मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक आदिवासी स्त्री आणि तिचे पाच मुलगे यांना पाहुणे म्हणून ठेवून घेतात. लाक्षागृहात हे लोक जळून मरतात आणि कौरवांना पांडव मेले असेच वाटते. <<<<<<<<

मी देखील अशीच कथा वाचली आहे. या सिरियलमध्ये त्यांना अगदी शेवटच्या क्षणी कळते कि आपल्याला आग लाउन मारणार आहेत. ते जरी लपुन पळुन गेले तरी जोपर्यंत त्यांचे शव कौरवांना मिळत नाही तो पर्यंत कौरव मान्य करणार नाहीत कि पांडव जळुन मेले.

वाचलेल्या कथेत आदिवासी व तिच्या पाच मुलांना लाक्षागृहात ठेवायची कल्पना कुंतीची असते. ज्याच्या फलस्वरुप कुंतीचा मृत्यु देखील वानप्रस्थाश्रमात धृतराष्ट्र, गांधारीसोबत जंगलात आगीत होळपळुन होतो.

महाभारतात प्रत्येक पात्राला त्याने केलेल्या चांगल्या वाईट कामाचे फळ कोणत्या ना कोणत्या प्रकारे भोगावेच लागले आहे. श्रीकृष्णदेखील त्याला अपवाद नाही.

कालचा कुंती अर्जुनचा संवाद आवडला.

नो डाऊट, सलिम खान टच!!!

अर्जुन महाशय कधीच हिंदी शिकलेले नाहीत, त्यामुळे त्यांना डिक्शनचे ट्रेनिंग वर्षभर दिले होते म्हणे.

पण त्या सलीम जावेद टचमध्ये पांडवांवर कसलाही डाग नाही, कर्ण सुद्धा अगदी चागल्या मनाचा, परिस्थितीमुळेच काय तो वाईट झालेला असे दाखवले तर महाभारतातली कॉम्प्लेक्सिटी निसटेल.
ऑडियन्सच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि ग्रहणशीलतेबद्दल थोड्या जास्त अपेक्षा ठेवायला हव्यात.

पांडवांत एकटा भीमच बरा वाटतोय. धर्म कळकट आहे.टाइम लीपनंतर अर्जुन बदलला तर बरे आहे.
द्रौपदीच्या येण्याची वर्दी दिली गेली आहे. यज्ञातून तरुण द्रौपदीच बाहेर पडणार आहे.

यज्ञातून तरुण द्रौपदीच बाहेर पडणार आहे.<< हो! ती तशीच बाहेर येते. इरावती कर्व्यांच्या पुस्तकामधे यब्बदल एकदम सुंदर लिहिलेलं आहे.

भरत, बी आर चोप्राच्या महाभारतामधे पण हेच केलं होतं. सगळ्या पात्रांची तितकी ग्रे मानसिकता पचणं भारतीयांना तसंही शक्य नाही. "आमच्या धार्मिक भावना दुखावल्या" म्हणून गळे काढले जातील लगेच.

महाभारतात प्रत्येक पात्राला एक स्टोरी आहे ना. काहीतरी इतिहास, दुश्मनी, पुर्वजन्माची कथा वगैरे.

त्या नकुल-सहदेवांना काहीच काम नाहीय का? त्यांची स्पेशल अशी कथा जशी भीमासाठी बकासूर वध, अर्जुनासाठी मारुती युद्ध, सुभद्राहरण, वगैरे. धर्मालादेखील यक्षाच्या प्रश्नांची कथा आहे. दु:शासनाला पण दुर्योधनाला असिस्ट करण्याबरोबर वस्त्रहरनात काम दिले आहे.

पण हे नकुल-सहदेव नुसते राखीव खेळाडूंसारखे का असतात? त्यांची स्वत:ची काही कथा, व्यक्तिमत्व वगैरे आहे की नाही?

नकुल-सहदेव नुसते राखीव खेळाडूंसारखे का असतात? त्यांची स्वत:ची काही कथा, व्यक्तिमत्व वगैरे आहे की नाही?
<<<<<<

भीम-अर्जुनासारखे रथी-महारथी मोठे भाउ असल्यामुळे हे लहान भाउ लहान भाउ म्हणुनच जास्त वावरलेत. ते काही विचार किंवा काम करु शकतील त्या आधीच युधिष्ठिर सल्ला देतो व भीम-अर्जुन कार्यवाही करतात. बाकी त्यांच्याविषयी कथा म्हणाल तर ते देवांचे वैदय अश्विनीकुमार यांचे पुत्र असतात. जे बहुतेक जुळे असतात. त्यातील नकुल सर्व भावांमध्ये सुंदर असतो व त्याला मुक्या प्राणी-पक्ष्यांची भाषा कळते. तर सहदेवास भविष्य ज्ञान/ आभास होतो.

सगळ्या पात्रांची तितकी ग्रे मानसिकता पचणं भारतीयांना तसंही शक्य नाही >> नंदिनी +१००.
अगदी ऑफीसमध्ये चर्चा करताना इथे पांडवांच चुकल , इथे कौरव बरोबर होते अस म्हटल तरी सगळी असे अगदी काहीतरी गुन्हा केल्यासारखे पाहतात .
महाभारत ही माणसांची कथा आहे हेच लोकांच्या मुळी लक्षात येत नाही .

मैत्रेयी, +१. "युधिष्ठीराकडून" तेच अपेक्षित असावं बहुतेक Happy

या महाभारतात दुर्योधनाला एक तरी रोम्यान्टिक सीन द्यायला पाहिजे Happy

सध्या सगळ्यात बेकार युधिष्ठिर चा अभिनय आहे. काहीही धक्कादायक घडले तरी चेहर्‍यावरची माशीही हलत नाही <<<<<<<

नाही हा त्याला बेकार अभिनय नाही म्हणायचे त्याला किती तो स्थितप्रज्ञ चेहरा ठेउन राहतो असे म्हणायचे Lol

या महाभारतात दुर्योधनाला एक तरी रोम्यान्टिक सीन द्यायला पाहिजे
<<<<<<<<<

जो दुर्योधन बनला आहे त्याला अर्जुन केले असते तर त्याचे कितीतरी रोमँण्टिक सीन बघायला मिळाले असते.

बायदवे, त्या द्रौपदी जन्माचे प्रोमो दाखवतायत सारखे, त्यात तो द्रुपद म्हणतो "मुझे ऐसी बेटी चाहिये, जिसे सारी अपवित्रता प्राप्त हो लेकिन दुनिया उसे सबसे पवित्र कहे " (??) हे मला काही कळले नाही ! म्हणजे काय नक्की???

अगदी ऑफीसमध्ये चर्चा करताना इथे पांडवांच चुकल , इथे कौरव बरोबर होते अस म्हटल तरी सगळी असे अगदी काहीतरी गुन्हा केल्यासारखे पाहतात .
असेच असते. एकदा पांडव चांगले कौरव वाईट म्हंटले की त्याचा एव्हढा मोठा पगडा मनावर बसतो की, इतर काही मनाला पटतच नाही.

पण या वेळी जरा भीष्म या सारख्या लोकां बद्दल माझ्या मनात संदेह निर्माण झाला. तोच प्रयत्न असावा.

जुन्या महाभारतात वारणाव्रत ला जाण्यापूर्वी विदूर धर्माला उंदीर जमिनितून कसा जातो याची आठवण करून देतो. म्हणून त्याला भुयार खणण्याची कल्पना सुचते.
आताहि उंदीर, पण त्याचे काम वेगळे.
(हा उंदीरहि काँप्युटरने केलेला होता का? मारले बिचार्‍याला.)

कुंतीचा शोक हृदयद्रावक!

"मुझे ऐसी बेटी चाहिये, जिसे सारी अपवित्रता प्राप्त हो लेकिन दुनिया उसे सबसे पवित्र कहे " (??) हे मला काही कळले नाही ! म्हणजे काय नक्की???>> म्हणजे माझ्या पोरीनी वाट्टेल त्या भानगडी केल्या तरी लोकांनी तिला सोज्वळ म्हणावं असा असावा. Light 1

कुंतीचा मृत्यु देखील वानप्रस्थाश्रमात धृतराष्ट्र, गांधारीसोबत जंगलात आगीत होळपळुन होतो.

मी असेहि ऐकले की त्यावेळी कुंतीला एक स्त्री भेटते. ती पळून जात नसते. ती कुंतीला म्हणते वारणाव्रतात जिला तू जाळून मारलेस ती मी. तुम्ही थोर लोक तुमच्यासाठी खुश्शाल इतरांना जळू देता, आता तुमच्यावर परत वेळ आली, परत कुणाला बळी देता? ते ऐकून कुंति पश्चात्तापदग्ध होऊन पळायचे थांबते व आगीला सामोरी जाते.

म्हणजे माझ्या पोरीनी वाट्टेल त्या भानगडी केल्या तरी लोकांनी तिला सोज्वळ म्हणावं असा असावा. दिवा घ्या

नंदिनी, Rofl
खरे तर सगळ्याच मुलींच्या बापांना तसे वाटत असते.

म्हणजे माझ्या पोरीनी वाट्टेल त्या भानगडी केल्या तरी लोकांनी तिला सोज्वळ म्हणावं असा असावा. दिवा घ्या

नंदिनी,
खरे तर सगळ्याच मुलींच्या बापांना तसे वाटत असते.
<<<<<<<

अरे काय हे Lol

बरे मला एक सांगा.... यावर तुमचे काय मत आहे....

सध्या चालु असलेल्या महाभारत सिरियलमध्ये अजुनपर्यंत तरी पांडव चुकीचे वागलेत असे वाटले नाही पण दुर्योधन व त्याच्या भावांना पांडवांचा वरचढपणा (युधिष्ठिर वयाने मोठा, भीम शारिरिक ताकदीने वरचढ, अर्जुन धनुर्विदयेत वरचढ) सहन होत नाही आहे असेच वाटतेय. त्यांना सतत असुरक्षित वाटते म्हणुन त्यांनी लगेच कर्णाला आपल्या पक्षात घेतले.

समोरासमोर नामोहरन करता येत नाही म्हणुन लपुन काटा काढत आहेत. भीमाला विष देउन मारायला बघणे, कुंती व पाच पांडवांना विष देउन जाळुन मारायला बघणे. हे सर्व पाहुन लोकांचे मत तर असेच बनणार ना कि कौरव वाईट होते किंवा लुझर होते.

पांडवांनी अजुनतरी कोणते छक्के-पंजे खेळलेत किंवा कपट केले असे वाटले नाही/ दाखविले नाही. उलट त्यांची आई कुंती कालच्या एपिसोड मध्ये सांगते की मी तुमच्यावर इतके चांगले संस्कार केलेत ते दुर्योधनाशी शीतयुद्ध करत घालवुन बसु नका. त्यापेक्षा आपल्याला राज्य नको किंवा त्या लोकांशी कोणते संबध नको. आपण आपले वेगळेच राहु या आणि सर्व पांडव त्याला तयार होतात. त्यामुळे त्यांचे इम्प्रेशन आईचे आज्ञापालन करणारे सुपुत्र असे पडत आहे. उलट दुर्योधन आई-वडिल कोणाचेच न ऐकता स्वतःला वाटेल तेच करतोय मग ते चुक असले तरी....

सध्या चालु असलेल्या महाभारत सिरियलमध्ये अजुनपर्यंत तरी पांडव चुकीचे वागलेत असे वाटले नाही पण दुर्योधन व त्याच्या भावांना पांडवांचा वरचढपणा (युधिष्ठिर वयाने मोठा, भीम शारिरिक ताकदीने वरचढ, अर्जुन धनुर्विदयेत वरचढ) सहन होत नाही आहे असेच वाटतेय. >>

. हे सर्व पाहुन लोकांचे मत तर असेच बनणार ना कि कौरव वाईट होते किंवा लुझर होते. >>
हेच तर मी म्हणतोय , असल्या सीरीयल पाहून जी लोक महाभारताबद्दलच मत बनवतात अशांशी वाद घालण्यात काय अर्थ आहे .
त्यांच काम आहे नोटा छापणे . त्यांच्या दाखवण्याला किती महत्व द्यायच ते आपण ठरवायच ना ?

ऑडियन्सच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि ग्रहणशीलतेबद्दल थोड्या जास्त अपेक्षा ठेवायला हव्यात. >>
भरतजी , आपल्यात ग्रे काही असण मान्यच नाही . एकतर हिरो नाहीतर व्हीलन Sad

त्यांच काम आहे नोटा छापणे . त्यांच्या दाखवण्याला किती महत्व द्यायच ते आपण ठरवायच ना ?
<<<<<

म्हणुन तर सध्या चालु असलेल्या महाभारत सिरियलमध्ये असे लिहीले आहे. जे तुम्ही बोल्ड करुन पुन्हा मलाच सांगत आहात. तुम्ही जे काही महाभारत वाचले आहे किंवा जुन्या/नव्या सिरियल व्यतिरिक्त तुम्हाला जे काही महाभारत माहित आहे त्यावरुन आतापर्यंत (कालच्या एपिसोडपर्यंत किंवा वारणावत प्रकरणापर्यंत ) असे तुम्हाला कुठे वाटले कि पांडवांची देखील चुक आहे कि ज्यामुळे कौरव असे वागतात एवढेच विचारायचे आहे. पांडव चांगलेच व कौरव वाईट हा प्रश्न नाही आहे. नाहीतर तुम्हीदेखील वेगळ्या प्रकारे पांडव काही एवढे चांगले नव्हतेच हा मुद्दा घेउनच विचार करत आहात असे वाटत आहे.

तसेही ही सिरियल बघणारे प्रत्येकजण फक्त त्यावर विसंबुनच महाभारताचा विचार करतात असे नाही. उलट खुप जणांनी असली महाकाव्य वाचलेली असतात. मुळ कथेला साजेसे त्यांनी कितपत व कश्याप्रकारे दाखविले आहे हे बघण्यातदेखील बरयाच ऑडियन्सना इंटरेस्ट असतो. सिरियलवाले टिआरपी वाढवायला मुळ कथेत फेरफार करतात जसे अर्जुनाने स्त्रीवेश धारण करुन रुक्मिनी हरणात कृष्णाला मदत केली असा भाग वाचनात नव्हता... पण हाच भाग असे प्रेक्षक बघतील ज्यांना महाभारताबद्दल काहीही माहिती नाही त्यांना कदाचित हे खरे वाटेल इतकच सांगायचे आहे.

महाभारताचा काल कलियुगाची सुरुवात समजला जातो. त्यामुळे त्यात ग्रे कॅरॅक्टर्स दाखवणे योग्यच आहे. महाभारताचीही अनेक व्हर्शन्स आहेत. अनेक भाग प्रक्षिप्त आहेत.
मालिकेत जे दाखवले जातेय ते अशा एखाद्या व्हर्शनमधले आहे, सोयीनुसार वेगवेगळ्या व्हर्शन्समधले हवे ते उचलले आहे की मालिकाकार आपलेच व्हर्शन रचत आहेत असा प्रश्न आहे.
कृष्ण-अर्जुन यांची पहिली भेट द्रौपदी स्वयंवराच्या वेळी होते असे वाचले आहे.
मालिकेत कृष्ण अर्जुनाला लाक्षागृहाबद्दल सचेत करताना आणि भुयाराचा क्लु देताना दाखवला आहे. (इथे सरस्वती लुप्त होते हे सांगताना त्याला हेच सुचवायचे होते असे मला वाटले)

(इथे सरस्वती लुप्त होते हे सांगताना त्याला हेच सुचवायचे होते असे मला वाटले)>>> मला वाटलं तो तिथून बाहेर पडल्यावर गुप्त रूपने रहायचा सल्ला देतोय की काय.
भरत, अकॉर्डिंग टू इट्स मेकर्स, ते वेगवेगळे व्हर्जन्समधून उचलत आहेत कारण खूप कथानकं आहेत.

मुदलात पांडवांचा राज्यावर काही अधिकार नव्हे. धृतराष्ट्र आंधळा होता म्हणून त्याच्याबदल्यात पंडुने राज्य कारभार चालवला (अ‍ॅज अ रीजन्ट). याचा अर्थ पंडुच्या संततीला अधिकार मिळाला असे नाही. लॉ ऑफ प्रिमॉजिनेचर (थोरल्याचा आणि त्याच्या थोरल्या पुत्राचा अधिकार या क्रमाने पैतृक संपत्ती जाणार) प्रमाणे दुर्योधनालाच राज्य मिळणं न्याय्य. कारण त्याच्यात कुठलंही व्यंग नव्हतं. ज्या पांडवांच्या मागणीचा पायाच 'प्राचीन धर्मशास्त्रा'नुसार अन्याय्य होता, त्यांच्या पुढच्या कुठल्याही कृतीचं नीती-अनीतिवर विश्लेषण करायची गरज नाही. (साभार वरदा यांची पोस्ट)

कर्ण, दुर्योधन यांनीहि स्वतःच स्वतःला पटेल त्याला धर्म मानले तर माझी तर काहीच हरकत नाही.
<<<<<<

एक तर मला कधी कधी प्रश्न पडतो कि मोठया मुलाचा मोठा मुलगा हा राजा बनतो असे बहुतेकदा गृहितक असते. तर दुर्योधन राजा बनने योग्य होते. धृतराष्ट्र व पांडुच्या काळात धृतराष्ट्राच्या आंधळेपणामुळे पांडु राजा बनतो. पण पुढे त्याच्या मृत्युनंतर इतर पर्याय न उरल्यामुळे धृतराष्ट्र राजा बनतो. आता त्याचा मोठा मुलगा दुर्योधन व्यंगविरहित व शुर असतो मग त्याला राजा बनवला तर बिघडले कुठे?

<<<<<<<<<<<

याच धाग्यावरील माझा वरील प्रतिसाद आहे. वाचताना निसटलेला दिसतोय.

बाय द वे.. दुर्योधन आणि दुशासन सोडून बाकीचे कौरव कुठे आहेत हो? महाभारतातही त्यांनी युध्दात लढण्याखेरीज इतर काही केल्याचे ऐकिवात, वाचनात नाही. आणि दुर्योधनासारखा एकही विद्रोही निघाला नाही हे विशेष! नाहीतर दुर्योधन, दुशासनाशी भांडून सगळ्यांनी राज्याचे शंभर तुकडे करून घेतले असते. तेही पांडवांइतकेच प्रामाणिक होते असे म्हणावे लागेल. मालिकेतही एकदाही शंभर कौरव दाखवले नाहीत. दोन ते तीन वेळा मोजले ते कोणत्याच शॉटमध्ये वीसपेक्षा जास्त कौरव दाखवले नाहीत. आणि धृ्तराष्ट्रालाही इतर पुत्रांवर प्रेम नव्हतेच, असे वाटते. कारण फक्त दुर्योधनच धृतराष्ट्राला भेटतो, त्यांच्याशी संवाद साधतो. बाकीचे काय केवळ दुर्योधनाच्या बॅकअपला आहेत की काय कोण जाणे?

Pages