तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे कसे आहे ना वाक्य मंजिरीच जास्त वापरते. तिच्याच नावावर त्याचे रेकॉर्ड आहे. चेहेर्‍यावर आणी आवाजात जास्तीत जास्त खवचटपणा आणण्याचा प्रयत्न करत ती तसे बोलत असते.

कसं आहे ना नेत्रा/ कसं आहे ना आई/ कसं आहे ना गौरांगभावजी/ कसं आहे ना आजी/ कसं आहे ना सत्यजीत/ कसं आहे ना अनघाताई/ कसं आहे ना मंजुषाताई

आता प्रिया आणी सुहास चुकुनमाकुन तोंड दाखवायला आले तर त्यांना पण कसं आहे ना ऐकावे लागेल.:फिदी:

आज दुपारी बघितल की सौ. देखण्याबाई उर्फ डुचकी मंजिरीला सांगत असते की सत्यजीतची काही चुक नाही, प्रियाच त्यांच्या गळ्यात पडत होती वगैरे.... बादवे कुणालाच त्यांना परत बोलवावेसे वाटत नाहीये का? इतक सगळ होउनही मुधोळकर मंजिरीची समजुतच घालत बसले आहेत. प्रियाला समोर बोलावुन जाब वगैरे विचारण प्रकार कोणाच्या डोक्यातच येत नाहीत.....

अरे आले होते, आले होते हे सगळे संख्येच्या ( दादाचा चमचा) मनात. त्याने तसे दादाला बोलुन दाखवले की आपण मोतीवाल्या बाईंना ऑस्ट्रेलीयाला जाऊन भेटु. पण दादाने खोडा घातला, म्हणाला की तिथे जायला तिकीट, पासपोर्ट, विसाची सोय कशी करणार? विंग्लिश पण बोलता आले पाहीजे ना.:फिदी:

बरं, दादाचे इंग्लिश एकदम कोकाटे छाप फर्डे. आय मायसेल्फ दादा होळकर वगैरे. आता खरं तर वत्सला, लाजो आणी निनाद हे सगळे मायबोलीकर ऑस्ट्रेलीयात रहातात, त्यांनीच प्रिया आणी सुहासला भेटुन मिनी गटगं करावे आणी प्रियाबायला जाब विचारावा.:खोखो:

अरे, मायबोलीकरांना कशाला त्रास देताय??? ती ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम आली आहे ना भारतात. त्यांची आणि होळकरांची गाठ घालून द्या. ते नीट निरोप समजावून सांगतील कांगारूंना.

अग स्वप्ना ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम भारतात आली आहे आणि हे दोघे तिकडे गेले आहेत आणि कस आहे ना... ऑस्ट्रेलिअन प्लेअरपेक्षा माबोकर जास्त चांगला जाब विचारतील त्यांना

हे कसे आहे ना वाक्य मंजिरीच जास्त वापरते. >>>>> हो रश्मी मंजिरी जास्तच वापर करते ह्या वाक्याचा इतरांपेक्षा. पण प्रत्येकाच्या तोंडात हे वाक्य येतेच कधी ना कधी. (अपवाद बहुतेक दादा होळकर). एवढचं काय ते नवीन "पात्र" घेतलयं ना अनघा रजेचा नवरा म्हणून ते पण काल सत्यजितशी भांडताना म्हणत होतं "कसं आहे ना सत्यजितब्ला ब्ला ब्ला ब्ला"

हो अबोली हे हि अशक्य वाटत नाही.
बोलायला शिकताच कदाचित शुभ्रा असं काहितरी म्हणेल सरनाईकांना "कशं आहे ना आजोबा तुमच्या मुलीशी कशं हि वाग्ले असले तरी ते माझे आदल्श वडील आहेत"

बोलायला शिकताच कदाचित शुभ्रा असं काहितरी म्हणेल सरनाईकांना "कशं आहे ना आजोबा तुमच्या मुलीशी कशं हि वाग्ले असले तरी ते माझे आदल्श वडील आहेत">>>>> आदर्शपणाची व्याख्या जरा तपासायला पाहिजे. ज्या मुलीच्या जन्माच्या वेळेस तिचे तिर्थरूप तिच्या आईला तशा अवस्थेत घराबाहेर काढायला निघाले आणि नंतर कुठेतरी गायब झाले होते असे वडिल जर आदल्श वडील ? Uhoh

आज म्हणे मंजिरीला ती राजे, सत्यजित च्या खोलीत झोपलेली दिसणार... व्वा!! आणि खात्रीपूर्वक ती कुणालाही नीट न विचारता आदळाआपट करून निघून जाणार..कम्युनिकेशन नाही म्हणजे किती ना!!!! कोणी कुणाशी काही बोलून क्लीअर करायचे नाही..अग माझे ऐकून तरी घे/नाही मला काही एक ऐकून घ्यायचं नाही, याच्यातच बरबाद होत रहाय्चं!!!

कम्युनिकेशन नाही म्हणजे किती ना>>>> रमा, या एकाच युक्तीच्या जोरावर तर सगळ्या मालिका युगे अठ्ठाविस टिआरपीच्या विटेवरी उभ्या आहेत ना.....

तो असली डोक्याला हेडेक मालिकाही बनवेल असे वाटत नव्हतेच की.:खोखो:

आणी आधी दुसर्‍याचे काही एक ऐकुन न घेता दुसर्‍याला व्हिलन समजणे हे आमच्या घरातील काही मान्यवर ज्येष्ठ सदस्य अहोरात्र करत असतात( सासरचे हो), त्यामुळे त्या गैरसमजाबद्दल मला नवीन काही वाटत नाही.:फिदी:

मला तुझे काही एक ऐकून घ्यायचे नाहीये असं म्हंट्ल्यावर त्या व्यक्तीचं पटकन तोंड दाबून काय बोलायचेय ते बोलून टाकावं..काय तर उगिच्यौगीच

रमा.:हाहा: रमा हे बर्‍याच वेळा माझ्या मनात येतं की. नाहीतर जोरात किंचाळुन त्या व्यक्तीला कानफटवुन सांगावं की अरे बाबा'/ बाई त्या घटनेचा अर्थ असा होता.:फिदी:

पण असे नाही केले तर यांची पोटे कशी भरतील!

नै तर काय, पिढ्या न पिढ्या यांना काही तरी सांगाय्चच असतं.

आता ती मंजिरी अनघाला बेडरूम मध्ये बघेल आणि तशीच उलट पावली परत जाईल, बाबा बाबा करत. विचारय्चं ना तिला, अगं ए बाई, अजुनही नवरा आहे तो माझा, तू अशी कशी हिम्मत केलीस गं, कौतुक वाटतं तुझं म्हणून

मला द्यावासा नाही घ्यावासा वाटतो.. सगळ्यात आधी सीमावैनीचा आणि नं २ गार्गी(तिला डायलॉग्स पण नीट म्हणता येत नाहित राव) बाकीच्यांचे नं रोज बदलत जातात. कोण किती डो़क्यात जात त्यानुसार पण सीमावैनी आणि गार्गी always on top 2 positions of the list of to be murder....

तुतिमी मधला दादा होळकर ईतका हुश्शार माणूस आहे, त्याच्या घरी टीव्हीच नाहीये..
अर्थात आप्ल्यालाही कुणी डोक्याला पिस्तुल लावून बघा असं सांगितलेलं नसतं, पण आ, 'बैल मुझे मार' असं म्हणणे हा भारतीय प्रेक्षकांचा जन्मसिध्द अधिकार आहे, आणि तो ते मिळवतातच.

<<नै तर काय, पिढ्या न पिढ्या यांना काही तरी सांगाय्चच असतं.>>:D होना.....

राधाला तर सौरभला गोड बातमी द्यायचा सुद्धा मुहुर्त मिळाला नाही अजून. उद्या ते मूल जन्माला येऊन पुढे सौरभला शोधून काढेल आणि सांगायला जाईल..."मला तुला(ईथे तुम्हाला नाही कारण आजकालची मुले बाबांना तू म्हणतात) काहितरी सांगायचे आहे" तेव्हा सौरभ "मी आता काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही" म्हणून निघून जाईल.

त्या नेत्राला का त्रास देताय रे??? प्रिया करून-सावरून बाजूलाच!! सत्यजित सगळ करून अजुनी पवित्र!!!
मंजिरीच डोकं फक्त केस उगवण्याच्या कामाच आहे तेव्हड!

Pages