मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.tellynagari.com/star-plus/mahabharat#.UqHqufRDvKA

येथे पीसी वर आम्ही दररोज वेळ असेल तेंव्हा बघतो.

आजकाल तर दर शनिवारी रात्री आमचे मित्र व आम्ही पी सी टीव्ही ला जोडून अगदी पहिल्या एपिसोडपासून बघतो आहोत.

काही काही प्रसंग उगाचच घुसडले आहेत असे वाटते, म्हणजे ज्यांना महाभारताबद्दल काहीच माहित नसेल त्यांना व्यक्तित्वाचे पैलू ठळक दाखवण्यासाठी असे केले असावे.
अर्जून कर्णाचे पाय धुवून क्षमा मागतो तो प्रसंग. शकुनीचा कावेबाजपणा अगदी स्पष्ट दिसतो.

सुभद्रा अर्जुनावर लाईन मारायला येते तो प्रसंग?

सुभद्रा अर्जुनावर लाईन मारायला येते तो प्रसंग?<<<< Lol

आज शिखंडीणीची एन्ट्री दाखवली, पण तो शिखंडी म्हणजे नपुसंक असस्तो ना?यामधे द्रुपदाची मुलगी असंच दाखवलंय.

हे महाभारतवाले एका एका कॅरेक्टरच्या एंट्रीला फार वेळ काढतात.अकालचा अर्धा एपिसोड द्रुपदाच्या एन्ट्रीला वाया घालवला.

हे महाभारत थोडे स्लो वाटते, हे बरोबर आहे. मला त्या देखण्या अर्जुनाला, सुभद्रा म्हणून दिलेली तेवढी योग्य वाटत नाही, बालिका वधु आणि अजून एका सिरीयलमध्ये तिला बघितली म्हणून असेल कदाचित.

कालच्या अनिल कपूर च्या कलर्स वरच्या २४ मध्ये, मला दाढी मिशी नसलेले द्रोणाचार्य दिसले.
ते अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ज्या तुरुंगात आहेत त्याचे अधिक्षक आहेत.

द्रोणाचार्याच्या भूमिकेत सुदेश बेरी का? << नाही. तो द्रुपदाच्या भूमिकेमधे आहे.

लाईफलाईनमधे आठवत नाहीये मला.

द्रोणाचार्यांची भूमिका करणारा तो निस्सार खान. अने‌क हिंदी मालिकांमध्ये तो इन्‍स्पेक्टरचं काम करतो. त्याची डायलॉग डिलिव्हरी जबरदस्त. आवाजातला भारदस्तपणा आणि जरब वाखाणण्यायोग्य. सुदेश बेरीच्या एन्ट्रीनेही मजा आणली. आता बघू या आणखी कोण कोण दिग्गज मालिकेत दिसतात ते.

द्रोणाचार्यांची भुमिका करणारा अभिनेता निस्सार खान याने छान अभिनय केला आहे. संवादफेक, चेहरयावरील भाव मस्तच....

कर्णाचे नशिब काही चांगले नाही. स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर भगवान परशुरामांसारख्या गुरुंकडून विद्या प्राप्त केली. सर्वांकडुन जातीवरुन सतत हिणवले गेले तरी स्वतःच्या सामर्थ्यावर, कर्तुत्वावर विश्वास ठेवुन स्वतःचा आत्मविश्वास नेहमी बळकट ठेवला. हस्तिनापुराचा सम्राट होण्याची योग्यता असणारा कर्ण शेवटी स्वतःच्याच लहान भावाकडुन युद्धाचे नियम मोडुन मारला गेला. दुर्योधनाकडुन अजाणतेपणे का होईना स्वतःच्या मोठया भावाला मित्रत्वाच्या दृष्टीनेतरी आदर दिला गेला.

दुर्योधनाकडुन अजाणतेपणे का होईना स्वतःच्या मोठया भावाला मित्रत्वाच्या दृष्टीनेतरी आदर दिला गेला.>>
अजाणतेपणे नव्हे, स्वार्थामुळे, पांडवांच्या भीतीपोटी.

नक्कीच अजाणतेपणेच.... त्यात स्वार्थ होताच, पण जर त्याला माहित असते कि हा देखील कुंतीपुत्र आहे तर त्याला लग्नाआधीचा मुलगा म्हणुन दुर्योधनानेच पहिले अपमानित करुन राज्यपद देण्यास नाकारले असते.

त्यात स्वार्थ होताच, पण जर त्याला माहित असते कि हा देखील कुंतीपुत्र आहे तर त्याला लग्नाआधीचा मुलगा म्हणुन दुर्योधनानेच पहिले अपमानित करुन राज्यपद देण्यास नाकारले असते.>> खरे आहे.

त्या द्रुपदला आता एवढा व्हिलन का केलाय? नंतर हीरो लोकांच्या साईडलाच येईल ना? शिवाय हीरोचा सासरा पण होइल.

दुर्योधन एकदम स्टाईलिश व्हिलन आहे खरा.

मला परवाच्या भागात द्रोणाचार्यांचे डायलॉग्ज फार आवडले, ज्या प्रकारे तो कर्णाशी डायरेक्ट न बोलता त्याचा पत्ता कट करतो - तेही व्यवस्थित कारण देऊन. मस्त घेतला होता तो सीन !

महाभारत संध्याकाळी ५.३० ते ६.०० रिपीट टेलीकास्ट बघायचे तो आजपासून बंद केला, माझ्या सोयीच्या वेळा हे 'स्टार प्लस' वाले बदलतात. सो sad.

चक्रव्यूहाचे एरियल शॉट्स छान होते. << +१

दुर्योधन एकदम स्टाईलिश व्हिलन आहे खरा. <<< +१ एकदम हॅण्डसम

मला परवाच्या भागात द्रोणाचार्यांचे डायलॉग्ज फार आवडले, ज्या प्रकारे तो कर्णाशी डायरेक्ट न बोलता त्याचा पत्ता कट करतो - तेही व्यवस्थित कारण देऊन. मस्त घेतला होता तो सीन ! << +१

दुर्योधन व शिखंडिणी यांच्या लढाईत शिखंडिणी बोलते मै तुम्हारा काल हु... मला वाटले आता या दोघांची मस्त लढाई बघायला मिळेल पण कुठचे काय शिखंडिणी एका फटक्यातच जमिनीवर Lol

काल कोणाची लढाई होती.
सुदेश बेरी द्रुपद कळालं.
ती बाई कोण त्याला दिसत असुनही युद्धाचा लाइव्ह वृ सांगणारी??

तीच शिखंडीणी. गुरूदक्षिणेसाठी द्रुपदावर स्वारी करतात ती लढाई चालू आहे.
या महाभारताचं बॅकग्ग्राऊडं स्कोर जबरदस्त आहे. प्रत्येक कॅरेक्टरला वेगळा श्लोक दिला आहे.

अन्जू. सीरीयसली स्टारप्लसला ईमेल टाका. लोकांचा काय प्रतिसाद आहे ते समजू देत त्यांना. जेवड्।या सटासट ते रीपीट टेलीकास्ट बंद करतात ते पाहून टीआरपी सॉलिड मिळतोय या महाभारताला असं वाटलं होतं. पण सध्यातरी नंबर पाच वर आहे. रीपीट बंद केल्याचे ओरिजिनल एपिसोडचा टीआरपी वाढवायचा प्लान असेल बहुतेक.

तीच शिखंडीणी. गुरूदक्षिणेसाठी द्रुपदावर स्वारी करतात ती लढाई चालू आहे.>>
शिखंडिणी?? महाभारतात तो शिखंडी असा उल्लेख आहे ना. शिखंडी हा तृतियपंथी होता, असे ऐकलेय... पण यात तर ती त्याची द्रुपदची मुलगीच दाखवलीय...

कोण हल्ला करतं गुरुदक्षिणेसाठी?
पांडवच ना?

मी काल फक्त पाच मिनिटे पाहिलय म्हणुन कन्फ्युज आहे.

या महाभारतात आधी न ऐकलेल्या कथा दिसत आहेत. कुंती-कर्ण फूटेज अगदी बळंच आणि उगाच होतं. तिला इतक्या आधीपासून कुठे माहित होतं हाच आपला मुलगा आहे ते? तो भाग तद्दन फिल्मी वाटला.

तेच शिखंडीचं. आधी मला वाटलं ती आधीची अंबाबाई येतेय परत. पण किमान बाई तरी बदलली! ती भयंकर होती अंबा.

ट्विस्ट देण्यासाठी उगाच कथा पुढे मागे करून भलतेच ईमोशनल टच देत आहेत. फारसे पटले नाहीत ते.

झकासराव,
महाभारत समजायला पाच मिनिट टीव्ही बघून पुरणार नाही. बर्‍याच लोकांनी निदान शंभरदा तरी महाभारतातल्या असंख्य गोष्टी ऐकल्या आहेत.

शिखंडिणी?? महाभारतात तो शिखंडी असा उल्लेख आहे ना. शिखंडी हा तृतियपंथी होता, असे ऐकलेय... पण यात तर ती त्याची द्रुपदची मुलगीच दाखवलीय...

हे उगीचच काहीतरी दाखवले आहे असे मला वाटते.
ट्विस्ट देण्यासाठी उगाच कथा पुढे मागे करून भलतेच ईमोशनल टच देत आहेत. फारसे पटले नाहीत ते.
अनुमोदन.

Pages