होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री आणि जान्हवी दोन्ही अगदीच unrealistic characters आहेत. एकवेळ श्रीच्या आयांसारख्या बायका असतात हे पटेल मला पण जान्हवीसारखं कोणी नसतं.

एकवेळ श्रीच्या आयांसारख्या बायका असतात हे पटेल मला पण जान्हवीसारखं कोणी नसतं.>>>++++१ अति सद्गुणी, सोशिक आदर्श ई. ई . दाखण्याच्या हट्टापायी त्या व्यक्तीच्या भूमिकेतील आत्माच हरवून बसतो आपण हे कोणाच्याच कस लक्षात येत नाही . Sad

नाहीतर काय. म्हणजे ती जान्हवी सासवांसाठी नाश्ता करते, स्वयंपाक करते, श्रीच्या फ्लॅटवर जाऊन सकाळ संध्याकाळ त्याच्यासाठी साग्रसंगीत स्वयंपाक करते, त्याच्या डोक्याला तेल लावून देते, घरी या बायकांच्या कटकटी सोडवते, त्यांच्यासाठी प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालवते, शिवाय दिवसभर नोकरी करते, त्यात त्या कामचुकार मैत्रिणीचं कामही हीच करते म्हणजे डबल काम करते. शिवाय इतकी चवळीच्या शेंगेसारखी आणि ताजीतवानी दिसते म्हणजे जिममध्येही जात असणार रोज. एक दिवसाआड पार्लरमधेही जात असावी.
शक्य आहे का हे मुलीला एका दिवसात?
म्हणजे मग एखादी मुलगी एखादया दिवशी बिचारी हपिसातून दमूनभागून खूप उशीरा आली घरी आणि म्हणाली ’आज काही माझ्यात त्राण नाहीये स्वयंपाकघरात जाण्याचं, डोकं पण ठणकतंय दिवसभर आकडेमोड करुन, आपण बाहेरुन मागवूया पावभाजी’ आणि ही गोष्ट नंतर नवऱ्याकडून सासूला फोनवर जर कळली तर ती म्हणायला मोकळी की ती जान्हवी बघा कशी भराभर काम करते. माझ्याच मुलाच्या नशीबी आळशी बायको आलीय- त्याला धड जेवायलासुध्दा घालत नाही ही म्हणजे काय म्हणावं.

गुरुवार दि. २१ फेब्रुवारी २०१४ : अपडेट

~ कालच्या अंकावरून शरयूची भाजी खर्च तसेच वारंवार बाजाराला जाणे या मुद्द्यावरून आजी आणि बेबी उलटतपासणी घेत आहेत. शरयू नेहमीप्रमाणे गोंधळलेल्या आवाजात तितकीचे गोंधळलेली उत्तरे देऊन आजींचा राग वाढवत आहे तर बेबी शरयूच्या अंगावर मोठ्याने ओरडत आहे. शरयूला तो ताण असह्य होतो आणि "माझ्यावर असे ओरडू नका प्लीज..." म्हणते. आजी बेबीला थांबवितात, "तू केवळ भाजी याच विषयावर शरयूला विचार. नसेल तर तुझ्या खोलीत जाऊन बस..." बेबी चूप बसते पण तिची नजर शरयूकडेच....जी आपला पूर्ण चेहरा या दोघींनाही दाखवित नाही. आजी आणि बेबी बर्‍याच चर्चेनंतर निर्णय घेतात की, "आजपासून शरयूने भाजीबाजाराला जाणे बंद... इथून पुढे असा एक भाजीवाला गाठायचा जो आपल्याला इथे येऊन आवश्यक त्या भाज्या पोच करेल..." आजीना हा प्रस्ताव चांगला वाटतो....पण शरयूला ते पटत नाही...."मी बाजाराला जाणार, मला जाऊ द्या. मी स्वस्त भाज्या आणते.." असा अकारण वाटणारी विनंती करते, रडलेल्या स्वरात....तो स्वर देताना ती नकळत आपला पूर्ण आजीकडे करते....तो चेहरा पाहून आजी चमकतात कारण शरयूच्या कपाळाच्या डाव्या बाजूला एका माराची खूण असून तिला तिथे टेंगूळ आले आहे. आजी त्याबद्दल खोदूनखोदून शरयूला विचारतात तर ती "मला बसचा दांडा लागला..." असे कसेबसे म्हणते, त्यावर बेबी, 'अगं इथे खर्चात तर तू भाज्या रिक्षाने घेऊन आली आहेस...असा उल्लेख आहे...मग बसचा दांडा तुला कसा लागेल..." शरयूचा गोंधळ परत. ती काहीच न बोलता अपराधीपणाची भावना घेऊन समोर उभी आहे. श्री येतो....त्याला ही चर्चा माहीत नाही. पण त्या ठिकाणी तो प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असताना शरयू त्याला चहा आणून देते. तो घेत असताना त्याची नजर शरयूच्या कपाळाकडे जाते आणि तो काळजीने म्हणतो, "अगं छोटी आई, हे काय लागलंय तुला ?" शरयू काही उत्तर देत नाही....खाली मान घालते....आजी आपल्या खोलीकडे जात आहेत... जाताना मागे वळून न पाहता "श्री इथले तुझे काम झाले की माझ्या रूममध्ये ये. मला बोलायचे आहे तुझ्यशी" असा हुकूम देतात आणी जातात. तिथे हजर असलेले सारेच शरयूकडे पाहतात. श्री आजीच्या रूममध्ये जातो.तिथे त्या मग्न अवस्थेत बसल्या आहेत. त्याना काहीच सुचत नाही. श्री त्याना कारण विचारतो तर त्या म्हणतात "शरयू"....श्री चमकून त्यांच्या चेहर्‍याकडे पाहतो ते पाहून आईआजी त्याला शरयूच्या गेल्या कित्येक् दिवसापासूनच्या शंकास्पद हालचालींची माहिती देतात. श्री ला देखील हा एकप्रकारे शॉकच आहे.

विजया बॅन्क.....जान्हवी आणि गीता नेहमीच्या प्रफुल्लीत मुद्रेने काम करीत आहेत. मॅनेजर ड्युटीवर आले नसल्याने गीताची शेरेबाजी चालू आहे. जान्हवी तिला समजावून सांगत आहे. तेवढ्यात तिलाच फोन येतो आणि फोनवर असतात सदाशिवराव. त्याना तिच्याशी काही महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे. जान्हवी फोनवर सांगा असा आग्रह धरते, पण ते सांगत नाहीत, उलट तू काळजी करू नकोस. एकदोन दिवसात घरी ये म्हणजे समोरासमोर बोलू या..जान्हवी कबूल करते. थोड्यावेळाने श्री चा ऑफिसमधून फोन येतो....मग ही लैला आपल्या मजनू सोबत फोनवर छेडछाड करते. दोघांचाही चेष्टेचा स्वर एकमेकांच्या परिचयाचा आहे आणि घरात आता आनंदी वातावरण सुरू झाल्याची भावना यांच्या मनी असल्याने बोलण्यातही खेळकरपणा आला आहे. मजनू म्हणतो, "चल आज आपण डेटवर जाऊ....पिकनिक करू...." पण लैला हसत नकार देते..."डेटवर केव्हाही आपण जाऊ, पण तू आज घरी जा. कितीतरी दिवसांनी तू घरी आला आहेस त्यामुळे त्या स्त्रियांना तुझ्याशी बोलायला खूप आवडते...." श्री ला जान्हवीची ही भूमिका पटते..."तू किती समजूतदार आहेस, जान्हवी.." असे प्रेमाने तिला म्हणतो.

सहस्त्रबुद्धे यांच्या घरात सदाशिवराव आणि शशिकलाबाई यांच्यात जान्हवीला घरी बोलावण्यावरून वाद चालू आहे. पिंट्याच्या मदतीला जान्हवीने यायलाच हवे ही शशिकलाबाईची भूमिका सदाशिवरावाना मान्य नाही. पण तरीही त्याची विनंती म्हणून ते म्हणतात "मी जान्हवीला दोन दिवसात इकडे येऊन जावे असे सांगितले आहे." यालाही त्या मायलेकरांनी विरोध दर्शविला आहे.

गोकुळमध्ये मध्यरात्र झाली आहे आणि शरयू परत केस विस्कटलेल्या अवस्थेत रडत रडत घरात प्रवेश करीत आहे. दरवाजा जान्हवीने उघडला आहे....पण जान्हवीशी काही न बोलता त्याच अवस्थेत शरयू आपल्या खोलीत गेली आहे व दरवाजा बंद करून आत रडत बसली आहे.....जान्हवी बाहेरून तिला हाका मारत आहे.

मामा गुड नेहेमीप्रमाणे. बरं झाले शरयूच्या हातून भाजीचे काम काढून घेतले ते. जान्हवीने आता माहेरी जाऊन बाबांचे पायाचे नीट बघावे, काही पाय सुधारला नाही दुसरे कसले उपचार घेतात त्याने आणि दुसरी गोष्ट त्या पिंट्याकडे जरा लक्ष द्यावे.

भाजीवाल्याने घरी येऊन भाजी द्यावी हे कुणाच्याही डोक्यात येऊ नये म्हणजे मठ्ठपणाची कमाल मर्यादा झाली. च्यायला, महिना १२,००० हे जर भाजीवर खर्च करत असते तर सगळे भाजीवाले मंडई सोडून त्यांच्या दारात बसतील स्टॉल लाऊन...घ्या पाहिजे तेवढी...
लोकांना ...... बनवायचे म्हणजे किती याची एक मर्यादा आखण्याची वेळ आली आहे आता

अन्जू....

"...बरं झाले शरयूच्या हातून भाजीचे काम काढून घेतले ते....."

~ नाही, असे झालेले नाही अद्यापि. तसा एक प्रस्ताव आणला गेला आहे....त्याला शरयू विरोध दर्शवित आहे. कारण उघडच आहे.

आशुचॅंप.....

"...महिना १२,००० हे जर भाजीवर खर्च..." ~ इतका खर्च होतो का ? हाच सवाल हिशोब ठेवणार्‍या बेबीआत्याचा आहे. ना तिला ना नर्मदाबाईला....कुणालाच भाजीसाठी आठवड्याला तीन हजार आकडा पटत नाही, असेच त्यांच्या संवादातून दाखविले आहे....म्हणजेच शरयू हिशोबात काहीतरी घोटाळा करीत आहे हे उघडच....म्हणून घरी भाजीवाल्याला बोलाविण्याचा प्रस्ताव आला आहे.

तो मॅनेजर गीताला टोचून बोलला की मला फार राग येतो Angry ती सॉलीड गोड आहे Happy

काल बँकेत फोन-फोन असा खेळ चालू होता.

  1. स्मितूडीचा मॅनेजरला फोन
  2. जानूडीला बाबांचा फोन
  3. गीतूडीचा बॉय फ्रेंडला फोन

आशुचँप, मामा इतके डीटेल अपडेट्स देतात तरी तुमच्या नजरेतुन भाजीच्या बजेटची गोष्ट कशी काय सुटली? आणि जर तुम्ही स्वतः मालिका बघत असाल तर जेव्हापासुन मालिकेत शरयु, तिची भाजी आणि भाजीच बजेट हा विषय सुरु झालाय तेव्हापासुन घरातले सगळेच तिच्या मार्केटमधल्या वाढिव फेर्‍या आणि बजेटच्या विरोधात चर्चा करताना दाखवले आहेत. टिका करायची म्हणुन करु नका ब्वा.

जानूडीला श्रीड्याचा फोन राहिला की.>>>:हाहा: कालचा एपिसोड धमाल होता. शरयूने मस्त लहान मुलीसारखे भोकाड पसरले होते. हसून हसून वाट लागली.:फिदी:

वेदिका २१ तुझे जाम गालगुच्चे घेतले पाहिजे.:फिदी: तूने मेरी मनकी बात छीन ली.:फिदी: आमच्या इथे साबा च काय, साबु पण हिरीरीने पुढे येतील, माझ्या लेकराला ही भवानी ( फार सौम्य शब्द वापरलाय मी. :खोखो:) काही पण खायला देते म्हणजे काय?

वेदिका २१ तुझे जाम गालगुच्चे घेतले पाहिजे. तूने मेरी मनकी बात छीन ली<<<

मीही आजवर अनेकांच्या मूंहची बात छीनलेली आहे. पण लक्षात कोण घेतो?

Light 1

एक प्रामाणीक शंका - खरचं असं सिरिअलीतल्या गुणी सुना पाहून साबा आणि साबू टोमणे मारतात? मला असा काही अनुभव नाही. स्वतःचा पण किंवा ऐकीव पण.

हो मला असला खच्चुन अनूभव आहे. या क्षेत्रात मी अग्रेसर आहे.:खोखो:

ते सुनाचे सोड, पण एके दिवशी माझ्या साबुनी माझ्या साबाना चक्क रागवुन टोमणे मारले, की हो तू मोठी जानकी आहेस कुन्कुतली. ते ऐकुन मला समोर हसता पण येईना.( साबु भडकले असते ना):फिदी:

त्यात काय एवढ ज्यांच्या सासवा टोमणे मारतात त्या सुनांनी त्यांना मुरांब्याच्या बरणीचं, इलाभाटेंच, शोभनामावशीचे उदाहरण द्यावे लगेहाथ. काहीही सांभाळुन ठेवू नये तिथल्या तिथे परतफेड.

बाकी ऑन सिरियस नोट, व्यक्ति तितक्या प्रवृत्ती. त्यांच्यासाठी तो एकमेव विरंगुळा असेल तर आपोआपच कंपॅरिझन होणार पण सुना म्हणजे सुपरवुमन नाहित हे पण पटवून देणे आपल्या हातात आहे ना

शुभान्गी अग साबाना तसे सान्गता येईल ग, पण साबुन्चे काय? घरात नृत्याचे विवीध आयटेम सादर होतील त्याचे काय्?:अरेरे::अओ:

मग कठीणे सगळं.
आमच्याकडे साबा साबु असले की दुपारभर नुसते रिपिट टेलिकास्ट चालू असतात त्यांच्यासाठी घरात आणि आम्ही कुणीही नस्तो तेंव्हा. संध्याकाळी मात्र आमच्याकडे रिमोट काही काळाकरिता त्यामुळे नो कटकट. Happy

काल शरयू डोक्यात गेली Angry
काय ते लहान मुलांसारखं , 'बेबीवंस मला रागवू नका ना" Angry
हाईट तर आईआज्जी बेबीला म्हणते तू बोलू नकोस त्यावर शरयू जशी रडली ना. मी तिथल्य अतिथे मुस्काडात फोडली असती माझ्यासमोर कोणी असं काही केलं असतं तर.

Pages