बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परत गटग?? <<<< गटग नाही गटंगळ्या खायचे गटग. सोब्रायटी सोडायची आहे ना? Rofl

मी म्हटलं २०० झाले आता 'न येण्याची कारणे' द्यायला हरकत नाही, म्हणून नांव कमी केलं...

एका येळेला फक्त एकेकानेच करायच हाय का हे ए.वे.ए.ठी.?
स्वाती तुमची येळ संपली बरं का. नाव काढा बघु. दुसर्‍याला चानस द्या आता ए.वे.ए.ठि. चा. Happy

गोगा आठवडाभर होते की! << ते सराव असावा म्हणून दिवसातून एकदा मेलबॉक्सपर्यंत जाऊन येत होते... उगाच नाही नाव काढलं... Proud

माझ्या डोक्यात ते तुमच्या कोणातरी बेन चे ऑस्सम बटाटेवडे होते अ‍ॅक्चुअली. Happy
ते बुवा किंवा तू आणले तर ? त्या केस मधे पावभाजी त्याच चवीवर जाईल म्हणून म्हणत होते थांबा, ठरवू.
अजून काय मेनू काँबिनेशन्स सुचतायत का ?!

मला वाटलं बवडे रिपीट नको म्हणून मी पाभा विचारलं. (करणार त्याच! :P)
तशी त्या मिसळही भारी करतात.

हम भेल लावे की नय?
गोगांचा अनुभव मिसळ सांडण्यातच अडकलाय. म्हणून मी स्वातीला फार प्रोत्साहन देत नाहीये आणायला Proud

हो , भेळ पण चांगली जमेल ब वड्यांबरोबर! मसाला दूध मी करेनच. अजून मेनूमधे जे लागेल / उरेल ते.

मी दही वडे आणु का? Happy दही वडे आणि म.ब. चांगले मुरतील मी तिथे पोचेपर्यंत.

मैत्रेयीच्या घरी कट शिजवलेला (:फिदी:) चालणार असेल तर मिसळ पण आणु शकते. मी मराठा दरबारचा मसाला वापरते त्यामुळे कट पटकन होइल.

मैखाना पर्यंत कशाला जायला पाहिजे >> मैखाना पर्यंत गेलात तरच मै तुम्हाला खा ना.. खा ना म्हणुन आग्रह करेल ना. Happy

गोगा ना अनुभव आहे ना मिसळ आणायचा ? <<< गोगांना स्वतःच्या घरी Exotic पदार्थ करून आणण्याचा अनुभव आहे हे तुम्हाला कुणी सांगणार नाही... Proud

मागच्या वेळी शाकाहारी मंडळींनी कोलंबी पुलाव (त्यातली कोलंबी बाजूला करून) खाल्ला होता..

सिंडे, तुम्ही लोक उशीरा आलात तर इथे भुका लागलेल्या असताना कट शिजवायचा म्हणजे वांधे होतील. Happy
ब. वडे अन द. वडे - साउंड्स गुड! (आणि आल्या आल्या तुटून पडायची वेळ आली तर सोयीचे!)
वड्यांची गोष्ट वेगळी , पण (मला ) उंधियो रिपीट करायला नको वाटतोय. दुसरा कुठला रस्सा करू या की.
व्हॉट से!

दर पार्टीला भेळ, वडे, मिसळ पेक्षा यावेळी देसी चायनीज वगैरे का ठेवत नाही? डंप्लिंगवालं सूप, चायनीज भेळ, फ्राइड राइस, चॉपसुई, स्प्रिंग रोल्स, मंचूरियन?

मला चोंबडेपणा करायला आवडतं. Proud

Pages