Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज श्री थ्री पीस सूट मधे
आज श्री थ्री पीस सूट मधे होता... (लग्नानन्तरची डेव्हलपमेन्ट)... आणि एक कर्कश्श बाई जान्हवी, पिन्ट्या आणि त्यांच्या बाबांशी बोलत होती... मग शरयूला भाजी आणायला एकमताने प्रतिबंध केला गेला...
Mama kuthet?
Mama kuthet?
मामा कुठे आहात? आजची
मामा कुठे आहात?
आजची थोडक्यात झलक अशी की
भोपळ्याचे घारगे यावरून आजी मुलाच्या जुन्या आठवणीत रमल्या आहेत आणि त्या घारगे करणार आहेत.
इकडे जान्हवी माहेरी आली आहे आणि पिंट्याच्या बिझनेस करण्यावरून चर्चा चालू आहे. जान्हवीने अजून श्री घरी परत आलाय हे सांगितलेच नव्हते त्यांना त्यामुळे पिंट्या आणी सगळ्यांना असंच वाटतंय की श्री गोखले उद्योगातून बाहेर पडेल आणि त्याला मदत करेल. शेवटी ती सांगते की घरातले सगळे ताणतणाव संपले आहेत आणि श्री घरी आलाय पण अॅज युज्वल तिची आई तणतण करते आहे श्री बिजनेस मधे येणार नाही म्हणून. जान्हवी मग पिंट्याला बाहेर घेऊन बोलायला जाते. पिंट्या एकदम घायकुतीला आला आहे. त्याला लवकर काय तो निर्णय हवा आहे. पण जान्हवी त्याला आश्वासन देतेय की मी त्याच्याशी बोलीन पण अंतिम निर्णय श्रीचाच असेल.
दुसरीकडे आज श्री शरयू आणि काकाला एकत्र फिरताना (हे त्याला माहित नाही की हा काका आहे) रिक्षात बसताना पाहतो. त्याला धक्का बसतो.
गोकुळ मधे सगळ्या बायका नेहेमीप्रमाणे शरयू च्या भाजी आणण्यावरून काथ्याकुट करत आहेत. शेवटी आजी असा निर्णय देतात की शरयूने आता त्यांना न विचारता घराबाहेर पडायचेही नाही त्यामुळे भाजी आणणे हे कामही तिच्याकडून काढून घेतले जाईल.
भाजीवाली हसायला लागली, विचारत
भाजीवाली हसायला लागली, विचारत होती काय आठवले म्हणून? <<<
चावट झाल्यात हल्ली भाजीवाल्याही!>>>>>:हहगलो:
काय हे! भाजीवालीला तसले काही वाटले नसेल.:फिदी:
तिला काय सान्गणार्? << सांगायचे 'बेबीआत्या' आठवली>>>> भाजीवालीला आधी बेबीआत्या कोण ते सान्गावे नाही लागले म्हणजे झाले.:हाहा:
मुग्धा मला किती मोदक देणार होतीस? देणार असशील तर जरा खवा आणी काजूचे मोदक पाठव टोपलीभर.:फिदी:( थोडे तुला पण ठेव)
हे काहीच नाही. परवा एका
हे काहीच नाही. परवा एका माबोकरांना फोन केला. पलीकडून उत्तर आले : ते भाजी आणायला गेलेत. तरी मला हसायला आले.
सध्या नया है वह आणी भाजी
मयेकर
गोकुळातल्या बायका ग्रेट आहेत.
गोकुळातल्या बायका ग्रेट आहेत. ती शरयू अली नाही म्हणून काळजी वाटते म्हणतात. आणि एकीकडे लाल भोपळा आणून, घारगे करून खाऊनही टाकतात
आता एक पाय बेंमाकेमध्ये
आता एक पाय बेंमाकेमध्ये असलेल्या इंदू वहिनी सर्वांसमोर जान्हवीचे दोन्ही दंड धरून कुजबुजत्या लाडीक स्वरात विचारतील.
"काय गं जान्हवी? घारगे का खावेसे वाटतायत?"
त्यावर त्या प्रश्नातली खरी गोम कळल्यावर एक पूर्ण श्वास घेऊन विस्फारलेल्या डोळ्यांनी जान्हवी सर्वांकडे बघेल. त्याचवेळी कॅमेरा प्रत्येकीच्या चेहर्यावरून फिरेल व प्रत्येकीच्या चेहर्यावर कोणत्या उत्तराची अपेक्षा आहे ते ठळकपणे दाखवेल. शेवटी तो कॅमेरा पुन्हा जान्हवीच्या चेहर्यावर येऊन स्थिरावेल आणि मग जान्हवी श्वास सोडेल व त्याचवेळी तिच्या तोंडातून उत्तर बाहेर पडेलः
"गेल्या महिन्यात तर लग्न झालंय बावळटींनो, काही खावसं वाटूच नये का नुसतं आपलं माणसाला?"
मामा कुठे आहात तुम्ही
मामा कुठे आहात तुम्ही ????????????
प्लीज लवकर या.... वाट बघते आहे मी......
मामांसाठी भोपळ्याचे घारगे
मामांसाठी भोपळ्याचे घारगे केलेत की काय?
बहुतेक ते जान्हवीच्या घरी
बहुतेक ते जान्हवीच्या घरी भोपळ्याचे घारगे खायला गेले आहेत असे वाटते......:हहगलो:
मामा वास्तुशान्तीचे जेवण चापत
मामा वास्तुशान्तीचे जेवण चापत आहेत.:स्मित: मामा आमच्यासाठी बेळगावचा कुन्दा पण घेऊन या. ( बेळगावची कुन्दा नव्हे.:फिदी:) आणी येताना पुढे कारवार करुन या, तिथली परवानेगी घेऊन फोटु पण टाका.:फिदी:
बेळगावची कुंदा आणली तरी चालेल
बेळगावची कुंदा आणली तरी चालेल हो अशोकराव.
नमस्कार मंडळी.... मी काल
नमस्कार मंडळी....
मी काल रात्री आलो परत कोल्हापूरला....धारवाड, हुबळी दौरा करून तीन दिवसांचा. तिकडे ज्यांच्या घरी गेलो होतो तिथे वास्तुशांतीचा कार्यक्रम आणि पाहुण्यांची गर्दी झाल्याने "जान्हवी-श्री" मालिका बंदच.....त्यामुळे शनिवार व सोमवार काय घडले याचा अंदाज इथे श्री.बेफिकीर यांच्या पोस्टवरून घेता आला.....वाटले, हुकला ते बरेच झाले.
आजपासून वृत्तांत देता येईल.....[ अर्थात आता या मालिकेच्या वृत्तांत्तामध्ये कुणाला गंभीरतेने काही स्वारस्य उरले आहे असे दिसत नाही...इतकी ही मालिका घसरली आहे हे जाणवते. ]
वाटले, हुकला ते बरेच झाले.<<<
वाटले, हुकला ते बरेच झाले.<<<
आजपासून वृत्तांत देता येईल.....[ अर्थात आता या मालिकेच्या वृत्तांत्तामध्ये कुणाला गंभीरतेने काही स्वारस्य उरले आहे असे दिसत नाही...इतकी ही मालिका घसरली आहे हे जाणवते. ]<<<
अशोकराव, वय, ज्ञान, अनुभव, वाचन, दुनियादारी आणि सर्वच बाबतीत आपण माझ्यापेक्षा खूपच वरिष्ठ आहात. मूळ निर्मीती कसदार असली तरच तिच्यावर, तिच्या विडंबनांवर, तिच्या खिल्लीवरही लोकांचे मन जडू शकते. मालिकेपेक्षा तुमचे अपडेट्स एक कलाकृती म्हणून जरी फारसे श्रेष्ठ नसले (म्हणजे ते तसे असावेत असा तुमचा हेतूच नसल्याने ते एक कलाकृती म्हणून श्रेष्ठ नसतात, तुम्ही ठरवलेत तर मालिकेपेक्षा कितीतरी सरस कलाकृती तुम्ही स्वतःच निर्माण करू शकता हे आम्ही सर्वजण जाणतोच), तरीही ते अपडेट्स तुम्ही देता म्हणूनच सगळेजण येथे येतात. अनायासे त्यासोबतच मी किंवा अन्य काहींनी दिलेले मजेशीर अभिप्रायही त्यांना एन्जॉय करता येतात.
तेव्हा, तुमचे लेखन कृपया सुरूच ठेवावेत ही विनंती करत आहे.
-'बेफिकीर'!
श्री.बेफिकीर.... अपडेटबाबत
श्री.बेफिकीर....
अपडेटबाबत तुमचा मुद्दा मला पटलेला आहेच.....शिवाय या धाग्यावर प्रेम करणारेही असंख्य आहेत हेही मी जाणतो. तुमच्या लिखाणशैलीला मिळत असलेले प्रतिसाद ह्या धाग्याला आणखीन् लोकप्रिय करत आहे हे मी टिपले आहे. त्याला कारण तुम्हीही मालिका न चुकता पाहात आहातच [आता जरी कथानक चाचपडत राहिले असले तरी...]
बाकी तुमच्या "....मूळ निर्मीती कसदार असली तरच तिच्यावर, तिच्या विडंबनांवर, तिच्या खिल्लीवरही लोकांचे मन जडू शकते...." ~ या वाक्यामुळे मला आचार्य अत्रे यांच्या "मी कसा झालो" पुस्तकातील "मी विडंबनकार कसा झालो" या लेखाची प्रकर्षाने आठवण झाली. त्यात अत्रे एका ठिकाणी म्हणतात, "मूळ कविता आणि कवी प्रतिष्ठित आणि लोकप्रिय असतील, त्यांच्या कविता माहीत असतील तरच त्यांचे विडंबन समाजप्रिय होऊ शकते...".
मामा तुमचे अपडेट्स हवेच, त्या
मामा तुमचे अपडेट्स हवेच, त्या मालिकेचे काहीही होवो. अंजली_१२ अपडेट्ससाठी धन्यवाद.
बेफि जी अगदी सहमत. मामा
बेफि जी अगदी सहमत. मामा तुम्ही आणि बेफी जी दोघान्चे लेखन हे आम्हि सगळे एन्जोय करतो. ते क्रुपया बन्द करु नये.
मूळ मालिका पूर्ण गन्ड्ल्ये अस मला तरी अजुन वाटत नाहिये.
मालिका संपली तरी रोजच्यारोज
मालिका संपली तरी रोजच्यारोज अपडेट्स आलेच पाहिजेत म्हणावं!
मला कोणितरि मराठी टायपिन्ग
मला कोणितरि मराठी टायपिन्ग शिकवा प्लिज
आता काय शिकायचे? आणी शिकवायचे
आता काय शिकायचे? आणी शिकवायचे ?:अओ: धर तो कीबोर्ड आणी बडव त्याला.:खोखो:
(तू लहान असताना मी हेच करायचे
(तू लहान असताना मी हेच करायचे - सारखे वाटत आहे हे)
रश्मी...."की बोर्ड बडव..."
रश्मी...."की बोर्ड बडव..." ग्रेट ! एकदम चित्रच नजरेसमोर आले...... वै तो बोर्ड बडवित आहे.
@ वै....अगं, खरं सांगायचं झाल्यास मी देखील इथे मायबोलीचा सदस्य झाल्यावरच मराठी टंकलेखन शिकलो आहे. इंग्रजी येत होते पूर्वीपासून त्याचा उपयोग झाला. तसे सोपे वाटते मराठी टायपिंग.
(No subject)
मी गुगलचे मराठी वापरते, ते
मी गुगलचे मराठी वापरते, ते टाकलंय आमच्या संगणकात, ते मला सोपे जाते.
वै तुझे मराठी टंकलेखन
वै तुझे मराठी टंकलेखन चांगले आहे की. तेच करत रहा म्हणजे बडवायला नको....
अन्जू.... "गुगलचे मराठी ?"
अन्जू....
"गुगलचे मराठी ?" हा काय प्रकार ? मी बराहा प्रणाली वापरतो....त्याबद्दलच तू लिहिले आहेस का ? मला सोपे जाते ही पद्धती....आय मीन 'बराहा'.
अहो गोगा तेच म्हणतेय मी की
अहो गोगा तेच म्हणतेय मी की बडवायचा म्हणजे दुसर्यान्च्या पोस्टी बघुन आपणही सतत लिहीत्/टायपत रहायचे म्हणजे आपोआप सवय होईल.
मामा, 'गुगल इनपुट टूल्स'
मामा, 'गुगल इनपुट टूल्स' म्हणतात त्याला, ते डाऊनलोड करून install करायला लागतं, ते माझ्या नवरोबाने केले आहे मला आयते मिळाले आहे.
Pages