Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामा काय? मस्करी केली जरा,
मामा काय? मस्करी केली जरा, एवढं मनावर घेऊ नका.
मी ? आणि मनावर घेणार ?.....
मी ? आणि मनावर घेणार ?..... असला विचारदेखील मनात आणू नकोस अन्जू. माझेही सारे मजेत चाललेले असते. जान्हवी सुखी राहाणार आहे ना ? बस्स...बाकी काही नकोय मला.
सोमवार दि. १७ फ़ेब्रुवारी २०१४
सोमवार दि. १७ फ़ेब्रुवारी २०१४ : अपडेट
~ हा भाग म्हणजे पूर्णतया जान्हवी आणि शरयू यांच्या "संसार सुखदु:ख" कहाणी कथनासाठीच राखीव ठेवला असल्याचे जाणवत होते. कार्यक्रमातील बराचसा भाग या दोघींवरच चित्रित झाला. काल जान्हवीवर फार खोलवर विचारत आहेस किंवा तुला मी उत्तर दिलेच पाहिजे असे नाही, असे रोखठोक बोलणारी शरयू आजही तिच भूमिका घेऊन बसली होती. जान्हवीने "पण छोटी आई, आजींसमोर तुम्ही माझे नाव घेतल्यामुळे माझी आता किती अवघड परिस्थिती तुम्ही करून टाकली आहे याचा विचार केला पाहिजे ना ?" या प्रश्नाला उत्तर म्हणून शरयू तिच्यासमोर हात जोडते, "माझी चूक झाली, सॉरी...जा तू आता..." पण जान्हवी विचार करते आपण आता इथून निघून जाण्यामुळे मूळ प्रश्न संपणार नाही उलट किचकट होईल. ती म्हणते, "सॉरी म्हणून हा प्रश्न सुटणार नाही, छोटी आई" "मग मी आता काय करू ?" असे शरयूने विचारताच जान्हवी उत्तरते, "माझ्याशी बोला. इतरवेळी तुमची इच्छा नसताना तुम्हाला मी बोलायला लावले नसते, मला आवडत नाही तो प्रकार. पण आईआजीना तुम्ही माझे नाव सांगितले म्हणजे तुम्ही मला तोफेच्या तोंडी दिलंय...मला सांगा मी काय उत्तर देवू आईआजींना? मी कसं सांगू त्याना की छोटी आई माझ्यासोबत नव्हत्या कारण त्या......" इथे अचानक जान्हवी बोलायचे थांबते, वाक्य पूर्ण करत नाही. शरयू तिच्याकडे अविश्वासाने पाहाते.
अचानक पसरलेल्या भीतिदायक शांततेमुळे जान्हवी स्वतःला सावरते आणि शरयूला म्हणते, "मला वाटतं... मी आता निघते येथून आता...." आणि उठते....त्यातूनही म्हणते, "छोटी आई, माझं लग्न होऊन ज्यावेळी मी या घरात आले होते ना, त्यावेळी फक्त तुमच्याशी मी मोकळेपणाने बोलले होते. तुमच्यावर विश्वास टाकला होता. सासू असूनही सासू असल्याची जाणीव नाही करून दिली तुम्ही कधी....आणि मग मी मैत्रिणच समजायला लागले तुम्हाला...त्याच समजुतीपोटी मी असे खूपसारे प्रश्न विचारले....सॉरी....समोरच्याला अडचणीत टाकण्यासारखे प्रश्न विचारता आले म्हणजे घट्ट मैत्री असते असं नसतं हे कळलंय मला. तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नाही आहेत हे समजून घेऊन ते प्रश्न न विचारणे म्हणजेही मैत्री असती ना छोटी आई ?" इतपत बोलून जान्हवी "मी निघते आता.." म्हणत उठते....आणि तोच शरयू तिचा हात पकडून रडते....तिला लहान मुलीप्रमाणे रडताना पाहून जान्हवीला तिचा कळवळा येतो आणि एखाद्या मोठ्या स्त्री प्रमाणे ती आपल्या छोट्या आईला कुशीत घेते....शरयू जान्हवीच्या खांद्यावर डोके ठेवून आपल्या अश्रूंना मुक्त वाट करून देते.
"जान्हवी मी तुझ्याबाबतीत खरेच चुकले आहे. मी तुझं नाव घ्यायला नको होते. पण आता खोटं बोलायला पाहिजेच म्हणून मला त्या क्षणी दुसरं काही सुचलंच नाही म्हणून तुझे नाव घेतले....खूप घाबरले होते." जान्हवी विचारते, "आता नाही ना घाबरत तुम्ही ?" शरयू उदासपणे म्हणते, "घाबरत काय किंवा न घाबरत काय... सारे आयुष्य असेच घाबरण्यातच गेले माझे. मनात सतात भीती आणि धास्ती बाळगायची...आणि चेहर्यावर मात्र सतत खोटे हसत राहायचे....मी किती नॉर्मल आहे मी किती आनंदी आहे हे बघा....असे नाटक करायचे. जान्हवी जीव जातो ग माझा या सार्या खेळामुळे !..." शरयू थांबत, जान्हवीकडे वळते, अश्रू पुसत म्हणते, "पण तुझ्याशी मात्र मी मोकळेपणाने बोलू शकते. कारण तू दोन्ही गोष्टींचा चूक किंवा बरोबर या दृष्टीने विचार न करता या दोन्ही गोष्टी तू सर्वांगाने पाहतेस, म्हणून मला खात्री वाटते तुझ्याबद्दल." जान्हवी या संधीचा फायदा घेऊन शरयूचे दोन्ही हात आपल्या हाती घेते आणि म्हणते, "मग बोला ना...मला खूप दिवसापासून माहीत आहे की तुम्हाला मला काहीतरी सांगायचे आहे. यात योग्य वेळ आहे की नाही याचा विचार करा....आणि बोला तुम्ही..." शरयू म्हणते, "मला ते कळत नाही जान्हवी...कळते ते हेच की मी तुझ्यासारखे चांगले नशीब घेऊन जन्माला नाही आले." आता शरयू कॉटवर बसते आणि जान्हवीला आपल्या माहेरची सारी कथा सुनावते. वडील माझ्या लहानपणीच गेल्यावर आईने कसेबसे मला मोठे केले....माझ्या आईला वाटायचं की मी खूप शिकावं, मोठं व्हावं... पण परिस्थितीमुळे ते झाले नाही....माझ्या आईने सुखी संसार कधी पाहिलाच नाही, त्यामुळे मी स्वप्नं पाहिली ती माझ्या संसाराचीच....माझ्यावर प्रेम करणारा नवरा मिळावा इतकंच मागत होते....पण तेही नशिबात नव्हतं माझ्या....ना नवरा मिळाला ना कुशीत खेळणारं एक बाळ...! हवं होतं गं जान्हवी, एक बाळ !" इथे शरयूला हुंदका फुटतो आणि जान्हवीही व्यथीत होऊन तिच्याकडे पाहात राहते.
हेच बोलणे याच विषयाला धरून पुढे चालू राहते आणि मग एका क्षणी शरयू जान्हवीला म्हणते, "अडचणीच्या वेळी नेमकी मला तू आठवतेस जान्हवी...." याचवेळी तिच्या मोबाईलची रिंग होते....त्यातील नंबर पाहताच तिला कळते की नवर्याचा फोन आहे....ती जान्हवीकडे पाहते, जान्हवी तिच्या नजरेतील भाव टिपते आणि तिथून उठून बाहेर पडते....शरयू फोनवर बोलणे सुरू करते.
मामा छान. आज शरयुचे काम
मामा छान. आज शरयुचे काम चांगले झाले असेलना? ती करते चांगला अभिनय.
पुढील भागात जान्हवीच्या हातात
पुढील भागात जान्हवीच्या हातात अल्बम दाखवलाय. बहुतेक तिला आता सगळे कळेल.
अन्जू..... लीना भागवत यांच्या
अन्जू.....
लीना भागवत यांच्या अभिनयक्षमतेबद्दल इथे चर्चेत भाग घेणार्यार जवळपास सर्व सदस्यांचे मत फार छान आहे. तिने आतापर्यंत केलेल्या हसतमुख तसेच विसरभोळ्या छोट्या आईच्या भूमिकेत अभिनयाची छाप पाडलेली आहेच, पण गेले काही भाग ती संसार दु:खाने पिचलेली दाखविली असल्याने तिच्या अभिनयात वेगळेपण येणे गरजेचे होते, तेच ती अतिशय प्रभावीपणे सादर करीत आहे. क्षणात रडणे तर क्षणात हसणे....तेही केवळ जान्हवीसोबत असताना... हे भाग दोघींनीही चांगल्या तर्हेने कॅमेर्यासमोर सादर केले आहे. कालच्या भागात प्रथमच तिच्या माहेरच्या स्थितीबद्दल तिच्याच तोंडून ऐकताना "संसारसुख" म्हणजे तिला काय अपेक्षित होते आणि ते इतक्या मोठ्या श्रीमंत घरात मिळाले नसल्याचे कबुली लीनाने प्रभावीपणे आपल्या संवादातून दाखविली.
तेच ती अतिशय प्रभावीपणे सादर
तेच ती अतिशय प्रभावीपणे सादर करीत आहे.<<< निरिक्षण आवडले.
अंजली.... होय, अगदी
अंजली....
होय, अगदी बरोबर....तो दोनेक मिनिटांचा भाग माझ्या वृत्तांत आला नाही. कारण त्या विषयी आज खुलासा होईल. आल्बम जान्हवी कसा मिळाला ? तर आजी आरामखुर्चीत बसून शरयूसंदर्भात विचार करीत आहेत आणि शेजारी असलेल्या लॅम्पपोस्टवर तो आल्बम आहे....आज जान्हवी त्यांच्याकडे येणार आणि आजी तिथे नसताना तो पाहात बसणार....तिची कृती आजीला नापसंत पडली आहे.
किती ते हमसून हमसून रडणे.
किती ते हमसून हमसून रडणे. प्रेक्षकात पण पदर डोळ्याला लावणार्या बर्याच असतील. एका उपेक्षित वर्गाचे दु:खच तिने बोलून दाखिवले आहे. मन मारून जगणार्या शिरीमंत स्त्रिया. खरेच ती जिम का जॉइन करत नाही. आणि त्या लग्नातून बाहेर पडून स्वतःचे जीवन साकारत का नाही? धमक नाही. पिंड नाही का असेच रडू रडू जीवन आव्ड्ते? एक मूल दत्तक घेउ शकते. काहीही करू शकते हू इज स्टॉपिन्ग हर?
पेट, अश्विनीमामी का मामा
पेट, अश्विनीमामी का
मामा तुम्चे अपडेट्स नेहमीप्रमाणे छान.
बेफि, पिंट्याला मिस्टर ईन्डिया केलात :))
>>>आणि त्या लग्नातून बाहेर
>>>आणि त्या लग्नातून बाहेर पडून स्वतःचे जीवन साकारत का नाही? धमक नाही. पिंड नाही का असेच रडू रडू जीवन आव्ड्ते? एक मूल दत्तक घेउ शकते. काहीही करू शकते हू इज स्टॉपिन्ग हर?<<
हर लो सेल्फ ईस्टीम अॅंड नो कॉन्फीडन्स.
(अशांनी कुत्रा पण पाळू नये) 
अमा, ह. घ्या.
पेट थेरपी.... "...काहीही करू
पेट थेरपी....
"...काहीही करू शकते हू इज स्टॉपिन्ग हर?...."
तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. शरयू गरीबाघरी वाढलेली मुलगी. वडील तिच्या लहानपणी गेल्यावर आईने तिला वाढविले. शिक्षण अपुरे....ती प्रवीण आहे फक्त स्वयंपाकघरात....लग्न तिच्या मनाने झाले की विरुद्ध....हा प्रश्न तिच्यासमोर नव्हता....ठरले लग्न, झाली ती गोखल्यांची सून....तिथून तिचे आयुष्य एखाद्या पतंगाप्रमाणे भिरभिरत राहिले ज्याची दोरी नवर्याच्या हातात....तर नवरा कुचकामी म्हणून मग सासूने त्याचाच पत्ता काटलेला. म्हणजेच एका अर्थी सासूच्या पंखाखाली तिने आयुष्य काढायचे.
अशा स्थितीत शरयूला स्वत:च्या पायावर उभी आहे असे दाखवायचे झाल्यास ते दिग्दर्शक कसे दाखवेल ? एक तर ती शिक्षित नाही....वेल ट्रेन्ड नाही...दडपणाखालील आयुष्य....नवर्याची मारहाण सहन केलेली (हे श्री ने जान्हवीला सांगितले होते), सासूच्या उपकाराखाली..... त्यामुळे जसा दिवस उजाडतो त्याच्या कलानुसारच तिने तो घालवायचा असा अलिखित नियमच तिच्या ललाटी असल्याने स्टॉपिंग कुणी करत असेल तर तिचे ते अभाग्यच.
गोखले श्रीमंत आहेत म्हणून त्या श्रीमंतीच्या छायेखाली आलेल्या सार्याच चिमण्या आनंदीच राहू शकतील असेही होणार नाही....जिथे हसू आहे तिथे आसूही आहेत हे तर दिसत्येच....आणि हे दोन्ही प्रकार असल्यामुळेच मालिकेची लोकप्रियता टिकून असेल.
अशा स्थितीत शरयूला स्वत:च्या
अशा स्थितीत शरयूला स्वत:च्या पायावर उभी आहे असे दाखवायचे झाल्यास ते दिग्दर्शक कसे दाखवेल ? एक तर ती शिक्षित नाही....वेल ट्रेन्ड नाही...दडपणाखालील आयुष्य....नवर्याची मारहाण सहन केलेली (हे श्री ने जान्हवीला सांगितले होते), सासूच्या उपकाराखाली..... >> क्या मॅन. डबे देउन तीन तीन मुलांची शिक्षणे केलेल्या लग्ने करून दिलेल्या स्त्रिया आहेत समाजात. स्वयंपाकच येतो तर घरच्या उद्योगात प्रॉडक्षन संभाळू शकते. इनु खाली रोते बैठती.
लो सेल्फ एस्टीम साठी पेट थेरपी घ्या. झंपुडी चल फुगडी खेळू.
झंपुडी चल फुगडी खेळू. >> अमा
झंपुडी चल फुगडी खेळू. >> अमा
झंपे आगाऊ झालीस अलिकडं, शिरेली कमी बघत जा जरा
झंपुडी चल फुगडी खेळू. >> अमा
झंपुडी चल फुगडी खेळू. >> अमा
शरयूने किमान वाचनाची आवड,
शरयूने किमान वाचनाची आवड, एखादा छंद जोपासलेला तरी दाखवायचा, तसेच ती कमी शिकलेली असली तरी बालवाडी वगैरे कोर्स करू शकली असती, मालिकेतील लेखक, दिग्दर्शक असे positive काही दाखवत नाही, तेच इंदूकाकूने पण कुठेतरी मन रमवायला पाहिजे होते, सर्वजणी घरात बसून श्री श्री करत बसतात आणि रडतात.
बंच ऑफ लूजर्स दे आर.
बंच ऑफ लूजर्स दे आर.
जे आहे असं आहे. तुमी ष्टोरी
जे आहे असं आहे. तुमी ष्टोरी लिवता का आता??
शरयूने किमान वाचनाची आवड,
शरयूने किमान वाचनाची आवड, एखादा छंद जोपासलेला तरी दाखवायचा, तसेच ती कमी शिकलेली असली तरी बालवाडी वगैरे कोर्स करू शकली असती, मालिकेतील लेखक, दिग्दर्शक असे positive काही दाखवत नाही, तेच इंदूकाकूने पण कुठेतरी मन रमवायला पाहिजे होते, सर्वजणी घरात बसून श्री श्री करत बसतात आणि रडतात.>>> माझ्या नातातल्या एक आजी सिनेमा मधे मारामारी सूरू झाली की 'ह्म मार त्याला, अजून मार' असे एक्दम तावातावाने बोलतात. एवढ्या त्या गुंग होतात. त्याची आठवण झाली.
सस्मित, जे आहे ते तसंच
सस्मित, जे आहे ते तसंच दाखवतात म्हणून मालिका न बघणे माझ्या हातात आहे कारण शेवटी रिमोट आपल्या हातात असतो त्यामुळे मी सिरीयल बघणे सोडून देते, मी हि सिरीयल बघत नाही पण मला मामांचे अपडेट्स खूप आवडतात, ते वाचायला मी इथे येते.
झंपुडी चल फुगडी खेळू. >> जे
झंपुडी चल फुगडी खेळू. >>
जे आहे असं आहे. तुमी ष्टोरी लिवता का आता??>>:D
डेली डोस ऑफ फन
सर्वजणी घरात बसून श्री श्री
सर्वजणी घरात बसून श्री श्री करत बसतात आणि रडतात.<<<
नैतंकै!
दाण्याचे लाडू करून तरी विका म्हणावं! तीस तीस पैशाला एकेक द्यायचा. खातात लोकं! फार करावंही लागत नाही. मनही रमते, पैश्यापरी पैसाही येतो हातात आणि नवर्याबिवर्यांच्या आठवणी येत नाहीत. ह्या मालिकेतले अटिकाऊ नवरे पाहून माझा पुरुषसुलभ मत्सरच जागृत होऊन र्हायलाय राव आजकाल! किती मजेत नांदत असतात ते घराबाहेर! इंदूची तर अशी परिस्थिती आहे की कोणीतरी तिला सांगावे की बाई तूही ह्या मालिकेतील एक पात्र आहेस.
परवा आमच्यायेथील एका मारुतीला काही बायका तेल वाहात होत्या ते पाहून मला ही मालिका आठवली.
चला अशोकराव बिडी मारू. बायकांची मंगळागौर होईस्तोवर!
ओह् गॉड.... बिडी मारू ? मी
ओह् गॉड.... बिडी मारू ? मी बाजूला उभा राहतो बेफिजी तुमच्या....यू एन्जॉय !
"<<<< हू इज स्टॉपिन्ग हर?>>>>
"<<<< हू इज स्टॉपिन्ग हर?>>>> : टीआरपीचे ठोकताळे.
मामा बेफी ओढतील, तुम्ही फक्त
मामा बेफी ओढतील, तुम्ही फक्त फेकून मारा बिडी

होय दक्षे..... तेच ओढू
होय दक्षे..... तेच ओढू देत....आणि मी कशाला मारू ? मी फक्त बघत राहतो....त्यांची धुम्रवलये !!
मामा तुम्हाला विनोद कळत
मामा तुम्हाला विनोद कळत नाहीत. तुम्ही पण म्हणायचं ना लग्गेच हो चला ओढू म्हणून. बेफी काय एक बिडी मारायला पार कोल्हापूरात येणार होते काय? कमाल आहे तुमची पण.
.....आणि समजा ते येतोच
.....आणि समजा ते येतोच म्हणाले....आले....आणि मागितली बिडी....तर काय करू ? मी एवढा भोळा की बिडीच काय पण काडी देखील कुठे मिळते कोल्हापूरात तेही मला माहीत नाही. पार निपाणीला जावे लागेल.
मंगळवार दि. १८ फ़ेब्रुवारी
मंगळवार दि. १८ फ़ेब्रुवारी २०१४ : अपडेट
~ श्री पुनश्च: चीफ़ एक्झेक्युटिव्हच्या खुर्चीवर बसून गोखले गृहउद्योगाचा कारभार पाहात आहे आणि खुषीत असल्याने त्याने आईआजीला फोन केला आहे. फोनवरून आजीना तो "तू दिवसातून एक तास का होईना, ऑफिसमध्ये यावेस..." प्रत्यक्षात त्याचे हे निमंत्रण तो हसतहसत देत आहे....पण इकडून आईआजी अजूनही शरयूच्या भवितव्याविषयी साशंक असल्याने त्या श्री ला तशाच मन:स्थितीत कोरडे उत्तर देतात...."नाही, मी येत नाही....तू सांभाळ सारे..." इथे श्री त्याना बरे नाही का ? असेही विचारतो, पण आजी आपण संध्याकाळी बोलू या असे सांगून फोन बंद करतात. श्री काळजीने घरी जान्हवीला फोन करतो....ती इकडे त्याच विचाराच्या हिंदोळ्यात आहे की आता आईआजीनी शरयूबाबत विचारले तर खरे सांगावे की खोटे सांगून शरयूला त्यांच्या रागापासून वाचवावे ! फोनवर श्री "तू आजीच्या खोलीत जाऊन त्यांच्या तब्येतीविषयीची चौकशी कर..." जान्हवी, "अरे श्री, मी तिकडेच चालले आहे..." असे सांगून फोन बंद करते.
जान्हवी आईआजींच्या खोलीत येते....पाहते तो आजी कुठेच दिसत नाहीत. मग ती कॉटजवळ येते... आजीची वाट पाहात बसते. इकडेतिकडे पाहताना तिला तो घरातील फोटो आल्बम दिसतो. तिची उत्सुकता जागृत होते. आजी नाहीत हे पाहून ती आल्बम उघडते....श्री चे लहानपणातील फोटो पाहून स्मितही करते. पाचसहा पाने पलटल्यानंतर तिला शरयू आणि तिच्या नवर्याचे फोटो दिसतात. हा नवरा म्हणजे आपण काल रात्री रस्त्यावर खाद्यपदार्थाच्या गाडीजवळ शरयूसमवेत हसत असलेली व्यक्तीच हे ती ओळखते.....सुरुवातीला तिचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. शरयू आपल्या पतीसमवेतच होती हे पाहून खरे तर तिला आनंद झाला आहे. त्या दृष्टीने आजीना काही सांगावे का या विचारात ती दंग होऊन जाते. आतल्या खोलीतून आजी तिथे येतात तर जान्हवीला त्यांचा आवाजही ऐकू येत नाही. जान्हवीच्या हाती आल्बम पाहून आजी नाराज होतात. त्या थेट बोलून दाखवित नाहीत. पण जान्हवीला "तू काय पाहतेस त्यात ?" हा प्रश्न विचारल्यावर मात्र जान्हवी चाचपडते आणि म्हणते, "तुम्हालाच भेटायला आले होते, पण तुम्ही इथे नाही तर बसले आणि इथेच हा आल्बम दिसला.तो पाहत होते." आजी त्यावर तो विषय पुढे वाढवित नाहीत. मात्र "तू शरयूबाबत मला अजूनी काही सांगितलेले नाहीस..." यावर एक मिनिट जान्हवी विचार करते आणि म्हणते, "हो, छोटी आई माझ्याबरोबरच होत्या. श्री ना भेटायला आल्या होत्या...." आजी फक्त तिच्याकडे पाहात, "तू खरी स्थिती सांगत आहेस असे मी मानते." जान्हवीदेखील तसाच चेहरा करते....कारण आता तिलाहा एकप्रकारचा विश्वास आलेला आहे.
खाली स्वयंपाकघरात नर्मदाआई, इंदूआई आणि बेबीआत्या महिन्याच्या बाजाराची खरेदीची यादी बनवीत आहेत. तिथे सरूमावशी येऊन यादीवरील चर्चा पाहून "श्री आल्याबद्दल मी जो महाप्रसाद करणार आहे, त्याचीही यादी करू या....". सरूमावशीचे बोलणे कुणीचे गंभीरपणे घेत नाहीत. कारण सर्वांना माहीत असते श्री असल्या गोष्टींना कधीच हो़कार देणार नाही. बोलणी चालू राहतातच....पण त्यातून काहीही निष्पण्ण होणारे नाही.
जान्हवी श्री ला ऑफिसमध्ये फोन करून आपली आजीबरोबर बैठक झाली आणि त्याबद्दल ती सांगणार आहे; पण श्री त्याचवेळी मीटिंगमध्ये असल्याने आपण नंतर बोलू या असे सांगतो, पण त्यातूनही "आजी बरी आहे ना?" असे विचारतो. जान्हवी होकारार्थी उत्तर देतो....श्री समाधानाने म्हणतो, "बरं, मग तुला काही लागले तर मला फोन कर...." यावर जान्हवी हसून त्याला म्हणते, "आता तशी वेळच येणार नाही."
सरूमावशी पूजार्चना करीत आहे. तिथे जान्हवी येते. तिला पाहून सरूमावशी "तू श्री ला या महाराजांच्या प्रसादासाठी तयार कर ना..." अशी विनंती करते....जान्हवी मावशीला म्हणते, "मी समजू शकते तुमची भावना, पण श्री चा असल्या कर्मकांडावर विश्वास नाही....त्याचा होकार येणार नाही..." या दोघींचा संवाद चालू असतानाच श्री तिथे येतो...सरूमावशीचे आभार मानतो आणि म्हणतो, "मावशी तुला माहीत आहेच की मी असल्या गोष्टींच्या विरोधात आहे. तेव्हा तू महाप्रसाद विसरून जा...". दुसरीकडे आजी, बेबीआत्या भाजीपाल्याच्या खर्चाबाबत चर्चा करीत आहेत. शरयू ते ऐकत आहे.
मामा गुड. आज काही तसे विशेष
मामा गुड. आज काही तसे विशेष घडले नाही, शरयूचा नवरा कोण हे जान्हवीला कळले. श्रीने परत सूत्र हाती घेतली.
Pages