झुळझुळ वाहणारं पाणी खळखळ नाद करतं. एक चैतन्य, उत्साह निर्माण करतं. कधी त्याचा फेसाळ, दुधाळ रंग चित्तवेधक असतो तर कधी त्याच्या स्वच्छ प्रवाहातून दिसणारा तळ ! पण हेच पाणी साचून राहिलं की ? नकोसंही होतं.
प्रवासही प्रवाही असायला हवा. कुठेही अडून राहावं लागलं, खोळंबा झाला की नकोसं होतं. दिशा चुकली, भरकटली की संयम सुटतो. गती ही प्रवासासाठी अत्यावश्यक.
'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक गतिमान प्रवास आहे. ही गाडी कुठेही 'सायडिंग'ला पडत नाही. औरंगाबाद-पुणे रेल्वे दौंड मार्गे जाऊन ८ तास खाते, तशी ही चेन्नई एक्स्प्रेस वेड्यासारखी भरकटत नाही. ह्या गाडीचं तिकीट काढताना आपल्याला माहित असतं की ही कुठल्या मार्गाने जाणार आहे, किती थांबे आहेत, किती वेळ लागणार आहे आणि अर्थातच कुठून सुरु व कुठे संपणार आहे. सगळं काही माहित असतानाही हा प्रवास कंटाळवाणा होत नाही. डब्यातल्या शौचालयाच्या वासाने गुदमरायलाही होत नाही आणि विदाउट तिकीट चढलेल्या उपऱ्या लोकांचा त्रासही होत नाही.
गाडी मुंबईहून सुरु होते. जसा अमिताभ 'विजय' असायचा, तसा शाहरुख 'राज' किंवा 'राहुल' असतो. इथे तो राहुल आहे. भूमिकेत शा.खा. फिट्ट होण्यापेक्षा भूमिका शा. खा. साठी फिट्ट व्हावी म्हणून आधीच सांगून ठेवलेलं आहे की तो चाळीशीचा आहे. वयस्कर व्यक्तिची प्रेमकहाणी दाखवायची आहे म्हणून त्याचं आधी एखादं लग्न झालेलं आणि बायको गचकलेली वगैरे भावनिक ठिगळं इथे नाहीत. आई-बापाविना वाढवलेल्या नातवावरील अपार प्रेमासमोर, आजोबा नातवाचं लग्न वगैरे क्षुल्लक गोष्टी बाजूला ठेवतात, इतकंच. सचिन तेंडुलकरचे परमचाहते असलेले राहुलचे आजोबा, स्वत:च्या शंभराव्या वाढदिवशी भारत-पाकिस्तान सामना पाहत असतात. सचिन आणि आजोबा दोघेही ९९ वर असतात आणि एक चेंडू दोघांचीही विकेट काढतो. तिकडे पाकिस्तानी खेळाडू सुटकेचा निश्वास टाकतात आणि इकडे राहुल मुक्त हवेत मोकळा श्वास घेतो. मित्रांसोबत आधीच ठरलेला गोव्याला जायचा प्लान 'ऑन' ठेवतो आणि तयारी करतो. पण आजोबांची एक विचित्र इच्छा असते. त्यांच्या अर्ध्या अस्थींचं विसर्जन गंगेत आणि अर्ध्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरमला करावं ! (ही अशी इच्छा का असते ? ह्याचं कारण/ संदर्भ कुठेच मिळणार नाही. बस्स. असते. कारण चित्रपट पुढे जायचा असतो.) राहुलला आजीला दाखवण्यासाठी चेन्नई एक्स्प्रेसने जाण्याचं नाटक करावं लागतं. प्रत्यक्षात कल्याणला उतरून, मित्रांसोबत गोव्याला जाऊन तिथेच अस्थि विसर्जित करण्याचा नतद्रष्ट प्लान केला जातो. मृत व्यक्तीच्या भावनांशी खेळ केल्याबद्दल त्याला तळतळाट लागतो आणि सगळ्या प्लानचा खेळखंडोबा होतो. चालू गाडीतून उतरताना मिनम्मा (दीपिका) गाडीसोबत धावताना त्याला दिसते. हात देऊन तो तिला आत घेतो. (असा सीन चित्रपटात असणार हे मला आधीच माहित होतं आणि त्याला पार्श्वसंगीत काय असेल, हे तुम्हालाही नक्कीच माहित आहे.) दीपिकापाठोपाठ ३-४ सांडसदृश मनुष्यसुद्धा धावत येतात आणि त्यांनाही राहुल आत घेतो. दीपिका एका डॉन (सत्यराज) ची मुलगी असते, 'थंगबली' (निकितिन धीर) नामक होतकरू डॉनशी होऊ घातलेल्या लग्नापासून ती पळालेली असते, हे आपल्याला ट्रेलरमधूनच माहित झालेलं असतं. पुढे सगळे जण तमीळनाडूतल्या त्यांच्या गावी येतात आणि परिस्थितीशरण राहुललाही त्यांच्यासोबत यावंच लागतं. निकितिन हा खरं तर 'शाखातिन' आहे. (शा. खा. X ३ इतका धिप्पाड) त्यामुळे इथून पुढे पळापळी असणार असते. होते. आणि सगळ्या धावपळीनंतर, काही गाड्या-माणसं उडून-उडवून झाल्यानंतर कहाणी अपेक्षित शेवटाला पोहोचते.
चेन्नई एक्स्प्रेस ही काही रोलर कोस्टर राईड नाही. लागणारे धक्के पोटात गोळा आणत नाहीत. पण ही अगदीच संथगती ट्रामही नाही. काही सिनेमे सुरु होण्याआधीच 'आपकी यात्रा आनंददायी एवं सुखकाकरक हो, यही हमारी शुभकामानायें' वाली भारतीय रेलची अनाउन्समेण्ट करतात. तसाच चे.ए. आहे.
तमिळनाडू म्हणून दाखवलेला भाग गोवा असावा, असं वाटलं. कोम्बण गावाला जाण्यासाठी जिथे ट्रेन थांबवली जाते, तो बहुतेक गोवा-कर्नाटक सीमेवरचा नयनरम्य दुधसागर धबधबा असावा, असंही वाटलं.
दीपिकाच्या 'मिनम्मा'च्या अॅक्सेन्टवरून बरेच लिहिले-बोलले गेले आहे. हा अॅक्सेन्ट खरोखर तमीळ आहे की मल्याळी माहित नाही. पण तो काही काळ गंमतीशीर वाटतो. तिच्यासोबत राहून राहून राहुल थोडंसं तमिळ बोलायला लागतो तरी तिचा अॅक्सेन्ट जराही बदलत नाही. शेवटी शेवटी तिने जपलेलं ते बेअरिंग बोअरिंग वाटायला लागतं. पण दिसलीय लै भारी !
शा. खा. 'जतहैंजा'मध्ये दिसला त्यापेक्षा तरूण दिसलाय आणि त्यामुळे चाळीशीचाच (Not more) वाटलाय. शा. खा. ह्या चित्रपटाची जान आहे. बाकी काहीही असलं, तरी त्याचा उत्साह नेहमीच बेजोड असतो. (त्या उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अॅक्टिंग करतो, हा भाग वेगळा) त्याचा उत्साह पडदा व्यापतो. विनोदनिर्मितीत अनेक ठिकाणी अचूक टायमिंग त्याने साधले आहे. एकंदरीत मला शा. खा. आवडला असेल अश्या काही मोजक्या चित्रपटांत मी चे.ए. ला मोजेन ! (Have I made it too large??)
साऊथ इंडियन पार्टी आणि निकीतीन धीरला विशेष काम नाहीये. जे आहे, जितकं आहे, ते आणि तितकं ते व्यवस्थित निभावतात.
कॉलीवूडमध्ये नावाजलेला 'सत्यराज' त्याच्या शारीरिक अभिनय व भेदक नजरेने लक्षात राहतो. ह्या अभिनेत्याला हिंदीत अधिकाधिक संधी मिळावी, असे वाटते.
संगीत विशाल-शेखरचं आहे. संपूर्ण स्कोअरवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी शा. खा. आणि रोहित शेट्टीची इच्छा वजा मागणी होती आणि अर्थातच त्यासाठी विशाल-शेखरने विनम्र नकार दिला होता म्हणे. बरोबरच आहे. विशाल-शेखर ह्याहून चांगले काम करतील अशी आशा वाटणेच चुकीचे आहे. कुठलेच गाणे लक्षात राहील असे दमदार नाही. प्रत्येक गाणे कुठल्या न कुठल्या गाण्याची नक्कल किंवा दोन-तीन गाण्यांची भेसळ वाटते. चांगल्या संगीताची अपेक्षा रहमानशिवाय इतर कुणाकडून करावी का ? असा प्रश्न आजकाल पडायला लागला आहे.
रोहित शेट्टीचे सिनेमे वैचारिक उंची गाठत नसतातच. ते अगदीच वैचारिक दिवाळखोरीसुद्धा दाखवत नाहीत. नर्मविनोदाचा जमाना गेला आहे. आताचा विनोद अंगावर आपटतो आणि शेट्टी इज मास्टर ऑफ इट. अनेक प्रासंगिक विनोद मस्त जमले आहेत. अनावश्यक पसारा न करता कहाणीला वेग देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं जाणवतं आणि त्यामुळेच पटकथेतल्या काही 'भोकां'कडे लक्ष जात नाही. जसं - कल्याणचा प्लान बदलून कर्जतला भेटणार असलेला आपला मित्र आला नाही. त्याचा फोन लागत नाही. ह्याची काळजी न वाटून, काहीच न करण्याच्या वयाचे राहुलचे मित्र नसतात. चाळीशीत इतपत तर समज येते, नाही का ? मोबाईल फोन जवळ नाही, पण एखादा नंबरही पाठ नसतो, असं नसतं ना ? किमान घरचा नंबर तरी प्रत्येकालाच पाठ असतो.
एकंदरीत चे. ए. एकदा बघायला नक्कीच हरकत नसावी, (शा. खा. भक्त पारायणंहीकरू शकतील) असा नक्कीच आहे. फक्त चित्रपटाचं तिकीट आणि रेल्वेचं खरंखुरं तिकीट एकाच किमतीचं नसावं !
रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/movie-review-chennai-express.html
सूसाघो काय आहे? >>>> सूरज
सूसाघो काय आहे? >>>> सूरज का सातवा घोडा, काय हे रिया
या लिस्ट मधे.."रेनकोट" हा
या लिस्ट मधे.."रेनकोट" हा चित्रपट सुध्दा टाक रे ,.... थिएटर मधे अवघी ३ टाकळी होती त्यातला मी एक

.
.
आज गूगल गंडलंय. स्केअरी मूवीज
आज गूगल गंडलंय. स्केअरी मूवीज असा सर्च दिला तर बीए पास दाखवतंय
सूसाघो काय आहे? >>>>>>> सुने
सूसाघो काय आहे? >>>>>>> सुने च्या सासु चा घो
किरण..... कैच्याकै असंबद्ध
किरण.....
कैच्याकै असंबद्ध पोस्ट !
म्हणजे त्याच्याआधी सगळं
म्हणजे त्याच्याआधी सगळं सुसंबद्ध होतं ?
(No subject)
आज गूगल गंडलंय. स्केअरी मूवीज
आज गूगल गंडलंय. स्केअरी मूवीज असा सर्च दिला तर बीए पास दाखवतंय >> मनी वसे ते गुगल वर दिसे
रोहित शेट्टीच्या सिनेमात
रोहित शेट्टीच्या सिनेमात असतात तसे चांगले पंचेस आहेत सिनेमाभर नि त्याने स्वःत वर अतिव कार पॉर्न टाकण्यापासून कंट्रोल केलाय हे जमेची बाजू. शाहरुखचे कॉमेडी टायमिंग परत परफेक्ट जमलय नि त्याच बळावर सिनेमा बघवतो. 'चुन्नी मुडैल है" हे वाक्य एकदम खतरा टाकलय. किती जणांना लक्षात आले देव जाणे.
असामी अगदी अगदी मी जेंव्हा
असामी अगदी अगदी


मी जेंव्हा पण ते चुन्नी मुडैल आठवते वेड्यासारखी हसत सुटतेय
आताच "धुम३" चे बहुचर्चित
आताच "धुम३" चे बहुचर्चित पोस्टर आले...
.
.
नेमके "धुम३" चे आहे की "जिस्म३" चे हेच कळत नाही........... आमिर खान आणि सन्नी लिओन पाठिमागुन सारखेच दिसतात....त्या पेक्षा अनिल कपुर ला घेतले असते तर कळल तरी असते बाप्या उभा आहे
वर "बॅटमॅन - डार्क क्नाईट राईज" ची सेम टु सेम कॉपी
बॉलिवुड वाले कधी ओरिजल पोस्टर बनवणार देव जाणे
धूम चे पाहिले नाही, पण क्रिश
धूम चे पाहिले नाही, पण क्रिश ३ चा प्रोमो पाहिला. मस्त वाटले स्पेशल इफेक्ट्स , एकदम हॉलिवुड च्या तोडीचे वातले मला तरी. इथले सुपरहिरो मूवीज पाहिले नाहीत मी पण प्रोमो वरून क्रिश तरी मस्त वाटत आहे!
या लिस्ट मधे.."रेनकोट" हा
या लिस्ट मधे.."रेनकोट" हा चित्रपट सुध्दा टाक रे ,.... थिएटर मधे अवघी ३ टाकळी होती त्यातला मी एक >>>मी सुद्धा रेनकोट थिएटर मधे पाहिला होता.....अरारा....
चेन्नई एक्स्प्रेस सुपर फास्ट
चेन्नई एक्स्प्रेस सुपर फास्ट दिसते आहे
बेसिकली ह्या रोलमध्ये कुणीही
बेसिकली ह्या रोलमध्ये कुणीही चालला असता.>>>>>>> पण त्यांनी हा रोल स्वीकारला असता का हा सुद्धा प्रश्न आहेच …. नुसतेच गाडीत बसून काहीच्या काही गाणे म्हणणे आणि मार मार मार खाणे, उरलेला वेळ टवाळक्या म्हणजे काही अर्थ आहे का …सिनेमे कसे असावे … जिंदगी ना मिलेगी दोबारा, रंग दे बसंती, बर्फी, दिल चाहता है वगैरे वगैरे........
चित्रपट म्हणजे मनोरंजन…
चित्रपट म्हणजे मनोरंजन… कितीही मान्य केले तरी काहीतरी 'अर्थ' तर असावाच राव … अर्थ असणार्या फिल्म्स मध्ये मनोरंजन नसतं असं थोडच आहे ......
कितीही मान्य केले तरी काहीतरी
कितीही मान्य केले तरी काहीतरी 'अर्थ' तर असावाच राव
>>>>>>>>>>>
मयी आपले अर्थशास्त्र कच्चे नाही ना... सिनेमा २०० कोटींचा धंदा करायला चाललाय, आणखी किती अर्थ हवा राव..
सध्या मायबोलीवर दुनियादारी व
सध्या मायबोलीवर दुनियादारी व शारुखने धुमाकुळ घातलाय. (मी अजुन पाहिला नाही चे.ए.)
देवा देवा, लवकर १ नवीन मराठी व हिंदी सिनेमा रिलीज होऊ दे म्हणजे सर्वजण शांत होतील.
वर गोविंदाचा विषय निघालाय.. मलापण पुर्वीचा गोविंदाने केलेला टाईमपास (डेव्हीड धवन बरोबर काम केलेला) आवडायचा.
काल पाहिला. मला आवडला.
काल पाहिला. मला आवडला.
चित्रपट पाहिला, धमाल मनोरंजन
चित्रपट पाहिला, धमाल मनोरंजन
काल इथे (व्हिएन्ना- ऑस्ट्रिया) मध्ये याचे खास शो होते आणि तेही हाउस फुल !
चित्रपट परीक्षण छान लिहिले आहे, धन्स.
हिंदी सिनेमा रिलीज होऊ दे
हिंदी सिनेमा रिलीज होऊ दे म्हणजे सर्वजण शांत होतील.>>>
राष्ट्रीय वस्त्रत्याग आंदोलनाच्या महान प्रणेत्या पूनमताईंचा कुटुंबवत्सल, भावनाप्रधान शिणुमा आला आहे.
जिंदगी ना मिलेगी दोबारा, रंग
जिंदगी ना मिलेगी दोबारा, रंग दे बसंती, बर्फी, दिल चाहता है वगैरे वगैरे........ >> ही अपर लिमीट आहे का ? असल्यास कठीण आहे
ही अपर लिमीट आहे का ? असल्यास
ही अपर लिमीट आहे का ? असल्यास कठीण आहे स्मित >>>>>>>>>>>>नाही हि अप्पर लिमिट नाही या पेक्षा आणखी अनेक आहेत पण …. चेए खुप्प आवड्ल्यांसाठी निदान 'हे सिनेमे तरी चांगले होते' असे सांगणे … म्हणून हि नावं
किरणाऊ, तुमचे वाक्य काय कळळं
किरणाऊ, तुमचे वाक्य काय कळळं नाही. कोण पुनम?
झकास सिनेमा आहे. पैसे वसूल.
झकास सिनेमा आहे. पैसे वसूल. फक्त तमिळ संवाद उपशिर्षकांत असायला हवे होते.
(शारूखचा रावनही मस्त होता.)
सुनिधी | 17 August, 2013 -
सुनिधी | 17 August, 2013 - 05:33
किरणाऊ, तुमचे वाक्य काय कळळं नाही. कोण पुनम?
>>>>>>>>>>>>>
पूनम पांडे च्या 'नशा' बद्दल बोलत आहेत ते..!
ब्रिटीश भारतात
ब्रिटीश भारतात स्वातंत्र्ययुद्धासाठी हाक देताना महात्मा गांधींनी देशबांधवांसाठी केलेल्या वस्त्रत्यागानंतर स्वतंत्र भारतात भारतीय संघ जिंकावा या उदात्त हेतूने (आ़णि नंतरही वेळोवेळी) देशवासियांसाठी ज्या आदरणीय व्यक्तिमत्त्वाने वस्त्रत्याग केला त्याबद्दल माहिती असू नये हे पाहून अंमळ खेद वाटला.
कोणाचेतरी फेसबुक
कोणाचेतरी फेसबुक अपडेट.....
श्री. शाहरुख खान (पती - गौरी खान,
सहनिर्मात्या चेन्नई
एक्सप्रेस)
स. न. वि. वि.
विषय : पीव्हीआर मधील तुझ्या शोच्या तिकिटांचे पैसे
परत मिळणे
बाबत...
मित्रांच्या आग्रहावरून काल तुझा ` चेन्नई
एक्सप्रेस` हा चित्रपट
पहिला. तद्दन भिकार वाटला. यात काही वेगळे दिवे
लावले आहेत, असे
मित्रांनी सांगितल्यामुळे आम्ही तिकिटे काढली.
निराशा झाली.
खरे तर तुझे पडद्यावरील माकडचाळे मला कधीच
आवडले नव्हते.
वास्तविक, तुझ्या चेहऱ्यावरच्या,
मानेवरच्या सुरकुत्या स्पष्ट
दिसताहेत. ५५ वर्षे वयाचा नायक
प्रेक्षकांनी किती वर्षे सहन
करायचा? अर्थात, काही जण तो सहन करतात...
त्यांच्या सहनशक्तीला प्रणाम.
असो, वाया घालविलेल्या पीव्हीआर मधील
तुझ्या शोच्या तिकिटांचे पैसे
मला परतकरून टाक.
तुझा `पैसा वसूल` झाला नाही.
तुझ्या सिनेमावर उतारा म्हणून मी `दुनियादारी`
पहिला. तो झकास
जमला. जमलेतर तो सिनेमा पाहून घे. आमची सई
कशी दिसते,ते सांग. माझे पैसे
तेव्हढे परत दे
बाबा...
असे पैसे परत मिळत असतील तर
असे पैसे परत मिळत असतील तर मलाही पैसे परत द्या.. मलाही नाही आवडला चेन्नई एक्सप्रेस.. अॅडमीनना विनंती माझे परीक्षण अन पोस्ट उडवाव्यात जेणे करून मला सिनेमा आवडला नाही हे सिद्ध करायला कायद्याची अडचण येणार नाही..
तसेच दुनियादारीचेही पैसे परत मिळाले तर बरे होईल.. ते देखील डबल.. मी दोनदा पाहिला.. वाटले किमान दुसर्यांदा तरी आवडेल, पण नाही, दुसर्यांदाही पकलो.. काही नाही, त्याचेही पैसे मला परत हवेत..
टिव्ही वर च्या बिनडोक
टिव्ही वर च्या बिनडोक मालिकांमुळे महीन्याचे पैसे जातात,,, ते ही मला परत द्या
Pages