होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०१४ : अपडेट

~ अखेर छोट्या आईचे, शरयूचे, बाजार निमित्ताने बाहेर जाणे आणि प्रत्यक्षात तिने लक्ष्मीकांतला चोरून भेटणे या घटनेवरील पडदा दूर झाला. श्री ने तिला काकासमवेत रिक्षातून जाताना पाहिले. याचा त्याला धक्का बसला आहे. तो दु:खी मनाने घरी आला आहे. जान्हवी दार उघडते तेव्हा तो प्रथम विचारतो बाकी मंडळी कुठे आहेत ? जान्हवी म्हणते, "मीच त्याना आग्रहाने आपापल्या खोल्यात पाठविले आणि छोटी आई आल्यानंतर तुम्हा सर्वांना बोलावून घेते असेही बोलले....पण तू असा टेन्शनमध्ये का आहेस ?" या प्रश्नाला उत्तर म्हणून श्री सांगतो, "मी ज्या गोष्टीबद्दल काळजी करत होतो ते सारे खरे निघाले. मी पाहिले छोट्या आईला त्या व्यक्तीबरोबर फिरताना, रिक्षात बसताना... तू मला छोट्या आईविषयी सांगितले होतेस त्यावेळी मला ते खरे वाटले नव्हते, पण आज मी स्वतःच पाहिल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली......जान्हवी, मला खूप विचित्र वाटत आहे...." जान्हवीला आता श्री चीच काळजी वाटू लागली आहे. ती पाणी आणायला जाते, पण श्री तिला थांबवितो. जान्हवी थांबते आणि विचारते, "तू ज्याना पाहिलेस ते तुझे काकाच होते ना ? आय मीन तू त्याना पाहिले आहेसच. मी ज्या व्यक्तीला पाहिले ती फोटोमधीलच होती. तू लहानपणी त्याना पाहिले असल्याने आत्ता तेच होते याची खात्री असेल तुला...." श्री तिला सांगू लागतो की "जान्हवी मी त्यावेळी चारपाच वर्षाचा होतो. अंधुकसे आठवते. काकाचे दारुचे व्यसन जसजसे वाढत गेले,त्यामुळे सर्वांनी मला त्याच्यापासून दूरच ठेवले....." श्री आणि जान्हवी यांच्यातील हा संवाद चालूच राहतो....काका आणि शरयू यांच्यातील संबंधाबाबत.

इकडे आईआजी खोलीत येरझार्‍या घालीत आहेत, शरयू प्रश्नावरून त्या अस्वस्थ आहेत. बेबी त्यांच्याकडे येते, "आई, शरयूचा फोन...." शरयू मोबाईल घरी ठेवून गेलेली आहे. ती विसरली आहे की मुद्दामच तिने तसे केलेय यावर या मायलेकी विचार करतात. तोच त्याची रिंग होते. नंबरवरून फोन कुणाचा हे कळत नाही. दोनदा फोन आल्यावर आजी फोन घेतात पण संवाद करीत नाहीत. पलिकडे लक्ष्मीकांत असतो. तो "शरयू, घरी पोचलीस का ?" ही विचारणा करतो. त्याचा आवाज ऐकताच आजी स्तब्धच राहातात. त्याना सत्यपरिस्थिती कळून चुकते.

मुख्य हॉलमध्ये शरयू वगळता गोखले कुटुंबातील सारे सदस्य जमले आहेत. श्री फोटो आल्बम पाहात आहे. फोटोवरून तो ओळखतो की शरयू त्याच्या काकांसोबत होती. तो उद्गारतो, "हाच होता तो." सार्‍याजणी आजीकडे पाहातात. आजीना वाईट तर वाटतेच, पण इतक्या वेळेला आपण आपल्या मुलाच्या दुर्गुणाविषयी शरयूला सांगूनसुद्धा ही अशी वेड्यासारखी का वागते हे त्याना कळत नाही. त्या शरयूवर चिडल्या आहेत. "मी तिला वारंवार सांगत होते की समोर खड्डा आहे. नको मारू त्यात उडी...पण तिलाच खड्ड्यात उडी मारायची असेल तर मी तरी काय करणार ?" आजी अत्यंत निराश झाल्याचे दिसत आहे. बेबी, नर्मदाआई, इंदूआई यांचीही मते आजीसारखीच आहेत, तर जान्हवी काहीही न बोलता चूप ऐकत उभी आहे. श्री म्हणतो, "तिच्या वर्तनाबद्दल तिला समजावून सांगू या अगोदर. ती वाहवत चालली आहे. त्यात धोका आहे हे तिला पटवून दिले तर तिला कदाचित कळूनही चुकेल." आजी जास्त काही बोलत नाहीत यावर, फक्त म्हणतात, "एक बाकी खरे आहे. ज्यांच्यासाठी या घराचे दरवाजे बंद झाले आहेत ते परत उघडणार नाहीत."...... आजीच्या या करारीपणाकडे सारे पाहात आहेत....आणि त्याच वेळी शरयू तिथे प्रवेश करते. सार्‍या स्त्रिया तिच्याकडे एकटक पाहातात. शरयूला उमजून चुकते की इथे काहीतरी वेगळे घडले आहे. ती त्यातून चोरून जान्हवीच्या चेहर्‍याकडे खुलाशासाठी पाहते. जान्हवी नजर चुकवते पण त्यातून ती श्री कडे खूण करते. शरयूला काहीच कळत नाही.

बस स्टॉप. तिथे श्री ला भेटलेले ते गृहस्थ बसची वाट पाहात उभे आहेत. त्यानी अमेरिकेला फोन लावला आहे. लाईन डिसकनेक्ट होत आहे असे दिसते. तरीही ते नेटाने फोनवरून पलिकडील व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा संवाद, "आय अ‍ॅम आर.जी. हीअर...कॉलिंग फ्रॉम इंडिया....आय नीड टु स्पीक टु सिमरन. कॅन यू हीअर मी ? येस येस....आय अ‍ॅम हर फादर. आय ट्राईड कपल ऑफ टाईम्स....प्लीज लिसन टु मी, आय अ‍ॅम हर फादर...आय नीड टु स्पिक टु हर. ..." इतके बोलूनही पलिकडील व्यक्ती प्रतिसाद देत नाही म्हणून हे गृहस्थ चिडतात आणि ओरडतात, "आय अ‍ॅम हर फादर, डॅमिट !".... थांबतात, "आय अ‍ॅम सॉरी....माय अ‍ॅपॉलॉजी, सॉरी अगेन.... वुईल यू प्लीज कनेक्ट मी वुईथ हर ? व्हॉट ? शी सेड शी डझन्ट वॉन्ट टु टॉक टु मी ?....नो, नो, नो.... देअर कुड बी सम मिसअंडरस्टॅन्डिंग....प्लीज..." असे म्हणत असतानाच फोन पुन्हा डिसकनेक्ट होतो. बाजूला अनिल आपटे स्टॉपजवळील एका गाडीवाल्याकडून शेंगदाणे घेऊन त्याचा बकणा मारत फोनवरील संवाद ऐकत आहे आणि त्या गृहस्थाला चीड येण्यासाठी शेंगदाण्याच्या पुडीचा कागद त्याच्या पायावर टाकतो....दोन तीन वेळा. ते सज्जन गृहस्थ काही न बोलता ते चुरगळलेले कागद एकत्र करून आपल्या खिशात ठेवतात. नेहमीप्रमाणे आपट्याची बकबक सुरू होते पण त्याला प्रतिसाद देताना हे गृहस्थ एकच शब्द शांतपणे उच्चारतात, "तुमच्या आयुष्यात तुमच्यावर प्रेम करणारे कुणीच नसेल." आपटे थंडच पडतो.

इकडे "गोकुळ" मध्ये शरयूवर बेबी प्रश्नांचा भडिमार करीत आहे...."तू भोपळा आणायला गेली होतीस ना शरयू ?" या प्रश्नाला उत्तर म्हणून शरयू धांदरटपणे "हो ना....मी ह्या बाजारात पाहिला...तिथे चांगला नव्हता, मग दुसरीकडे गेले, तिथेही नव्हता, मग मी तमुक ठिकाणी गेले. मिळालाच नाही. तेव्हा रिक्षाने परतले..." उत्तर देताना ती सर्वांकडे पाहते मग तिला कळते की आपला खुलासा वाया चालला आहे. जान्हवीकडे पाहते तर ती तिला चूप बसायची खूण करीत आहे, पण शरयूला त्यातील काहीच कळत नाही.

आता आजी बोलत आहेत...आणि शरयू रडत ऐकत आहे.

देवी....

जान्हवी आणि आपटे यांचा काय संबंध असा एक प्रश्न तू विचारला आहेस. त्याचा खुलासा असा की, अनिल आपटे या व्यक्तीशी जान्हवीचे लग्न ठरलेले असते. ते जान्हवीच्या आईने ठरविलेले. वडिलांच्या ऑपरेशनला लागणारे पैसे आणि भाऊ पिंट्याला नोकरी यांच्या मोबदल्यात जान्हवीपेक्षा वयाने दुप्पट असणारा हा गृहस्थ तिच्या आईला अगोदरच पैशे देवून आपल्या बाजूने वळवतो. पण पुढे श्री सोबत ओळख प्रेम झाल्यावर तिच्या मागची आपटेची कटकट संपुष्टात येते.

तरीही कथानकात त्याला डोकेदुखी निर्माण करण्यासाठी लेखिका आणि दिग्दर्शक यानी जागा दिल्याचे दिसतेच.

आपटे हा जान्हवीचा पूर्वाश्रमीचा नवरा आहे...पण एका अपघातात तिची स्मृती गेली आणि तीच्या वडीलांच्या पायाला दुखापत झाली..आणि आई व भावाच्या डोक्याला मार लागला.....
आता त्यामुळे तिला मागचे काहीच आठवत नाहीये आणि श्री ने फूस लाऊन मीच तुला कसा लायक आहे असे पटवून दिल्यामुळे ती त्याच्या घरी येऊन राहतीये....

लवकरच या सगळ्याचा पडदा उलगडणार आहे

मामा वेलकम. अपडेट्स मस्त. शरयूला भाजी आणायला पाठवलेच शेवटी, श्रीच्या बाबांनी अमेरिकेत बहुतेक दुसरे लग्न केले आणि त्यांना मुलगी आहे असं आजच्या भागावरून वाटते.

मामा, अपडेट्स द्यायचे सोडू नका, प्लीज. तुमच्या अपडेट्स साठी इथे येतो आम्ही... आणि इतरही धम्माल वाचायला मिळते.
केकसाठी येऊन आयसिंगही मिळतं तसं. नुस्तं आयसिंग कशावर घालायचं म्हणे?
केक हवाच.

दाद...

धन्यवाद....मी मालिकेचा वृत्तांत देत आहेच. शनिवार व सोमवारी मी कर्नाटकातील हुबळी इथे होतो आणि ज्यांच्या घरी गेलो होतो तिथे झी मराठी चॅनेल नव्हते....त्यामुळे संबंधित वृत्तांत देता आले नाहीत. मी देखील इकडे कोल्हापूरला परतल्यानंतर श्री.बेफिकीर आणि अन्यांचे प्रतिसाद वाचून एकूण काय घडले ते जाणून घेतले.

मला कालचा भाग पाहून अत्यंत गंभीर प्रश्न पडलाय.

आईआज्जी ने या सर्व बायांना घरात का बसवून ठेवलंय? बेबीला परत आणून, डिव्होर्स घ्यायला लावून दुसरे लग्न का करून दिले नाही? श्री च्या आईच्या बाबतीतही तेच. आई आज्जी इतकं मोठं प्रस्थ असल्यानी सावत्र वडलांनी श्रीला त्रास देणं तसं अशक्यच आहे. शरयूला सुद्धा नवर्‍यापासून वेगळं केलं तर तिच्या दुसर्‍या लग्नाचे प्रयत्न का केले नाहीत?

दक्षिणा point आहे तुझ्या मुद्द्यात. अग दुसरं लग्न सोड पण काही कामाला वगैरे पण नाही लावलं, बेबी आत्या त्यांच्या बिझनेसमध्ये मदत करू शकली असती, बरं ह्या बायकांना कुठलाही छंद वगैरे दाखवला नाहीये, विणकाम, भरतकाम, वाचन काहीच नाही, तेच तेच किचन आणि श्री श्री करून मेंटल फटिग कसा येत नाही त्यांना?

फटाफटा सगळ्यांची लग्नं करून टाकली तर महाभयंकर फाटे फुटतील सिरियलीला आणि कथानक दिग्दर्शकाच्या आवाक्यातच राहायचे नाही. कोणीही काय वाट्टेल ते बकायला लागेल डायलॉगच्या जागी! इंदू वहिनी ठार वेड्या होतील. शरयू नृत्य करू लागेल. श्रीची आई किंकर्तव्यमूढ होईल. श्री पुन्हा घर सोडून जाईल. जान्हवी ऑफीसमधून परतच यायची नाही. बेबी अथक परिश्रम घेऊन दुसरे लग्न मोडून परत येईल. अशोकरावांना एका एपिसोडचे अपडेट्स लिहायला एकेक आठवडा लागू लागेल.

ह्या अश्या सर्व भित्या असल्याने आई आजी सगळ्या बायकांना घरातच बसवून ठेवत असाव्यात.

आता शरयूचा नवरा श्री ४-५ वर्षांचा असल्यापासून घराबाहेर असेल तर ती बिचारी शरयू गेली २३ वर्ष एकटी आहे? Uhoh आईआज्जी सैतान आहे का? तिला (शरयूला) माणूस म्हणून गरजा किंवा भावना असतील हे कळत नाही क? Uhoh

२३ वर्षे दारू पिऊन प्रओ चे तब्येतीचे काहीच नुकसान नाही? << कढई भरून पालेभाजी खाल्ली होती ना? त्यामुळे... Happy

आणि २३ वर्ष चोरून भेटतेय तरी घरातल्या कुणालाच सुगावा लागला नाही?
भाजीचा खर्च पहिल्यापासूनच अवास्तव आहे की नुकताच वाढलाय? Uhoh
घरात भाजीचे काम एकच एक शरयू करत असेल तर तिला मोनोटोनस कामाचा नॉशिया कसा नै आला?

प्रओ ४२ वर्षांचा आहे १९ व्या वर्षी लग्न झाले होते वाटते
>>>
म्हणुनच घारगे आणि कढईभर भाजी खाऊ घालताना रोहिणी हंट्टंगडींचे केस काळे कुळकुळीत दाखवलेत.
प्रओ चे वय ४२ वर्षे जो सगळ्यात लहान आहे तर मोठ्या मुलाचे म्हणजे श्रीच्या बांबाचे वय किती बरं असेल आणि त्याहुन उप्पर आईआज्जींचे वय किती असेल?? किती चिरतरुण दिसतात त्या. Uhoh
बेबी २८ वर्षांपुर्वी पण तश्शीच होती आणि आताही तश्शीच आहे फरक काय तो वेण्याचे केस झडल्याने मोकळे सोडते बाकी फ्लॉलेस ब्युटी.

मांडा त्रैराशिक
प्रओचे वय श्री ४ वर्षाचा असताना २३ होते (१९व्या वर्षी लग्न झाले हे ग्रूहित धरुन) तर श्री २८ वर्षाचा असताना जान्हवीचे वय किती???? :डोमा :

Pages