मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

......अजुनपर्यंत तरी पांडव चुकीचे वागलेत असे वाटले नाही पण ...... मग ते चुक असले तरी....

सहमत. (मत काय विचारले म्हणून सांगितले.)

या वेळी चांगल्या लोकांच्या कृत्यांबद्दल मनात संदेह उत्पन्न होतो आहे हे माझे पूर्वीचे मत आता चुकीचे ठरत आहे.

असल्या सीरीयल पाहून जी लोक महाभारताबद्दलच मत बनवतात अशांशी वाद घालण्यात काय अर्थ आहे .

केवळ बौद्धिक व्यायाम हो. मुद्दाम असा उलट सुलट विचार करायचा म्हणजे तो महाभारताबद्दल नाही तरी तशी सवय झाली की इतर प्रश्नांबद्दलहि तसा विचार करता येतो. जसे जोर बैठका, करणे यात मुख्य उद्देश ताकद वाढवणे हा असतो तसे.

ज्या पांडवांच्या मागणीचा पायाच 'प्राचीन धर्मशास्त्रा'नुसार अन्याय्य होता,
पण विदुर सांगतो ना की कालानुसार धर्म बदलतो! त्याने धर्म बदलला तर मी पण म्हणून कर्ण दुर्योधन पण धर्म बदलतात ( तशी योग्यता आहे की नाही हे पण त्यांचे तेच ठरवतात!! )

मुदलात पांडवांचा राज्यावर काही अधिकार नव्हे. धृतराष्ट्र आंधळा होता म्हणून त्याच्याबदल्यात पंडुने राज्य कारभार चालवला (अ‍ॅज अ रीजन्ट). याचा अर्थ पंडुच्या संततीला अधिकार मिळाला असे नाही. लॉ ऑफ प्रिमॉजिनेचर (थोरल्याचा आणि त्याच्या थोरल्या पुत्राचा अधिकार या क्रमाने पैतृक संपत्ती जाणार) प्रमाणे दुर्योधनालाच राज्य मिळणं न्याय्य. कारण त्याच्यात कुठलंही व्यंग नव्हतं. ज्या पांडवांच्या मागणीचा पायाच 'प्राचीन धर्मशास्त्रा'नुसार अन्याय्य होता, त्यांच्या पुढच्या कुठल्याही कृतीचं नीती-अनीतिवर विश्लेषण करायची गरज नाही.

१०० % सहमत. पांडवांचा राज्यावर काडीमात्र अधिकार राहिलेला नव्हता.. पांडू राज्यत्याग करुन वनात गेला. मग तिथे त्याला मुले झाली. बापानेच राज्यत्याग केला तर मुलांचा अधिकार कसा काय लागू झाला?

मुदलात पांडवांचा राज्यावर काही अधिकार नव्हे. धृतराष्ट्र आंधळा होता म्हणून त्याच्याबदल्यात पंडुने राज्य कारभार चालवला (अ‍ॅज अ रीजन्ट). याचा अर्थ पंडुच्या संततीला अधिकार मिळाला असे नाही. लॉ ऑफ प्रिमॉजिनेचर (थोरल्याचा आणि त्याच्या थोरल्या पुत्राचा अधिकार या क्रमाने पैतृक संपत्ती जाणार) प्रमाणे दुर्योधनालाच राज्य मिळणं न्याय्य. कारण त्याच्यात कुठलंही व्यंग नव्हतं. ज्या पांडवांच्या मागणीचा पायाच 'प्राचीन धर्मशास्त्रा'नुसार अन्याय्य होता, त्यांच्या पुढच्या कुठल्याही कृतीचं नीती-अनीतिवर विश्लेषण करायची गरज नाही.

१०० % सहमत. पांडवांचा राज्यावर काडीमात्र अधिकार राहिलेला नव्हता.. पांडू राज्यत्याग करुन वनात गेला. मग तिथे त्याला मुले झाली. बापानेच राज्यत्याग केला तर मुलांचा अधिकार कसा काय लागू झाला?

पांडवांचा राज्यावर काडीमात्र अधिकार राहिलेला नव्हता.

तरी धर्माला राज्य मिळावे असे भीष्म, विदूर यांना वाटले. कारण दुर्योधन हा योग्य राजा नाही, अधर्मी आहे हे भीष्म इ. चे मत होते. असा राजा हस्तिनापूरला मिळाला तर राज्य बुडेल, नि भीष्म तसे होऊ देणार नाही या वचनाने बांधला होता. शिवाय एकदा विदुराने सांगितले की धर्म, परंपरा कालानुसार बदलतात व ते मान्य झाले तेंव्हा प्रिसिडेंट झाला. तेंव्हा आता ते दोघे बोलतील ते खरे, तोच धर्म.

(ही माझी वकिली. नाहीतर आधी भीष्म होता की नव्हता, असेल तर कधी होता तेंव्हा मी नक्कीच नव्हतो, त्यामुळे तशी मला काही नक्की खात्री नाही. पण आपले लिहायचे!)

(ही माझी वकिली. नाहीतर आधी भीष्म होता की नव्हता, असेल तर कधी होता तेंव्हा मी नक्कीच नव्हतो, त्यामुळे तशी मला काही नक्की खात्री नाही. पण आपले लिहायचे!)
<<<<<< Lol

जाउ दया हो झक्की काका... वकिली करण्यापेक्षा आपण आता सिरियलचा आस्वाद घेउ या Happy
मोठया एलसीडीवर बघायला तर खुपच छान वाटते ही सिरियल...

मोठ्या एलसीडीवर आणि मोठ्या स्पीकरवर सुद्धा छान वाटते हि सिरीयल बघायला आणि ऐकायला...!!!

आजच्या एपिसोडमध्ये पांडव स्वत: भुयार खणतात असे दाखवले आहे.
ते खरे आहे की विदुराचा माणूस आधीच भुयार खणून चुकलेला असतो?

आणि पांडव एकत्र मूठ धरून भुयार खणताना एकदम फोकस भीष्माच्या डोळ्यात !!! वाव !
ग्रेट डायरेक्शन !!

अजुन आजचा भाग बघायचा आहे... यात पांडवांना अगदी शेवटी कळते कि आपल्याला जाळुन मारणार आहेत. मला वाटले कि आता हे कधी भुयार खोदणार, कधी बाहेर पडणार. बहुतेक अर्जुन त्याच्या नेहमीच्या ट्रिकप्रमाने हवेत बाण काढुन (भुगर्भास्त्र वगैरे नाव देउन) त्याला जमिनीत मारेल व एका मिनिटात भुयार तयार होइल असे काही दाखवतील असे वाटले होते Happy

मला आजचा एपिसोड विनोदी वाटला. कुंतीला फेकले काय कॅच काय केले. अर्जुन हॅरी पॉटरसारखा कोणत्याही क्षणी ब्रूमस्टिकवर बसून उडायला लागेल असे वाटत होते.
तहान लागल्यावर विहीर खणणे हा वाक्प्रचार बदलून आग लागल्यावर भुयार खणणे असा करावा.

आज शेवटच्या सीनमधे भीष्म लाक्षागृहात येतो तो सीन बी आर चोप्राच्या स्पेशल ईफेक्ट्स टीमने बनवला होता अशी शंका येण्याइतपत बेकार होता.

आणि अर्जुनाला किती ते फुटेज!!!

मज्जा मज्जा होती बुवा आजच्या एपिसोडमध्ये... एवढी आग लागलेली तरी सर्वजन आपल्या अंगावरील ओढण्यांसकट पळत होते. अर्जुन तर मस्तपैकी ओढणी इथे तिथे फिरवत आगीतुन धावत होता. तरी सर्वांचे कपडे एकदम जसेच्या तसे. पण चला महाभारताचा एक मुख्य भाग संपला. आता पुढे पाहु.

ते खरे आहे की विदुराचा माणूस आधीच भुयार खणून चुकलेला असतो?
तुम्ही माझ्याप्रमाणेच भारत का वीर पुत्र राणा प्रताप बघता का? तिथेहि प्रतापला चितेवर ठेवून जाळतात पण त्याच्या गुरूंच्या सल्ल्याप्रमाणे मेवाडचे सैनिक आधीच चितेखाली भुयार खणून ठेवतात. कदाचित प्रताप पांडवाम इतका ग्रेट नसावा.

आजचा एपिसोड एकदमच कंटाळवाणा. पळवत पळवत बघितला. लहान मुलांचे महाभारत वाटत होते. आग काय, पांडवांचे कपडे काय, कुंतीला फेकणे काय, पाण्यात भिजलेला भीष्म काय.
आणि अर्जुनाला किती ते फुटेज!!! +१११ किती पळवला बिचाऱ्याला.

तरी धर्माला राज्य मिळावे असे भीष्म, विदूर यांना वाटले. कारण दुर्योधन हा योग्य राजा नाही, अधर्मी आहे हे भीष्म इ. चे मत होते. असा राजा हस्तिनापूरला मिळाला तर राज्य बुडेल, नि भीष्म तसे होऊ देणार नाही या वचनाने बांधला होता. शिवाय एकदा विदुराने सांगितले की धर्म, परंपरा कालानुसार बदलतात व ते मान्य झाले तेंव्हा प्रिसिडेंट झाला. तेंव्हा आता ते दोघे बोलतील ते खरे, तोच धर्म.

दुर्योधन हा अधर्मी राजा होता हे कुणी ठरवले? विदुर दासीपुत्र म्हणून त्याला नाकारणारे अधर्मी का सूतपुत्राला योग्यतेनुसार राजा करणारे अधर्मी म्हणायचे?

आणि पांडव अधर्मी नाहीत हे सर्टिफिकेट त्याना कुणी दिले होते?

दुर्योधन हा अधर्मी राजा होता............ दिले होते?

भीष्म व विदूर या जोडगोळीने!!

भीष्माविरुद्ध लढायची ताकद कुणातच नाही नाही ना, मग तो म्हणेल ते मान्य करायलाच पाहिजे.
नि हजारो वर्षे आपल्याला तेच सांगत आल्याने आपण तेच मानतो.

तेंव्हा माझ्या मते या गोष्टीत धर्माचा राजकारण करण्यासाठी उपयोग करून घेतला आहे. शेवटी बळी तो कानपिळी. तरी पण गोष्ट पकड घेणारी आहे कारण व्यक्तिरेखा नाना तर्हेने रंगवून सांगायला स्कोप आहे. आनि बळ हे शारिरीक बळच नव्हे तर बुद्धीचेहि.

मुदलात पांडवांचा राज्यावर काही अधिकार नव्हे. धृतराष्ट्र आंधळा होता म्हणून त्याच्याबदल्यात पंडुने राज्य कारभार चालवला (अ‍ॅज अ रीजन्ट).
>>
असे मी ऐकले नव्हते. व्यासांच्या महाभारतानुसार धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे त्याला राज्यपद मिळत नाही
आणि पंडु राजा होतो (रिजंट नाही). पंडुच्या पश्चात धृतराष्ट्र मात्र कार्यकारी राजा रिजंट म्हणुन राज्यकारभार संभाळतो. (मध्ययुगा पर्यंत अशी व्यवस्था होती म्हणुनच घोरीने पृथ्विराजाला आंधळे करुन, तख्तावर आपला गुलाम बसविला. अगदी दुसर्या शाह आलमला पण आंधळे करण्यात आले होते. हा नियम कुठुन आला हे मात्र माहित नाही. पण राजा आंधळा हे आंध्ळ्या न्यायाचे प्रतिक असे काही असावे).

यामुळे जर दुर्योधनाला राजा बनविले तर पांडवांवर अन्याय कारण युधिष्ठीर सर्वात मोठा आणि त्याचे वडिल राजा होते (शिवाय पंडुने राजसुय करुन अनेक देश देखिल जिंकले होते).
आणि युधिष्ठीर राजा झाला तर दुर्योधनावर अन्याय असा प्रसंग निर्माण होतो. फरक हाच असतो की युधिष्ठीर युवराजपद सोडायला तयार असतो पण दुर्योधनालामात्र ते कोणत्याही परिस्थितीत हवेच असते.

यावर उपाय म्हणुन दुर्योधनाला हस्तिनापुर मिळते तर पांडवांना खांडववन ज्यातुन ते इन्द्र्प्रस्थ उभारतात यामुळे कौरवांवर कोणताही अन्याय झाला असे मला वाटत नाही.

काल श्री. यादव आम आदमी पार्टीचा प्रचार करीत होते. <<<

हो ना! मला देखील असेच वाटले. जेव्हा ते दोन ॠषी राजा द्रुपदला कन्येचे महत्व समजाउन सांगतात ते जास्त आवडले. दक्ष प्रजापतीचे उदाहरण मस्त दिले होते नाहीतर राजा किती लाउडली स्वतःच्याच मुलीचा अपमान करतो.

अर्जुन व भीमाची न्यु हेअरस्टाईल नाही आवडली. जुन्या चायनिज योद्ध्यांसारखी वाटत होती.

अर्जुन व भीमाची न्यु हेअरस्टाईल नाही आवडली. जुन्या चायनिज योद्ध्यांसारखी वाटत होती.>>

अर्जून आणि युधिष्ठिर सोडून आधी सर्वांना विग होते. आता ओरिजिनल केस वाढलेले दिसताहेत. फक्त सहदेवचाच विग वाटला कालच्या भागात. ‌भीम तर अगदी लहानपणी एखाद्या गुबगुबीत लहान मुलीचा डोक्यावर गोंडा घालतात, तसा वाटला. Happy

अर्जुन व भीमाची न्यु हेअरस्टाईल नाही आवडली. जुन्या चायनिज योद्ध्यांसारखी वाटत होती.<< असं कसं "भेस बदलके" असे वाटायला हवेत ना ते....

या भागात दाखविलेला द्रुपद एकदमच डोक्यात गेला! पण मला वाटायचे की द्रुपदाला मुले होती. अश्वथ्याम्याने द्रुष्ट्द्युम्न आणि पांडवांच्या पाच मुलांबरोबर उत्तमौजा, युधामन्यु ही द्रुपदाची मुल पण मारली गेली असा काहिसा उल्लेख आहे. द्रुपदाचे पुढे काय झाले माहित नाही.
कधी कधी मला असे वाटते की लेखकाला सांगायचे असावे की काही कामासाठी दुसर्यातील नीच प्रव्रुत्तीचादेखिल उपयोग करुन घ्यावा लागतो? जसे पांडवांनी भीष्म आणि द्रोण यांना मारण्यासाठी द्रुपदाच्या सुडबुद्धीचा उपयोग केला.

आली आली महाभारताची नायिका आली. आल्या आल्या स्वतःच्याच पित्याकडुन अपमानित झाली. आता पुढे अजुन भरपुर जण येतील तिचा अपमान करायला.

बाकी आजचा एपिसोड आवडला. द्रोपदीसाठी तयार केलेले गाणे मस्त होते. शिखंडिणीने दिलेले एक्सप्रेशन्स छान. तिला या एपिसोडमध्ये काही डायलॉग्ज नव्हते पण तिच्या पित्याच्या उद्दाम वागण्याबद्दल तिला काय वाटत आहे हे ती फक्त तिच्या चेहरयाद्वारे सांगत होती. द्रोपदी अगदी नाजुक-साजुक आहे. दिसली देखील सुंदर.

माझ्या लेकीला तर सगळे संवाद मिङ्ग्लिश मध्ये सांगावे लागतात Uhoh
द्रॊपदिच्या एन्ट्रीला तर सगळे स्पष्टीकरणंच होते. दिवा

खूप दिवसांनी मी काल महाभारत पहिले, किती स्लो. आख्खा एपिसोड द्रौपदीची आंघोळ, शृंगार, मैत्रिणी ह्यातच घालवला. परवा रविवारी रात्री १२ला मागच्या आठवड्याचे एकत्र एपिसोड पहिले. तेच बरे वाटते, रोज बघायला बहुतेक स्लो वाटत असेल.

मैत्रेयी, सध्या तरी ती डंबच आहे. नुकतीच जन्मली आहे. हळूहळू शिकेल आणी स्मार्ट होईल. Proud

द्रुपदाच्या यज्ञापासूनच शिखंडीणी नुसत्या एक्स्प्रेशनवर सीन मारून नेतेय. मला ती अभिनेत्री आवडली. चालण्याबोलण्यामधे एक पुरूषीपणा सही दाखवलाय तिने.

कालचा एपिसोड स्लो होता, पण आवडला. पुन्हा एकदा, त्या पात्राच्या मनामधे उतरून समजून घेण्याचा आणि मान्सिक आंदोलने दाखवण्याचा प्रयत्न मस्त.

Pages