Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रश्मी: अनुस्वार कसा टाइप
रश्मी: अनुस्वार कसा टाइप करायचा? क्रु नीट कसा लिहायचा? इ.इ.
पुढच्या भागात बहुधा आई आजी
पुढच्या भागात बहुधा आई आजी जान्हवीला गर्भसंस्कार हे पुस्तक भेट म्हणून देतील
>> जान्हवी प्रेग आहे?
आईआज्जींचे फ्लॅशबॅकमधले केसे काळ्याकुट्ट केसांच्या विगमुळे कैच्याकै दिसताहेत.
नैसर्गिक काळ्या रंगाचे विग मिळत नाहीत का कुठे?
किंवा थोडे पांढरे केस चालले असते कि.. अगदी केस न केस काळाभोर आणि चेहेर्यावर सुरकुत्या.. यक्स..
अनुस्वार कसा टाइप करायचा?
अनुस्वार कसा टाइप करायचा? क्रु नीट कसा टाइप करायचा? इ.इ. प्रश्न पडलेत. :-/
अन्जू.... "गूगल इनपुट टूल्स"
अन्जू.... "गूगल इनपुट टूल्स" ~~ ओके. पण प्रत्यक्ष टायपिंग करताना की युटिलिटी कुठली वापरतेस ? म्हणजे मला जर "जान्हवी" टाईप करायचे असेल तर मी Jaanhavi ह्या कीज टंकतो; तुझ्याकडेही असेच आहे ?
अनुस्वाराची काळजी करण्याचे
अनुस्वाराची काळजी करण्याचे काम नाही. एकही अनुस्वार (जिथे द्यायचे गरज आहे तिथेही) न देता जोडक्षरं लिहुन लोक लांबच लांब प्रतिसाद टाईप करतात.
अम्बिका असे लिहीताना एम
अम्बिका असे लिहीताना एम कॅपिटल टाईप कर. नाहीतर ब च्या आधी डॉट दे. कृपया लिहीताना आर कॅपिटल काढ.
वै.... तुला "मुंबई" असे टाईप
वै....
तुला "मुंबई" असे टाईप करायचे झाल्यास..... M टाईपल्यानंतर Small u घे....म्हणजे "मु" शब्द येईल आणि त्यानंतर शिफ्ट की प्रेस करून एम टाईप कर....म्हणजे मु वर अनुस्वार येईल.
वै अग माझा इन्तरनेट
वै अग माझा इन्तरनेट एक्सप्लोरर चालत नाहीये, त्यामुळे अनुस्वार टाकता येत नाही, पण वर टिम्ब/ अनुस्वार द्यायचा असेल तर आधी असे लिहुन बघ. ( मी मदत समितीत बघीतले होते, पण ते दिसत नाही) उदा. अम्बिका :- अ.न्बिका एनच्या आधी डॉट देऊन बघ. कृपया असे लिहीताना आर कॅपिटल काढ. म्हणजे क नन्तर शिफ्ट + आर आणी कॅपिटल लिहीताना अॅ लिहीण्यासाठी शिफ्ट + आर. ( हसू नकोस फारच डीटेल्स दिले म्हणून)
मालिका संपली तरी रोजच्यारोज
मालिका संपली तरी रोजच्यारोज अपडेट्स आलेच पाहिजेत म्हणावं!
हायला, मामा आल्यावर धाग्याचा TRP काय वाढला
कृपया - kRupayaa चिंता -
कृपया - kRupayaa
चिंता - chiMtaa, chi.ntaa
क्रम - kram
कार्य - kaary
ज्ञान - jnaan
मुंबई... कृपया.... जमलं...
मुंबई... कृपया.... जमलं...
धन्यवाद!!!!
मामा janhvi असे लिहिले की चार
मामा janhvi असे लिहिले की चार एक मराठी रुपांतरे येतात त्यात पहिलेच जान्हवी असे आही, खूप सोपं आहे.
नाही गं रश्मी मनापासून आभार!!
नाही गं रश्मी मनापासून आभार!!
अन्जू... तू दिलेल्या
अन्जू...
तू दिलेल्या स्पेलिंगप्रमाणे janhvi असे टंकले की "जन्ह्वि" असे काहीतरी भलतेच नाव येते....म्हणून मला jaanhavee = जान्हवी इतकी आगगाडी पळवायला लागते....अर्थात हे मी मायबोली बाय डीफॉल्ट प्रोव्हिजनबद्दल लिहितोय. फेसबुकवर बराहा घ्यावे लागते...मराठीसाठी.
मामा हे खूपच सोपे आहे म्हणून
मामा हे खूपच सोपे आहे म्हणून मला आवडते, फेसबुकवरपण हेच वापरते. आपण la असं type केलं की लगेच ला, लं असं येतं आपल्याला पाहिजे ते सिलेक्ट करायचं.
वै आभार नको मानुस, आपण सर्व
वै आभार नको मानुस, आपण सर्व एका कुटुम्बाचे सदस्य आहोत.:स्मित: गोगान्च्या पोस्टने तुझा प्रश्न मस्त सॉल्व्ह केला.
मामा तरीही अपडेट्स येऊ द्या. बारीक सारीक खाचा खोचा पण छान टिपता तुम्ही.:स्मित: बेफि आहेतच बॅकग्राऊन्ड म्युझिक आणी हायलाईटस साठी.:खोखो:
रश्मी.... मी न चुकता अपडेट
रश्मी....
मी न चुकता अपडेट देणार आहेच.... फक्त का कोण जाणे मला अगदी अस्पष्टसे का होईना पण जाणवले की आपल्या सदस्यांची मालिकेविषयी वाटणारी आपुलकी कमी होत आहे.....[अर्थात त्याला कारणीभूत सारी टीमच असेल... घरात इतके तणावाचे प्रसंग आहेत आणि त्या इंदूबाईला इंग्लिशचा ध्यास लागला आहे....म्हणजे विनोदनिर्मितीचा हा प्रकार फार हास्यास्पद चालला आहे, हे लेखिका आणि दिग्दर्शकाला का जाणवू नये...? फॉरेन रीटर्न्ड सासरा एकाच बस स्टॉपवर येजा करीत आहे....फोन करत आहे आणि परत गायब...इतकी वर्षी तो लक्ष्मीकांत बाहेर आहे, आता दाखविला आहे, तर तो शरयूला मारहाण करतोच....तरीही ह्या सावित्रीचे असल्या सत्यवानाला चोरून भेटायला जाणे काही कमी होत नाही. .सदाशिवरावांसारखा प्रकृतीने अधू पण वर्तनाने खंबीर माणूस बेरोजगार मुलाला "तुझ्या खिशात दहा रुपये नाहीत, बारावी परीक्षा पास नाहीस, कसलेही ट्रेनिंग नाही, तरीदेखील जो कुणी फायनान्सर तुला लाखो रुपये देण्यास तयार आहे, त्याला आधी माझ्यासमोर उभे कर, मग जावयाला काय सांगायचे ते मी ठरवेन...." असे रोखठोक म्हणत नाही.....हे सारे अतर्क्य प्रकार चालू आहेत सध्या.]
वैला टंकायला शिकवाल हो,
वैला टंकायला शिकवाल हो, मालिकेच्या लेखकाला कोण शिकवेल नीट लिहायला...
मालिकेच्या लेखकाला कोण शिकवेल
मालिकेच्या लेखकाला कोण शिकवेल नीट लिहायला... << शिकवले असते पण त्याला/तिला शिकायची आवड हवी ना ?
ती दुसर्या शिरेलीत रडारड करतेय सध्या....
मामा बरोबर आहे तुमचे. पण काय
मामा बरोबर आहे तुमचे. पण काय होते की सिरीयल आणी सिनेमा काढणार्यान्ची एक अपेक्षा असते की प्रेक्षकानी आपले डोके/ मेन्दू बाजूला ठेवुनच ह्या घटना पहाव्यात/ स्वीकाराव्यात. त्यामुळे हे जेवढे लाम्बवता येईल तेवढे लाम्बवायचे आणी आमटीत पाणी वाढवायचे. यामुळे मालिकेचा मूळ गाभाच पोखरला जाऊन मालिका रटाळ, नीरस आणी केवीलवाणी बनते.
त्या तू तिथे मी मध्ये हिरॉईन मन्जिरीची बहीण मधूरा आणी खलनायक आशिष यान्चा खून मस्त पचवलेला दाखवला. यान्चे मूळ खुनी कोण आहेत, उद्देश काय होता याचे काही गम्यच नाही. सॉरी दुसर्या मालिकेचे कथानक सान्गीतल्याबद्दल. पण परत तेच म्हणेन की असम्भव सारखी खिळवुन ठेवणारी दर्जेदार सिरीयल परत बनेल असे नाही वाटत.
या सगळ्या जणी श्री भोवती इतक्या फिरतायत की त्यान्चे आपले काही कर्तव्य आहे हेच विसरल्यात. बाकी जान्हवीच्या वडलान्बाबत तुम्हाला फुल्ल अनुमोदन.:स्मित:
तुम्ही लोकं कुठेही काहीही
तुम्ही लोकं कुठेही काहीही चर्चा का करता?

गप्पांच्या पानावर हे शिक्षण चालू ठेवलं तर चालणार नाहीये का?
चिल्ल रीया
चिल्ल रीया
रिया उन्हाळा सुरु झालाय, जरा
रिया उन्हाळा सुरु झालाय, जरा थन्ड घे आणी थन्ड हो. काय पाहीजे तुला मस्तानी? लस्सी? मिल्कशेक? पन्हे? की कुल्फी?:फिदी:
नुसतेच हसून काय होणार? जरा मधून मधून ज्ञानामृत घेतले की बरे असते. जेवणात कधीतरी कारले असावे ग. नुसत्याच भाज्या, कोशिन्बिरी, स्वीटस नकोत.:स्मित:
मराठीत कसे टाइप करायचे
मराठीत कसे टाइप करायचे याबाबतच्या वरच्या पोस्ट्स सिरिअलवाल्यांनी वाचल्या तर
जान्हवी, आई-आजींना मराठी टाइपिंगचे प्रशिक्षण देते यावर दोन-तीन एपिसोड्स नक्कीच पाडता येईल.
उल्हास काका
उल्हास काका

अपडेट चालू ठेवा प्लीज. मी
अपडेट चालू ठेवा प्लीज. मी मालिका बघत नाही पण अपडेट आवडतात वाचायला.
भिडेकाका स्मिते, बर्याच वेळ
भिडेकाका
स्मिते, बर्याच वेळ गप्प बसलेलेच की गं. पण कुठेही काहीही किती वेळ सुरू ठेवायचं याला काही लिमिट?
असो!
बघा ! कॉपीकॅट इंदूआईवर
बघा ! कॉपीकॅट इंदूआईवर बेंमाकें चा परिणाम झालाय
आज स्वतःच्या मनानी बर्यापैकी सेंसिबल बोलत होती.
ओके रिया. माझ्याकडुन इथे येणे
ओके रिया. माझ्याकडुन इथे येणे पूर्णपणे स्टॉप. वाद नको.
हा आपटे कोण आहे, त्याचं आणि
हा आपटे कोण आहे, त्याचं आणि जान्हवीचं काय कनेक्शन आहे???????????????????????
सांगा ना मला प्लीज
Pages