होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झंपुडी चल फुगडी खेळू. >> Rofl

बेफी .. खुप जळु नका .. को डेपो खाक करुन कस चालेल अख्ख्या पुण्याच Proud

होय अन्जू....आजचे कथानक जवळजवळ त्या आल्बमभोवतीच फिरले....मुख्य काम झाले ते म्हणजे जान्हवीच्या मनातील मळभ दूर झाले....शरयूविषयी.

एक मुद्दा लिहायचा राहिला....बेबीआत्या आता उघडपणे जान्हवीचे कौतुक करीत आहे...म्हणजे तिच्यामुळेच श्री घरात परत आला आहे...हसतहसत सार्‍यांना सांगत आहे.....चांगले लक्षण म्हणायचे.

(जाहिरातीत) शरयू मार खाऊन आलीये वाटत घरी नवऱ्याकडून. तिच्या बद्दल थोडी किव वाटली आणि ती किती बावळट आहे, असही वाटल. तिच्यावर अन्याय होऊ नये म्हणून घराबाहेर काढलेल्या नवऱ्याला ती भेटायला काय जाते, त्याच्यासाठी रडत काय बसते, घरच्यांशी खोट काय बोलते......असह्य झालीये तिची परिस्थिती!!

काल जान्हवीच्या खर्‍या लग्नाची मेंदी दिसली हातावर्....अच्छ्या..म्हणून तिला लांब बाह्यांचे ब्लाउज दिले आहे तर्...आणि साडी नेसायला लावलीये...

काल जान्हवीच्या खर्‍या लग्नाची मेंदी दिसली हातावर्....अच्छ्या..म्हणून तिला लांब बाह्यांचे ब्लाउज दिले आहे तर्...आणि साडी नेसायला लावलीये... >> अरे पण ह्यांच्याकडे कंटिन्युइटी हा प्रकार नाही.. एका प्रसंगात जान्हवीच्या हातावर मेहंदी नाही, त्यानंतर श्रीशी बोलताना हातावर मेहंदी आहे, पण त्याच्या लगेच पुढच्या सीनमध्ये ती सरू मावशीजवळ येऊन बसते आणि देवासमोर हात जोडते तेव्हा हातावरची मेहंदी पुन्हा गायब.. !मान्य आहे की काही भाग आधी शूट केले असतील, पण मग मेहंदी दाखवयाची तर मग तो देवासमोर हाडो जोडणे वाला भाग पुन्हा शूट करायचा की.. असो हा काही खूप महत्वाचा मुद्दा नाहीये, पण जस्ट रहावलं नाही म्हणून बोलले..
आणि काल त्या जान्हवीने आईआजीला तो आपण एखाद्याला ओळखतो तो विश्वास की आपली त्याच्याकडून अपेक्षा असते तो विश्वास.. असा काहीतरी संवाद म्हटला.. मला ते कळलं नाही नक्की तिला काय आणि का विचारायचं होतं? कोणी सांगेल का जरा? अशोक मामा सांगा बर नक्की तुमच्या भाच्चीला काय म्हणायचं होतं? प्लीज...

मीनाक्षी....

जान्हवी बाहेर जाण्यापूर्वी दारात थांबते.....काहीसा विचार करते....मागे वळते आणि आजीला म्हणते, "आईआजी एक विचारू ?" आजी होकार देतात....त्यावेळी जान्हवी म्हणते, "आपण एखाद्या माणसाला ओळखतो तो विश्वास की त्या माणसाकडून आपल्याला जे अपेक्षित असतं, तो विश्वास ?"

आईआजी कौतुकाने जान्हवीच्या चेहर्‍याकडे पाहतात, म्हणतात, "या प्रश्नाचं उत्तर मलातरी अजून मिळालेले नाही. कदाचित माझ्याआधी ते....." इथे आजी किंचित थांबतात आणि म्हणतात, ".... मलाच मिळेल." जान्हवी आणि आजी दोघीनी नि:शब्दपणे एकमेकीकडे पाहातात...जान्हवी स्मित करते आणि बाहेर जाते.

~ या संवादात दडलेला अर्थ शोधायचा झाल्यास जान्हवीला शरयूबाबतीत म्हणायचे असेल तर वाक्याचा अर्थ असा होऊ शकतो की "मी छोट्या आईला ओळखते, म्हणजे तो माझा विश्वास म्हणायचा....किंवा छोट्या आईचे वर्तन कसे असले पाहिजे, तिच्याकडून या घराला जी अपेक्षा आहे....त्याला विश्वास म्हणावे..."

[अर्थात हा माझा अंदाज आहे...कदाचित तुम्हा सर्वांना काही वेगळेही त्या वाक्यात दडले आहे असे जाणवेल.]

....बाकी मेहंदी निरीक्षणाबद्दल तुला १०० गुण....तरीही तो प्रश्न फार महत्वाचा मानू नये....शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकानुसार बदल होतात.

शशिकलाबाई आणि जानू.....खाण तशी माती कशी ?..+१
आईआजींना माहित नव्हतं का अजुनही माहित नाही का विसरल्या की ती जान्हवीची सावत्र आई आहे.

बुधवार दि. १९ फ़ेब्रुवारी २०१४ : अपडेट

~ आजच्या कार्यक्रमात केवळ लेक्चरबाजीचाच प्रभाव....कथानकात ज्याला गती म्हणतात तो भाग नव्हता. सुरुवातीला सरुमावशीच्या देवघरात श्री तिचे बौद्धिक घेत आहे. पूजा, देवदेव, पाठ, महाप्रसाद अशा गोष्टींच्या मागे आपण लागून वातावरण किती प्रदूषित करत आहोत....लोकांमध्ये अंधश्रद्धेला पसरवत आहोत....देवापेक्षा जगात काहीच नाही असे म्हणत स्वतःच्याच क्षमतेवर कमी विश्वास....आदी अनेक बाबीवर श्री व्याख्यान देत होता. सरुमावशी त्याच्याकडे पाहात बसली होती तर पत्नी जान्हवी "माझा नवरा किती हुशार !" असा कौतुकाचा हसरा भाव घेऊन त्याच्याकडे नजर लावून ते श्रवण करीत होती.

दुसरीकडे सहस्त्रबुद्धेंच्या घरी सदाशिवराव सोफ्यावर पेपर वाचत बसले आहेत तर बाजूला पिंट्या मोबाईलवरून आपटे याच्याशी दबक्या आवाजात बोलत आहे. आपटे, एकीकडे गलिच्छरित्या पान खात खात त्याची यथेच्छ टिंगलटवाळी करून पिंट्या म्हणजे ज्याला आयुष्यात काहीच करायला जमणार नाही अशी व्यक्ती असे वर्णन करीत होता. त्याचा आवाज पिंट्याला दाबून टाकणाराच. बाप शेजारी असल्याने त्याला मोठ्याने बोलता येतच नव्हते....[खरे तर आपटेचा फोन मोबाईलचा आहे....पिंट्याने तो काही लॅन्डलाईनवर घेतलेला नाही....मोबाईलवरूनच आपट्याचा भडिमार तो सहन करीत आहे. तर अशा परिस्थितीत त्याने वडिलांजवळून उठून बाहेर जायला होते व मग उत्तरादाखल तो यथेच्छ बोलू शकला असता.....पण हे दिग्दर्शकाला कोण समजाविणार ?]. फोन संपल्यानंतर पिंट्या वडिलांसमोर उभा राहतो....त्याना हाक मारून आपल्या उद्योगाच्या स्वप्नाविषयी ऐकवतो. तेही गंभीरपणे ऐकतात. पण ज्यावेळी मुलगा श्री चे नाव घेतो पार्टनरशिपबाबत त्यावेळी ते साशंक होऊन पिंट्याला सावध करण्याचा प्रयत्न करतात की श्री सारख्या बिझिनेसमधील मोठा माणूस तुला कशाकरीता पार्टनर म्हणून घेईल ? तर हा "आपण ही गोष्ट ताईकडून भावोजीना सांगावी आणि त्यासाठी तुम्ही ताईला इकडे बोलावून घ्या आणि तिला सविस्तर सांगा" अशी गळ घालतो. सुरुवातीला सदाशिवराव नकारच देतात, तरीही मुलाची आतुरता पाहून "मी जान्हवीसोबत बोलतो या विषयावर" असे आश्वासन देतात. पिंट्याला तेवढेच हवे असते.

"गोकुळ" चे स्वयंपाकघर....तिथे दोन सासू आणि बेबीआत्या यांचा भाजी खरेदीवर होणा-या अमाप खर्चावर चर्चा करीत आहेत. घरातील आर्थिक व्यवहार व हिशोब बेबीआत्या पाहात असल्याने शरयूकडून भाजीखरेदीवर मर्यादा का नाहीत याच विचारात आहे. ती ही बाब आईच्या कानावर घालणे गरजेचे आहे असे ठरविते आणि आईआजीकडे चहा घेऊन जाते.तिथे आजी डोळे मिटून चिंतन करीत आहेत. तिला त्या अवस्थेत पाहून बेबी तिथून जाऊ लागते पण आजी तिला थांबवितात...."थांब गं....नको जाऊ, चिंतनाला या वयात बराच वेळ मिळतो.... तू बस." बेबीला तेच हवे असते. चहाचा कप देवून ती कॉटवर बसते हसत म्हणते, "चला, म्हणजे तुझे ऑफिसशिवायचे रुटीन सुरू झाले." "हो, पण माझे हे रुटीन चिंतन नव्हते" बेबीला समजत नाही त्याचा अर्थ, तर समजावून सांगताना आजी म्हणतात, "म्हणजे आपण एखादे पुस्तक वाचले, एखादा प्रसंग पाहिला, एक अनुभव आला, तर त्यावर शांतपणे विचार करावासा वाटला तर त्याबाबत केलेला विचार म्हणजे चिंतन नव्हे....मी करत असलेले चिंतन काहीसे वेगळे आहे." बेबीला अजूनही समजलेले नाही, ती म्हणते, "वेगळे म्हणजे ?" या ठिकाणी आजी तिच्याकडे पाहात किंचितसे हसतात आणि सांगतात, "मला जान्हवीने विचार करण्याबाबत एक वेगळा दृष्टिकोण दिला आहे."....बेबीचा चेहरा पाहून आजीला हसू येते, तर आजकाल बेबीलाही जान्हवीबद्दल प्रेम वाटू लागले असल्याने तीही हसते आणि विचारते, "कशाबद्दल ?" आजी सांगतात "तिने मला एक प्रश्न विचारला. आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो म्हणजे काय ? आपल्याला त्याच्याकडून आलेला अनुभव का त्याच्याकडून असलेली अपेक्षा." बेबी हताशपणे म्हणते, "आई, मला कळेल असे सांग ना काहीतरी." आजीला माहीत असतेच की आपल्या कन्येला हे किचकट प्रकरण समजणार नाही, म्हणून त्या विस्तृत व्याखा करतात..."म्हणजे एखादा माणूस आपल्याशी विशिष्ट पद्धतीने वागतो. ते आपल्याला आवडते. आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याने आपल्याशी तसेच वागावे अशी अपेक्षा ठेवतो. पण तो आपल्याशी काही कारणाने वेगळं वागला तर आपला अपेक्षाभंग होतो. मग त्याने आपला विश्वासघात केला म्हणून दु:खही होते.....पण मुळात 'माझ्यावर विश्वास ठेवा' असं तो म्हणालेला नसतोच. ही आपल्याच मनाची गुंतागुंत असते." थक्क झालेली बेबी म्हणते, "हे तुला सारं जान्हवीने सांगितले ?" आजी हसतात, "एवढं क्लिष्ट नाही, पण तिचा प्रश्न बरोबर होता." बेबीही हसून दाद देते, "हल्लीच्या मुलांना असे प्रश्न कसे पडतात तेच मला कळत नाही." आजी उत्तरतात, "प्रश्न पडणं केव्हाही चांगलं बेबी."..... एक क्षणभर थांबतात आजी आणि बेबीकडे पाहून म्हणतात, "इंटेलिजन्ट आहे ती मुलगी. मला सारखं वाटतंय की श्री माझ्यापेक्षा हुशार आहे. त्याची निवड बरोबर आहे. मीच तिला का नाकारत होते हे देव जाणे !" बेबी समजाविण्याच्या स्वरात म्हणते, "आई तेव्हाची परिस्थितीच वेगळी होती. तिची आई, त्यांचे ते वागणे सगळं कसं भयंकर होतं !" आजी मान हलवितात, "तिथंही श्री बरोबर ठरला आणि माझंच चुकलं. श्री म्हणायचा 'माणसाचे आईवडील, इतिहास यावरून माणसाची पारख करू नये....आणि मी बरोबर उलटे म्हणायची. तिच्या आईवरून मी तिची परीक्षा करीत होते. खाण तशी माती असा ठाम विश्वास होता माझा. या आपल्या अशा धारणा चुकीच्या ठरल्या की मग चिंतन करावेसे वाटते." बेबीही आनंदाने म्हणते, "म्हणजे एकूणच जान्हवीमुळे तू आता दुसर्‍या बाजूनेही विचार करायला लागलीस." आजी कबूली देतात, "आणि मलाही त्याचे दु:ख नाही."

या ठिकाणी बेबी धैर्याने म्हणते, "आई असंच आपल्याला शरयूच्याबाबतीत करता येईल ?" आजी तिच्याकडे रोखून पाहतात, "बेबी काय ते स्पष्ट सांग..." बेबी म्हणते, "कदाचित माझंही चुकत असेल, पण हल्ली शरयूचे भाजी आणायला जायचे प्रमाण खूप वाढले आहे....आणि भाजीचे बजेटही."

आजी आणि बेबी खाली दिवाणखान्यात खर्चाची फाईल घेऊन बसल्या आहेत. शरयू त्यांच्यासमोर काम करत असल्याचा बहाणा करीत आहे. फाईलमधले आकडे वाचत बेबी आजीला सांगते, "एका आठवड्यात एका महिन्याचे बजेट कसे संपेल ?" आजी शरयूला त्याबद्दल जाब विचारीत आहेत. पण शरयू आपला चेहरा त्या दोघींपासून लपवून ठेवत आहे....ती आजीच्या कोणत्याच प्रश्नाचे धड उत्तर देत नाही. आजी आवाज चढवून तिला "शरयू माझ्याकडे बघ..." असे फर्मान सोडतात....पण शरयू चेहरा त्यांच्याकडे करत नाही.

उद्याच्या भागात ती आजीकडे पाहात असल्याचे दाखविले आहे आणि तिच्या कपाळाच्या डाव्या बाजूला मारामुळे टेंगूळ आले आहे. आजी त्याचा खुलासा शरयूला विचारीत आहेत.

मामा अपडेट्स मस्त. तो पिंट्या त्या आपटेपासून दूर झाला असे वाटत होते तर नाही, काय म्हणायचे त्या पोराला?

जान्हवीचे घरातले महत्व वाढत चालले आहे. पिंट्याकडे जरा लक्ष द्यावे तिने.

अन्जू.....

पिंट्या आपटेपासून दूर होण्याऐवजी तो आपटेच लांडग्यासारखा अशा सहज उपलब्ध होणार्‍या भक्ष्यावर दबा धरून बसला आहे असे चित्र दिसते. पिंट्याच्या वयातील बेरोजगार तरुण मुले परिस्थितीमुळे गांजलेली असतातच.... हलकीही झालेली असतात, त्यामुळे शुद्ध व्यवहारी दुनियेत त्यानाही आपल्याला कुणीतरी प्रवाहात फळकूट देत आहे असे दिसले तर त्यामागील भावना विचारात न घेता तो आधार पकडण्याचा प्रयत्न केला जातो. पिंट्याही तसाच.

जान्हवी अगोदर शरयू नंतर बेबीआत्या यांचा प्रवास ठीकठाक करेल असे वाटते....शिवाय पिंट्या आणि आपटे यांच्यात काहीतरी प्रकल्प मांडणी चालू आहे याची तिला कल्पना नाहीच.

काल भाज्यांच्या किमतींबद्दल चर्चा करताना श्रीची आई म्हणली की रोज आपण एवढ्या भाज्या कुठे खातो? कधी उसळी, कोशिंबीरही असते की. गोकुळातल्या गोखल्यांकडे कोशिंबीरीत भाज्या घालत नाहीत का? Uhoh

नवरा घरी परत आल्याचे जान्हवीने अजून स्वतःच्या घरी सांगीतले नाही का?

आईआजींना माहित नव्हतं का अजुनही माहित नाही का विसरल्या की ती जान्हवीची सावत्र आई आहे.>>>> जान्हवी जेव्हा आईआजींना तिच्या कुटुंबासमवेत भेटली तेव्हा आईआजींसमोर शशिकलाबाईंनी तमाशा केला होता, देवदर्शनाच्या मुद्द्यावरुन, त्यानंतर लग्नाच्या वेळी घरी येउन तिच्याबद्दल खोटनाट सांगताना दरवेळी माझीच मुलगी आहे हो ती अस वारंवार सांगत होत्या. हे लग्न आईआजींच्या मनाविरुद्ध होत असल्याने त्यांनी जान्हवीबद्दल बोलायला श्रीला कधी चान्सच दिला नाही आणि लग्न झाल्यापासुन ते आईआजींच्या मनात स्थान मिळवेपर्यंत इतकी उलथापालथ झाली की तिच्या माहेरच्या कुटुंबाबद्दल त्या दोघींना बोलायला वेळच मिळाला नाही. त्यात पिंट्या आणि जान्हवीच नातही सख्खा भावंडांसारखच आहे. यामुळे मला अस वाटतय की आईआजींना अजुन माहित नाहीये की शशिकलाबाई जान्हवीची सावत्र आई आहे. बाकी खर खोट देव जाणे.

इतके खात असतील का खरेच? १२००० रु च्या फक्त भाज्या? त्यापेक्षा घरचा फार्म स्वस्तात पडेल.

मी प्रोसेस्ड चिकन घेते तरी ग्रॉसरी बिल इतके येत नाही. ते कोशिंबीरीचे मला पन जाणवले. शरयू तै ते पैसे नवर्‍याला देत असतील असा गौप्य स्फोट होईल काही महिन्यांनी.

शरयू तै ते पैसे नवर्‍याला देत असतील असा गौप्य स्फोट होईल काही महिन्यांनी.>>> हे तर होणारच्चे मामी.. त्यासाठी तर आत्तापर्यंत दुर्लक्षित असलेली शरयु आणि तिची भाजी बघायला मिळतेय ना आपल्याला...

मुग्धा, तू बहुतेक सदाशिवराव आईआज्जीना भेटायला गोकुळ बंगल्यावर येतात आणि जान्हवीला तिच्या आईवरुन पारखु नका आणि तिला स्विकारा अशी विनंती करायला येतात तो भाग बघितलेला दिसत नाही.
सदाशिवरावांनी आईआज्जीला स्वतः सांतिगले आहे की शशिकला बाई जान्हवीची सावत्र आई आहे आणि जान्हवीचा चांगला वाईट जो काही विचार करणारा आहे तो मी एकटाच आहे. Happy

अर्थात हे सगळे लग्नाआधी झालेले आहे आणि काही वेळाकरिता का होईना पण आईआज्जी पाघळलेल्या दाखवलेल्यात Wink

मुग्धा, मध्ये एकदा जान्हवीचे बाबा गोखल्यांकडे आलेले तेंव्हा त्यांनी सांगितलं होतं की तिची आई खोटं बोलली तिच्याबद्दल कारण ती तिची सावत्र आई आहे Happy

शुभांगी....

नेमके हेच लिहायला आता आलो होतो, पण तूच माझे काम हलके केले आहेस.
मुग्धा.... वरचा प्रसंग अगदी योग्य आहे. शशिकलाबाईने त्यापूर्वी आजीपुढे येऊन शपथबिपथ घेऊन जान्हवीच्या चारित्र्याविषयी चांगलीच राळ ओकलेली असते आणि त्यामुळे भागिरथीबाईंचे मत प्रतिकूल बनलेले असतेच. तो ग्रह दूर करण्यासाठी सदाशिवराव लंगडतच गोकुळ बंगल्यावर येतात आणि भागिरथीबाईंच्या समोर अगदी हात जोडून जान्हवीविषयीची खात्री देतात....त्याच प्रसंगी शशिकलाबाई सावत्र आई असून जान्हवीविषयी चांगला वाईट विचार करणारी मीच एक व्यक्ती आहे, अशीही खात्री देतात.

सबब "खाण तशी माती" मधील भाव हा भांडणप्रसंगी तोंडातून आलेला शेरा मानावा.

हम्म, कधीकधी कस होत की मी किचनमध्ये काम करत करत ही मालिका ऐकत असते सो हे बहुतेक स्कीप झाल. आणि तसही बर्‍याचदा मालिकांमधुन आधीच्या भागाचा आणि पुढे येणार्‍या भागाचा ताळमेळ नसतोच...

मी नाही बघत हल्ली ही मालिका रडारड सुरु झाल्यापासुन. मामांचे अपडेटस वाचले की कळते की कुठवर आलिये गाडी गाडी:स्मित:

श्री च्या बाबांना एक दोन एपिसोडात फोनवर गप्पा मारायला लावुन गायब केलय. शरयुचा नवरा पण भाजीवाले संपावर गेल्यासारखा मधुनच बेपत्ता झालाय. बहुदा 'तिच्याकडे' गेला असावा Lol

काल सरू मावशी आणि श्री बरोबरच्या देव्हार्‍याच्या प्रसंगात जान्हवीचं काम लईच साळसूदपणाचा आव आणल्यासारखं वाटलं. अतिशहाणी वाटत होती मला ती.

जान्हवीला एकदा पाल वगैरे असलेल्या खोलीत सोडले पाहिजे. म्हणजे मग तिचा नैसर्गीक अभिनय बाहेर येईल.

(किंवा पालीचा)

छोटी आई तर आधी म्हणत होती नं, की माणूस बदलतो, हे सुधारलेत वगैरे वगैरे... मग आता काय झालं अचानक.. तिला सोडाल नं (दारुबद्दल बोलत असेल असं गृहित धरुनही), वगैरे बोल्तेय काय, मार खाउन येत्ये काय.. अरे काय चाललंय काय? कधी कधी वाटतं की लेखक-दिग्दर्शकालाच विसरण्याचा रोग जडलाय. बाबांचं ऑपरेशन - विसरले. लक्ष्मीकांत (भाउजी) सुधारलाय - विसरले. आजकाल छोटी आई विसराळू आहे हे पण विसरलेत बहुदा.

बाकी, मामांचे अपडेट्स.. ग्रेट्च.

जान्हवीला एकदा पाल वगैरे असलेल्या खोलीत सोडले पाहिजे. म्हणजे मग तिचा नैसर्गीक अभिनय बाहेर येईल.

(किंवा पालीचा)
>> पालीचा एक पती असेल मिस्टर पालकर ज्याला आईआज्जी ने झाडू मारून बाहेर फेकले असेल. म्हणून ती सुसरीचे अश्रू ढाळत असेल. मग श्रीतिला थंड रक्ताचे प्राणी ह्यावर एक लेक्चर देइल
व जानव्ही तिच्यावर एक विश्वासचे वस्त्र टाकेल. बेबी तिला फोन करेल आणि हे बघून सर्व झुरळे डास माश्या इत्यादी आनंदाश्रू ढाळतील.

हो गोगो, बाबा लंगडत चालतायेत त्याची खंत प्रेक्षकांनाच आहे, ती मालिकेतील ले. दि. आणि काम करणाऱ्या कोणालाच दिसत नाही.

Pages