झुळझुळ वाहणारं पाणी खळखळ नाद करतं. एक चैतन्य, उत्साह निर्माण करतं. कधी त्याचा फेसाळ, दुधाळ रंग चित्तवेधक असतो तर कधी त्याच्या स्वच्छ प्रवाहातून दिसणारा तळ ! पण हेच पाणी साचून राहिलं की ? नकोसंही होतं.
प्रवासही प्रवाही असायला हवा. कुठेही अडून राहावं लागलं, खोळंबा झाला की नकोसं होतं. दिशा चुकली, भरकटली की संयम सुटतो. गती ही प्रवासासाठी अत्यावश्यक.
'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक गतिमान प्रवास आहे. ही गाडी कुठेही 'सायडिंग'ला पडत नाही. औरंगाबाद-पुणे रेल्वे दौंड मार्गे जाऊन ८ तास खाते, तशी ही चेन्नई एक्स्प्रेस वेड्यासारखी भरकटत नाही. ह्या गाडीचं तिकीट काढताना आपल्याला माहित असतं की ही कुठल्या मार्गाने जाणार आहे, किती थांबे आहेत, किती वेळ लागणार आहे आणि अर्थातच कुठून सुरु व कुठे संपणार आहे. सगळं काही माहित असतानाही हा प्रवास कंटाळवाणा होत नाही. डब्यातल्या शौचालयाच्या वासाने गुदमरायलाही होत नाही आणि विदाउट तिकीट चढलेल्या उपऱ्या लोकांचा त्रासही होत नाही.
गाडी मुंबईहून सुरु होते. जसा अमिताभ 'विजय' असायचा, तसा शाहरुख 'राज' किंवा 'राहुल' असतो. इथे तो राहुल आहे. भूमिकेत शा.खा. फिट्ट होण्यापेक्षा भूमिका शा. खा. साठी फिट्ट व्हावी म्हणून आधीच सांगून ठेवलेलं आहे की तो चाळीशीचा आहे. वयस्कर व्यक्तिची प्रेमकहाणी दाखवायची आहे म्हणून त्याचं आधी एखादं लग्न झालेलं आणि बायको गचकलेली वगैरे भावनिक ठिगळं इथे नाहीत. आई-बापाविना वाढवलेल्या नातवावरील अपार प्रेमासमोर, आजोबा नातवाचं लग्न वगैरे क्षुल्लक गोष्टी बाजूला ठेवतात, इतकंच. सचिन तेंडुलकरचे परमचाहते असलेले राहुलचे आजोबा, स्वत:च्या शंभराव्या वाढदिवशी भारत-पाकिस्तान सामना पाहत असतात. सचिन आणि आजोबा दोघेही ९९ वर असतात आणि एक चेंडू दोघांचीही विकेट काढतो. तिकडे पाकिस्तानी खेळाडू सुटकेचा निश्वास टाकतात आणि इकडे राहुल मुक्त हवेत मोकळा श्वास घेतो. मित्रांसोबत आधीच ठरलेला गोव्याला जायचा प्लान 'ऑन' ठेवतो आणि तयारी करतो. पण आजोबांची एक विचित्र इच्छा असते. त्यांच्या अर्ध्या अस्थींचं विसर्जन गंगेत आणि अर्ध्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरमला करावं ! (ही अशी इच्छा का असते ? ह्याचं कारण/ संदर्भ कुठेच मिळणार नाही. बस्स. असते. कारण चित्रपट पुढे जायचा असतो.) राहुलला आजीला दाखवण्यासाठी चेन्नई एक्स्प्रेसने जाण्याचं नाटक करावं लागतं. प्रत्यक्षात कल्याणला उतरून, मित्रांसोबत गोव्याला जाऊन तिथेच अस्थि विसर्जित करण्याचा नतद्रष्ट प्लान केला जातो. मृत व्यक्तीच्या भावनांशी खेळ केल्याबद्दल त्याला तळतळाट लागतो आणि सगळ्या प्लानचा खेळखंडोबा होतो. चालू गाडीतून उतरताना मिनम्मा (दीपिका) गाडीसोबत धावताना त्याला दिसते. हात देऊन तो तिला आत घेतो. (असा सीन चित्रपटात असणार हे मला आधीच माहित होतं आणि त्याला पार्श्वसंगीत काय असेल, हे तुम्हालाही नक्कीच माहित आहे.) दीपिकापाठोपाठ ३-४ सांडसदृश मनुष्यसुद्धा धावत येतात आणि त्यांनाही राहुल आत घेतो. दीपिका एका डॉन (सत्यराज) ची मुलगी असते, 'थंगबली' (निकितिन धीर) नामक होतकरू डॉनशी होऊ घातलेल्या लग्नापासून ती पळालेली असते, हे आपल्याला ट्रेलरमधूनच माहित झालेलं असतं. पुढे सगळे जण तमीळनाडूतल्या त्यांच्या गावी येतात आणि परिस्थितीशरण राहुललाही त्यांच्यासोबत यावंच लागतं. निकितिन हा खरं तर 'शाखातिन' आहे. (शा. खा. X ३ इतका धिप्पाड) त्यामुळे इथून पुढे पळापळी असणार असते. होते. आणि सगळ्या धावपळीनंतर, काही गाड्या-माणसं उडून-उडवून झाल्यानंतर कहाणी अपेक्षित शेवटाला पोहोचते.
चेन्नई एक्स्प्रेस ही काही रोलर कोस्टर राईड नाही. लागणारे धक्के पोटात गोळा आणत नाहीत. पण ही अगदीच संथगती ट्रामही नाही. काही सिनेमे सुरु होण्याआधीच 'आपकी यात्रा आनंददायी एवं सुखकाकरक हो, यही हमारी शुभकामानायें' वाली भारतीय रेलची अनाउन्समेण्ट करतात. तसाच चे.ए. आहे.
तमिळनाडू म्हणून दाखवलेला भाग गोवा असावा, असं वाटलं. कोम्बण गावाला जाण्यासाठी जिथे ट्रेन थांबवली जाते, तो बहुतेक गोवा-कर्नाटक सीमेवरचा नयनरम्य दुधसागर धबधबा असावा, असंही वाटलं.
दीपिकाच्या 'मिनम्मा'च्या अॅक्सेन्टवरून बरेच लिहिले-बोलले गेले आहे. हा अॅक्सेन्ट खरोखर तमीळ आहे की मल्याळी माहित नाही. पण तो काही काळ गंमतीशीर वाटतो. तिच्यासोबत राहून राहून राहुल थोडंसं तमिळ बोलायला लागतो तरी तिचा अॅक्सेन्ट जराही बदलत नाही. शेवटी शेवटी तिने जपलेलं ते बेअरिंग बोअरिंग वाटायला लागतं. पण दिसलीय लै भारी !
शा. खा. 'जतहैंजा'मध्ये दिसला त्यापेक्षा तरूण दिसलाय आणि त्यामुळे चाळीशीचाच (Not more) वाटलाय. शा. खा. ह्या चित्रपटाची जान आहे. बाकी काहीही असलं, तरी त्याचा उत्साह नेहमीच बेजोड असतो. (त्या उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अॅक्टिंग करतो, हा भाग वेगळा) त्याचा उत्साह पडदा व्यापतो. विनोदनिर्मितीत अनेक ठिकाणी अचूक टायमिंग त्याने साधले आहे. एकंदरीत मला शा. खा. आवडला असेल अश्या काही मोजक्या चित्रपटांत मी चे.ए. ला मोजेन ! (Have I made it too large??)
साऊथ इंडियन पार्टी आणि निकीतीन धीरला विशेष काम नाहीये. जे आहे, जितकं आहे, ते आणि तितकं ते व्यवस्थित निभावतात.
कॉलीवूडमध्ये नावाजलेला 'सत्यराज' त्याच्या शारीरिक अभिनय व भेदक नजरेने लक्षात राहतो. ह्या अभिनेत्याला हिंदीत अधिकाधिक संधी मिळावी, असे वाटते.
संगीत विशाल-शेखरचं आहे. संपूर्ण स्कोअरवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी शा. खा. आणि रोहित शेट्टीची इच्छा वजा मागणी होती आणि अर्थातच त्यासाठी विशाल-शेखरने विनम्र नकार दिला होता म्हणे. बरोबरच आहे. विशाल-शेखर ह्याहून चांगले काम करतील अशी आशा वाटणेच चुकीचे आहे. कुठलेच गाणे लक्षात राहील असे दमदार नाही. प्रत्येक गाणे कुठल्या न कुठल्या गाण्याची नक्कल किंवा दोन-तीन गाण्यांची भेसळ वाटते. चांगल्या संगीताची अपेक्षा रहमानशिवाय इतर कुणाकडून करावी का ? असा प्रश्न आजकाल पडायला लागला आहे.
रोहित शेट्टीचे सिनेमे वैचारिक उंची गाठत नसतातच. ते अगदीच वैचारिक दिवाळखोरीसुद्धा दाखवत नाहीत. नर्मविनोदाचा जमाना गेला आहे. आताचा विनोद अंगावर आपटतो आणि शेट्टी इज मास्टर ऑफ इट. अनेक प्रासंगिक विनोद मस्त जमले आहेत. अनावश्यक पसारा न करता कहाणीला वेग देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं जाणवतं आणि त्यामुळेच पटकथेतल्या काही 'भोकां'कडे लक्ष जात नाही. जसं - कल्याणचा प्लान बदलून कर्जतला भेटणार असलेला आपला मित्र आला नाही. त्याचा फोन लागत नाही. ह्याची काळजी न वाटून, काहीच न करण्याच्या वयाचे राहुलचे मित्र नसतात. चाळीशीत इतपत तर समज येते, नाही का ? मोबाईल फोन जवळ नाही, पण एखादा नंबरही पाठ नसतो, असं नसतं ना ? किमान घरचा नंबर तरी प्रत्येकालाच पाठ असतो.
एकंदरीत चे. ए. एकदा बघायला नक्कीच हरकत नसावी, (शा. खा. भक्त पारायणंहीकरू शकतील) असा नक्कीच आहे. फक्त चित्रपटाचं तिकीट आणि रेल्वेचं खरंखुरं तिकीट एकाच किमतीचं नसावं !
रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/movie-review-chennai-express.html
रणजीत आयएम सो सिरिअस मागे
रणजीत आयएम सो सिरिअस
मागे एकदा मी हे केदारला म्हणाले होते
बघा कोणाला इच्छा आहे का?
लाँग वीकेण्ड येतोय!
एक पारायण शाहरुखप्रेमी माबोकर
एक पारायण शाहरुखप्रेमी माबोकर गटगमध्ये होऊन जाऊ देत की
धम्माल येईल >> गुड आयडीया
एक पारायण शाहरुखप्रेमी माबोकर
एक पारायण शाहरुखप्रेमी माबोकर गटगमध्ये होऊन जाऊ देत की
>>>>>>>>>
अगदी अगदी...
पण शाहरुखप्रेमीच का... शाहरुखद्वेषींनाही यात सामील करून सिनेमा चालू असतानाच काय ती आमनेसामने चर्चा करता येईल..
याउपर जे या वादात नाही त्यांनीही यावे.
तसेही शाहरुख खान, सचिन तेंडुलकर यांसारखी व्यक्तीमत्वे राष्ट्रीय एकात्मता वाढवायची कामे करतात.. माबोकर देखील एक होतील..
एवढी मारामारी चाललीय
एवढी मारामारी चाललीय वरती(शारूक चांगला की वाईट) त्यापेक्षा हे सांगा कोणीतरी,
ते लुंगी गाणम नक्की कधी होतं? मला अजिबात आठवत नाहीये.
दुसरे , शेवटी कुठले गाणे होते की पबलिक न उठता शेवटपर्यंत बघत होते... मला हे कसे नाही कळले.. मी लग्न कर असे बाप म्हणतो व दीपिका म्हणते... आपण रामेश्वरम इथूनच नसतो का पळालो हे एकले व उठले.. ट्राफिक वाढते म्हणून..
रीये मी पण चेन्नई एक्सप्रेस्स
रीये मी पण चेन्नई एक्सप्रेस्स धरुन पुण्याला येउ काय??
मी लग्न कर असे बाप म्हणतो व
मी लग्न कर असे बाप म्हणतो व दीपिका म्हणते... आपण रामेश्वरम इथूनच नसतो का पळालो हे एकले व उठले.. ट्राफिक वाढते म्हणून..
>>>>>>>>>>>>>
झंपी, म्हणजे आपण रो.शे.ची अॅक्शन नाही तर शाहरुखची कॉमेडी बघायला गेलेलात तर... मस्तच हं.. पक्के शा.खा.पंखे आहात ..
याउपर जे या वादात नाही
याउपर जे या वादात नाही त्यांनीही यावे.>>>ठीक आहे. चलो कोल्हापुर.
महाभव्य गटग महाभव्य भक्तांसहीत.
सिन्ग्ल स्क्रीनला बघुयात.
शिट्ट्या, दन्गा, चिल्ल्लर उधळणे वै सहीत..
स्मिते ये की लोक्स ठरवाच
स्मिते ये की

लोक्स ठरवाच प्लिज
कोण कोण तयार आहे?
हात वर करा
झकोबा, कोल्हापुर?
झकोबा, कोल्हापुर?
इथुन ऑनलाईन उपस्थित आहेच
इथुन ऑनलाईन उपस्थित आहेच
मौजे ग्वांजू, द. कोरिया, जपानच्या जवळ. 
सिनेमा काय आहे? चेन्नई
सिनेमा काय आहे? चेन्नई एक्स्प्रेस. मग गटग कुठे करायचे तर चेन्नईमधेच!!!!!!!
इकडे या, पब्लिक रजनीकांतच्या गाण्याला अतिधुमाकूळ घालतंय. इथला पब्लिकचा धुमाकूळ ऐकलात तर समजेल फॅनचा क्रेझीपणा काय असतो ते....
>>झंपी, म्हणजे आपण रो.शे.ची
>>झंपी, म्हणजे आपण रो.शे.ची अॅक्शन नाही तर शाहरुखची कॉमेडी बघायला गेलेलात तर... मस्तच हं.. पक्के शा.खा.पंखे आहात<<
मी प्रश्ण काय विचारला आणि काय उत्तर देता आहात... मी कोणाची पंखा आहे ह्याचा कशाला अॅनालिस्सिस....
एका प्रश्णावरून..आँ...
मग गटग कुठे करायचे तर
मग गटग कुठे करायचे तर चेन्नईमधेच!!!!!!! >>> ++१
नंदिनी , यात जे तमिळ संवाद आहेत , ते खरोखरीच तसेच आहेत का ? कारण ते कन्नड , मल्याळम किंवा तेलुगू म्हणूनही आम्हला खपल असत .
औरंगाबाद.......... हे ठरतंय
औरंगाबाद..........
हे ठरतंय माझ्या बाफवर.. मग मला इतपत मुभा द्या ना !!
चला ....... भांडण ते
चला ....... भांडण ते गटग......... इतिश्री संपुर्ण
अरे देवा मी येती
अरे देवा
मी येती चेन्नईकू
मेरेको नो प्रॉब्लेम
रणजीत आयड्या माझीये ना?
मग पुण्यात
नहि उदय... आता गटग कुठेवरुन
नहि उदय... आता गटग कुठेवरुन भांडणं बाकी आहे
सगळेच एकाचवेळी वेगवेगळ्या गावात वेगवेगळया थेटरात जमेल का?
रणजीत आयड्या माझीये ना? मग
रणजीत आयड्या माझीये ना?
मग पुण्यात>>
मग अॅट लीस्ट 'शुक्रवार' तरी ठरवा!
>>सगळेच एकाचवेळी वेगवेगळ्या
>>सगळेच एकाचवेळी वेगवेगळ्या गावात वेगवेगळया थेटरात जमेल का?<<
ही आयडीयाची कल्पना पण चांगली आहे.... पण किमान दोघे तरी एकत्र हवेत.. असं वाटतं.
चला मराठी चित्रपटही कोट्याधीश
चला मराठी चित्रपटही कोट्याधीश झाले.
कुठलाही वार ठरवा आयेम
कुठलाही वार ठरवा
आयेम रेडी
केदार नो बॅकऑट?
राईट?
अभिषेकदादा , वॉट अबाऊट यू?
मिलिंददादाला फोना रे कोणी तरी
शाखा रहातो कुठे?? मुंबैत.
शाखा रहातो कुठे?? मुंबैत. मग???
मुंबैला या सगळे 
सगळे सोबत असलोत तर धमाल करू
सगळे सोबत असलोत तर धमाल करू ना
तिथे भर थेटरात पब्लिक आधी तमिळ कळत नसल्याने वैतागेल
मग मध्ये दिवे घ्या, हजार मोदक, विपूत सांग हे काये ते न कळल्याने वैतागेल
झालच तर अचानक शाहरुख आणि अमीर आणि सलमान हा वाद मध्येच कुठे आला म्हणून भंजाळेल
आपल्याला काय
इथे बोला रे
इथे बोला रे -
http://www.maayboli.com/node/44611
फॅनचा क्रेझीपणा काय असतो
फॅनचा क्रेझीपणा काय असतो ते..>> लै लाम्ब आहे.
त्यापेक्षा सोलापुरात जाउन बघु काय एखादा तेलुगु चित्रपट??
, कोल्हापुर?>>> मी तेव्हा तिथे असेन म्हणुन...
शाखा रहातो कुठे?? मुंबैत.
शाखा रहातो कुठे?? मुंबैत. मग??? स्मित मुंबैला या सगळे>>> त्याच्या घरी नेत असाल तर येवु स्वखर्चाने.
त्याचं घर लांबुन दाखवेन की.
त्याचं घर लांबुन दाखवेन की. त्याच बरोबर सलमान, अमिताभ, ऐश्वर्या, राजेश खन्ना ह्यांची घरं आणि सी लिंक, मोतमाउली सगळच बघाल
मग भक्त आणि ना भक्त ( हा शब्द आताच एका बाफ वर वाचला) ह्यांच्यात कुणाचं घर जास्त चांगल ह्यात पण चर्चा होउदेत.
नुसतं घर बघू काय करू?
नुसतं घर बघू काय करू?
रीये तुला सांगितलय ना शाखा ला
रीये तुला सांगितलय ना शाखा ला बघितलस तर झोपेतुन घाबरुन उठशील काहीतरी असंच
गप्पे तशीही मला झोप येत
गप्पे

तशीही मला झोप येत नाही
काळजी नसावी
Pages