तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईआईगं ....सगळे अभिप्राय वाचून Rofl ....हसून हसून कोसळण्याची वेळ आली. तेसुद्धा मुलाला शाळेत आणायला आलेय आता इथे तेव्हा....एकटीच उभी राहून हसताना पाहून दोन चायनीझ आणि एक मक्कू(मेक्सिकन) आया माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहताहेत. त्यांचे चेहरे बघून पुन्हा अशक्य हसू आलं. देवारे हसू आवरता येणं अत्यावश्यक आहे.

अबोलीजाह्नवी मस्त आहेत ना हे सगळे मालिका धागे. मनाला टवटवी देणारे. आणि तुमच्या सगळ्यांच्या कोमेंट्स एक्से एक. Lol

या मालिकेत ऑल्मोस्ट सगळ्यांना एकच रोग आहे - स्वतःला जे काही म्हणायचंय ते म्हणायचं आणि वॉकआऊट! आणि अगदी तसं नसेल करायचं तर ट्रॅफिक पोलिसासारखी एका हाताने 'थांब' ची खूण करायची आणि समोरच्याला बोलू द्यायचं नाही अजिबात.

आजचा एपिसोड पाहून तर त्या मुधोळकरांच्या मठ्ठ्पणाची दाद द्यावीशी वाटली. अरे, त्या अनघाचं येणं पण सत्याच्या आईला आवडलं नाहीये ना? मग तिला थेट सत्याच्या खोलीत झोपू कसं दिलं? शिवाय त्याच्या जस्ट आधी सत्या आईला म्हणतो की अनघा मंजूषा ताईंबरोबर राहील. मग ती त्याच्या खोलीत कशाला घेऊन जाते अनघाला? सगळाच गोंधळ. चिमा आधीचं न वाचताच पुढचं लिहीतो का? Proud

आज सकाळी पोळ्या करताना ऐकल अनघा राजे बोलत होती, बोलता बोलता ती म्हणाली "कस आहे ना सत्यजीत"? तिला पण लागण झाली "कस आहे ना" रोगाची Lol इतक हसायला येत होत मला पण हसता आल नाही कारण घरच्यांना काय सांगणार की तिच्या वाक्यात इतक हसण्यासारख काय आहे ते? Biggrin

>>मला तुझे काही एक ऐकून घ्यायचे नाहीये असं म्हंट्ल्यावर त्या व्यक्तीचं पटकन तोंड दाबून काय बोलायचेय ते बोलून टाकावं..काय तर उगिच्यौगीच

>>मंजिरीच डोकं फक्त केस उगवण्याच्या कामाच आहे तेव्हड!

__/\__ Proud

>>शिवाय त्याच्या जस्ट आधी सत्या आईला म्हणतो की अनघा मंजूषा ताईंबरोबर राहील.

ह्यांनी काय ह्या सगळ्या बायांना पोसायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का? हायला, आमच्या घरात टीव्ही दुरुस्त करायला मेकॅनिक आला तर कधी जातो असं होतं आणि हे खुशाल लोकांना ठेवून घेतात. महान आहेत.

काल मंजिरीला कानपटावंसं वाटलं खरोखर. काय ते एकदा ऐकून घे की बाई. सत्या तिला म्हणतो की तुझा गैरसमज झालाय तर म्हणे हे वाक्य ऐकून मला कंटाळा आलाय. अग सटवे, आम्हाला पण तुझं 'कसं असतं ना', 'अहो, तुम्ही ऐकून घ्या', 'तुम्ही काय म्हणताय मला काही कळत नाहिये' ही वाक्यं ऐकून कंटाळा आलाय.

अग स्वप्ने तुला समजल का? मंजिरिला सर्वोत्कृष्ठ सुनेचा झी मराठीचा पुरस्कार मिळाला आहे...... Lol

कस ऐ ना , आम्हाला एवढ्या शिव्या घालून ही इमानेईतबारे तुतिमी पाहील्याबद्दल आदर्श सहनशील प्रेक्षकांचा पुरस्कार मिळणं प्राप्त आहे..

कस ए ना रमा.... ही सगळी मत प्रेक्षकांनीच दिलेली आहेत. यावरुन अस लक्षात येत की मराठी प्रेक्षकांच्या मनातुन "आशा काळे", "अलका कुबल - आठल्ये" या मोठ्या पडद्यावरच्या अखंड वाहणार्‍या नद्या अजुन आटल्या नाहियेत. त्यामुळे धन्य ते प्रेक्षक अस म्हणायची वेळ आली आहे.

अरे बंद करा रे ही सिरीयल्.:राग::अरेरे:

वात आणला चिमाने आणी मंजिरीने. फुकणीचे कुठुन नवरा बायको झाले काय माहीत. एकमेकांशी जर मोकळेपणाने बोलताच येत नसेल तर ते नाते काय कामाचे? नुसतीच पळापळी केलेली दिसतेय सप्तपदीच्या नावाखाली. ( सिरीयलबद्दल बोलतेय हो मी.:खोखो:)

आणी ती मोतीवाली बाई कधी येणारे ऑस्ट्रेलीयावरुन? जरा तिचे दात विचकणे कमी करेन म्हणते.

तिकडे राहिबामध्ये सीमावैनी सौरभ बाळाला मोठ्ठे करण्याच्या गोष्टी करतायत आणी इकडे मंजिरी वैनी घटस्फोटाच्या तयारीत आहेत.

रश्मी, हे चांगलं नाही, 'भाषाशुद्धी, अध्याय ५- तांबडेबाबा आणि आपण' वाचायला सुरुवात करा...चरण तुम्हारे...

ह्या फुकणीचे म्हणजे फुकणी शब्दाचा अर्थ मला आजही माहीत नाही, शप्पथ.:स्मित: पहिल्यांदा ऐकले तेव्हा वाटले की ती शेगडी किंवा चुलीला विस्तव फुंकण्याकरता वापरतात तशी फुंकणी आणी तिचा अपभ्रंश म्हणजे फुकणी.:फिदी: आणी बायका जास्त बोलतात, म्हणून त्यांना फुकणी म्हणत असावेत असे वाटले.:फिदी:

मला पेताड या शब्दाचा अर्थही माहीत नव्हता, जेव्हा मोठे दिर त्यांच्या मित्राबद्दल बोलत होते तेव्हा ऐकला.:फिदी: आपली मराठी भाषा दिवसेंदिवस एवढी समृद्ध होत चालली आहे की विचारु नका.:खोखो:

अनघा राजेच्या तोंडी कसं आहे ना ऐकलं आणि खात्री पटली....
'मांडलेकर' तिथे 'कसं ए ना'
रच्याकने....एका लग्नाची तिसरी गोष्ट मधे पण कसंए ना ची एन्ट्री झालीच असेल. मांडलेकरांच्या लॅपटॉप वर पूर्णविराम, स्वल्पविराम वगैरे बहुतेक कसंए ना ने ऑटोकरेक्ट होत असावं.

कसं ए ना, मोतीवाल्या बाईनी, देखण्याताईंची जोरात पंचाईत करून ठेवलेली आहे. तिकडे मला त्या सुहासची इतकी काळजी लागून राहीलीये ना, की पुछो मत. कसं ए ना, मला पहिल्यापासूनच भेदरलेल्या कुत्र्यांवर दया येते..

सगळ्यांच्या पोस्टी धन्य धन्य आहेत.

मंजिरिला सर्वोत्कृष्ठ सुनेचा झी मराठीचा पुरस्कार मिळाला आहे... नह्हीsssss ये हो नही सकता :Surprise:
अग साकेता हो मीच दिली ही बहुमुल्य माहिती या धाग्यावर... ही बघ त्यावरची रमाची आणि नंतर माझी प्रतिक्रीया.
रमा
कस ऐ ना , आम्हाला एवढ्या शिव्या घालून ही इमानेईतबारे तुतिमी पाहील्याबद्दल आदर्श सहनशील प्रेक्षकांचा पुरस्कार मिळणं प्राप्त आहे..

मुग्धा.रानडे
कस ए ना रमा.... ही सगळी मत प्रेक्षकांनीच दिलेली आहेत. यावरुन अस लक्षात येत की मराठी प्रेक्षकांच्या मनातुन "आशा काळे", "अलका कुबल - आठल्ये" या मोठ्या पडद्यावरच्या अखंड वाहणार्‍या नद्या अजुन आटल्या नाहियेत. त्यामुळे धन्य ते प्रेक्षक अस म्हणायची वेळ आली आहे.

हो मुग्धा, तुझ्याच पोस्टवर दिलेली प्रतिक्रिया आहे ती! पण कसं ए ना त्या मंजिरीसारख्या व्यक्तीरेखेला हा पुरस्कार मिळू शकतो ह्यावर विशास बसत नाही. जास्तीत जास्त रडकेपणा आणि बावळटपणा हा तर क्रायटेरिया नसतो ना ह्या लोकांचा "सर्वोत्कृष्ट सुन " म्हणून?

अग तेच ना साकेता हा पुरस्कार प्रेक्षकांकडुन आलेल्या मतांवर ठरवला गेला आहे. आता मराठी प्रेक्षकांना जास्तीत जास्त रडकेपणा आणि बावळटपणा हाच क्रायटेरिया योग्य वाटतो ना सर्वोत्कृष्ट सुनेसाठी त्याला काय करणार? कसं ए ना (या वाक्याशिवाय ह्या धाग्यावरील सगळ्या प्रतिक्रिया ओक्याबोक्या वाटतात :हाहा:) एकतर प्रत्यक्षात इतक रड आणि बावळट कोणी नसतच आणि असलच तर त्याला उठसुठ, येताजाता शिव्या शाप आणि टोमण्यांव्यतिरिक्त काहि मिळत नाही, पण पडद्यावरच्या सुनेला पुरस्कार मिळतात

मंजिरी सर्वोत्कृष्ट सून? अरेरे.... कसं ए ना तिला फक्त मिसेस बावळट नं.वन, मूर्खशिरोमणी, यडपटचंद्रिका या पुरस्कारांनी गौरवलं जाऊ शकतं.
खरंतर यावर्षी सर्वोत्कृष्ट सून कॅटेगरीमध्ये विजेती कोणीही नाही असंअसायला हवं होतं.

Pages