..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम कथा, असामान्य शेवट, प्रमुख अभिनेत्रींचा अप्रतिम अभिनय, सुंदर गाणी.. यांनी हा चित्रपट नटला होता.
( त्रीं वर अनुस्वार आहे. )
पुढचा क्लू उद्या..!

रिटायर व्हायचे आणि "तो" ग्रूप जॉईन करायचे वय ६० ना ? असे आपले मला वाटते. आता काय लोक ५८ / ५९ अशी सरकारी वयोमर्यादा असली तरी आधीच व्ही. आर. एस. घेतात.

तर ६० इज द नंबर.. आता अगदी रिया. साठी पण सोपे आहे.

उत्तम कथा, असामान्य शेवट, प्रमुख अभिनेत्रींचा अप्रतिम अभिनय, सुंदर गाणी.. यांनी हा चित्रपट नटला होता.
( त्रीं वर अनुस्वार आहे. ) --->

चित्रपट "मेरा साया" जर बरोबर असेल तर ...

तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया, साथ (६०) होगा

या गेस साठी पूर्ण मार्क्स.

कोडं क्र. ०७/५६:

असेच एक विशिष्ठ शहरातले पंतोजी आपल्या मित्राला घेऊन मकाऊ ला गेले. आता लोक मकाऊ ला कशाला जातात ? सट्टा खेळायलाच ना. त्या दोघांनी स्वतंत्रपणे कुठला नंबर आपल्याला भरपूर धनलाभ करून देईल असे एका विशिष्ठ व्यावसायिकाला विचारलेच होते. मजा म्हणजे दोघांना एकच दोन अंकी संख्या सांगितली गेली.

तर मकाऊला कसं ना दिवसरात्र सट्टा चालतो. उन्हा पावसाची फिकीर न करता लोक खेळत राहतात. आणि या दोन
मित्रांचा त्या सल्लागारावर गाढा विश्वास.. तर ते मकाऊला जाताना कुठले गाणे म्हणतील ?

संख्या सांगितली तर गाणे लवकर ओळखता येईल.. तर संख्येचा क्लू म्हणून मायबोलीचा एक नवा विभाग, असे सांगू शकेन.

उत्तर =

तेरा मेरा साथ ( sath ) रहे,
तेरा मेरा साथ ( sath ) रहे,
धूप हो, छाया हो,
दिन हो के, रात रहे..

गायिका लता, चित्रपट : सौदागर, अभिनेत्री नूतन आणि पद्मा खन्ना

कोडं क्र. ०७/५७:

समीरला काजल शर्मा बघताक्षणीच आवडली होती. तिला मदत करण्याची, तिच्याशी बोलण्याची एकही संधी तो सोडत नसे. तिच्या मैत्रिणींच्या लक्षात ही गोष्ट आली होती. आता तर तो दुरून येताना दिसला की एकमेकींना डोळे मारत आणि काजलला कोपरखळी देत त्या म्हणायच्या 'तुझा पंखा येतोय बघ'. काजलची 'बेटा मनमे लड्डू फुटा' अशी गत होती. मग मानेला एक नाजूक झटका देउन ओठ मुडपून ती म्हणायची 'आई ग! पंखा कसला. वेडा आहे झालं तो.' तिच्या ह्या अदेवर समीर बेहद्द खुश होता. मात्र ती तो झटका देताना नक्की काय म्हणते ते त्याला कळलं नव्हतं. ते कळलं असतं तर त्याने गोल्डन एरातलं कोणतं गाणं म्हटलं असतं?

कोडं क्र. ०७/५८:

'एक्झिट पोलचा डेटा आला का रे?' साहेबांनी परत एकदा विचारलं तेव्हा मात्र त्यांच्या सहाय्यकाला राहवेना 'नाही आला अजून साहेब....पण...' तो अंदाज घेण्यासाठी थांबला. अपेक्षेप्रमाणेस साहेबांनी भुवया उंचावून त्याच्याकडे पाहिलं. तोच संकेत समजून तो पुढे म्हणाला 'एक्झिट पोलची हिस्टरी रिलाएबल नाहीये साहेब.'. एक उसासा सोडून साहेब म्हणाले 'तेही खरंच आहे म्हणा. आपण ह्या वेळी बाजी मारणार असं माझं मन मला आतून सांगतंय. पण बाकी उमेदवारांप्रमाणे आपण cash वाटली नाहीये. ह्या विभागात गेली ५ वर्ष जी कामं केली आहेत त्याचं फळ म्हणून जनता आपल्याला पुन्हा निवडून देईल अशी खात्री आहे. फक्त पोलचा डेटा तोच कौल देतो का हे पाहायचं आता'. मनातली ही घालमेल साहेबांना कोणतं गाणं म्हणून सांगता आली असती. गाणं गोल्डन एरातलं नाही.

कोडं क्र. ०७/५९:

जन्मभूमी गुजरातमधून राजस्थानच्या ह्या छोट्याश्या खेड्यात येऊन त्याला काही दिवसच झाले होते. त्याचं मन अजिबात रमत नव्हतं कामात. तो परत जायचा विचार करत होता आणि एक दिवस त्याला ती दिसली. ती बॉर्डरपल्याड नसती तर त्याने नक्की तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला असता. पण इथे नुस्तंच बघण्यावर समाधान मानायला लागत होतं. तिची गुरं चारायला येण्याची वेळ साधून हा नेमका बाहेर यायचा. त्याच्या सहकार्‍यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी त्याला एक हिन्दी गाणं म्हणून चिडवायला सुरुवात केली. एके दिवशी तिच्या मैत्रिणींनी तिला तिथे मारलेली हाक ह्या सगळ्यांनी इथे ऐकली आणि मग तर काय त्यांच्या चिडवाचिडवीला उत आला. त्यांचं गाणं अगदी चपखल बसत होतं. कोणतं गाणं असेल ते?

स्वप्ना.. कोडं क्र. ०७/५७:

दीवाना कह के आज मुझे फिर पुकारिए
हाज़िर हूँ कोई तीर-ए-नज़र दिल पे मारिए
दीवाना कह के ...

हे आहे का? इतकं सोप्पं नसावं. Uhoh

०७/५७:

इक बार ज़रा फिर कह दो
मुझे शर्माके तुम दीवाना
ऐसी मीठी-मीठी बातें करके
कहाँ सीखा है दिल का लुभाना

???

मी_आर्या नाही. झिलमिल बरोबर! तुम्हाला पाणीपुरी आणि फालुदा Happy

कोडं क्र. ०७/५७:

समीरला काजल शर्मा बघताक्षणीच आवडली होती. तिला मदत करण्याची, तिच्याशी बोलण्याची एकही संधी तो सोडत नसे. तिच्या मैत्रिणींच्या लक्षात ही गोष्ट आली होती. आता तर तो दुरून येताना दिसला की एकमेकींना डोळे मारत आणि काजलला कोपरखळी देत त्या म्हणायच्या 'तुझा पंखा येतोय बघ'. काजलची 'बेटा मनमे लड्डू फुटा' अशी गत होती. मग मानेला एक नाजूक झटका देउन ओठ मुडपून ती म्हणायची 'आई ग! पंखा कसला. वेडा आहे झालं तो.' तिच्या ह्या अदेवर समीर बेहद्द खुश होता. मात्र ती तो झटका देताना नक्की काय म्हणते ते त्याला कळलं नव्हतं. ते कळलं असतं तर त्याने गोल्डन एरातलं कोणतं गाणं म्हटलं असतं?

उत्तर: ओ जाने जा इक बार जरा फिर कह दो मुझे शर्माके तुम दिवाना

शर्माके - काजल शर्मा

कोडं क्र. ०७/५८:

'एक्झिट पोलचा डेटा आला का रे?' साहेबांनी परत एकदा विचारलं तेव्हा मात्र त्यांच्या सहाय्यकाला राहवेना 'नाही आला अजून साहेब....पण...' तो अंदाज घेण्यासाठी थांबला. अपेक्षेप्रमाणेस साहेबांनी भुवया उंचावून त्याच्याकडे पाहिलं. तोच संकेत समजून तो पुढे म्हणाला 'एक्झिट पोलची हिस्टरी रिलाएबल नाहीये साहेब.'. एक उसासा सोडून साहेब म्हणाले 'तेही खरंच आहे म्हणा. आपण ह्या वेळी बाजी मारणार असं माझं मन मला आतून सांगतंय. पण बाकी उमेदवारांप्रमाणे आपण cash वाटली नाहीये. ह्या विभागात गेली ५ वर्ष जी कामं केली आहेत त्याचं फळ म्हणून जनता आपल्याला पुन्हा निवडून देईल अशी खात्री आहे. फक्त पोलचा डेटा तोच कौल देतो का हे पाहायचं आता'. मनातली ही घालमेल साहेबांना कोणतं गाणं म्हणून सांगता आली असती. गाणं गोल्डन एरातलं नाही.

उत्तर: इतनी शक्ती हमे देना दाता (data) मनका विश्वास कमजोर हो ना
हम चले नेक रस्तेपे हमसे भूलकर भी कोई भूल हो ना

कोडं क्र. ०७/५९:

जन्मभूमी गुजरातमधून राजस्थानच्या ह्या छोट्याश्या खेड्यात येऊन त्याला काही दिवसच झाले होते. त्याचं मन अजिबात रमत नव्हतं कामात. तो परत जायचा विचार करत होता आणि एक दिवस त्याला ती दिसली. ती बॉर्डरपल्याड नसती तर त्याने नक्की तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला असता. पण इथे नुस्तंच बघण्यावर समाधान मानायला लागत होतं. तिची गुरं चारायला येण्याची वेळ साधून हा नेमका बाहेर यायचा. त्याच्या सहकार्‍यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी त्याला एक हिन्दी गाणं म्हणून चिडवायला सुरुवात केली. एके दिवशी तिच्या मैत्रिणींनी तिला तिथे मारलेली हाक ह्या सगळ्यांनी इथे ऐकली आणि मग तर काय त्यांच्या चिडवाचिडवीला उत आला. त्यांचं गाणं अगदी चपखल बसत होतं. कोणतं गाणं असेल ते?

उत्तर: चान्द को क्या मालूम चाहता है उसे कोई चकोर

कोडं क्र. ०७/६०:

वडोदऱ्यातील त्या सोसायटीत आजकाल एकच विषय - जिग्नेस आणि पिंकलचं प्रेमप्रकरण. आणि त्या दोघांच्या लग्नाला असलेला घरच्यांचा विरोध. जिग्नेसची आई कस्तुरबा आणि पिंकलची आई केसरबा दोघींचं हाडवैर हेच ह्या विरोधाचं मुख्य कारण. जिग्नेस आणि पिंकल दोघांनाही ह्याची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच ही धार बोथट करायला त्यांनी एक नवीन युक्ती शोधून काढली होती. एक जुनं हिंदी गाणं त्यांनी आपलं मोबाईल रिंगटोन म्हणून वापरायला सुरुवात केली. त्यात आईला मस्का लावणंही होतं आणि परस्परांबद्दल 'प्यार का इजहार' ही. कोणतं होतं ते गाणं.

कोडं क्र. ०७/६१:

तो भारतीय संघातला अलीकडचा नावाजला गेलेला फलंदाज. तिचं त्याच्याशी लग्न ठरलं तेव्हा तिचे कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणी सगळ्यांनाच फार आनंद झाला. तिच्या मैत्रिणीनी तर एक गाणं म्हणून तिला चिडवायला सुरुवात केली. गाणं गोल्डन एरामधलं नव्हतं. पण त्याचं नाव (!) होतं की त्यात. ओळखा पाहू ते गाणं.

कोडं क्र. ०७/६२:

'तुमचं गावात एखादं घर आहे का?' तिने होणार्या नवऱ्याला विचारलं. त्याच्या कुटुंबाचा गावी खूप जमीनजुमला होता.
'जुनं घर आहे एक. पण ते इतकं जुनं आहे की तिथे आता कोणी रहात नाही. का ग?'
'नाही. परवा टीव्हीवर एक जुना मराठी चित्रपट दिसला त्यात तो पाटील कसल्या मोठ्या घरात रहात होता.' ती डोळे मोठे करत म्हणाली आणि त्याला हसूच फुटलं.
'ओहो, तसं घर पाहिजे आहे काय पाटलीणबाईंना' तो चिडवत म्हणाला आणि ती लाजलीच.
'नक्की बांधू. ह्या दिवाळीपर्यत तसंच बांधू'
बघता बघता दिवाळी आली आणि दोघं गावाकडे रवाना झाली. पण तिने जेव्हा घर बघितलं तेव्हा तिचा भ्रमनिरास झाला. एक टोलेजंग बंगला होता. वर त्याचे बाबा मिशीला पीळ देत म्हणत होते 'काय सूनबाई, आवडला का आमचा बंगला?'.
तिने फक्त त्याच्याकडे पाहिलं. तिला गाणं म्हणता येत असतं तर तिने कोणतं गाणं म्हणून आपली नाराजी व्यक्त केली असती?

कोडं क्र. ०७/६३:

'काकू, विनीत आहे का घरात?' सुहासने विचारलं.
'नाही रे, आज सकाळपासूनच लायब्ररीत गेलाय. काही काम होतं का?'
सुहासला काय बोलावं ते कळेना. विनीतने त्याच्यावर एक कामगिरी सोपवली होती. विनीतचं एका मुलीवर प्रेम बसलं होतं. पण ती त्यांच्या जातीची नसल्याने घरून प्रचंड विरोध होणार हे तो जाणून होता. सुहास त्याचा जवळचा मित्र. त्याने सांगितलं तर घरचे निदान ऐकून तरी घेतील असं त्याला वाटत होतं. पण त्यामुळे बिचारा सुहास मात्र कानकोंडला झाला होता. कुठून कसा विषय काढावा हेच त्याला समजत नव्हतं.

'काय रे सुहास? काय म्हणतो आहेस?' विनीतचे बाबा हॉलमध्ये येत म्हणाले.
'काका, नाही म्हणजे, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी आणि काकूशी' तो चाचरत म्हणाला.
'अरे मग बोल की. आमच्याशी बोलायला तुला कधीपासून प्रस्तावना करायला लागली?'
'कोण प्रस्तावना करतंय? अरे सुहास तू होय.' विनीतचे आजोबा देवळातून आले.
सुहासला काय करावं ते कळेना. तो नुसताच बसून राहिला. 'आजोबा, नाही, ते म्हणजे, त्याचं काय आहे....' तो चाचपडत म्हणाला.
'मी सांगतो काय आहे ते. तुझं कोणातरी मुलीवर प्रेम बसलंय आणि तुझ्या घरच्यांना आम्ही सांगावं हेच तुला सांगायचं आहे. हो की नाही?'
सुहास दचकलाच. आजोबांना 'तुमचा रस्ता बरोबर आहे पण गल्ली चुकलीय' हे कसं सांगावं ते त्याला कळेना. शेवटी त्याची ट्यूब पेटली आणि त्याने एक हिंदी गाणं म्हणून टाकलं.
विनीतच्या घरच्यांना आधी अर्थबोध झाला नाही. पण मग एकच हास्यकल्लोळ झाला. आणि विनीतची केस पास झाली.

कोडं क्र. ०७/६१:

माहीवरून?

माही वे मुहबतां सचिया रे?

कोडं क्र. ०७/६४:

प्रीतीला मूळच्या चायनीज इंग्लिश कंपनीत मध्ये नोकरी लागली तेव्हा अगदी आसमान ठेंगणे झाल्याचा भास झाला. त्यात तिची बॉस म्हणजे तिच्या क्षेत्रातल्या नामांकित स्त्री नेत्यांपैकी एक. तरी पण 'ती' तिची बॉस असणार म्हटल्यावर मैत्रिणींनी इशारा दिलाच. 'बघ हं बाई, एकदम कडक शिस्तीची बाई आहे ती.'
'असू देत. पण तिच्याकडून शिकायला किती मिळेल.'
'हं.....घी देखा लेकिन बडगा नही देखा....'
प्रीतीने काही लक्ष दिलं नाही. काही महिने उलटले. मग तिला एक महत्त्वाची असाईनमेंट मिळाली. नवरा कामानिमित्त बाहेरच्या देशात असल्याने तीही रात्रीचा दिवस करून काम करत होती. पण डेडलाईन आली तरी काम पुरं व्हायची चिन्हं दिसेनात. त्यात त्याच दिवशी रात्री नवरा सुध्दा वर्षा-दीड वर्षाने भारतात परत येणार होता.
शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. 'ती' ने बोलावलं आणि प्रीतीला झाप झाप झापलं.
ती परत आपल्या डेस्कवर आली तेव्हा तिचा फोन वाजत होता. फ्लाईट बोर्ड करायच्या आधी नवर्याने फोन केला होता.
तिचा रडवेला आवाज ऐकून त्याने काय झालं म्हणून विचारलं.
त्याचं उत्तर तिने गाण्यांत कसं दिलं असेल?

कोडं क्र. ०७/६१:

तो भारतीय संघातला अलीकडचा नावाजला गेलेला फलंदाज. तिचं त्याच्याशी लग्न ठरलं तेव्हा तिचे कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणी सगळ्यांनाच फार आनंद झाला. तिच्या मैत्रिणीनी तर एक गाणं म्हणून तिला चिडवायला सुरुवात केली. गाणं गोल्डन एरामधलं नव्हतं. पण त्याचं नाव (!) होतं की त्यात. ओळखा पाहू ते गाणं.

उत्तरः

रहना है तेरे दिलमे

(रहना = रहाणे = अजिंक्य रहाणे)

कोडं क्र. ०७/६०:

शायद मेरी शादी का खयाल दिलमे आया है, इसीलिए मम्मीने मेरे तुम्हे चायपे बुलाया है! ?

Pages