नाहीत आणि आम्हाला फसवले.... आम्ही ग्राहकांनी प्रोजेक्टकडे पाठ फिरवली तर भारी पडेल वगैरे.
७/९३
७/९३
ती आणि तिचा बाबा इतकंच विश्व होतं तिचं अगदी तिच्या लहानपणापासून. आता तिचा बाबा म्हातारा झाला तेव्हा ही श्रावणबाळ बनून त्याची सेवा करत असे. असेच एकदा फिरायला गेले असता मुक्कामाच्या ठिकाणी पोचण्याआधीच गाडी बंद पडते. बाबाला चालणं शक्य नसतं त्यामुळे इतर कोणा गाडीची वाट बघावी आणि त्यातून मुक्कामी पोचावं असं बाबा लेकीला सुचवतो. पण लेक कसली! ती बाबाला सांगते की मी तुला पाठीवर घेते आणि चालत जाते - काळजी करू नकोस. मला आवडतं तुझी सेवा करायला. आणि खरंच ती सरळ बाबाला पाठंगुळी घेते आणि आनंदानं मुक्कामाच्या दिशेनं चालू लागते. कोणतं गाणं म्हणत जाईल ती ?
( गाण्याच्या अंतर्याची ओळ आहे.)
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे (पण ही अंतर्याची ओळ नाही )
सारी दुनिया का बोझ हम उठाते
सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं,
उठाते है, बोझ उठाते है.
रानभुली, साहिल शहा ....
रानभुली, साहिल शहा .... दोन्ही नाही.
मराठी आहे का हिंदी?
मराठी आहे का हिंदी?
लेकीकरता बाप ओझं किंवा बोझ
लेकीकरता बाप ओझं किंवा बोझ नाहीये. ती आनंदानं बाबाला घेऊन चालण्याचं काम करतीये.
हिंदी
हिंदी
७/९३: यु ही कट जाएगा .. (हम
७/९३: यु ही कट जाएगा .. (हम है राही प्यार के चलना अपना काम पलभर मे हो जाएगी हर मुश्कील आसान)
नाही कविन
नाही कविन
क्ल्यु: बापाला पाठीवर घेऊन
क्ल्यु १ : बापाला पाठीवर घेऊन चालत जाणे ही आनंदाची गोष्ट आहे तिच्यासाठी.
हसते हसते कट जाए रास्ते?
हसते हसते कट जाए रास्ते?
नाही मानव.
नाही मानव.
क्ल्यु २ : बापाला सांगतीये ती आणि त्याला एकवचनी संबोधतेय.
क्ल्यु ३: गाण्याच्या
क्ल्यु ३: गाण्याच्या मुखड्यात देवाचं नाव आहे.
Pages