बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न काढायला काय झालं ? पाककृतींवर चर्चा करणारी माणसं तुम्ही :फिदी:, तुम्हांला सहज जमेल Lol

आधी प्रि चर्चा, मग तेथून अपडेट्स द्या. मग वृ टाका आणि मग त्यावर पण आम्ही येऊच की Lol

आहारशास्त्र पाककृती लिहिणार्‍या मंडळींनी गटग विषयावर बोललेलं चालतं ना? नाही, ललितावर बोलू नये असं मत वाचलं काल Proud
गोगा, तुम्हांला मयूर दावल माहिती आहेत का? गेल्या शनिवारी श्रीधर फडके कार्यक्रमाचं अ‍ॅंकरिंग केलं त्यांनी ( हे नवर्‍याकडून कळलं)

आहारशास्त्र पाककृती लिहिणार्‍या मंडळींनी ललितावर बोलू नये <<<

हे ज्या बाफ वर आहे त्या बाफचं अस्तित्व (च) धोक्यात नाही का येत या विधानामुळे ? Proud

या वेळी चिल्लीपिल्ली डॉट कॉम सोबत नसल्यामुळे गाडी सायोकडून सुटली तरी चालेल. माझ्याकडून सोडायची तर तिला उलट ड्राइव्ह करून यावं लागतं.

गोगा, तुम्हांला मयूर दावल माहिती आहेत का? <<< देवल म्हणायचे आहे का तुम्हाला.. होय.. मला मयूर/संगीता देवल माहित आहेत. मुख्य म्हणजे मीही त्यांना माहित आहे...

कुठल्या खिंडीत शिंडी दिसणार आहे? मी पण लक्ष ठेवेन म्हणतो....

तो 'पांढरा' मेन्यू मागे पडला का?
यावेळी मायबोली चहासदरे घालून यायला विसरू नका..

काळ्याचे पांढरे ??? काळ्याचे पांढरे आपोआप होतात. पांढर्‍याचे काळे करावे लागतात. आणि ती एक कटकटच असते. Happy

बाई मग मी तुमच्याकडे येऊन आपण सायोकडे जायचं का?

पांढरे(च) कपडे घालायचेत का?

बरं दह्याची कुणाला अ‍ॅलर्जी नाही ना?

हो हो, आपण एकत्र जाऊ. किती वाजेस्तोवर पोचशील?
बुवा, तुम्ही पोळ्या घ्यायला जाल तेव्हाच वडेही पिकअप कराल का? दोघांनी निराळं जाण्यात काही पॉइंट नाही.
तुम्हीही माझ्याचकडे यायला काही हरकत नाही. आपण तिघं सायोकडे एकत्र जाऊ शकतो.

दह्याची अ‍ॅलर्जी वाचल्यावर सिंडी दहीवडे आणणार यातली आयरनी ध्यानात आली माझ्या. Lol

मला एक सेकंड थॉट आलाय पोळ्यांविषयी. या वरच्या मेनूबरोबर पोळ्या काहीतरीच लागतील नाही का? बुवा ते नान चे रेडी पॅक्स मिळतात बघा, (फ्रोझन नव्हे) ते आणू शकाल का ? ओवन मधे नाहीतर तव्यावर मस्त गरम होतात.

मला पर्सनली नानपेक्षा पोळ्याच आवडतात, पण एकूणच रोटी हा आयटमच कटाप केला तरी वरच्या मेनूत चालून जाईल. पुलाव आहेच.

शुम्पी.. तुम्ही खूप काही सांगता पण प्रत्यक्ष आल्याशिवाय 'तुम लढो हम कपडे संभालते है' असं होतंय Wink

मैत्रेयीला पोळीवालीचा पत्ता, फोन आणि पोळ्या दाखवूनही अजून बुवांच्या गळ्यात पोळ्या... Proud
पोळीवाली सुट्टीहून परत आलीय बरं का..

मलाही पोळ्या नकोत.. Happy

मला काय फक्त घेऊन यायचे आहे त्यामुळे तुम्ही लोकं ठरवाल तसं.
थोड्या पोळ्या आणि थोडे नान असं दोन्ही आणू का? आधी फक्त जास्त पोळ्याच आणणार होतो.
बाई, विबेन कडे गेलो तर मी वडे घेऊन येइन. फक्त मै कडे मी माझी गाडी घेऊन येइन कारण मी सकुसप येतोय.

मैत्रेयीला पोळीवालीचा पत्ता, फोन आणि पोळ्या दाखवूनही अजून बुवांच्या गळ्यात पोळ्या... >>>> Lol

सिंडरेला, हा इवेंट अ‍ॅलर्जन फ्री नसून फ्रिली अ‍ॅलर्जन्स पचवण्यार्‍या लोकांचा आहे. फिकर नॉट. तू नुसती पौष्टिक पानं न पुसता पदार्थ येऊन देत फक्त Proud

Pages