होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार, मी मायबोली वर अगदीच नविन. ह्या धाग्याने मला माबो वर यायला प्रव्रुत्त केले अस म्हणायला काहिच हरकत नाही. Happy

हो नक्कीच मामाना क्रेडिट आहे. त्याबरोबरच इथे जे शेलके प्रतिसाद असतात ते मनापासुन आवडतात. Happy एखादे कौटुम्बिक गटग आहे आणि जिव्हाळ्याने चर्चा चालली आहे अस वाटत.

एखादे कौटुम्बिक गटग आहे आणि जिव्हाळ्याने चर्चा चालली आहे अस वाटत.<<<

एक दिवस सोळा तासाच्या मानाने 'गटग', 'जिव्हाळा' हे शब्द सर्रास वापरणे म्हणजे उत्तम प्रगती मानावी लागेल.

बेफिजी हे उपरोधिक होते का नाही ते कळले नाही Happy पण माबो वर येण्याआधी जवळजवळ ३ महिने काही धागे नियमीत वाचत होते.

धन्यवाद मुग्धटली. मला खरे तर बरे वाटते आहे. मी बन्गळुरु मधे आहे आणि मराठीशी सम्पर्क तुटल्यागत झालय. Sad सो धिस इज अ वेलकम चेन्ज. Happy

Sorry don't know how to type Marathi from mobile...suja thanks:-) prachi, mi chiu -- haa joke shalepasun chhaltoy mala Wink

शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०१४ : अपडेट

~ सारा भाग आज शरयूच्या वर्तनाविषयीच्या वादानेच भरून गेला. आजी आणि नातू त्याबद्दलच खोलीत चर्चा करीत बसले आहेत. आजी "मी माझ्या मुलाला हिच्यासाठी घराबाहेर काढले कारण त्याचे वाईट वर्तन. सुनेला त्याचा त्रास होऊ नये म्हणून मी तिला त्याच्याबरोबर जाऊ न देता घरी ठेवून घेतले. पण आता मला शंका येत आहे की ती माझ्याशी खोटे बोलत असून ती चोरून लक्ष्मीकांतला भेटत असते." श्री आजीची ते म्हणणे समजून घेतो आणि आपले काका वर्तनामुळेच या घरात बदनाम तर झाले आहेतच पण शरयूआई जर पुन्हा त्याच व्यक्तीला भेटत असेल तर घरातील शांती परत बिघडणार हे खरेच, त्यामुळे मी तसे होऊ देणार नाही असे आजीला विश्वासाने सांगतो.

मध्यरात्र होत आली आहे. बेबीआत्या घराचा मुख्य दरवाजा कडी लावून बंद करते आणि परत आपल्या रूमकडे जात असताना तिथे जान्हवी पिण्याचे पाणी घेण्यासाठी आलेली आहे. दोघी एकमेकीला भेटतात. बेबी आता जान्हवीसोबत हसतहसत बोलत असल्याने दोघींमध्ये कसलाही ताणतणाव नाही. जान्हवी तिला सांगते, "मी पाणी घेऊन जाते.." बेबी, "बरं झालं...मलाही झोप येत नव्हती, वाचत बसले होते. पण आता कंटाळा आला आहे, जाऊन झोपते मी. गुड नाईट" आणि हसतच तिथून निघून जाते. जान्हवी पाण्याचे भांडे भरून घेत असतानाच दरवाजावर थाप पडलेली तिला ऐकू येते. ती घाईघाईने दरवाजाकडे जाते आणि हलक्या हाताने कडी काढते, तर बाहेर केस अस्ताव्यस्त्,पदर खांद्यावरून ढळलेला, चेहरा घामाने भरलेला आणि डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत अशा अवस्थेतील शरयू आत येते कशीबशी....जान्हवीचे तोंड देखले आभार मानते आणि तिला काही बोलायची संधी न देता झटदिशी आपल्या रुमकडे जाते. जान्हवी घाईघाईने "छोटी आई, छोटी आई..." अशा दबक्या आवाजातील हाका मारत तिच्या मागे जाते पण छोटी आई दरवाजा आतून बंद करून घेते. जान्हवी तिला बाहेरून वारंवार विनंत्या करते, पण शरयू तिला दाद ने देता कॉटवर रडत बसते....निराशेने जान्हवी आपल्या रूमकडे जाते. तिथे श्री लॅपटॉप उघडून काहीतरी काम करीत आहे; त्याचे जान्हवीकडे लक्षही नाही. तेव्हा ती त्याच्या खांद्याला हात लावून त्याला आपण आल्याची जाणीव करून देते शिवाय "तुला काय होत आहे ? कसला त्रास करून घेत आहेस. आतापर्यंत माझ्यामुळे ह्या घरात तणाव होता तो मी दूर केला आहे आणि पूर्वीचेच वातावरण पुन्हा येत असताना तू मात्र आणि तोच ताण आणि अस्वस्थता आणीत आहेस..." श्री सुरुवातीला "काय नाही, तसे काही नाही..." असेच म्हणत राहतो, पण अखेरीस "मी अस्वस्थ आहे ते छोट्या आईमुळे. आजीही त्याच त्रासात आहेत. छोट्या आईचे काय चालले आहे हे कळत नाही, पण ती अशी विचित्र का वागत आहे हाच प्रश्न आहे. आय अ‍ॅम शुअर की ती काकाना भेटते. इतक्या भयंकर अनुभवातून जाऊनसुद्धा छोटी आई असे का वागते हे मला नाही समजत." जान्हवी समजुतीच्या स्वरात म्हणते, "बाकी सगळे ठीक आहे श्री....पण मुळात तो त्यांचा नवरा आहे. कधीतरी जीवापाड प्रेम केले असणार त्यानी एकमेकावर श्री, त्यामुळे त्याना भेटावे असे वाटत असेल आणि याला चूक नाही म्हणता येणार.....नवरा म्हणून..." इथे जान्हवीला श्री थांबवितो. "नवरा ? त्याला तसा अधिकार नाही. जो माणूस बायकोवर हात उगारतो त्याला नवरा म्हणवून घ्यायचा कुठलाही अधिकार नाही. रागाने भिंतीवर हात आपटणे आणि बायकोला मारणे यात खूप फरक आहे. हा असा नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा..." जान्हवी म्हणते, "मला १०० टक्के पटतंय...पण प्रेमात माणूस क्षमाही करतो, श्री." श्री ला जान्हवीचे काहीही बोलणे पटत नाही, "जान्हवी ज्या माणसाने माझ्या आईला त्रास दिला आहे त्याची किंमत माझ्या लेखी शून्यच आहे. उद्या जरी आईआजीने त्याला माफ करायचे ठरविले तरी मी त्याला माफ करू शकणार नाही." जान्हवी त्याला म्हणते, "असं ठरवून टाकू नकोस...." पण श्री अजिबात ऐकत नाही. "खरं तर त्या माणसाला थोडीशी जरी लाज वाटत असेल तर तो आपल्या घरातील लोकांना तोंड दाखविणार नाही...." जान्हवीला शरयूची आणि लक्ष्मीकांतची भेट माहीत असल्याने ती श्री ला म्हणते, "आणि समजा तसं झालं तर ?" श्री तिच्याकडे रोखून पाहतो, "नाही जान्हवी असे होऊ नये....आणि कुठल्याही परिस्थितीत मी हे होऊ देणार नाही. आता तर या घराची घडी मी विस्कटू देणार नाही." "पण श्री आपल्यापेक्षा छोट्या आईला काय वाटते ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यांच्या मनाचा विचार केला तर...." इथे जान्हवीकडे श्री वेगळ्या नजरेने पाहात आहे हे लक्षात आल्यावर जान्हवी थांबते...अपराधी नजरेने त्याच्याकडे पाहात विचारते, "असा का बघतोयस?" श्री तिच्या नजरेला नजर भिडवून विचारतो, "तुला छोट्या आईबद्दल काही माहिती आहे का जी मला माहीत नाही ?" जान्हवी कशीबशी उत्तर देते..."नाही, तसे नाही....का रे ?" श्री स्पष्ट करतो, "जान्हवी आईआजीनी घरातील स्त्रियांसाठी जे काही निर्णय घेतले आहेस त्या सर्वांनी, आता त्यात तूही आलीस, पाठिंबा द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. मी विश्वास ठेवू ना तुझ्यावर या बाबतीत ?" जान्हवी शांतपणे उत्तरते, "अर्थातच श्री. मी या घरातील कोणत्याही निर्णयाच्या बाजूनेच आहे." श्री अजूनही विमनस्कपणे तिच्या चेहर्‍याकडे पाहात उभा आहे....त्याला बहुधा तिच्या बोलण्यावर विश्वास बसलेला नाही.

सकाळ झाली आहे आणि बेबीआत्या आजीच्या रुममध्ये येऊन आज भाजी कुठली करायची याची विचारपूस करायला आली आहे. आजी म्हणतात तुमचे तुम्ही ठरवा, मला काही विचारू नका. बेबीआत्या उत्साहाने विविध भाज्यांची नावे सांगते....आणि म्हणते "आजी, आळूचे फतफते करू या ?" आजी तिच्या चेहर्‍याकडे पाहात राहतात आणि त्यांचे मन स्मृतीपटलाकडे जाते. त्या जुन्या आठवणीत त्याना मुलगा लक्ष्मीकांत जेवणाच्या तयारीत आहे. खुर्चीत हसतमुखाने बसला आहे. शेजारी बायको शरयू आहे...तिच्यामागे बहीण बेबी आहे. वहिनी नर्मदा आणि इंदू आहेत....आजी त्याला आग्रहाने डावाने आळूचे फतफते वाढण्याचा प्रयत्न करीत आहे; तर याला आळू आवडत नसल्याने तो निर्धाराने नको म्हणत बसला आहे. तो एकटा जेवणारा आणि आजुबाजूला ५ स्त्रिया; पण या सार्‍यांना तो यशस्वी विरोध करतो आणि आळूचे फतफते आपल्या ताटात वाढून घेत नाहीच.

प्रसाद ओकबरोबरच्या सीन मधे लहान वय दाखवण्याच्या प्रयत्नात बेबी आत्याला दोन वेण्या घालून उभे केले आणि आजीचा विग पूर्ण काळा Proud

नमस्कार, मी मायबोली वर अगदीच नविन. ह्या धाग्याने मला माबो वर यायला प्रव्रुत्त केले अस म्हणायला काहिच हरकत नाही. >>> अगदी मी पण... सेम टू सेम..... मजा येते सगळ्यान्चे प्रतिसाद वाचायला......

फक्त मी ह्या धाग्यावर काही प्रतिसाद दिला नव्हता.

शरयु एवढे दिवस जात होति तेव्हा नवरा मारत नव्हता .. आताच बरा मारायला लागला ... (आनि भाजिचा खर्च पन वाढला )

हो अगदी परवा परवा पर्यंत शरयू गजरा घालून यायची ( जानव्हीने तिच्या नव-याला रस्त्यावर गजरा माळतानाच पाहिले होते) शिवाय खुश असायची, माणूस सुधारतं असे म्हणायची, आताच रडायला लागली,

सृष्टी करेक्ट, माझ्या पण मनात आलंकी शरयू इतके दिवस खुशीत असायची, गजरा वगैरे घालून यायची आताच काय झालं मार खाऊन येते.

याचा प्रॉब्लेम हा असतो की यांचे सर्व काही लिनीअर चालू असतं. एखादी समस्या घ्यायची आणि ती सोडवेपर्य्म्त तेच पुराण आणि दळण चालू. प्रत्येक गिष्ट अगदी चमच्याने भरवून भरवून सांगावी लागते. संवाद पण अगदी सोप्पी आणि सुटसुटीत हवेत. व्हिज्यु ली काय दाखवायचं वगरे नाही. जुन्या नाटकासारखे ठोकळ्यापुढे ठिकळा आणि संवाद बोला. कॅमेर्‍याला कष्ट नकोत. एकाच वेळेला अनेक प्लॉट्स सब प्लॉट्स वगैरे झेपवणं यांची बातच नाही.

*हे म्हणजे लेखक दिग्दर्शक अभिनेते नव्हेत. ते पुरेसे हुशार आणि अक्कलवाले आहेत. हे म्हणजे सर्वसामान्य प्रेक्शक.

एखाद्या विशिश्ट प्रतिसादावर उत्तर कसे द्यायचे? Sad अन्जली - १२ हो तो फारच हास्यास्पद प्रकार होता. लीना भागवत कधी कधी वेन्धळी नाही वेडी आहे अस वाट्टय. तिचा आइ आजी आणि बेबी बरोबरचा सीन फारच बालीश वाटला.

Pages