होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या भागातला खटकलेला प्रसंग...
श्री घरी आल्यानंतर दार बंद करून वरची खिट्टी लावताना दाखवला आहे. आणि नंतर सगळेच जण हॉलमध्ये अल्बम बघत असतात. त्यावेळ शरयू येताना दाखवली आहे. तिला दरवाजा कुणी उघडला....????
का ती आता खिडकीमधून यायला शिकली आहे.

क्योंकिसाभीकबथीच्या शेवटी मालिकेतील 'बा'चे वय १४७ वर्षे होते. इतक्या टाइम लीप्स आणि जनरेशन लीप्स त्या मालिकेने घेतल्या.

त्यावेळ शरयू येताना दाखवली आहे. तिला दरवाजा कुणी उघडला....????
<<<

मालिकेच्या निर्मात्यांनी तुमचा अमानवीय धागा वाचलेला दिसत आहे.

क्योंकिसाभीकबथीच्या शेवटी मालिकेतील 'बा'चे वय १४७ वर्षे होते<<<

१४७ म्हणजे काही विशेष नाही. महाभारताचे युद्ध झाले तेव्हा भीष्मांचे वय २१४ होते. कर्णच मुळी ७२ वर्षाचा होता तर?

क्योंकिसाभीकबथीच्या शेवटी मालिकेतील 'बा'चे वय १४७ वर्षे होते. इतक्या टाइम लीप्स आणि जनरेशन लीप्स त्या मालिकेने घेतल्या.>>> सुरूवातीपासून शेवटपर्यंत मी ती मालिका पाहिली. अधले मधले एपिसोड चुकले असतील तरी ट्रॅक कायम ठेवला. तीन जनरेशन लीप्स घेतल्या होत्या. त्यातल्या तिसर्या जनरेशनमधले लग्नाचे आणि डिव्होर्सचे फंडे अचाट होते. भरीसभर त्यातच त्यांनी तुलसी आणि मीहीरचं पण पुन्हा एकदा लग्न लावलं होतं.

पण तरी मालिका आवडती आहे. तिने एवढे आद्य युगप्रवर्तक काम करून ठेवले आहे की आजही इतर मालिका तिचीच कॉपी करत असतात.

पण तरी मालिका आवडती आहे. तिने एवढे
आद्य युगप्रवर्तक काम करून ठेवले आहे
की आजही इतर मालिका तिचीच
कॉपी करत असतात.>>>>>> अगदी अगदी

मेलेला माणूस जीवंत करणे , कुठ्ची नाती कुठे जोड़ने , मराठी पात्र दाखवायचे असेल तर फ़क्त ' आई' म्हणणे( ते ही भयाण आवाजात ) , मराठी खाद्य पदार्थ म्हणजे फक्त वडापाव अशी समजूत असणे
या महान परंपरा या मालिकेने सुरु केल्या Lol Proud

जाऊ द्या बरच अवांतर झाल

क्योंकि मालिकेत मराठी आई होती? मी दुसर्‍या जनरेशन लीपला टाटा केले.
क्योंकिबद्दल याआधीही लिहिले होते. पण ती मालिका डिझर्व करते. कोमामध्ये जाणे, स्मृतिभ्रंश, मेलेल्या माणसाचे प्रेत कधीही न सापडणे, तान्ह्या मुलांची अदलाबदल झालेली असणे, ते वीसेक वर्षांनी कळणे, डीएनए टेस्ट, प्लास्टिक सर्जरी, जय श्रीकृष्ण, टेपरेकॉर्डर वापरून दुष्ट लोकांचे पितळ उघडे पाडणे.

क्योंकि मालिकेत मराठी आई होती?>>>> मयेकर त्या अरारा पात्राची सून मराठी दाखवली होती . हुसेन या अभिनेत्याची पत्नी टू बी स्पेसिफिक
एका प्रसंगात आपल्या मालिकेतील 'आईशी ' बोलताना आई चा भयानक उच्चार केला होता

मयेकर, शिवाय या भावाची बायको कोमात गेली म्हणून त्याचं लग्न दुसर्‍याच भावाच्या एक्स बायकोसोबत लावणे, याची बायको मेली म्हनून त्याचं लग्न अजून एका कुनाच्यातरी बायकोसोबत लावणे, "बिझनेस मीटींग" म्हणून सुटाबुटात फिरणे, करोंडों की जायदाद एका कागदावर लिहून देणे, कुणाचंही मूल आपलं म्हणून वाढवल्यावर आयुष्ब्भर त्याला आपलंच पोर म्हणत बसणे (मग ते खरे आईवडील विसरून्च जातात!) नवरे बदलणे, बायका बदलणे, मधेच मरणे, मघेच परत येणे, याद्दाश्त जाणे असलं सॉलिड महाभारत होतं.

गेले ते दिन गेले!!!!

आता श्रीच्या बाबांना ’सिमरन’ नामक उध्दट, अमेरिकन पंजाबी मुलगी असणार. ’सिमरन’ ची आई मात्र श्रीच्या बाबांबरोबर राहात नसणार. मग सिमरनचं भारतात येऊन भारतीय संस्कृतीचं शिक्षण, मराठीकरण वगैरे. आईआजी तिचा उध्दटपणा घालवून तिच्यावर संस्कार करणार. तिचा पूर्ण ट्रॅक- बॉयफ्रेन्ड, लग्न, आईआजीची लाडकी कशी होते ते सगळं. श्रीच्या बाबांना श्रीची रडकी आई (इतकं सगळं झाल्यावरही) ’पती परमेश्वर’ म्हणून डोक्यावर घेणार. पण तेव्हढयात सिमरनची माता परत येणार.
फुलटू हिंदी सिरीयलच्या वाटेने जाणार आहे ही सिरीयल. आता ’गोखले’ नाव बदलून ’गर्ग’ किंवा ’गुप्ता’ करा.

परत येणे, याद्दाश्त जाणे असलं सॉलिड महाभारत होतं. >>>+++ १
महाभारत होतं>>> Lol

श्रीच्या बाबांना श्रीची रडकी आई (इतकं सगळं झाल्यावरही) ’पती परमेश्वर’ म्हणून डोक्यावर घेणार. >>>भारतीय संस्कृती ना आपली मग .अस केल तरच ती टिकून राहणार अस वाटत या शिरेलीवाल्याना. Angry Angry

बुधवार दि. २५ फेब्रुवारी २०१४ : अपडेट

~ केवळ आईआजी आणि शरयू यांच्यातील प्रदीर्घ संवाद म्हणजेच आजचा वृत्तांत होय. दिवाणखान्यात आजी आणि श्री कोचवर बसले आहेत तर अन्य सर्व स्त्रिया त्यांच्यासमोर उभ्या आहेत. शरयू स्वतःला अपराधी समजून आजीसमोर आपले नको असलेले स्पष्टीकरण इतक्या प्रशस्तपणे देत आहे की ना तिला आजी ना श्री थांबवू शकत आहेत. श्री तिला "छोटी आई, तू जरा बोलायचे थांब...." तरीदेखील शरयू आपला मुद्दा...म्हणजे आजी या घरात किती महत्त्वाच्या आहेत आणि त्या आहेत म्हणून आम्ही आहोत....असली काहीबाही वाक्ये एकापाठोपाठ एक अशी सर्वांच्या कानावर घालीत आहे. नर्मदा, इंदू, बेबी, सरूमावशी आदी फक्त एकदा आजीकडे व नंतर शरयूकडे पाहात वेळ घालवीत आहेत....या ठिकाणी अर्थात जान्हवीही आहेच, पण तिला तर २२ मिनिटांच्या एपिसोडमध्ये एकही वाक्य आज दिले गेले नाही....फक्त तिने करुणेने शरयूकडे पाहात राहणे, एवढेच बाकी होते.

आजीनी अखेर शरयूला थांबविले आणि "तू आज लक्ष्मीकांतबरोबर फिरताना पाहिले आहे...." या वाक्यावर प्रथम शरयू नकार देते, पण नंतर श्री देखील तिच्याजवळ जाऊन तिला सागतो की 'छोटी आई, मी स्वतः आज तसे पाहिले आहे...". इथे शरयूचे अवसान गळते आणि ती कबूल करते. आजी तिला स्वतःच्या मुलासंदर्भातील धोके पुन्हा सांगते आणि तिला हुकूम सोडते की उद्यापासून तिने घराबाहेर पडायचे नाही...भाजी आणायला जायचे नाही. या उपरही तिने ऐकले नाही आणि ती घराबाहेर पडलीच तर तिने परत आत येऊ नये. हा शरयूसाठी एक धक्काच असल्याने ते रडत आजीकडे माफीची याचना करते...अशी अट घालू नका म्हणून विनंतीही करते; पण आजी खंबीर आहेत. त्या ऐकत नाही. आपले म्हणणे सांगितले आहे असे म्हणत त्या तिथून निघून आपल्या खोलीकडे वळतात.

या प्रसंगाशिवाय बाकी काही विशेष नव्हते, तरीही त्या अनिल आपटेला पंधरावीस शेंगदाण्याच्या पुड्या फस्त केल्यामुळे बस स्टॉपवरच अ‍ॅसिडिटीचा त्रास सुरू होतो....तो पाण्यासाठी कासाविस होतो. ते पाहून ते अमेरिकेहून परतलेले गृहस्थ त्याला आपल्याकडील पाण्याची बाटली आणि अ‍ॅसिडिटीवर एक गोळीही देतात.

इकडे नव्या दिवसाची सुरूवात झाली आहे आणि चार स्त्रिया आजीच्या भूमिकेसंदर्भात चर्चा करीत आहेत.

कितीही झालं तरी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतातच या बायका...सवय (प्रथा) आहे न टिपिकल संसारी बायकांची. शरयू जे वागतीये ते अत्यंत मूर्खपणाच आहे.

एकदा डोक्यावर टेंगुळ घेऊन घरी आली, दुसऱ्यांदा अजून मार खाऊन आली, तरी पोट भरल नसावं, म्हणून परत काय ते भोपळ्याचे घारगे का काहीतरी खायचे डोहाळे सुरु झाले बयेला. मी तिथे असते तर तिलाही घराबाहेर हाकलली असती. म्हणाले असते,"जा, बाई जा...दिल्या दारुड्या सवे तू सुखी राहा....."

तो दारुडा आज घरातून बाहेर असताना तिला इतकं मारतो तर घरात आल्यावर तिची हाडं देखील जागेवर राहणार नाहीत, हे तिला कस कळत नाही?? आणि त्याहून आश्चर्य म्हणजे जान्हवी....तिला कसा काय पुळका येऊ शकतो त्या दारुड्या मारकुट्याचा??? ती का मदत करते शरयुला त्याला भेटण्यासाठी? जान्हवी तरी समजावेल शरयुला, अशी आशा होती, पण ती.....

जाऊ देत..

तरीही त्या अनिल आपटेला पंधरावीस शेंगदाण्याच्या पुड्या फस्त केल्यामुळे बस स्टॉपवरच अ‍ॅसिडिटीचा त्रास सुरू होतो....तो पाण्यासाठी कासाविस होतो. ते पाहून ते अमेरिकेहून परतलेले गृहस्थ त्याला आपल्याकडील पाण्याची बाटली आणि अ‍ॅसिडिटीवर एक गोळीही देतात.>>>> त्या आपटेला कशाला आणतात मध्ये काही कळत नाही....

कालच शरयुच्या आणि तिच्या नवर्‍याच्या वयाची चर्चा झाली आणि लगेच आजच्या भागात आईआजी म्हणते, "तू २५ वर्ष ओळखतेस त्याला आणि मी ४७ वर्षे"

२०-२५ वर्षांपुर्वी घराबाहेर काढला तर ती ४७-२०=२७ वर्षे च ओळखणार ना त्याला कि आजी सुद्धा बाहेर भेटत होती?

मामा छान लिहिलेत. एकंदरीत आजचा भाग खूपच बोअर झालेला दिसतोय. उद्या महाशिवरात्र आहे. गोखल्यांच्या बायका किचनमध्ये विविध उपासाचे पदार्थ करताना दाखवतील.

एक शंका: जान्हवीने घारगे करायला सांगितले असतात म्ह्णून शरयू भोपळा आणायच्या निमित्ताने बाहेर जाऊ शकते मग जान्हवी ऑफिसमधून आल्या आल्या घारगेच खाते ना? खुसखुशीत झालाय म्हणते वगैरे. शरयू तर आली नसते अजून मग तेव्हा भोपळा कुठुन आला घरात? Proud

लीभा आणि प्रओ यांची टेंगूळ मारामारी दाखवली ...त्यात प्रओ भिंतीवर डोकं आपटताना दाखवला..
त्यानी लीभाला मारलं नाही काही....एकटं राहण्याचा आणि भाजीब्रेक मधे बायकोला भेटण्याचा आता त्याला कंटाळा आलाय.
म्हणजे आता रोह वर खापर फोडायचा कार्यक्रम असावा.

एक शंका: जान्हवीने घारगे करायला सांगितले असतात म्ह्णून शरयू भोपळा आणायच्या निमित्ताने बाहेर जाऊ शकते मग जान्हवी ऑफिसमधून आल्या आल्या घारगेच खाते ना? खुसखुशीत झालाय म्हणते वगैरे. शरयू तर आली नसते अजून मग तेव्हा भोपळा कुठुन आला घरात? >>>> नाही हं इंद्‌आत्या व सरू जातात पटकन रिक्षातून भोपळा आणायला, असे दाखविले आहे, उगीच बुवा तुम्ही लेखिकेचे खच्चीकरण करताय, आहे की तेवढी लॉजिकल ती!! भले मग इतर ९९% बाबतीत ती तशी लिहित का नसेना..

एक शंका: जान्हवीने घारगे करायला सांगितले असतात म्ह्णून शरयू भोपळा आणायच्या निमित्ताने बाहेर जाऊ शकते मग जान्हवी ऑफिसमधून आल्या आल्या घारगेच खाते ना? खुसखुशीत झालाय म्हणते वगैरे. शरयू तर आली नसते अजून मग तेव्हा भोपळा कुठुन आला घरात? >>>> नाही हं इंद्‌आत्या व सरू जातात पटकन रिक्षातून भोपळा आणायला, असे दाखविले आहे, उगीच बुवा तुम्ही लेखिकेचे खच्चीकरण करताय, आहे की तेवढी लॉजिकल ती!! भले मग इतर ९९% बाबतीत ती तशी लिहित का नसेना..

नाही नाही. शरयू (म्हणजे शरा) परय येईतो गोखल्यांच्या किचन गार्डनमध्ये लावलेल्या भोपळ्याच्या वेलाला छान भोपळा लागला. त्याचेच घारगे केले.

यावरून मला कल्पना सुचलीय. श्री ग्रीनपीस चळवळीत आहेच. तर त्याने घरातच भाज्या पिकवायची चळवळ हाती घ्यावी. सगळ्या बायका(गोखल्यांकडच्या, माबोवरच्या नव्हे) कामाला लागतील. शराला बाहेर जायला कारण राहणार नाही. ती झाडावेलींत मन रमवेल.

Pages