होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना म्हणजे श्रीने indirectly सांगितले, जान्हवीच्या हाताला चव नाही ते. बिच्चारी जान्हवी एवढी धडपड करायची.

जान्हवी शरयूच्या खोलीत आली आहे. शरयू रडत नवर्‍यासोबत फोनवर बोलत आहे....ते सारे जान्हवी ऐकत बाजूला उभी आहे...."मला काही आता यातले सांगू नका....यापुढे तिला जवळ घेऊन बसा तुम्ही... तुम्ही मला का छळता ?>>>> पण शरयू तर आधी सांगत असते कि "हे आता सुधारले आहेत" वगैरे ... मग आता त्यांना समोर आणायची वेळ झाल्यावर हि रडारडी का?

श्री बाळ म्हणतो आई आज्जी बाहेरच्या जेवणाला तुझ्या हाताची चव नव्हती. या घराची माया नव्हती. पण तो तर बायकोच्या हातचे जेवa होता ना?एकदा तर बिचारी ड्बा द्यायलाही त्याच्या ऑफिसात गेली होती ना?
हे लेखक सोयीस्करपणे विसरलेला दिसतोय.>>>>>>> श्री बाळ आता बरेच काही विसरायचे ठरवणार बहुतेक.

पण आपटे अत्यंत नालायक आहे, हे पिंट्या पहिल्यापासून जाणतो तरीही?... इतकी 'अनभिज्ञ' नसतात आजकालची पोरं.. (मालिका बघत नाही...पण )>>>.. तो पिन्ट्या खरोखर फुल मॅड दिसतोय, आपटेचा एवढा वाईट अनूभव येऊनही याचे आपले येरे माझ्या आपट्या.( हा पण तोन्डावर आपटणार आणी बरोबर जान्हवी आणी श्रीला पण आपटवणार)

पिंट्याचाच आधी आपटेला फुल विरोध होता तो कसा एवढा नादाला लागेल त्याच्या? लेखक आणि दि. काहीही दाखवतात, उगाच वैताग. पिंट्याला फसवणारा दुसरा कोणी दाखवायचा मग पटलं तरी असते.

पिंट्याला फसवणारा दुसरा कोणी दाखवायचा मग पटलं तरी असते<<<

मालिकेत पिंट्याच नसल्यामुळे त्याला कोणी फसवणार कसे, नाही का?

Lol आई ग! अहो बेफिकीर तो पिन्ट्या तुम्हाला इतका का नकुसा झालाय? अरे इथल्या कुणी मुली फेसबुकावर असतील तर त्या होसुयामीघ च्या फेबु वर माबोची ही लिन्क टाका, म्हणजे ते सॉल्लिड हादरतील.:फिदी:

ह्या मालिकेतील त्या श्री आणि जान्हवी खरे कपल आहेत का? म्हणजे नवरा बायको आहेत सिरियलच्या बाहेर पण?

( सिरियलीमुळे प्रेमात पडून लग्न झाले का? तसे असेल तर सिरियल सुरु कधी झाली आणि प्रेम झाले व लग्न सुद्धा.... खूप फास्ट. ) (हे आपलं उगाच कुतुहल.. तरी उत्तर द्या कोणीतरी. जीव शांत होइल माझा. :फिदी:)

होय होय श्री आणि जान्हवी म्हणजे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांचे ८ फेब. ला लग्न झाले. तुम्ही म्हणता तसे सिरीयल मध्ये एकत्र काम करताना प्रेमात पडून:-)

आजचा एपिसोड तर जरा जास्तच गोड झाला... आम्हि कित्ती कित्ती छान हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असं वाटत होतं.
बाकी शरयु आईआज्जी ला असं म्हणु शकत नाहि का कि माझ्या नवर्याला भेटायला मला कुणाच्या परवानगीची गरज नाही... किती वेड्यासारखं दाखवतात...

आज हॉरर प्रसंग दाखवण्यात आला. बसस्टॉपवर उभा असलेला आपटे हवेत बघून म्हणाला :माझ्यासाठी पाने आणा". त्यावर कोणीही काहीही बोलले नाही. मात्र अचानक दोन मिनिटांनंतर हवेतून आपटेच्या हातात एक पानाची पिशवी येऊन पडली. त्यातील एक पान स्वतः चघळत आपटे हवेतच बघत म्हणाला की आता एक पान तुम्ही खा. त्यावर हवेने काहीही प्रत्युत्तर दिले नाही, पण एक पान मात्र हवेत जाऊन गुडूप झाले. मग आपटे हवेला ते पान रस्त्यावर थुंकायची आज्ञा करू लागला पण हवा पान थुंकली मात्र नाही. आपटेने तीन आकडे मोजले तरी पान थुंकण्यात आले नाही. साईडला मनोज जोशी थांबलेला होता व त्याची व आपटेची स्वच्छता या विषयावरून चकमक उडालेली होती. आपटेने तीन आकडे मोजल्यानंतर मनोज जोशी विनाकारण 'गुडबॉय' असे म्हणाला. मनोज जोशीला सुतराम कल्पना असल्याचे दिसले नाही की तेथे शूटिंग चालू आहे. त्यामुळे त्याची बस आल्यावर तो शांतपणे बसमध्ये बसून निघून गेला. मग आपटेने एका कमनीय बांध्याच्या अजस्त्र स्त्रीची छेड काढली व तिच्याकडून रागवून घेतले.

आज शरयू वेड लागल्यासारखी रडत होती. आईआजी आता लॅपटॉपवर सर्च वगैरे मारतात आणि गेम्सही खेळतात. आज बेस्टची एक बस दाखवण्यात आली. आपटे हवेशी बिझिनेसबाबतही काही बोलल्याचे दाखवले. हवा हे ह्या मालिकेतील एक पात्र असावे.

ह्यानंतर बाबाजी बाबाजी असे विव्हळणार्‍या माणसाची मालिका सुरू झाली.

धन्यवाद

जिज्ञासा, धन्यवाद.
---------------------------------------------------------------------------------
हायला सिरियल सुरु होवुन फक्त ४-५ महिने झाले ना, त्यात प्रेमात सुद्धा पडून लग्न सुद्धा झाले?... Happy

आजकालच्या पॅटर्न मध्ये जरा फास्ट की हो...

शनिवार दि. १५ फेब्रुवारी २०१४ : अपडेट

~ शरयू वगळता सार्‍या स्त्रिया स्वयंपाकघरात आहेत. नाष्ट्याची तयारी चालू आहे. जान्हवी अर्थातच इथे हल्ली लीडर आहे. पोहे करीत आहे आणि अन्यांना न विचारता ती थेट आजीना विचारते, "आईआजी, तुम्ही पोहे करताना त्यात टोमॅटो टाकता ?" आजी म्हणतात, "होय, कधीकधी टाकते मी....श्री ला देखील हा प्रकार फार आवडतो म्हणूनदेखील...." आजी आणि नातसून यांच्यातील हा हलकाफुलका संवाद बेबीआत्यासह सार्‍या स्त्रिया मनापासून ऐकतात असे त्यांच्या चेहर्‍यावरून दिसते. एकूण या सर्वांची मने आता जुळली आहेत. यांचा हसरा चेष्टेचा दंगा चालू असतानाच श्री देखील ऑफिसला जायच्या तयारीत खाली येतो....सर्वांकडे प्रसन्न नजरेने पाहत खुर्चीवर बसतो....त्याच्या नाष्ट्याची चर्चाही सुरू होते. ती चालू असतानाच श्री आजीला म्हणतो, "तूही आवर. आपण दोघे एकत्रच जाऊ या ऑफिसला..." इथे आजी त्याला थांबवितात. "नाही, मी येणार नाही आजपासून ऑफिसला. तू घर सोडले होते म्हणूनच मी तितका काळ तिथे आले असे समज....खूप चांगला बिझिनेस तू सांभाळला आहेस, हे मी पाहिले असल्याने आता तिथे मला कसलेही काम नाही..." सुरुवातीला श्री "नाही..." म्हणतो पण नंतर तोही होकार देतो....आणि सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडतो.

बस स्टॉपवर आपटे आणि पिंट्याचा नित्याचा बकवास चालू आहे. पैशाच्या खोट्या बाता मारत आपटे पिंट्याला माकडासारखा खेळवत आहे. शंभर रुपयाची नोट देवून त्याला पान आणायला पाठवितो. त्याचवेळी श्री ला बससाठी पैसे दिलेले ते गृहस्थ तिथेच फोनवर बोलत येतात....त्याना पाहून आपटे पुन्हा पान खाऊन रस्त्यावर पिचकार्‍या मारण्याचा प्रसंग वर्णन करत राहतो. पिंट्याला तो पान खायाला देवून तिथेच पिचकारी मारायला सांगतो. पिंट्या ते ऐकत तर नाही, शिवाय आपटेच्या "मग तुला भांडवल मिळणार नाही" या धमकीला "माझ्या ताईने जे शिकविले आहे त्याच्यापुढे तुमच्या भांडवलाची मला गरज नाही." असे उत्तर देवून तिथून निघून जातो. त्याला तसे जाताना पाहून ते गृहस्थ "गुड बॉय" अशा शेरा देतात आणि आलेल्या बसमध्ये चढतात.

इकडे नाष्टापाण्याच्या खेळकर वातावरणात नेमकी शरयू नाही हे जान्हवीच्या लक्षात आले आहे. ती बाकीच्या सार्‍या गप्पात रंगलेल्या पाहते आणि हळूच तिथून जिना चढून शरयूच्या खोलीत येते. तिथे कालच्या वृत्तांतात लिहिल्याप्रमाणे शरयू आपल्या नवर्‍यासमवेत रडतच फोनवर बोलत आहे. : "मला काही आता यातले सांगू नका....यापुढे तिला जवळ घेऊन बसा तुम्ही... तुम्ही मला का छळता ? समजा मी आता तिथे आले तर तुम्ही हे सगळे बंद कराल ?.." वगैरे. शेवटी तिला दु:ख अनावर झाल्यासारखे होते आणि फोन बंद करते...मागे वळते तोच तिला जान्हवी आपल्याकडे बघत आहे हे दिसते. फोनचे रहस्य तिला समजू नये म्हणून उगाचच तो फोन मोबाईल कंपनीचा जाहिरातीबाबतचा आहे असे भासविते. शरयू अपराधीपणाची भावना मनी ठेऊन गादीवरील विस्कटलेल्या चादरी उशा नीट करायचा प्रयत्न करते....जान्हवीला 'तू बस ना.." असेही म्हणते. जान्हवी तशीच उभी असल्याचे पाहून "तुला काय झालंय ?" असाही प्रश्न विचारते. ते ऐकून जान्हवी प्रतिप्रश्न करते, "तेच विचारायचे आहे मला....काय झालंय ?" शरयू तिच्या बोलण्याकडे काही लक्ष न देता आपले काम चालू आहे याचा बहाणा चालू ठेवते....जान्हवी आपले बोलणे पुढे चालू ठेवते, "छोटी आई, तुम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही काही सांगणारच नाही असे काही आहे का ?" शरयू तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहते आणि म्हणते, "तू उलटतपासणी घेत आहेस का माझी ?" जान्हवी पुढे येऊन म्हणते, "नाही छोटी आई....मला जाणून घ्यायचे आहे, तुमच्याविषयी मला काही वाटते ना, म्हणून विचारत आहे." शरयू तिच्याकडे पाहत खालच्या आवाजात उत्तर देते, "तू माझं बोलणं ऐकलंस..." "म्हणजे मी ऐकू नये असे काही बोलत होता का तुम्ही ?" शरयू आपला हेका सोडत नाही, "नाही गं...ती मोबाईल कंपनीवाले सकाळपासून त्रास देत आहेत ना त्यामुळे....." इथे जान्हवी तिला थांबविते जवळ येऊन खांद्यावर हात ठेवते, "छोटी आई, आपल्याला खोटं बोलता येत नाही, हे माहीत आहे ना ? किती त्रास होतो तुम्हाला असं खोटं बोलायला ? होतो, तर मग का बोलता तुम्ही खोटं ?" असे आवाज चढवून जान्हवी विचारते. शरयू उत्तरते, "मी काहीही खोटं बोलत नाही किंव लपवत नाही. मला काम करू दे, तू खाली जा काम कर तिथले..." जान्हवीदेखील तिथून जात नाही, उलट शरयूला म्हणते, "असं समजू या...की तुम्हाला विसरायला झाले आहे सगळे..." शरयू कॉटवर बसते, "विसरता आले असते तर खूप बरे झाले असते. खूप गोष्टी आहेत, खूप घटना आहेत, खूप दु:ख आहे....त्यातील तुला काय कळणार जानू...?" जान्हवी आग्रहाने "मग मला सांगा ना...मलाही कळू दे यातील..." इथे शरयू आपले डोळे पुसते. जान्हवीकडे पाहते, "तुला काय कळायचे...? मी तर असे म्हणेन की तू मला अती प्रश्न विचारत आहेस." जान्हवी "प्रश्न विचारू या ना...तुम्ही विचारा, मी विचारते, दोघीही उत्तरे शोधू या एकत्रितरित्या, म्हणजे प्रश्नही सुटत जातील." शरयू ठामपणे म्हणते, "मला आता काहीच बोलायचे नाही. नंतर बोलू या आपण...." जान्हवी हट्टाने म्हणते, "नंतर कधी ?" यावर फटदिशी शरयू उत्तरते, "कधीच नाही. मला जर तुला काही गोष्टी तुला सांगायच्या नसतील तर तू मला भरीला पाडू शकत नाहीस." जान्हवी आवाज हळू करत म्हणते, "मलाही इतक्या खोलवर जायला आवडत नाही, पण छोटी आई तुम्हीच मला यात अडकवलं आहे. तुम्ही माझ्याबरोबर काल होता असं तुम्ही आईआजीना सांगितलं आहे ना ?" इथे मात्र शरयू अवाक होते....आपण जान्हवीबरोबर होतो हे सांगितलं आहे याची तिला आठवण होते.

अद्यापही याच दोघी बोलत आहेत....सोमवारच्या भागातही.

मामा मस्तच as usual. मामा तुम्ही खुशना जान्हवी लीडर झाली.

चला पिंट्याने आता परत आपटेच्या नादाला लागता कामा नये, मग मीपण खुश होईन.

थॅन्क्स अन्जू...

पिंट्याच्या आताच्या संवादाने एक बाब स्पष्ट झाली की तो आपटेच्या नादाला लागणार नाही. तसेच वाईटातून चांगले काय झाले असेल तर त्या दोघांचा संवाद त्या गृहस्थाने ऐकला आहे आणि पिंट्याने दिलेल्या उत्तरावरून त्याला "गुड बॉय" म्हणत बाजूला गेला आहे. त्यानेच पिंट्याचे बिझिनेसबद्दलचे भाष्यही ऐकले आहे. याचाच अर्थ असाही होईल की खुद्द तेच गृहस्थ पिंट्याला स्वतःच्या पायावर उभे राहाण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करतील... [असा माझा अंदाज आहे.]

मुग्धटली,

सॉरी, मी कालं ऑनलाईन आलेच नाही म्हणून उशिरा प्रतिसाद देत आहे.
मी थोड्या वेळा पूर्वीच मेल वाचला. आणि लगेच प्रतिसादही पाठवलाय. इनबॉक्स चेक कर.

DHANYAVAD MAMA NEHMICHYA UPDATE SATHI
MAAYBOLIVAR NAVIN AHE
UPDATE CHHAN ASTAT AJ PRATISAD DETOY

धन्यवाद जम्बो.....

मायबोली परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत. मराठीमध्येही टंकन करण्याचा प्रयत्न करा.... प्रयत्नान्ती तेही सोपे जाईल तुम्हाला.

बेफ़िकीरजी
<<बसस्टॉपवर उभा असलेला आपटे हवेत बघून म्हणाला :माझ्यासाठी पाने आणा". त्यावर कोणीही काहीही बोलले नाही. मात्र अचानक दोन मिनिटांनंतर हवेतून आपटेच्या हातात एक पानाची पिशवी येऊन पडली. त्यातील एक पान स्वतः चघळत आपटे हवेतच बघत म्हणाला की आता एक पान तुम्ही खा. त्यावर हवेने काहीही प्रत्युत्तर दिले नाही, पण एक पान मात्र हवेत जाऊन गुडूप झाले. मग आपटे हवेला ते पान रस्त्यावर थुंकायची आज्ञा करू लागला पण हवा पान थुंकली मात्र नाही. आपटेने तीन आकडे मोजले तरी पान थुंकण्यात आले नाही. साईडला मनोज जोशी थांबलेला होता व त्याची व आपटेची स्वच्छता या विषयावरून चकमक उडालेली होती. आपटेने तीन आकडे मोजल्यानंतर मनोज जोशी विनाकारण 'गुडबॉय' असे म्हणाला.>>

पन ही हवा कोन आहे

अन्जू
<< जान्हवीच्या हाताला चव नाही ते. बिच्चारी जान्हवी एवढी धडपड करायची >>
मामा खुप चिडले आहेत त्यांना खुप राग आला आहे. Angry Angry Angry Angry

आज काल कुठला अमेरिके वरुन बराच काल घालवुन परत आलेला माणुस बेस्ट बस ने फिरतो? एक दिवस ठीक आहे, नेहेमी?

जानवि....आणि अन्जू...

"जान्हवीच्या हाताला चव नाही..." असं काही श्री थेट म्हटला नाही आपल्या आजीला.....दुसरा अर्थ आपण असा घेऊ या की ज्यावेळी जान्हवी त्याला फ्लॅटवर जाऊन जेवण तयार करून खायाला घालत नव्हती, त्या काळात बाहेर हॉटेलात जेवलेल्या जेवणाच्या प्रतीबाबत बोलत असावा....

श्री बिचारा तर आपल्या बायकोला डोक्यावर घेऊन नाचायला तयार असतो, हमेशा.

Pages