Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नंदिनी +१ आता माबोकरांमध्ये
नंदिनी +१
आता माबोकरांमध्ये भोपळ्याचे घारगे करण्याची साथ येईल का?
घरातल्या लाल भोपळ्यालाच फोन
घरातल्या लाल भोपळ्यालाच फोन करून घरात लाल भोपळा आहे का असे विचारण्याचे कारण काही कळत नाही.
श्रीशी लग्न करा, भोपळ्याचे घारगे मिळवा - ह्या फसव्या योजनेला बिचारी जान्हवी बळी पडलेली आहे.
जान्हवीला भोपळ्याच्या घारग्याचे डोहाळे लागले आहेत. तुपट कुटुंबाची सून झाल्यावर काय रश्श्याचे डोहाळे लागणार म्हणा!
डोक्यावरच्या टेंगळाला जी शरयू आलेली आहे ती एका पुरुषाबरोबर सलगी करताना पाहून श्रीचे निरागस भावविश्व उलटेच्या पालटे होणार आहे.
दरम्यान श्रीला कल्पनाही नाही की त्याची दाढी वाढत आहे.
जान्हवीच्या उजव्या हातावर कोपरापर्यंत असलेली अतिशय नाजूक मेंदी व मधेमधे लागणार्या जाहिराती असे काही पाहण्यासारखे प्रकार आजच्या एपिसोडमध्ये होते.
इंदू वहिनींना बेंद्रे मानसोपचार केंद्रात दाखल करण्याची वेळ आलेली आहे.
आगामी काही आठवडे बाजारात लाल भोपळा मिळाला नाही तर प्रेक्षकांनी निराश होऊ नये. आई आजी बहुधा भोपळ्याचे राज्यव्यापी उत्पादन स्वगृही वळवण्याची शक्यता आहे.
अजून म्हैस पाण्यात अन् म्हणे लोणी केवढ्याला!
एक राहिलंच! तो जान्हवीचा
एक राहिलंच!
तो जान्हवीचा साहेब म्हणून जो कोणी दाखवलेला आहे तो मतिमंद संस्थेतून पळालेला एक तहहयात सदस्य असून त्याचा कोणीही शोध घेत नाही आहे.
बेफी.. कंट्रोल..
बेफी.. कंट्रोल.. कंट्रोल..
घरातल्या लाल भोपळ्यालाच फोन करून घरात लाल भोपळा आहे का असे विचारण्याचे कारण काही कळत नाही.
..
कालच्या एपिसोड मधे बेबी आत्या दोन वेण्यांमधे काय कॉमेडी दिसत होती
बेंद्रे मानसोपचार केंद्र हे
बेंद्रे मानसोपचार केंद्र हे कुठे आहे?
मध्यंतरी बसस्टॉपवर मनोज जोशी
मध्यंतरी बसस्टॉपवर मनोज जोशी दाखवत होते त्यावेळी नर्मदाआई हमसून हमसून रडत होती.
आणि आता कांता-शरू आख्यान लावलय तर नर्मदाबाई एकदम नॉर्मल झाल्यात.
कशाचा कशाला पत्ता नाही.
बाकी जौद्या पण
त्या इंदूबाईंना मानसोपचार द्यायचं मात्र मनावर घ्याच म्हणावं
म्हणजे नर्मदाआईला पण बेंमाकें
म्हणजे नर्मदाआईला पण बेंमाकें मध्ये....?
(No subject)
बेफी अवनी .. अगं सगळ्या
बेफी

अवनी .. अगं सगळ्या आयांना त्या बेंमाके च्या लाईफटाईम मेंबरशिपची गरज आहे .. कधी कोणाला काय होईल सांगता येत नाहे
बेफि, असेच चौकार षटकार मारत
बेफि, असेच चौकार षटकार मारत रहा! लवकरच हो सु मी या घ -२ काढण्याची वेळ येणार आहे! इतक्या विक्रमी वेळेत २००० पोस्ट्स ओलांडणारा अजून कोणता धागा आहे काय मायबोलीवर?
(No subject)
बेफिकीर....लई भार्री....
बेफिकीर....लई भार्री.... 'हो.सू.मी.या.घ. इन रिअॅलिटी / वास्तवातील हो.सू.मी.या.घ.' अशी समांतर सीरियल काढायला पाहिजे तुम्ही....:)
दरम्यान श्रीला कल्पनाही नाही
दरम्यान श्रीला कल्पनाही नाही की त्याची दाढी वाढत आहे. >>>:हहगलो:
लवकरच हो सु मी या घ -२
लवकरच हो सु मी या घ -२ काढण्याची वेळ येणार आहे<< भाग ३. आधीचा भाग ० आहे.
बेफि, - मस्त.
बेफि, - मस्त.
बेफाट लिहीता हो तुम्ही बेफि..
बेफाट लिहीता हो तुम्ही बेफि.. आपला हा धागा खरचत्या मालिकावाल्यांना दाखवायला पाहिजे.. झिट येऊनच पडतील सगळे... ते आपल्यावर अन्याय करत असताता काहीच्या कै दाखवून.. आपण पण या सगळ्या प्रतिक्रिया त्यांना वाचायला द्यायलाच हव्यात...! थोडीतरी सुधारण होईल
(No subject)
हे बेफि एक दिवस नोकरी घालवणार
हे बेफि एक दिवस नोकरी घालवणार अस दिसतय. सकाळी आठ वाजता सिरियस मिटींग चालू असताना ह्यांचे कमेंट आठवुन एकटीलाच खिदळायला होत होतं आणि ते दाबण्याचा जो आटोकाट असफल प्रयत्न मी करत होते ते बघुन बहुतेक माझा साहेब मलाच बाहेरचा रस्ता न दाखवो म्हणजे मिळवली
तुफान फटकेबाजी सुरु आहे. बादवे बेफिकीर ह्या निमित्ताने का होइना तुम्ही सिरेल नियमित पणे बघताय हे कळलय हो आम्हाला
बेफी प्रओ ला एक कढई भरुन
बेफी
प्रओ ला एक कढई भरुन अळुची भाजी पिताना बघुन माझी मुलगी म्हणे आता ह्या बायला काय खातील??
स्मिते त्यांच्यासाठी असणार हो
स्मिते त्यांच्यासाठी असणार हो आतल्या कट्ट्यावर पातेलं भरलेलं, करतानाच बाजारातला सगळा आळू खरेदी करुन आल्या असतील. तसेही त्यांचे भाजीचे बजेट १५००० आहे महिन्याचे
बेबीआत्याचं नाव बेबी आहे याची कारणीमिमांसा पटवुन देण्यासाठीच तिला दोन वेण्या घालुन उभे केलेले बहुतेक फ्लॅशबॅक मधे आणि चेहर्यावरचे हावभाव तर अतिरंजितच
भाजीचे बजेट महिना
भाजीचे बजेट महिना १५०००?
लोकांचे पगार आठ आठ हजार असतात.
असो!
पुढच्या भागात बहुधा आई आजी जान्हवीला गर्भसंस्कार हे पुस्तक भेट म्हणून देतील आणि ते पाहून शरयू ओक्साबोक्शी रडेल व विचारेल......
"का राहतो आहोत आपण अश्या??????"
श्रीला ही गोड बातमी कळेल तेव्हा श्री लाजून चूर होईल, पण दाढीमुळे 'गालांवरील काकोडकरी रक्तिमा' काही दिसायचा नाही.
अरे देवा लै दिवसांनी धमाल
अरे देवा



लै दिवसांनी धमाल येतेय
बाकी ते फ्लॅशबॅक वाल्या सगळ्या कमेंटांना +१
नर्मदाआईचे अश्रू पुढील अएपिसोड्स साठी राखुन ठेवलेत
बेफि
बेफि

बेफिकीरना ह्या धाग्यावर
बेफिकीरना ह्या धाग्यावर लिहायची बन्दी घातली पाहिजे.:हहगलो:
आज भाजीवालीकडे लाल भोपळा पाहुन हसू आवरेना. भाजीवाली हसायला लागली, विचारत होती काय आठवले म्हणून? तिला काय सान्गणार्?:फिदी:
तिला काय सान्गणार्? <<
तिला काय सान्गणार्? << सांगायचे 'बेबीआत्या' आठवली
तिला काय सान्गणार्? <<
तिला काय सान्गणार्? << सांगायचे 'बेबीआत्या' आठवली
>>>>>:हहगलो:
सरू : स्मिता सरवदे Smita
सरू : स्मिता सरवदे Smita Sarawade
बेबी आत्या : पोर्णिमा तळवळकर Purnima Talwalkar
( पोर्णिमा - पूर्णिमा छे कसे वाचायचे!!)
पौर्णिमा असा शब्द आहे...
पौर्णिमा असा शब्द आहे... (चंद्राच्या बाबतीत) बेबीआत्याच्या बाबतीत माहित नाही..
आज एक सॉलिड वाक्य वाचाल .. "
आज एक सॉलिड वाक्य वाचाल .. " ... आणि ... यांचा मधुचंद्र कसा साजरा होईल ? ">>>
... मध्ये मालिकेतील पात्रांची नावे होती .

भाजीवाली हसायला लागली, विचारत
भाजीवाली हसायला लागली, विचारत होती काय आठवले म्हणून? <<<
चावट झाल्यात हल्ली भाजीवाल्याही!
Pages