..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह धन्स जिप्सी.....

कोडं क्र. ०७/५१:

प्रेमात पडलेला कार्डिओलॉजिस्ट प्रेमिकेजवळ प्यार-का-इजहार कसा करेल?

उत्तर:

धडकने लगी दिलके तारोंकी
दुनिया संभल जायेगी बेकरारोंकी दुनिया
जो तुम मुस्कुरा दो

कोडं क्र. ०७/५२:

'तुम्ही इथे नवीन आला आहात का? आधी पाहिल्याचं आठवत नाही.' मिहीरने त्या मुलीची खाली पडलेली पुस्तकं उचलून देत म्हटलं. बिल्डींगमधल्या छोट्या मुलांनी पकडापकडी खेळताना तिला धक्का दिला होता.
'हो, मागच्याच आठवड्यात आलेय मी. तिसर्या मजल्यावरचे डोंगरे आहेत ना त्यांच्याकडे. शाम डोंगरे माझे सख्खे मामा. पुढचं शिक्षण पुण्यात राहून करायचं आहे मला आता. मी शामली.' ती मुलगी हसून म्हणाली. आणि मिहीर क्लीन बोल्ड झाला.

हळूहळू भेटी वाढू लागल्या. मैत्री झाली आणि तिचं रुपांतर प्रेमातही झालं. कसा कोण जाणे पण डोंगरयाना ह्याचा सुगावा लागला. शामलीचं कॉलेज बंद झालं. आधी मिहीरच्या हे लक्षात आलं नाही. पण ती दोन-तीन दिवस कॉलेजमध्ये दिसली नाही. फोन केला तर तो बंद होता तेव्हा त्याला संशय आला. मग कॉलेजमधल्या तिच्या एका मैत्रिणीला त्याने तिच्या घरी पाठवलं. ती मैत्रीण नोट्स देण्याचा बहाणा करून आल्याने घराच्या कोणालाच संशय आला नाही. शामलीने मैत्रिणीच्या फोनवरून मिहीरला फोन केला आणि त्याचा आवाज ऐकताच रडायला लागली. 'मिहीर, मला परत घरी पाठवायचं मामांनी ठरवलंय. दोन दिवसात आईबाबा येऊन मला घेऊन जाणारेत रे. तू इथे येऊन त्यांच्याशी बोल ना' मिहीरने फोन खाली ठेवला आणितो तिच्या घरी गेला.

त्याला बघून शाम डोंगरे आणि त्यांची दोन मुलं बाहेर आली. दोघंही मुलं नेहमी जिम मध्ये जात असल्याने Six Packs बाळगून होती. हे कमी की काय म्हणून त्यांनी मिहीरला बघताच आपल्या तिघा चुलतभावांना बोलावून घेतलं. पण मिहीरने आज कोणालाच जुमानायचं नाही असं ठरवलं होतं.

गाणं म्हणण्यासारखी परिस्थिती असती तर त्याने कोणतं गाणं म्हटलं असतं?

क्लू: गाणं गोल्डन एरातलं नाही.

मेरा रास्ता रोक रहे है ये पर्वत अंजाने ???

कि

हां यही है रास्ता तेरा तुने अब जाना है
हां यही सपना है तेरा तुने पेहचाना है
हां यही रास्ता है तेरा तुने अब जाना है
तुझे अब दिखाना है
रोके तुझको आंधिया, या जमीन और आसमां
लक्ष्य तो हर हालमें पाना है ???

०७/५२

मेहेरबानी नही तुम्हारा प्यार मांगा है
तुम्हें मंजूर है तभी तो यार मांगा है
गैरों के डर से, तेरे शहर से,
है कसम रिश्ता तोडू ना
तेरा रस्ता मैं छोडू ना..

रिया...हो गं मस्तच आहे ते गाणं.
पण ते स्वप्नाच्या कोड्याचं उत्तर नहिये असं वाटतंय मला आता

कोडं क्र. ०७/५२:

'तुम्ही इथे नवीन आला आहात का? आधी पाहिल्याचं आठवत नाही.' मिहीरने त्या मुलीची खाली पडलेली पुस्तकं उचलून देत म्हटलं. बिल्डींगमधल्या छोट्या मुलांनी पकडापकडी खेळताना तिला धक्का दिला होता.
'हो, मागच्याच आठवड्यात आलेय मी. तिसर्या मजल्यावरचे डोंगरे आहेत ना त्यांच्याकडे. शाम डोंगरे माझे सख्खे मामा. पुढचं शिक्षण पुण्यात राहून करायचं आहे मला आता. मी शामली.' ती मुलगी हसून म्हणाली. आणि मिहीर क्लीन बोल्ड झाला.

हळूहळू भेटी वाढू लागल्या. मैत्री झाली आणि तिचं रुपांतर प्रेमातही झालं. कसा कोण जाणे पण डोंगरयाना ह्याचा सुगावा लागला. शामलीचं कॉलेज बंद झालं. आधी मिहीरच्या हे लक्षात आलं नाही. पण ती दोन-तीन दिवस कॉलेजमध्ये दिसली नाही. फोन केला तर तो बंद होता तेव्हा त्याला संशय आला. मग कॉलेजमधल्या तिच्या एका मैत्रिणीला त्याने तिच्या घरी पाठवलं. ती मैत्रीण नोट्स देण्याचा बहाणा करून आल्याने घराच्या कोणालाच संशय आला नाही. शामलीने मैत्रिणीच्या फोनवरून मिहीरला फोन केला आणि त्याचा आवाज ऐकताच रडायला लागली. 'मिहीर, मला परत घरी पाठवायचं मामांनी ठरवलंय. दोन दिवसात आईबाबा येऊन मला घेऊन जाणारेत रे. तू इथे येऊन त्यांच्याशी बोल ना' मिहीरने फोन खाली ठेवला आणितो तिच्या घरी गेला.

त्याला बघून शाम डोंगरे आणि त्यांची दोन मुलं बाहेर आली. दोघंही मुलं नेहमी जिम मध्ये जात असल्याने Six Packs बाळगून होती. हे कमी की काय म्हणून त्यांनी मिहीरला बघताच आपल्या तिघा चुलतभावांना बोलावून घेतलं. पण मिहीरने आज कोणालाच जुमानायचं नाही असं ठरवलं होतं.

गाणं म्हणण्यासारखी परिस्थिती असती तर त्याने कोणतं गाणं म्हटलं असतं?

क्लू: गाणं गोल्डन एरातलं नाही.

उत्तरः
पर्बतोंसे आज मै टकरा गया
तुमने दी आवाज लो मै आ गया

कोडं क्र. ०७/५३:

अहमदला पाकिस्तानात येऊन एक वर्ष झालं होतं. पण अजूनही त्याचं मन इथे रमत नव्हतं. त्याला सारखी इराणमधल्या आपल्या छोट्या खेड्याची, आपल्या कुटुंबाची, मित्रांची आठवण यायची. पण त्याची मुख्य पंचाईत ही झाली होती की तो शिया पंथाचा होता. आणि पाकिस्तानात तो जिथे रहात होता तिथे मुख्यत्त्वेकरून सुन्नी पंथाचे लोक होते. त्यामुळे आपल्याला थोडी दुय्यम वागणूक मिळते अशी त्याची भावना झाली होती. एका रविवारी त्याला इराणमधून त्याच्या मित्राचा फोन आला. 'काय अहमद, कसं चाललंय पाकिस्तानात?'. मित्राचा आवाज ऐकून अहमदला रहावलं नाही. नुकत्याच ऐकलेल्या एका भारतीय गाण्याची ओळ त्याने मित्राला ऐकवली. कुठलं असेल ते गाणं?

क्लू: गाणं ७० च्या दशकातल्या हिन्दी सिनेमातलं आहे.

कोडं क्र. ०७/५४:

दुकानाच्या दरवाज्यावर लावलेल्या नाजूक घंटा किणकिणल्या तसं समीरने मान वर करून पाहिलं. खरं तर दुपारचा एक वाजत आला होता. त्यामुळे दुकान बंद करून लंचला जायचा विचार तो करत होता. पोटात कावळे ओरडत होते. नेमकं आत्ताच कोण कडमडलं म्हणून वैतागत तो उठला खरा पण आत आलेली सुंदर तरुणी पहाताच त्याचा वैताग कुठल्याकुठे पळून गेला. एफएमवर ऐकलेलं नव्या पिक्चरमधलं एक गाणं त्याच्या मनात रुंजी घालू लागलं. ओळखा ते गाणं.

०७/०५३ बडी सूनी सूनी है जिंदगी यह जिंदगी

मिली

०७/०५४ तूने मारी एन्ट्रियां रे
दिल में बजी घंटियां रे

भरत, बरोबर Happy

कोडं क्र. ०७/५३:

अहमदला पाकिस्तानात येऊन एक वर्ष झालं होतं. पण अजूनही त्याचं मन इथे रमत नव्हतं. त्याला सारखी इराणमधल्या आपल्या छोट्या खेड्याची, आपल्या कुटुंबाची, मित्रांची आठवण यायची. पण त्याची मुख्य पंचाईत ही झाली होती की तो शिया पंथाचा होता. आणि पाकिस्तानात तो जिथे रहात होता तिथे मुख्यत्त्वेकरून सुन्नी पंथाचे लोक होते. त्यामुळे आपल्याला थोडी दुय्यम वागणूक मिळते अशी त्याची भावना झाली होती. एका रविवारी त्याला इराणमधून त्याच्या मित्राचा फोन आला. 'काय अहमद, कसं चाललंय पाकिस्तानात?'. मित्राचा आवाज ऐकून अहमदला रहावलं नाही. नुकत्याच ऐकलेल्या एका भारतीय गाण्याची ओळ त्याने मित्राला ऐकवली. कुठलं असेल ते गाणं?

क्लू: गाणं ७० च्या दशकातल्या हिन्दी सिनेमातलं आहे.

उत्तरः

बडी सुनी सुनी है जिन्दगी ये जिन्दगी

चित्रपटः मिली

कोडं क्र. ०७/५४:

दुकानाच्या दरवाज्यावर लावलेल्या नाजूक घंटा किणकिणल्या तसं समीरने मान वर करून पाहिलं. खरं तर दुपारचा एक वाजत आला होता. त्यामुळे दुकान बंद करून लंचला जायचा विचार तो करत होता. पोटात कावळे ओरडत होते. नेमकं आत्ताच कोण कडमडलं म्हणून वैतागत तो उठला खरा पण आत आलेली सुंदर तरुणी पहाताच त्याचा वैताग कुठल्याकुठे पळून गेला. एफएमवर ऐकलेलं नव्या पिक्चरमधलं एक गाणं त्याच्या मनात रुंजी घालू लागलं. ओळखा ते गाणं.

उत्तरः

तूने मारी एन्ट्रियां रे
दिल में बजी घंटियां रे

एक सोप्प कोडं. धागा वर काढायला. Wink

कोडं क्र. ०७/५५:
One day at river bank
we had exchanged secret gestures
I had promised myself, i will never fall in love
I will never give consent
i am reminded of those promises now
i fear i may be ruined
If it was a mirror, I'd break it but i cannot break my heart. Happy

कोडं क्र. ०७/५५:

उई म उई मा ये क्या हो गया, उनकी गली मै दिल खो गया, बिंदिया हो तो ढुंढ भी लु, दिल ना ढुंढा जाय

बिंगो!!!

कोडं क्र. ०७/५५:

इक दिन कि बात है नदिया किनारे
उनसे हुए थे छूप छूप इशारे
कसम खा चुकी थी मै प्यार ना करूंगी
के प्यार का कभी भी इकरार ना करूंगी
अब वो बाते आये याद डर है हो ना जाऊ बरबाद
शिशा हो तो तोड भी डालू, दिल ना तोडा जाए Happy

उई मा उई मा ये क्या हो गया,
उनकी गली मै दिल खो गया,
बिंदिया हो तो ढुंढ भी लु, दिल ना ढुंढा जाए

नियती यांना थंडगार कैरीच पन्हं आणि तिखटमीठ लावलेल्या कैर्‍या. Happy

कोडं क्र. ०७/५६:

असेच एक विशिष्ठ शहरातले पंतोजी आपल्या मित्राला घेऊन मकाऊ ला गेले. आता लोक मकाऊ ला कशाला जातात ? सट्टा खेळायलाच ना. त्या दोघांनी स्वतंत्रपणे कुठला नंबर आपल्याला भरपूर धनलाभ करून देईल असे एका विशिष्ठ व्यावसायिकाला विचारलेच होते. मजा म्हणजे दोघांना एकच दोन अंकी संख्या सांगितली गेली.

तर मकाऊला कसं ना दिवसरात्र सट्टा चालतो. उन्हा पावसाची फिकीर न करता लोक खेळत राहतात. आणि या दोन
मित्रांचा त्या सल्लागारावर गाढा विश्वास.. तर ते मकाऊला जाताना कुठले गाणे म्हणतील ?

संख्या सांगितली तर गाणे लवकर ओळखता येईल.. तर संख्येचा क्लू म्हणून मायबोलीचा एक नवा विभाग, असे सांगू शकेन.

०७/५६:

जाता कहाँ है दीवाने, सब कुछ यहाँ है सनम
बाकी के सारे फ़साने, झूठे हैं तेरी क़सम

fifty, कुछ तेरे दिल में fifty
कुछ मेरे दिल में fifty
ज़माना है बुरा

??

झिलमिल, हे चालू शकेल... पण तिथे जायच्या आधीचे गाणे पाहिजे.

आणि काय हे, पन्नाशीतला माणूस काय उत्तररंगात जातो कि काय ? मी नाही जात तो Happy

प्यार का वादा फिफ्टि फिफ्टि
क्या है इरादा फिफ्टि फिफ्टि
आधा आधा फिफ्टि फिफ्टि

Pages