मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो शकुनीमामा बहिणीच्या माहेरी का रहात असतो हे मला कधी कळले नाही. काय आहे त्यामागची कथा? त्यानेच तर कौरवांना लहानपणापासुन महाभारताकडे खेचले म्हणावेसे वाटते (द्वेष रुजवुन).

सुनिधी, तेव्हा तशी प्रथा होती म्हणे.

कर्ण आपला मुलगा आहे कुंतीला खूप आधी-म्हण्जे जेव्हा त्याला अंगराज बनवलेलं असतं तेव्हाच समजलेलं असतं ना?

आजचा एपिसोड बघायला मजा आली. पाचही पांडव पहिल्यांदा लढत होते. आणि नकुल सहदेव शोपीससारखे नुसते उभे राहत नाहीत. नकुलचा घोड्यांशी बोलण्याचा युद्धातला वापर पण आवडला.

अर्जुन क्युट आहे!!!!

अर्जुन खरंच क्युट आहे. त्याला नायिकापण तशाच क्युट दयायला हव्यात, मला सुभद्रा नाही पटली.

शिखंडी मुलगी म्हणून जन्माला येते आणि नंतर पुरुषात रुपांतर होते, अशी काहीतरी स्टोरी आहेना?

पण ते पाच द्रुपद नि कृष्णाने दिलेल्या दगडांमुळे अर्जुनाला कळते वगैरे प्रकार काही भावले नाहीत. उगीचच काहीतरी!

कर्ण आपला मुलगा आहे कुंतीला खूप आधी-म्हण्जे जेव्हा त्याला अंगराज बनवलेलं असतं तेव्हाच समजलेलं असतं ना
, जेंव्हा कुंति हस्तिनापुरात पंडू बरोबर येतअसते तेंव्हा तिला कर्ण दिसतो, तेंव्हाच तिच्या मनात काहीतरी येते नि नंतर जेंव्हा कर्ण अंगराज झाल्यावर महालात येतो नि कुंतीला कमळाची फुले देतो तेंव्हा तिची खात्री पटते असे या महाभारतात दा़खवले आहे.

खर्‍या महाभारतात तिला हे केंव्हा कळते माहित नाही.
तो शकुनीमामा बहिणीच्या माहेरी का रहात असतो तुम्हाला सासरी म्हणायचे आहे का? तो सांगतो की बहिणीवरील अपार प्रेमामुळे नि कुरुकुलाचा नाश करण्याच्या हेतूने तो तिथे रहातो. पण त्याचे आई वडील त्याला सांगत नाहीत का की बाबा रे तू युवराज आहेस आपल्या राज्यात रहा तिथे तुझी काही कर्तव्ये आहेत! निदान उद्घाटन, बक्षीस समारंभ तरी!

तशी काही प्रथा असल्याचे ऐकीवात नाही. असेल तर कठीणच! म्हणजे बायको केली की तिच्या भावाला फुकट घरात रहायला आणायचे? निदान त्याला काही नोकरी धंदा तरी करायला लावतात की नाही? की फुकटचेच गिळायला? म्हणजे भीष्माचे ठीक आहे., मोठ्ठा रा़अवाडा होता नि चिक्कार पैसे होते. सामान्य माणसांनी काय करायचे? अहो आजकाल तर स्वतःच्या बायकोला सुद्धा नोकरी करायला लावतात! उगाच बायकांच्या डोक्यात भरवून दिले करियर वगैरे, नि नोकरी करायला लावले! त्याहि खुळ्याच. मा़झे काही करियर नाही म्हणायचे नि गप्प घरी बसून खायचे ते सोडून फुकट तडफडत कुठेतरी जाऊन काही तरी करायचे! बरी अद्दल घडली!!
Light 1

सामान्य माणसांनी काय करायचे? अहो आजकाल तर स्वतःच्या बायकोला सुद्धा नोकरी करायला लावतात! उगाच बायकांच्या डोक्यात भरवून दिले करियर वगैरे, नि नोकरी करायला लावले! त्याहि खुळ्याच. मा़झे काही करियर नाही म्हणायचे नि गप्प घरी बसून खायचे ते सोडून फुकट तडफडत कुठेतरी जाऊन काही तरी करायचे! बरी अद्दल घडली!!>>
झक्की, तुमच्या तीव्र भावना पोहचल्या. Happy

कर्ण आपला मुलगा आहे कुंतीला खूप आधी-म्हण्जे जेव्हा त्याला अंगराज बनवलेलं असतं तेव्हाच समजलेलं असतं ना?>> तेच तर काहीही आहे. ज्या महाभारत कथा वाचल्या आहेत, त्यात कर्णच आपला मुलगा आहे हे खुद्द युद्धाच्या आधी कृष्ण तिला सांगतो तेव्हाच तिला समजतं असं वाचलं आहे. तसंच, आपल्या बाळाचं नाव ती कर्ण ठेवते हे एक ठीक. पण अधिरथाच्या कर्णात कोणी सांगितलं होतं, की या बाळाचं नाव कर्ण आहे ते? त्यानेही तेच कसं कन्टिन्यू केलं हिला कळायला? Proud हेच उगाचचे ईमोशनल ड्रामे आहेत.

बाकी सुदेश बेरीचं कर्कश्श ओरडणं एकदा ऐकलं आणि नंतर म्यूट केलं. तसंच 'तुम्हे यकीन है कि मैं ही पांचालराज 'धृ'पद हूं' हे वाक्य कितीदा? Uhoh चक्रव्यूहाचे सीन्सही खूप रिपिट झाले.

कृष्णाला गायबच करून टाकलंय Sad

पूनम, नक्की कुठे वाचलंय ते माहित नाही. पण त्या परीक्षेच्या वेळेला जेव्हा कर्ण अर्जुनाला आव्हान देतो तेव्हाच कुंतीला हा आपला मुलगा असलेलं समजतं (त्याच्या कवच कुंडलांमुळे) तिला ते माहित असूनही ती जाहीर करत नाही, कारण एक मुलगा अनौरस आहे असं समजलं तर आपोआप इतर पाच पांडवांच्या औरसपणाबद्दल देखील शंका उभी राहील. तीच कृष्णाला तो आपला मुलगा आहे हे युद्धाआधी सांगते (नाहीतर कृष्णाला तरी कुठून कळणार आहे ही भानगड?)

सुदेश बेरीच्या सीन्सनी फार वैताग दिला.

कृश्णाच्या एन्ट्रीला तीन चार एपिसोड वाया घालवतीलच हे लोक.

तेच तर काहीही आहे. ज्या महाभारत कथा वाचल्या आहेत, त्यात कर्णच आपला मुलगा आहे हे खुद्द युद्धाच्या आधी कृष्ण तिला सांगतो तेव्हाच तिला समजतं असं वाचलं आहे. तसंच, आपल्या बाळाचं नाव ती कर्ण ठेवते हे एक ठीक. पण अधिरथाच्या कर्णात कोणी सांगितलं होतं, की या बाळाचं नाव कर्ण आहे ते? त्यानेही तेच कसं कन्टिन्यू केलं हिला कळायला? फिदीफिदी हेच उगाचचे ईमोशनल ड्रामे आहेत.>>>
+१

त्या कर्ण -कुंतीच्या राजवाड्यातल्या सीनमध्ये तर कुंती कुठल्याही क्षणी 'आ आ आ आ आऽऽऽ कभी खुशी कभी गमऽऽऽ...' म्हणेल असे मला वाटत होते. Proud

त्या कर्ण -कुंतीच्या राजवाड्यातल्या सीनमध्ये तर कुंती कुठल्याही क्षणी 'आ आ आ आ आऽऽऽ कभी खुशी कभी गमऽऽऽ...' म्हणेल असे मला वाटत होते. फिदीफिदी>> अगदी अगदी.

कृष्‍ण गायब असल्यामुळे मध्ये मध्ये होणारं रिफ्रेशिंग बंद झालंय. कृष्‍णाचा मिनिटभराचा संदेश ऐकताना छान वाटतं. कृष्‍णाच्या तोंडी आताच इतके दर्जेदार संवाद दिले आहेत, तर गीतेचं तत्त्वज्ञान सांगताना कसे डायलॉग्ज असतील, याची आता उत्सुकता आहे.

महाभारताविषयी अजुन काही जाणुन घ्यायचे असेल तर खालील काही ब्लॉग्स व वेबसाईट्स नक्की पहा :-

१. श्री.प्रभाकर फडणीस यांनी महाभारतावर लिहीलेला हा ब्लॉग पहा
www.mymahabharat.blogspot.com

2. महाभारत की अनसुनी कहानियाँ- हिंदी
http://www.speakingtree.in/spiritual-slideshow/seekers/mysticism/content...

३. पीडिएफ फॉरमॅटमधील महाभारत - इंग्रजी
http://www.holybooks.com/mahabharata-all-volumes-in-12-pdf-files/

४. http://www.bharatadesam.com/spiritual/mahabharata/

झक्कीकाका, मी बी आर चोप्रांच महाभारत पाहिलय हो आधी.

ह्याच्यात अचानकच द्रुपदाला जास्तीच फुटेज आणि सोबत एक युद्ध भुमीवर स्त्री बघुन कन्फ्युजलो.

कर्ण आपला मुलगा आहे हे कुंतीला आधीच कळते, आधीच्या महाभारतातपण कर्णाच्या एन्ट्रीलाच कळते असे दाखवले आहे, त्याची कवचकुंडले आणि कर्णफुले बघून तिच्या लक्षात येते हा आपला मुलगा आहे.

झकासराव,
तुमचे बरोबर आहे, माझे चुकले.
ज्यांना महाभारत माहित आहे त्यांनाच प्रश्न पडेल की ही स्त्री इथे कुठून आली? कारण शिखंडी बाह्य शरीराने पुरुष होता असेच सगळीकडे होते.

आता शेवटच्या कुरुक्षेत्रावरील युद्धात ती स्त्री पण येणार का? धन्य, धन्य!
बहुधा स्त्री-मुक्ति चळवळीचा परिणाम! स्त्री पण लढणारी दाखवा नाहीतर मनसे किंवा संभाजी ब्रिगेडसारख्या प्रोफेशनल गुंडांना मदतीला घेऊन तुमचा स्टुडियो जाळून टाकू अशी धमकी दिली असणार! Light 1

खर्‍या महाभारतात जेव्हा पांडव आणि कौरव गुरुकुलातून परत आल्यावर शक्तिप्रदर्शन करत असतात, तेव्हा कर्ण अर्जुनाला आव्हान द्यायला येतो. त्यावेळी त्याची कवच - कुंडले पाहुन कुंती त्याला ओळखते.

युद्धाच्या आधी कुंतीच कर्णाला एकांतात सांगते की तो तिचा मुलगा आहे आणि त्यावेळी कर्ण तिला वचन देतो की जरी मला अर्जुनाखेरीज ४ पांडवांना मारणे शक्य झाले तरीही मी फक्त अर्जुनालाच मारीन, जेणे करुन तुझे ५ च पुत्र जिवंत राहतील. इतर ४ पांडव आणि अर्जुन किंवा कर्ण!

घ्या आता द्रोणाचार्यांनी राजा द्रुपदाचा अपमान केला. त्याला मुलगा नाही तर स्वतःच्या मुलाला मुलगा मानुन त्याला राज्य करु दे चा फुकटचा सल्ला दिला. आता राजा पुन्हा यावर सुड घेण्यासाठी स्वतःला या वयात मुलगा कसा होईल याचा विचार करतोय. मग पुढे तो यज्ञ करेल व त्यातुन तरुण वयातले स्त्री-पुरुष राजाची मुलं म्हणुन बाहेर येतील. मजा आहे कि नाही. कोणीतरी असे यज्ञ कसे करायचे याची डिटेलवार कृती लिहुन ठेवली असती तर आताच्या काळात उपयोग झाला असता. लोकांनी स्वतःला हवे तेव्हा यज्ञ करुन तरुण वयातील मुलगा-मुलगी ( स्पेशली मुलगाच बरे का) जन्माला घातले असते. लोकांचा लहानपणापासुन मुलांवर होणारा खर्च आणि बायकांचा बाळाला नउ महिने सांभाळायचा त्रास वाचला असता. भारताचे नाव दशदिशात पसरले असते. अमेरिकेने यावर अजुन संशोधन करुन पेटंट घ्यायचा प्रयत्न केला असता.

यशस्विनी, आता राजा द्रुपद जो यज्ञ करतो त्यापासून दृष्टद्युम्न आणि द्रौपदी येतात. द्रुपद द्रौपदीच्या स्वयंवराचा पण मुद्दाम धनुष्य कौशल्यावर लावतो कारण त्याला असा वीर हवा असतो जो त्याच्या अपमानाचा बदला घेईल. (अ‍ॅन्ड गेस, हू विन्स द्रौपदी?)

द्रोणाचे काम करणारा एकमेव अभिनेता द्रुपद असा उच्चार करतोय. बाकीच्यांनी धृपद करून टाकलंय.

मी त्या "महाभारत कि अनसुनी कहानिया" या वेबसाईटवर वाचले कि दृष्टद्युम्न हा आधीच्या जन्मातला एकलव्य होता. द्रोणाचारयाने एकलव्याला स्वतःहुन विदया न देता उलट तो जे काही इतर राजकुमारांना शिक्षण देताना बघुन शिकलेला त्याची गुरुदक्षिणा म्हणुन त्याचा अंगठा मागितला त्या कर्माचे फळ म्हणुन दृष्टद्युम्न नविन जन्मात द्रोणाचार्यांकडुन ऑफिशियल शिक्षण घेतो व शेवटी त्यांनाच युद्धात मारुन स्वतःचा मागील जन्मातील व पिता द्रुपदाच्या अपमानाचा बदला घेतो. खखोदेजा.

अशी माहिती दिली आहे :-

एकलव्य देवाश्रवा का पुत्र था। वह जंगल मैं खो गया था और उसको एक निषद हिरण्यधनु ने बचाया था। एकलव्य रुक्मणी स्वंयवर के समय अपने पिता की जान बचाते हुए मारा गया. उसके इस बलिदान से प्रसन्न होकर श्री कृष्ण ने उसे वरदान दिया की वह अगले जन्म मैं द्रोणाचर्य से बदला ले पायेगा। अपने अगले जन्म मैं एकलव्य द्रष्टद्युम्न बनके पैदा हुआ और द्रोण की मृत्यु का कारण बना।

अपने अगले जन्म मैं एकलव्य द्रष्टद्युम्न बनके पैदा हुआ और द्रोण की मृत्यु का कारण बना।>>
आयला, कोण कुणाचा बदला घेतंय, कोण कुणावर अन्याय करतंय, काही कळेनासं झालंय. कोण कोण (आणि किती) लोक पुन्हा जन्म घेऊन एकमेकांचा बदला घेताय समजतच नाही. व्यासांना खरंच विनम्र अभिवादन करावं लागेल, त्यांनी एवढी पात्र लिहून ठेवली आणि त्यांची गुंतागुंतही व्यवस्थित सोडवली आहे.

व्यासांना खरंच विनम्र अभिवादन करावं लागेल, त्यांनी एवढी पात्र लिहून ठेवली आणि त्यांची गुंतागुंतही व्यवस्थित सोडवली आहे.<<<< +१

मला महाभारत म्हणजे प्रत्येकाच्या मनातील विविध वासना, इच्छा, प्रबळ महत्त्वाकांक्षा त्याच्या पुर्ततेसाठी केलेला जीवघेणा संग्राम, सुडनाटय यांचा न संपणारा प्रवास वाटतो. सर्वजण एकमेकांशी ऋणानुबंधाने बांधले गेले आहेत. प्रत्येकजण आपल्यावर झालेला अन्यायाचा, अपमानाचा बदला घेत आहे.

आजकाल कृष्ण रजेवर आहे वाटते.

बाकी जे चालले आहे त्यात सांगण्यासारखे काय? जंगलातले पशू जसे एकमेकांविरुद्ध लढतात तसेच जर माणसेहि करू लागली, तर काय बोलायचे! त्यावरुन काय शहाणपणा शिकणार?

तसेहि यापुढे जे जे घडते त्याबद्दल असे करू नये एव्हढेच म्हणण्याजोगे आहे. पार गीता सांगण्यापर्यंत. आता उगाच काही प्रसंग घुसडून त्याला आणायचे त्याचा खर्च तरी वाचेल.

Wow mondaypasun Krishnachi entry aahe watte....my most favourite character

येस्स्स्स!!! सोमवारी म्हणत म्हणत शुक्रवारपर्यंत एन्ट्री होइल कृष्णाची. मला तो विष्णु असल्यापासूनच आवडत होता. कृष्ण म्हणून अधिकच आवडलाय. Happy

आजच्या एपिसोडमधे अर्जुन धृतराष्ट्र आणि कुंती गांधारीमधले संवाद आवडले.

कृष्ण प्रथम प्रवेशाची तयारी करत असेल. तो मुलगा दिसतो गोड. आता बाकी सोमवारी कळेल.
हो झक्की, 'सासरी' असेच लिहायचे होते. द्रोणाचे डोळे काय भेदक आहेत. त्याला आधी पाहिले आहे. महाभारत म्हणजे बदला व वेदना, दु:ख. कोणीच सुखी नाही त्यात.

पौर्णिमा, कुंतीला माहीत असते गं कवच कुंडलांमुळे. कर्णाला युद्धाच्या आधी कळते, कृष्ण सांगतो..कर्ण नाव अधिरथानेच ठेवले असेल.
चांगली चाललिये मालिका..

द्रुपदाशी कुठली ही लढाई!? मला माहीत नव्हती...

Mala ajibat nahi athvat ahe... :/

Shalet astana mahabharatache khand vachle hote.. ata matra mrutyunjay madhlech athvtay! Happy

आज कृष्‍णाची कथेत एंट्री होतेय. बाकी आतापर्यंत बिचार्याला एकट्यानेच डायलॉग म्हणावे लागत होते. आजपासून तो इतरांशीही बोलेल..

Pages