झुळझुळ वाहणारं पाणी खळखळ नाद करतं. एक चैतन्य, उत्साह निर्माण करतं. कधी त्याचा फेसाळ, दुधाळ रंग चित्तवेधक असतो तर कधी त्याच्या स्वच्छ प्रवाहातून दिसणारा तळ ! पण हेच पाणी साचून राहिलं की ? नकोसंही होतं.
प्रवासही प्रवाही असायला हवा. कुठेही अडून राहावं लागलं, खोळंबा झाला की नकोसं होतं. दिशा चुकली, भरकटली की संयम सुटतो. गती ही प्रवासासाठी अत्यावश्यक.
'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक गतिमान प्रवास आहे. ही गाडी कुठेही 'सायडिंग'ला पडत नाही. औरंगाबाद-पुणे रेल्वे दौंड मार्गे जाऊन ८ तास खाते, तशी ही चेन्नई एक्स्प्रेस वेड्यासारखी भरकटत नाही. ह्या गाडीचं तिकीट काढताना आपल्याला माहित असतं की ही कुठल्या मार्गाने जाणार आहे, किती थांबे आहेत, किती वेळ लागणार आहे आणि अर्थातच कुठून सुरु व कुठे संपणार आहे. सगळं काही माहित असतानाही हा प्रवास कंटाळवाणा होत नाही. डब्यातल्या शौचालयाच्या वासाने गुदमरायलाही होत नाही आणि विदाउट तिकीट चढलेल्या उपऱ्या लोकांचा त्रासही होत नाही.
गाडी मुंबईहून सुरु होते. जसा अमिताभ 'विजय' असायचा, तसा शाहरुख 'राज' किंवा 'राहुल' असतो. इथे तो राहुल आहे. भूमिकेत शा.खा. फिट्ट होण्यापेक्षा भूमिका शा. खा. साठी फिट्ट व्हावी म्हणून आधीच सांगून ठेवलेलं आहे की तो चाळीशीचा आहे. वयस्कर व्यक्तिची प्रेमकहाणी दाखवायची आहे म्हणून त्याचं आधी एखादं लग्न झालेलं आणि बायको गचकलेली वगैरे भावनिक ठिगळं इथे नाहीत. आई-बापाविना वाढवलेल्या नातवावरील अपार प्रेमासमोर, आजोबा नातवाचं लग्न वगैरे क्षुल्लक गोष्टी बाजूला ठेवतात, इतकंच. सचिन तेंडुलकरचे परमचाहते असलेले राहुलचे आजोबा, स्वत:च्या शंभराव्या वाढदिवशी भारत-पाकिस्तान सामना पाहत असतात. सचिन आणि आजोबा दोघेही ९९ वर असतात आणि एक चेंडू दोघांचीही विकेट काढतो. तिकडे पाकिस्तानी खेळाडू सुटकेचा निश्वास टाकतात आणि इकडे राहुल मुक्त हवेत मोकळा श्वास घेतो. मित्रांसोबत आधीच ठरलेला गोव्याला जायचा प्लान 'ऑन' ठेवतो आणि तयारी करतो. पण आजोबांची एक विचित्र इच्छा असते. त्यांच्या अर्ध्या अस्थींचं विसर्जन गंगेत आणि अर्ध्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरमला करावं ! (ही अशी इच्छा का असते ? ह्याचं कारण/ संदर्भ कुठेच मिळणार नाही. बस्स. असते. कारण चित्रपट पुढे जायचा असतो.) राहुलला आजीला दाखवण्यासाठी चेन्नई एक्स्प्रेसने जाण्याचं नाटक करावं लागतं. प्रत्यक्षात कल्याणला उतरून, मित्रांसोबत गोव्याला जाऊन तिथेच अस्थि विसर्जित करण्याचा नतद्रष्ट प्लान केला जातो. मृत व्यक्तीच्या भावनांशी खेळ केल्याबद्दल त्याला तळतळाट लागतो आणि सगळ्या प्लानचा खेळखंडोबा होतो. चालू गाडीतून उतरताना मिनम्मा (दीपिका) गाडीसोबत धावताना त्याला दिसते. हात देऊन तो तिला आत घेतो. (असा सीन चित्रपटात असणार हे मला आधीच माहित होतं आणि त्याला पार्श्वसंगीत काय असेल, हे तुम्हालाही नक्कीच माहित आहे.) दीपिकापाठोपाठ ३-४ सांडसदृश मनुष्यसुद्धा धावत येतात आणि त्यांनाही राहुल आत घेतो. दीपिका एका डॉन (सत्यराज) ची मुलगी असते, 'थंगबली' (निकितिन धीर) नामक होतकरू डॉनशी होऊ घातलेल्या लग्नापासून ती पळालेली असते, हे आपल्याला ट्रेलरमधूनच माहित झालेलं असतं. पुढे सगळे जण तमीळनाडूतल्या त्यांच्या गावी येतात आणि परिस्थितीशरण राहुललाही त्यांच्यासोबत यावंच लागतं. निकितिन हा खरं तर 'शाखातिन' आहे. (शा. खा. X ३ इतका धिप्पाड) त्यामुळे इथून पुढे पळापळी असणार असते. होते. आणि सगळ्या धावपळीनंतर, काही गाड्या-माणसं उडून-उडवून झाल्यानंतर कहाणी अपेक्षित शेवटाला पोहोचते.
चेन्नई एक्स्प्रेस ही काही रोलर कोस्टर राईड नाही. लागणारे धक्के पोटात गोळा आणत नाहीत. पण ही अगदीच संथगती ट्रामही नाही. काही सिनेमे सुरु होण्याआधीच 'आपकी यात्रा आनंददायी एवं सुखकाकरक हो, यही हमारी शुभकामानायें' वाली भारतीय रेलची अनाउन्समेण्ट करतात. तसाच चे.ए. आहे.
तमिळनाडू म्हणून दाखवलेला भाग गोवा असावा, असं वाटलं. कोम्बण गावाला जाण्यासाठी जिथे ट्रेन थांबवली जाते, तो बहुतेक गोवा-कर्नाटक सीमेवरचा नयनरम्य दुधसागर धबधबा असावा, असंही वाटलं.
दीपिकाच्या 'मिनम्मा'च्या अॅक्सेन्टवरून बरेच लिहिले-बोलले गेले आहे. हा अॅक्सेन्ट खरोखर तमीळ आहे की मल्याळी माहित नाही. पण तो काही काळ गंमतीशीर वाटतो. तिच्यासोबत राहून राहून राहुल थोडंसं तमिळ बोलायला लागतो तरी तिचा अॅक्सेन्ट जराही बदलत नाही. शेवटी शेवटी तिने जपलेलं ते बेअरिंग बोअरिंग वाटायला लागतं. पण दिसलीय लै भारी !
शा. खा. 'जतहैंजा'मध्ये दिसला त्यापेक्षा तरूण दिसलाय आणि त्यामुळे चाळीशीचाच (Not more) वाटलाय. शा. खा. ह्या चित्रपटाची जान आहे. बाकी काहीही असलं, तरी त्याचा उत्साह नेहमीच बेजोड असतो. (त्या उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अॅक्टिंग करतो, हा भाग वेगळा) त्याचा उत्साह पडदा व्यापतो. विनोदनिर्मितीत अनेक ठिकाणी अचूक टायमिंग त्याने साधले आहे. एकंदरीत मला शा. खा. आवडला असेल अश्या काही मोजक्या चित्रपटांत मी चे.ए. ला मोजेन ! (Have I made it too large??)
साऊथ इंडियन पार्टी आणि निकीतीन धीरला विशेष काम नाहीये. जे आहे, जितकं आहे, ते आणि तितकं ते व्यवस्थित निभावतात.
कॉलीवूडमध्ये नावाजलेला 'सत्यराज' त्याच्या शारीरिक अभिनय व भेदक नजरेने लक्षात राहतो. ह्या अभिनेत्याला हिंदीत अधिकाधिक संधी मिळावी, असे वाटते.
संगीत विशाल-शेखरचं आहे. संपूर्ण स्कोअरवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी शा. खा. आणि रोहित शेट्टीची इच्छा वजा मागणी होती आणि अर्थातच त्यासाठी विशाल-शेखरने विनम्र नकार दिला होता म्हणे. बरोबरच आहे. विशाल-शेखर ह्याहून चांगले काम करतील अशी आशा वाटणेच चुकीचे आहे. कुठलेच गाणे लक्षात राहील असे दमदार नाही. प्रत्येक गाणे कुठल्या न कुठल्या गाण्याची नक्कल किंवा दोन-तीन गाण्यांची भेसळ वाटते. चांगल्या संगीताची अपेक्षा रहमानशिवाय इतर कुणाकडून करावी का ? असा प्रश्न आजकाल पडायला लागला आहे.
रोहित शेट्टीचे सिनेमे वैचारिक उंची गाठत नसतातच. ते अगदीच वैचारिक दिवाळखोरीसुद्धा दाखवत नाहीत. नर्मविनोदाचा जमाना गेला आहे. आताचा विनोद अंगावर आपटतो आणि शेट्टी इज मास्टर ऑफ इट. अनेक प्रासंगिक विनोद मस्त जमले आहेत. अनावश्यक पसारा न करता कहाणीला वेग देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं जाणवतं आणि त्यामुळेच पटकथेतल्या काही 'भोकां'कडे लक्ष जात नाही. जसं - कल्याणचा प्लान बदलून कर्जतला भेटणार असलेला आपला मित्र आला नाही. त्याचा फोन लागत नाही. ह्याची काळजी न वाटून, काहीच न करण्याच्या वयाचे राहुलचे मित्र नसतात. चाळीशीत इतपत तर समज येते, नाही का ? मोबाईल फोन जवळ नाही, पण एखादा नंबरही पाठ नसतो, असं नसतं ना ? किमान घरचा नंबर तरी प्रत्येकालाच पाठ असतो.
एकंदरीत चे. ए. एकदा बघायला नक्कीच हरकत नसावी, (शा. खा. भक्त पारायणंहीकरू शकतील) असा नक्कीच आहे. फक्त चित्रपटाचं तिकीट आणि रेल्वेचं खरंखुरं तिकीट एकाच किमतीचं नसावं !
रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/movie-review-chennai-express.html
मी मेहनतीचे पैसे खर्च करून
मी मेहनतीचे पैसे खर्च करून पिच्चर बघतो..... वेळ घालून परीक्षण(?) लिहितो.. आणि लो भलत्याच गप्पा मारतात बाफवर.. काही जण तर भांडणच करतात..
माझे आत्तपर्यंत पाहिलेल्या सर्व चित्रपटांचे पैसे + इंटरनेटचा चार्ज + वेळेची भरपाई + थोडंसं विडी-काडीकरता असं सगळं मला पण परत मिळेल का ?
मला तर आता भारत हरलेल्या
मला तर आता भारत हरलेल्या क्रिकेटसामन्यांचेही पैसे परत हवेत..
या बाफ मुळे माझे सर्व पैसे
या बाफ मुळे माझे सर्व पैसे वसुल झाले ....आणि मन हलके .... त्याबद्दल मी बाफ निर्मात्याची आभारी आहे ....
मयी कडून सगळ्यांनी वसूल करा
मयी कडून सगळ्यांनी वसूल करा
बरंय, मी नाही पहिला चेन्नई
बरंय, मी नाही पहिला चेन्नई एक्स्प्रेस !!!! आणि 'दुनियादारी'चे किमान माझे पैसे तरी वसूल झालेले आहेत.(एक तो वयस्कर झ.बा. सोडला तर
) आता 'टाईमप्लीज' सुद्धा पाहिला. त्याचे हि पैसे वसूल झाले. 
उदयन : अग्दि अग्दि ...
उदयन : अग्दि अग्दि ... त्यासाठी मी तुम्हाला मस्त धुम३ दाखवेन हो .. तयार असा
मस्त धुम३ दाखवेन हो>>> काहीही
मस्त धुम३ दाखवेन हो>>> काहीही दाखवु नका...बुटकाबैंगण बघण्याची हौस नाही मला.. त्याच्या उंचीपेक्षा तर ती हायाबुसा बाईक ची लांबी आहे
उदयन , धूम ३ अभिषेक बच्चनसाठी
उदयन , धूम ३ अभिषेक बच्चनसाठी बघा हो. त्याची हाइट बरी आहे तशी
त्याची ओव्हर आहे हो... उगाच
त्याची ओव्हर आहे हो... उगाच कारण नसताना खेचला गेल्यासारखा आहे तो
फेसबुक चे एक बर असते, आपण
फेसबुक चे एक बर असते, आपण कोण, आपल कर्तुत्व काय याचा काहि न विचार करता बराक ओबामा पासून नदाल पर्यंत आणि सचिन पासून मेस्सी पर्यंत कोणालाही काहीही शिव्या घालता येतात.
वर त्याला लाईक करणारी You scratch my back and I will yours वाली मंडळी असतातच.
फेसबुक
फेसबुक
अरे वा ३५ वर्ष्यांचा स्वजो
अरे वा ३५ वर्ष्यांचा स्वजो २२ वर्ष्यांचा कॉलेज तरुण म्हणुन चालतो पण ४७ वर्ष्यांचा शाखा ४० वर्ष्यांचा तरुण(म्हातारा) म्हणुन चालत नाही?
आजच चेन्नै एक्स्प्रेस पाहिला.
आजच चेन्नै एक्स्प्रेस पाहिला. सिनेमा खूप मस्त आहे.
टिपीकल कमर्शिअल सिनेमा. डोक्याला कुठेही ताप नाही.
शाहरुख - दिपीका फॅन्स साठी मस्ट वॉच. दिपीका ने रोल चांगला पेललाय. ती जास्त भाव खाउन जाते असे मला वाटले.ती या सिनेमात दिसतेही ही छान.शाहरुख ने ही ओव्हर अॅक्टिंग अगदी कमी केली आहे . अतार्किक गोष्टी बर्याच कमी आहेत. आजच १५० कोटी क्रॉस केल्याचे वाचले.
मला का आवडला -
१.सर्व लोकेशन्स अप्रतिम.
२.फोटोग्राफी उच्च दर्जाची.टॉकिजला दॄष्याची भव्यता मस्त जाणवते. (काही ठिकाणी एरियल व्ह्यूज्,ट्रेन खालून
कॅमेरा लावणे , कॅमे-यावर ट्रेन धडाडत येणे ई)
३.चुरचुरीत संवाद.कॉमेडी ची बाजू ओके. (फर्स्ट हाफ टॉकिज नुसतं हसत होतं) .
४.लहान मुले व पालक दोन्ही वर्गातला क्राऊड एंजॉय करू शकेल असा.(कथानकात वाव असूनही कुठेही
प्रौढांसाठीचे सीन्स नाहीत.धबधबा, गाव ,शेत ,हिरो हिरॉईन एकाच खोलीत अशा ठिकाणी कथानक घडत
असूनही धबधब्याखाली धोतरापेक्षा पातळ साडीत हिरॉईन भिजत नाही , असहाय्य हिरॉईन चा कुणीही
गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत नाही.अंगप्रदर्शन / बीभत्स सीन्स / किसींग् / बेड सीन्स नाहीत. गुडघ्यापर्यंत
काष्ट्याच्या नऊवारी साड्या नेसणार्या गांवक्या गो-या नाहीत.
५.सर्व कलाकारांचा अभिनय चांगला.
६.वेगवान हाताळणी.
तितली गाणे सुंदर .शेवटचा लुंगी डान्स ही मस्त.
एकूणच मस्त, फ्रेश वाटले चैए बघून.
शाहरुख , दिपीका , शेट्टी कॉम्बो रॉक्स !
(तळटीप - मी शा.खा ची डाय हार्ड पंखा नाही . )
माशा, एकुण एका शब्दाला
माशा, एकुण एका शब्दाला अनुमोदन
रिया. लुंगी डान्स ला तर मी व
रिया.
लुंगी डान्स ला तर मी व लेकीने डान्स चा मोह आवरला . अगदी आपणही नाचावे असे वाटत होते.
ईईईईईईईईईईई मला नाही आवडलं ते
ईईईईईईईईईईई मला नाही आवडलं ते गाणं,
माझं तसं १-२-३-४ ला झालेलं
आज हा सिनेमा बघितला. इथली
आज हा सिनेमा बघितला. इथली चर्चा सुद्धा वाचली. पॉवर ऑफ कॉमन मॅन , सिनेमाचा उद्देश ह्या मला न समजलेल्या गोष्टी! असो, सिनेमा ज्या कोणाला आवडला नाही त्यांच्या ( पैसे फुकट गेल्याच्या ) दु:खात मी सहभागी
मी अन माझ्या लेकीने तर
मी अन माझ्या लेकीने तर कितीतरी वेळा लुंगी डान्स या गाण्यावर नाच केला आहे. मस्त नाचते ती.
मी उद्या
मी उद्या पुन्हाआआआआआआआआआआआआआआआआआआ बघणार
वाआआआआआआआआआआआआआआआ
ढिंका चिका
रिया. इतका मोठा ई कशाला ?
रिया.
इतका मोठा ई कशाला ? आमची पहिलीच खेप होती ना . डॉल्बी सिस्टीम वर मजा आली आम्हाला तरी.
पाषाणभेद ,
लेकीबरोबर डान्स करणे ही मजा वेगळीच असते नाही ?
संपदा , सिनेमाचा मला कळालेला
संपदा ,
सिनेमाचा मला कळालेला उद्देश्य -
एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट !
भारतीय प्रेक्षक २ घटका करमणूकीसाठी सिनेमा बघतात हे रोहित शेट्टीला खूपच लौकर समजलेले आहे.
सर्व थरातल्या / वयोगटाच्या / वेगवेगळ्या राज्यातल्या / परदेशातल्या लोकांना आवडेल असं प्रॉडक्ट बनवणे हे खायचे काम नाही.
माशा, रिया, ___ यातील
माशा, रिया, ___ यातील रियाशी सहमत...
मलाही लुंगीडान्स गाणे फारसे नाही आवडल .. वन-टू-थ्री-फोर वर मात्र खुर्चीतून उठायचा मोह झालेला.. पण बायको आणि मेव्हणी बरोबर होतो..
पण नुकतेच दुनियादारी मित्रांबरोबर दुसर्यांदा बघायला गेलेलो तेव्हा झिंदगी गाण्यावर आणि काही डायलॉगवर गोंधळ घातला होता... जर चेई बाबत असा योग जुळून आला तर वन-टू-थ्री-फोर वर नक्की..
काल पाहिला. अगदीच टाकाऊ
काल पाहिला. अगदीच टाकाऊ नाहीये
आणि अगदीच महान पण नाही. टिपिकल बॉलीवूड मसाला मूव्ही आहे, जो बर्यापैकी जमून आला. सिनेमा मधेमधे "शाहरूख खान"चा आहे, मधेमधे "रोहित शेट्टीचा". जिथे रोहितचा सिनेमा आहे तिथे शाहरूख बॅकसीट घेतो आणि सेम तसंच उलटदेखील.. मात्र, पूर्ण सिनेमावर छाया आहे ती एक्झिक्ञ्टीव्ह लोकांची. पूर्ण सिनेमा शाहरूखच्या आधीच्या सिनेमाचा कोलाज बनवल्यासारखा आहे. प्रत्येक सीन (आणि बरेचसे संवाददेखील) शाहरूखच्या ग्लोरीयस पास्टची आठवण करून देण्यासाठी पेरले आहेत. पटकथेमधले ४० वर्षाचा नायक तोपण विनालग्नाचा वगैरे खुबीने वापरलेले पॉइन्ट्स आणि ए़ंदर सिनेम्याची हाताळणी पाहता चेन्नई एक्स्प्रेस हा सिनेमा म्हणून कसाही असू देत, मार्केटींग एक्सरसाईझ म्हणून फार उच्च आहे. बॉलीवूडचं कार्पोरटायझेशन किती प्रमाणात झालं आहे, यासाठी चेन्नई एक्स्प्रेस उत्तम उदाहरण आहे.
आता चित्रपटाबद्द्ल: मला तमिळ संवाद समजायला काहीही कठिण गेलं नाही. पण दिपीका टिपिकल कानडी स्टाईलने तमिळ बोलते. खासकरून "ळ"चे उच्चार. ती दिसते साऊथ इंडियन आणि काम देखील बरं करते पण तिचा लूक पण फार क्लिशे टाईप घेतला आहे. अपवाद: मला ती प्रचंड आवडली ती फक्त तिच्या लग्नातल्या साडीमधे. ती कांजीवरम आणि ती हेअरस्टाईल तिला फार मस्त सूट झालीये.
थंगबलीसोबतची अख्खी हाणामारी अचाट आहे, पण रोहित शेट्टीचा सिनेमा आहे म्हणून त्याला माफी!!!
ती पायर्या चढायची रसम (इथला पन सॉलिड आहे!!) बहुतेक जेजुरीवरून घेतली आहे.
शाहरूख म्हातारा दिसतो. यात वाद नाही. त्यासाठी त्याला कितीही ४० वर्षीय वगरेइ दाखवला तरी दिपीका त्याच्या मुलीसारखी दिसते हा फॅक्ट नजरेआड होत नाही. म्हणून असेल कदाचित, पण ती दोघे स्क्रीनवर असताना शाहरूख दिपीकाकडे लक्ष जाणार नाही याची पुरेपूर खात्री त्याच्या अभिनयामधून घेतो. शाहरूख खान कधीकाळी स्टेजवर अभिनय करायचा म्हणे. त्यामुळेच असेल पण लांबलचक पल्लेदार संवाद सलग म्हणणं हा त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे. यापण सिनेमामधले असले सम्वाद त्याने कमाल केले आहेत. संवाद मुळातच चटपटीत असल्याने शिवाय त्याच्या अफलातून देहबोलीतून त्याने बहार आणली आहे.
सिनेमामधे जे काही शाहरूख करतो ते बघायला मजा येते. पण दुर्दैव असं की, हे सर्व शाहरूखने आधी केलेलंच आहे. अगदी "यु आर अ टीचर... चीटर" सारखा संवाद इथे "डोन्ट अम्डर एस्टीमेट कॉमन ऑफ अ पॉवर मॅन" सारखाच येतो त्यावर शाहरूखचे तेच फेशियल एस्क्प्रेशन्स!!! हे सर्व करणं म्हणजे शाहरूख खान नव्हे. ज्या लोकांना शाहरूख खानमधे फक्त हेच आणि असलेच बघायचे आहे, त्यांचे पूर्ण पैसे वसूल होतात. पण ज्यांना शाहरूखकडून थोड्या अधिक अपेक्षा आहेत- आणि अपेक्षा रास्त आहेत, कारण शाहरूख खर्ंच चांगला अभिनेता आहे, त्यांचा अपेक्षाभंग होतो. शाहरूख याहून अधिक काही करू शकेल, पण "माझ्या प्रेक्षकांना ते आवडणार नाही" म्हणून तो वेगळं काही करतच नाही. तेवढ्याच चाकोरीमधे फिरत राहतो. ज्या धडाडीने त्याने सुरूवातीला वेगळ्या पद्धतीचे सिनेमा केले होते- तोच आता वय उलटून गेलं तरी तिथेच घुटमळतोय. (तो दरमियान नावाचा एक सिनेमादेखील करणर होता, पण इमेज खराब होइल म्हणून केला नाही....
) हेच सेम अमिताभ आणि दिलीपकुमारचं झालं होतं. अमिताभने सेकंड इनिंगमधे तरी बरेच विविध प्रकारचे सिनेमा करून पाहिले. आता शाहरूखने देखील धाडसाने वेगळे सिनेमा केले तर पब्लिक नक्की बघायला जाईल. पण त्याला आता परत सिंगल स्क्रीन बादशाह व्हायचे डोहाळे लागलेत!! १५० कोटी कमावले या हिशोबात जर त्याला खुश रहायचं असेल आणि त्याच्या फॅन्सनादेखील चेन्नई एक्स्प्रेस पाहून तो किती ग्रेट आहे याचा साक्षात्कार होत असेल तर आपण काय बोलणार??? शाहरूखने परत स्वदेस चकदे इंडिया, कभी हा कभी ना अगदी बाजीगरदेखील परत करावा अशी अपेक्षा ठेवणारे प्रेक्षक मूर्खच नाही का?
आधी म्हटलं तसं चेन्नई एक्स्प्रेस हा मार्केट ड्रिवन सिनेमा आहे, प्रेक्षकांना हे बघायचे आहे. तेच प्रॉडक्ट आम्ही मार्केटमधे आणलंय एवढ्यावरच प्रेक्षक खुश, सिनेमा बनवणारे खुश.
सुंदर पोस्ट,
सुंदर पोस्ट, नंदिनी..
शाखाबद्दलच्या प्रत्येक शब्दास मनापासून अनुमोदन.. एकदम मेरे दिल की बात..!!
फार छान लिहिलंत..
नंदीनी ___ शेवटच्या प्याराशी
नंदीनी ___ शेवटच्या प्याराशी प्रचंड सहमत..
"दरमियान" म्हणजे तोच तृतीयपंथी भुमिका असलेला ना.. ते तेव्हा मी देखील ऐकले होते.. नंतर ती भुमिका परेश रावलने केली बहुतेक..
दिलीपकुमारचा काळ माझा नव्हता मात्र अमिताभनेही त्याच्या काळात हे धाडस दाखवले नव्हते हे ही खरेच, मात्र त्याच्यासारखेच सेकंड इनिंगला शा.खा. वेगळी वाट ट्राय करेल अशी आशा, त्यात पोटेंशिअल नक्कीच आहे.. फक्त अजूनपर्यंत तरी तो आणि त्याचे चाहते फर्स्ट इनिंगच अभी बाकी है मेरे दोस्त, आहे अश्या हिशोबात आहेत..
त्या चाहत्यात मी देखीक एक आहे हे प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो
मला ती प्रचंड आवडली ती फक्त
मला ती प्रचंड आवडली ती फक्त तिच्या लग्नातल्या साडीमधे. ती कांजीवरम आणि ती हेअरस्टाईल तिला फार मस्त सूट झालीये.+१
दरमियान" म्हणजे तोच तृतीयपंथी
दरमियान" म्हणजे तोच तृतीयपंथी भुमिका असलेला ना.. ते तेव्हा मी देखील ऐकले होते.. नंतर ती भुमिका परेश रावलने केली बहुतेक..
>> परेश रावल ने नाही, दुसर्या एका अभिनेत्याने केली होती. नाव विसरले/
अरिफ झकेरिया.
अरिफ झकेरिया.
चिनूक्स, येस. धन्यवाद. चेहरा
चिनूक्स, येस. धन्यवाद. चेहरा आठवत होता पण नाव आठवेना. मी अरिफ शेख आणि असिफ शेख गूगल करून पाहत होते.
मीपण काल पाहिला. अपेक्षा
मीपण काल पाहिला. अपेक्षा जास्त झाल्या बहुधा शाहरुख कडून. त्या मानाने काहीच हाती आले नाही!
दोन तीन वेळा खरं हसू आलं असेल्/नसेल. पण बाकी बोर झालं. यापेक्षा शारुख मधे अन इव्हन मूव्हीच्या विषयात पण बरंच जास्त पोटेन्शियल होतं
Pages