तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजिरी सासरी असली की लांबलचक वेणी आणि माहेरी छोटे मोकळे केस असं काही कोडींग आहे का?>>>> अग आता अहोंच्या सांगण्यावरून तिने केस कापलेत. सो सासरी माहेरी आता आहे त्याच हेअरकट मधे दिसते ती.

मंजिरी घर सोडून जाते तेव्हा प्रिया दिल्ली का कुठेतरी असते. ती घरी फोन करते तेव्हा आत्याबाई कडून तिला सर्व कळते. सुहासला मंजीचा फोन येत असतो ते बघून ती लगेच फोन बंद करुन ठेवते कारण त्याच्या दुसर्याच दिवशी ते ऑला जाणार असतात.

अंजली_१२: प्रियाच्या बळीच्या बकर्याचं नवीन बारसं ....माकडतोंड्या....आमाला लई म्हंजी लईच भावलं....यकदम साजेसं हाये.... कसं आहे ना,त्याच्यावर कॅमेरा रोखला असेल तर हा आता 'हुप हुप' करतो की काय असं वाटतं. ( ह्या मालिकेत सगळीच 'पात्रं' नेहेमी 'कसं आहे ना' या पालुपदाचा धोशा लावून असतात, अतिशय कृत्रिम वाटतं ते. भयंकर डोक्यात जातं)

अबोली मी बघितला अनघा राजेचा घो आज सकाळी त्याच नाव निनाद आहे. तो आधीपण एका मालिकेत खलनायक म्हणुन आला होता. आणि सगळ्यात आधी तो झी तेव्हाच अल्फा मराठी मराठीवर एक लहान मुलांची मालिका लागायची 'दे धमाल' नावाची ज्यात प्रिया बापट, स्पृहा जोशी वगैरे आताच्या मोठ्या मंडळींनी बालकलाकार म्हणुन काम केल होत त्यात हा पण होता बालकलाकार म्हणुन... याच शिरेलीत एक मुलगा होता ज्याने ३ इडियट्स मध्ये मोठ्या सेंटिमिटरच काम केल आहे. ही मालिका या सगळ्या बालकलाकारांची पहिलीच मालिका होती बहुतेक....

ए तो प्रियाचा नवरा माझा मित्र आहे बर का . गेल्या आठवड्यात त्याच्याशी बोलले. काल पण त्याचा मिस्ड कौल येउन गेला .त्याला सांगू का मायबोली जोइन करायला. त्याला कळेल तरी आपण सिरियल बद्दल आणि त्याच्या बद्दल काय काय बोलतो ते Lol

आत्ता तासाभरापूर्वी त्याला कौल करत होते .तर तो उचलत नव्हता . आत्ता दहा मिनिटापूर्वी त्याचा मेसेज आला . ताई काल मी तुमच्या घराजवळ आलो होतो. तुम्हाला भेटायचं होत. म्हणून फोन केला . तर तुम्ही उचाललातच नाहीत Happy

>>ऑस्ट्रेलियात सुखाने नांदताहेत....पण मंजिरीचे वडिल आता काडी लावतिल.>> प्रियाने हि मालिका सोडली का?
पण जरी सोडली असेल तरी मालिका संपायची शक्यता कमीच आहे. (जर मालिका सोडली असेल तर) कदाचित असे काहितरी दाखवू शकतात कि ऑस्ट्रेलियाला जाताना किंवा तेथून परत येताना त्यांच्या विमानाला अपघात होतो व ती आता ह्या जगात नाही अशी सर्वांना खात्री पटते. पण प्रत्यक्षात ती जिवंत असते. व परदेशातूनच एका प्रसिद्ध डॉ कडून प्लॅस्टिक सर्जरी करून घेते व एक नवी व्यक्ती म्हणून कोल्हापूरात व पर्यायाने सत्यजितच्या आयुष्यात परतते.. ती प्रत्यक्षात प्रियाच आहे हे कोणालाच ओळखू येत नाही कारण लक्षात घ्या हि खास मालिकांमध्ये केली जाणारी प्लॅस्टिक सर्जरी आहे त्यामुळे प्रियाचा केवळ चेहराच नाही तर आवाज, शरीराची ठेवण, उंची सगळेच बदललेले आहे. व ती आता नव्याने सज्ज होते सत्यजितवर सूड उगवण्यासाठी, पुन्हा नव्याने कारस्थानं करण्यासाठी. तिचे खरे रूप कळायला एक - दिड वर्ष सहज घालवता येइल.:P Proud

छे! आता काय होईल माहीत्ये? अनघा राजेचा नवरा दादा होळकरला हवा असलेला 'खांदा' बनेल. थोडक्यात तो त्याला हाताशी धरेल. आणि मग प्रिया परत येऊन ती पण या गँग मधे सामील होईल. की पुन्हा सत्यजितच्या मागे सगळे हात धुवून लागतील.

हे लोक रानडे रोडवर भाजी घ्यायला गेल्यासारखे ऑस्ट्रेलिया, अमेरिका वगैरेला कसे काय जातात? आणि तिथे जाऊन काय करतात हा एक संशोधनाचा विषय ठरावा. सत्याच्या चेहेर्‍यावर कायम एक 'आज पण झालं नाही. कायमचूर्ण घ्यावं का आता?' असा विचार करत असल्यासारखा भाव असतो - मग प्रसंग काहीही असो.

सत्याच्या भावाला दारू पिऊन आल्याचा अभिनय अजिबात जमला नाही. त्याची बायको पण विचारत होती की तू दारू पिऊन आला आहेस का? Proud

आज पण झालं नाही. कायमचूर्ण घ्यावं का आता?' असा विचार करत असल्यासारखा भाव असतो - मग प्रसंग काहीही असो... Rofl

स्वप्ना_राज Rofl
मला 'सत्या' ला पुढे सांगावेसे वाटते की कायम चूर्ण अप्रभावी ठरल्यास ' एरंडेल तेल' वापरून पहा. त्यांचा हा क्रॉनिक त्रास असल्यामुळे निरनिराळे उपाय करावे लागतील. मालिकेत फार पूर्वीपासून त्यांच्या चेहर्यावर असला भाव ( अ‍ॅक्च्युअली भावांचा अभाव ) दिसला आहे. अरनॉल्ड शिवाजीनगर नव्हे नव्हे श्वारझेनेगर आणि सत्यजित यांच्यातला कॉमन फॅक्टर आहे हा. Wink

कसं आहे ना हे बाक्य प्रत्येक एपिसोड मध्ये कोणा ना कोणाच्या तोंडातून ५-६ वेळा तरी निघतेच. शिवाय एका लग्नाची ति. गोष्ट च्या प्रोमोमध्येही हे वाक्य असायचे,"कसं आहे ना, घर माणसांनी बनतं.". हे पण बहुतेक चिमांनीच लिहिले असेल?

नक्किच साकेता.... या मालिकेचा पटकथा लेखक तोच तर आहे..... त्यामुळे "कस आहे ना" "अहो पण" "अहो काय तुम्ही" इ. तुतिमी फेम वाक्यांचा डबल रोल बघायला मिळणार आहे.

साकेता, मुग्धा....अनुमोदन. या वाक्याचा इतका तिटकारा आला आहे, विशेष करून कोणी वयाने लहान व्यक्ती मोठ्या व्यक्तीला म्हणत असेल तर.
बाकी तुतिमी मध्ये तर काय विचारता,शुभ्रा जेव्हा बोलायला लागेल तेव्हा आई/ बाबा न म्हणता डायरेक्ट म्हणेल, 'कसं आहे ना' ..... ही ही..

Pages