मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज महाभारताविषयी ही प्रश्नमंजूषा विचारली गेली होती एका वृत्तपत्रात...
कोणाला उत्तरे येताहेत का सर्वच्या सर्व प्रश्नांची?
Happy
१) व्यासांकडून दिव्यदृष्टी प्राप्त झालेला, महाभारतातील युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला सांगणारा त्याचा सारथी.
२) द्युतामध्ये द्रौपदी जिंकली जाणे योग्य नाही, असे स्पष्टपणे सांगणारा धृतराष्ट्राचा न्यायी पुत्र.
३) दुर्योधनाच्या सांगण्यावरून पांडवांचा काटा काढण्यासाठी ज्वालाग्राही लाक्षागृह ह्याने तयार केले.
४) पांडवाच्या विरुद्ध कपटनीतीचे धडे धृतराष्ट्र व दुर्योधनाला देणारा कुटिल राजनीतिज्ञ.
५) नकुल-सहदेवांचा मामा, पण युद्धातील कर्णाचा सारथी.
६) 'न धरी शस्त्र करी मी' असे म्हणणारा अर्जुनाचा सारथी.
७) धृतराष्ट्राचा पुत्र- जो महाभारत युद्धात पांडवांच्या बाजूने लढला.
८) अर्जुनाने ह्यास पुढे करून भीष्मांना युद्धात जर्जर केले.
९) इंद्रप्रस्थ येथील पांडवांच्या राजवाडय़ातील खास सभागृह ह्याने उभारून दिले, जिथे दुर्योधनाची फजिती झाली.
१०) न्यायी, धर्म आणि नीतिनिपुण, कुरूवंशाशी एकनिष्ठ, पांडवांचा हितचिंतक.

१) व्यासांकडून दिव्यदृष्टी प्राप्त झालेला, महाभारतातील युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला सांगणारा त्याचा सारथी.
- संजय.
२) द्युतामध्ये द्रौपदी जिंकली जाणे योग्य नाही, असे स्पष्टपणे सांगणारा धृतराष्ट्राचा न्यायी पुत्र.
- विकर्ण
३) दुर्योधनाच्या सांगण्यावरून पांडवांचा काटा काढण्यासाठी ज्वालाग्राही लाक्षागृह ह्याने तयार केले.
- पुरोचन.
४) पांडवाच्या विरुद्ध कपटनीतीचे धडे धृतराष्ट्र व दुर्योधनाला देणारा कुटिल राजनीतिज्ञ.
-कणिक / कणक असे काहीसे नाव असलेला एक सल्लागार होता.
५) नकुल-सहदेवांचा मामा, पण युद्धातील कर्णाचा सारथी.
- शल्य.
६) 'न धरी शस्त्र करी मी' असे म्हणणारा अर्जुनाचा सारथी.
- श्रीकृष्ण.
७) धृतराष्ट्राचा पुत्र- जो महाभारत युद्धात पांडवांच्या बाजूने लढला.
- युयुत्सु
८) अर्जुनाने ह्यास पुढे करून भीष्मांना युद्धात जर्जर केले.
- शिखंडी.
९) इंद्रप्रस्थ येथील पांडवांच्या राजवाडय़ातील खास सभागृह ह्याने उभारून दिले, जिथे दुर्योधनाची फजिती झाली.
-मयासुर.
१०) न्यायी, धर्म आणि नीतिनिपुण, कुरूवंशाशी एकनिष्ठ, पांडवांचा हितचिंतक.
- विदुर.

गेले काही दिवस व्यस्त होतो. बरेच लिहायचे होते, जमले नव्हते. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या.

*****

ये द्रुपद का चक्रव्यूह है ....द्रुपद का चक्रव्यूह !!! Happy Happy Happy
भेदलं ते चक्रव्यूह शेवटी एकदाचं !

******

शिखंडी बद्दल:

गोपाल निलकंठ दांडेकरांच्या "श्री महाभारत" या पुस्तकात असे लिहिले आहे की:
अंबा भीष्माला सांगते की तिने मनातून "शाल्व" याला आधीच वारले आहे. मग भीष्म तिचे ऐकून तिला शाल्वाकडे परत पाठवून देतो. असे जर असेल तर मग शंकराचा हस्तक्षेप, परशुराम- भीष्म लढाई याबद्दल काय?

सी. राजगोपालाचारी यांच्या इंग्रजी महाभारत पुस्तकात लिहिले आहे की:
शिखंडी: (द्रुपद चा मुलगा) एक स्त्री जी नंतर माणसात रुपांतरीत होते आणि पांडवाच्या सैन्यात दाखल होवून सैन्याला शिस्त लावते. पांडवांच्या बाजूने लढते.

कृष्ण:
आज बहुतेक कृष्ण धमाकेदार एन्ट्री मारतोय असे दिसते.
आणि कृष्णाचे बालपण दाखवतील की नाही?
काही कल्पना नाही. कुणाला माहिती आहे का?
बरं, कुणाला कृष्णाच्या बासरीचा छान रिंगटोन हवा आहे का??
मला इमेल करा ! (sonar.nimish@gmail.com)
मी attach करून पाठवेन ....

डाउनलोड:
खाली दिलेल्या लिंक वर महाभारतातले बहुतेक पार्श्वसंगीत मिळतील:
freedownloadmobileringtones.com
यापलीकडे कुणाला एखादी या महाभारतातल्या सगळ्या प्रकारच्या संगीत डाउनलोड करण्यासाठी वेबसाईट माहिती असेल तर येथे सांगावी.

पुस्तके ? :
मराठीत महाभारतावर कोणकोणती पुस्तके आहेत?
मला भले मोठे १३/१४ खंड माहिती आहेत पण ते वाचायला वेळ लागेल.
एखादे एकच विश्वासार्ह पुस्तक आहे का ज्यात बहुतेक पूर्ण कथा कव्हर झाली असेल?

अर्जुनाबद्दल:
अर्जुनाची भूमिका करणारा अभिनेता थोडा जास्त handsome बहुतेक याकरता घेतला असेल की त्याला पुढे बृहन्नडा चे काम करायचे आहे. ....

नंदिनी यांच्या म्हणण्याप्रमाणे:

आजचा एपिसोड बघायला मजा आली. पाचही पांडव पहिल्यांदा लढत होते. आणि नकुल सहदेव शोपीससारखे नुसते उभे राहत नाहीत. नकुलचा घोड्यांशी बोलण्याचा युद्धातला वापर पण आवडला.

अर्जुन क्युट आहे!!!!

अगदी बरोबर. माझ्या मनातले लिहिलेत .
प्रथम वाटत होते पांडव अगदीच नेभळट आहेत. पण युद्धात त्यांनी खरा पराक्रम दाखवला.

फक्त एक खटकते. युधिष्ठीर ला संवाद हवे तितके दिले नाहीत.
कदाचित नंतर वेळ आल्यावर तो बोलेल सुद्धा !!

****
चला तयार रहा कृष्णाच्या प्रवेशाला !!!

आणि प्रतिक्रिया देत राहा.

अंबा भीष्माला सांगते की तिने मनातून "शाल्व" याला आधीच वारले आहे. मग भीष्म तिचे ऐकून तिला शाल्वाकडे परत पाठवून देतो. असे जर असेल तर मग शंकराचा हस्तक्षेप, परशुराम- भीष्म लढाई याबद्दल काय? >>>> पण शाल्व आता तिला स्वीकारत नाही. त्यामुळे ती परत भीष्माकडे येऊन म्हणाते आता तूच माझ्याशी लग्न कर. तेही होत नाही त्यामुळेच तर तो परशुराम वगैरे एपिसोड घडतो. पुढे मग पुढच्या जन्मी परत येऊन बदला घेण्याचे ठरवून अंबा अग्नीत प्रवेश करते. नंतर शिखंडिनी म्हणून जन्माला येते.

हे महाभारत पाहून काही प्रश्नः
परंपरा महत्वाची की विदुराने सांगितलेला बदलणारा धर्म? नि कोण ठरवणार धर्म कुठला खरा?
दुर्योधनाने ठरवले की माझ्या मनातील महत्वाकांक्षा, इच्छा काही करून पूर्ण करणे हा माझा धर्म नि मी तसा वागणार, कर्णाने सांगितले की दुर्योधनाचे आदेश पाळणे हा माझा धर्म नि मी तसे वागणार!

नि अंबेने, गांधारीने असे काय पाप केले म्हणून त्यांना धर्माने वागणार्‍या लोकांच्या वागण्याने त्रास व्हावा?

आपल्या धर्मात कुणि सुप्रिम कोर्ट किंवा पोप नाही.

अर्जुनाचे संवाद डब करायला हवेत. कालयवनचा कालय-वन केला. पौराणिक मालिकेत डिक्शन चेक करायला एक माणूस परवडत नाही?

हो ना. डिक्शन नीट असायला हवे.
पण एपिसोड अगदीच छान होता आजचा.
लाजवाब!
गोविंदा आला रे आला !!

*****
या महाभारताची लोकप्रियता कैश करून बोलीवूड वाले "महाभारत" एनिमेशन ३ डी चित्रपट २७ डिसेंबरला रिलीज करत आहेत.
अमिताभ भीष्म
सनी देओल भीम Happy दुर्योधन SSSSS अशी मोठ्ठी आरो-SSSSS-ळी मारतो तो ...
अनुपम खेर म्हणजे आपले शकुनी Happy
आपले २४ वाले अनिल भाई तेथे कर्ण होणार आहेत.
आणि ओळखा बरे द्रौपदी कोण ??

कुणी अमान खान आहे म्हणे दिग्दर्शक !!

या महाभारताची लोकप्रियता कैश करून बोलीवूड वाले "महाभारत" एनिमेशन ३ डी चित्रपट २७ डिसेंबरला रिलीज करत आहेत.<<< त्याच्याही खूप आधीपासून या महाभारत अ‍ॅनिमेशन मूव्हीवर काम चालू होते. मेगाबजेट मूव्ही आहे तो.

ट्रेलरमधे सनी पाजी "दुर्योधन" असे ओरडतात, ते पाहून चित्र्पट पैसावसूल असेलहे समजलंय. द्रौपदी विद्या बालन आहे.

कृष्ण कोण आहे ते ओळखा!!!

आज टीव्हीवरल्या महाभारतामधे कृष्णाची एन्ट्री आवडली. सही सीन होता तो.

पौराणिक मालिकेत डिक्शन चेक करायला एक माणूस परवडत नाही?<<< एका मुलाखतीमधे डिक्शन वर किती काम केलं ते अर्जुन सांगत होता. प्रत्यक्षात काय ते दिसतंयच.

मागे पण म्हटलं होतं या लोकांचे उच्चाराचे जाम घोळ आहेत. ती कुंती तर राखी असल्यागत बोलते. कर्ण, युधिष्ठीर वगैरे शब्द तिच्या तोंडून ऐकवत नाहीत.

किती ग गोड तो श्रीकृष्ण... अगदी मनातल्या प्रतिमेसारखा शुरवीर, बुद्धिमान, खटयाळ, मिश्किल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दैवी श्रेष्ठ पुरुष Happy

मी आताच युगान्त हातावेगळे केलेय.
मालिका काही नियमित पाहिलेली नाही. आजच्या भागावरून वाटले की कृष्ण-अर्जुन यांची पहिली भेट अजून झालेली नाही. त्याआधीच अर्जुन-सुभ्रद्रा यांची भेट झाली. द्रौपदी स्वयंवर झाले की व्हायचेय?

काल युधिष्ठिराला युवराज म्हणुन अभिषेक करताना बॅकग्राउंड म्युझिक म्हणुन जो श्लोक चालु होता. "ओम राजाधिराजाय" ... अहाहा काय अप्रतिम चाल दिली आहे त्याला... मी तर तो श्लोक ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा तो भाग रिपीट पाहिला. तसेच युधिष्ठिर ज्यावेळी मुकुट धारण करुन उभा राहतो तो शॉट देखील मस्त घेतला आहे. जुन्या राजाच्या समोर भविष्यातील नविन राजाचा उदय झाला असे वाटत होते. युधिष्ठिर रंगीत कमळाची माळ, सोनेरी नक्षीदार राजवस्त्र, सुंदर राजमुकुट यामध्ये अगदी छानच वाटत होता.

या महाभारतात श्रीकृष्णाची रुक्मिनी बहुतेक पल्लवी सुभाष बनणार आहे.

कृष्ण हाताला लावलेल्या आलत्यासहीत इतका देखणा दिसला काल! संभवामि युगे युगे म्हणाला तेव्हा अगदी पौराणिक पोस्टर्स वरच्या सारखा पर्फेक्ट दिसत होता Happy
त्या मानाने सुभद्राचे फेसिंग फार मॉडर्न वाटले मला. अर्जुनापेक्षा जरा मोठीच वाटतेय. द्रौपदीबद्दल तीच भिती आहे मला फोटोत बघून तरी. कारण हा अर्जुन फारच पोरगेला आहे दिसायला.

अजून द्रौपदीच जन्मायचीय Lol

मी हल्ली बुकगंगावर पुस्तके चाळताना एक पुस्तक बघितले बहुतेक ते द्रोपदीला मुख्य पात्र ठेउन लिहीले गेले आहे. त्यात लेखकाचे मत आहे कि द्रोपदी यज्ञात जन्मली त्यावेळी ती तरुण नव्हती तर ती लहान बाळच होती. अर्जुन व द्रोपदीमध्ये जवळ जवळ १६ वर्षाचे अंतर होते. ऐकावे तेवढे नवलच.

सुभद्रा जर द्रौपदीपेक्षा मोठी होती आणि अर्जुन- सुभद्राची आधीपासून ओळख होती तर अर्जुनाचे आधी द्रौपदीशी लग्न आणि मग सुभद्राशी, त्याकाळी मुलींची लवकर लग्न व्हायचीना, मग सुभद्राचे लग्न लांबले कसे काय?

मलापण वाटते पहिल्यापासून ही सुभद्रा त्या क्युट अर्जुनाला शोभत नाही, थोराड वाटते त्याच्यापेक्षा.

अर्जुन फारच क्युट आहे. Happy सुभद्रा आज त्याला सरळ सरळ लग्नाचं विचारते हे पाहताना झक्कींची या धाग्यवरची कमँट आठवली.

आजच्या त्या कृष्णाच्या एंट्री सीनचा किंवा कालचा मैत्रेयीने सांगितलेल्या पोझमधला फोटो नेटवर कुठे आला तर मला सांगा प्लीज.

सुभद्रा जर द्रौपदीपेक्षा मोठी होती आणि अर्जुन- सुभद्राची आधीपासून ओळख होती तर अर्जुनाचे आधी द्रौपदीशी लग्न आणि मग सुभद्राशी, त्याकाळी मुलींची लवकर लग्न व्हायचीना, मग सुभद्राचे लग्न लांबले कसे काय? <<<<<<<<

बात मे दम है... मला वाटते सुभद्रादेखील वयाने लहानच असेल व सुभद्रा-अर्जुनचे जे काही प्रसंग दाखवत आहेत. ते सर्व उगाचच अ‍ॅड केले असतील.

नसायला काय झालं? महाभारतातलं एक तरी लग्न धड आहे?<<< अहो ती लग्नं कुठे आहेत? आयदर स्वयंवरे नाहीतर पळवापळवी! अगदीच नाही जमले तर द्यूतबित!

अर्जुन खरंच क्युट आहे ह्या महाभारत मधला . कृष्णाची आत्या म्हणजे कुंती नं , मग अर्जुन ची सुभद्रा मामेबहीण.
ती सुभद्रा खूप मोठी वाटते वयाने.

ही द्रौपदीची एक पेटंट पायात अंतर पोझ आणि एक क्लोजप - मोठी दिसतेय की नाही अर्जुनापेक्षा?! Happy
draupadi.jpg

नंदिनी, कृष्णाचा त्या पोझ मधे दिसला नाही फोटो कुठे.

Pages